Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

औषधांमुळे दातांवर डाग पडतात का ?

$
0
0

शुभ्र व चमकदार  दात आपल्या सौंदर्यात भर पाडतात. तसंच आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम असण्याचे ते एक लक्षण आहे. पण काही चुकीच्या सवयींमुळे दात खराब होतात, त्यावर डाग पडतात. साधारणपणे कॉफी, चहा, व्हाईन, कोला, रंगीत सॉसेस, ब्लु बेरीज सारखी रंगीत फळे यांसारख्या पदार्थांमुळे दातांवर डाग (Teeth stains) पडतात. परंतु, याचे अजून एक कारण म्हणजे औषधं. यामुळे देखील दातांवर डाग पडतात. परंतु, बऱ्याचजणांना हे माहित नाही. या सोप्या पद्धतीने दात होतील शुभ्र आणि चमकदार !

दात स्वच्छ घासणे, तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी नीट काळजी घेणे हे इतकंच पुरेसं नाही. ब्रश करताना या ’7′ चुका टाळा

कारण हे सगळं करून देखील काही ठराविक औषधांमुळे तुमच्या दातांना हानी पोचू शकते. म्हणून दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे डेंटल सर्जन आणि सिनियर कॅन्सल्टंट डॉ. नीरज वर्मा यांनी याबाबत मार्गदर्शन केले. नैसर्गिक उपायांनी वाढवा दातांची शुभ्रता !

सगळ्याच नाही पण काही औषधांचा साईड इफेक्ट दातांवर होतो आणि परिणामी दातांवर डाग पडतात. दातांच्या आरोग्याबाबत या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Tetracycline आणि doxycycline ही कंपाऊंड असलेल्या औषधांमुळे विशेषतः लहान मुलांमध्ये intrinsic teeth stain होते. यामुळे दातांवर पिवळे किंवा चॉकलेटी डाग पडतात. त्याचबरोबर दातांवर पॅचेस किंवा लाईन्स येऊन दातांचा रंग बदलतो. एका मिनिटात हटवा दातांचा पिवळेपणा !

फ्लाराईडच्या अति वापरामुळे देखील दातांवर डाग पडतात. तसंच उच्च रक्त दाबाच्या औषधांमुळे देखील दातांचा रंग बदलतो. Antipsychotic औषधांचा ही दातांवर परिणाम होतो.  जरूर वाचा: दात पिवळे होण्याची कारणं जाणा, भविष्यातील धोका टाळा

दातांवर डाग पडल्यावर काय करावे?

सगळ्यात आधी औषधांचा दातांवर होणाऱ्या साईड इफेक्ट बाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज असल्यास डॉक्टर औषधं बदलून देतील. तोंडाची स्वच्छता राखा. दिवसातून दोनदा ब्रश करा. रात्रीही ब्रश करण्याची सवय कमी करेल या ’5′ समस्यांचा धोका !

कारण दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यास अन्नाचे बारीक कण दातांवर जमा होऊन दातांवर डाग दिसू लागतील. त्याचबरोबर दातांवर डाग असल्यास तुम्ही प्रोफेशनल टीथ क्लीनिंग टेक्निक्स किंवा टीथ व्हाईटनिंग ट्रीटमेंट घेऊ शकता. नक्की वाचा: दातांवर डाग पडण्याची समस्या कशी कराल कमी ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>