Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’4′फायद्यांसाठी Beer पिणं आरोग्यदायी !

$
0
0

पार्टीचा मूड असेल किंवा शुक्रवारी आरामात विकेंडची मज्जा घेताना सोबतीला बिअरचा ग्लास ठेवणे अनेकांना आवडते. बिअर इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. त्यामुळे वेटलॉसच्या मिशनवर असणार्‍या अनेकांना नेमकी किती प्रमाणात बिअर घ्यावी हेदेखील जाणून घ्या. म्हणूनच तुमच्या आवडीच्या बिअरमध्ये किती कॅलरीज असतात हे नक्की जाणून घ्या.  पार्टीचा आनंद घेऊनही हेल्दी राहण्यासाठी नक्की पाळा या खास टीप्स !

  • लाईट बिअरचा एक कॅन – 102.7 cal (1 can = 350ml)
  • रेग्युलर बिअरचा एक कॅन – 153.1 cal ((1 can = 350ml)
  • बाटलीभर फ्रुट बिअर – 130 cal (1 bottle = 550 ml)
  • बाटलीभर Sapporo बिअर – 257 cal ((1 bottle = 550 ml)

*Calories calculated using HealthifyMe, the world’s first Indian nutrition tracker.

तुम्हांला वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर रेग्युलर बिअरऐवजी लो कॅलरी बिअरची निवड करा. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. बाजारात अनेक लो कॅलरी बिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. Foster’s light  किंवा  Kingfisher light beer  या पर्यायांचा तुम्ही वापर करू शकता.  हॅंगओव्हरला दूर करतील या खास टीप्स !

बिअर पिणं फायदेशीर असतं का ?

  • काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी करण्यास मदत होते. बिअर प्यायल्याने शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. परिणामी अर्थ्राईटीसचा त्रास वाढण्यास प्रतिबंध होते.
  • एका संशोधनानुसार, नियमित सुमारे 473 मिली (1 pint) बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते.
  • बिअर प्यायल्याने, मेंदूतील डोपामाईन नामक घटकाला चालना मिळते. यामुळे तुम्ही आनंदी होण्यास मदत होते.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>