गर्भारपणाबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न, शंका असतात. त्याबद्दल अनेक समज-गैरसमज देखील प्रचलित आहेत. गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !
या गैरसमजामुळे गर्भारपणात अनेक महिला कमी पाणी पितात. कारण अधिक पाणी प्यायल्याने सेल्समध्ये (पेशींमध्ये ) पाणी जमा होऊन पायांना सूज येते. असे अनेकजणींना वाटते. पण असे तेव्हाच होते जेव्हा पाणी सेल्स मधून एक्सट्रासेल्युलर स्पेस मध्ये जमा होते आणि त्यामुळे सूज येते. गर्भारपणात स्त्री मध्ये अनेक शारीरिक बदल होतात. चेहऱ्यावर सूज येणे, हातापायांवर सूज चढणे हे अतिशय सामान्य आहे. म्हणून अनेकींना वाटते पाणी कमी प्यायल्यास सूज कमी येण्यास मदत होईल. पण हे खरे नाही. गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत
मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटलचे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट डॉ. वाय. एस. नंदनवार यांच्या सल्ल्यानुसार शरीरात ८०% पाणी असतं. शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी त्याची गरज असते. परंतु, त्यापेक्षा अति किंवा कमी पाणी घेतल्यास ब्लड पंपिंगच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो व त्यामुळे सूज येण्याचा धोका वाढतो. प्रेग्नेंसी मध्ये का बदलते तुमची शू साईझ?
त्याचबरोबर प्रेग्नेंसीमध्ये स्त्रवणाऱ्या progesterone हॉर्मोन मुळे शरीरात पाणी जमा होऊ लागते (water retention) त्यामुळे सूज येते. (edema) यावरून असे दिसून येते की पाणी कमी प्यायल्याने सूज येण्याचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढेल. गरोदरपणातील लठ्ठपणा,मधूमेह व इतर आरोग्य समस्यांचा बाळावर होतो असा परिणाम !!
परंतू फक्त पाणी जमा झाल्याने सूज येत नाही. तर त्याची अजून अनेक कारणे आहेत. प्रोटीनची कमतरता, अनेमिया, हृदयविकार, रक्त गोठणे (thrombus), हत्तीरोग यामुळे देखील सूज येऊ शकते. म्हणून, प्रेग्नेंसीमध्ये पायावर सूज दिसू लागल्यास काही घरगुती उपाय करण्यापेक्षा लवकरात लवकर स्त्री रोग तज्ज्ञांची भेट घ्या. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
पाणी पिण्याच्या प्रमाणाबद्दल डॉ. नंदनवार म्हणाले की, प्रत्येक प्रेग्नेंट स्त्रीने दिवसातून कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट ध्यानात असू द्या की, पाणी कमी प्यायल्यामुळे सूज येण्याचा त्रास कमी होणार नाही. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock