मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा.
कसे ठरते फायदेशीर ?
खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
कसे बनवाल हे मिश्रण ?
- तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.
- पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्या भागावर शेक द्यावा.
कधी कराल हा उपाय ?
- डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
या सोबतीला तुम्हांला एका मिनिटांत डोकेदुखीचा त्रास दूर करण्याचा सहज -सोपा जाणून घेण्यासाठी जरूर येथे क्लिक करा.
संबंधित दुवे -
मायग्रेनची डोकेदुखी कमी करणारे ‘भ्रमरी प्राणायम’ !
अंगदुखीची ही ’10′ कारणं देतात तुम्हांला आजाराचे संकेत !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Home remedy for headaches that works like a charm!
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.