मेंदूला होणार्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणते प्रथमोपचार करावे याबाबतचा सल्ला फोर्टीस हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट फ़िजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी खास सल्ला दिला आहे. त्यामुळे तुमच्या आसपास कोणाला चक्कर आल्यास घाबरून न जाता त्यांना ही मदत नक्की करा.
- चक्कर आलेल्या रुग्णाला पाठीवर, सरळ झोपवा. आणि त्याचे पाय थोडे वर उचला यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारायला मदत होईल. ( नक्की वाचा : प्रेगन्सीमध्ये चक्कर येण्याची कारणंं आणि उपाय)
- तुमच्या जवळच्या व्यक्तीला चक्कर आल्याने तुम्ही अस्वस्थ झाल्यास, नेमके काय करावे हे कळत नसल्यास इतरांची मदत घ्या. मात्र चक्कर आलेल्या व्यक्ती भोवती खूप गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. हवा पुरेशी खेळती राहील याची काळजी घ्या.
- चक्कर आलेल्या व्यक्तीचे कपडे खूप घट्ट असतील तर ते थोडे मोकळे करा. बेल्ट, कॉलर, बटणं, स्कार्फ़, जॅकेट थोडे सैलसर करा.
- रुग्णाशी मोठ्याने बोलून, त्याच्या चेहर्यावर हलकेसे मारत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करा. रुग्णाचे ठोके, श्वासाची गती यावर लक्ष द्या. त्याला श्वास घेताना काही त्रास होतोय का ? हे पहा . बीपी लो’ झाल्यास करा हे प्रथमोपचार !
- काही वेळेस उन्हांत फिरताना, कष्टाच्या कामाने त्रास झाल्यास किंवा प्रवासात डीहायड्रेशनच्या त्रासामुळे चक्कर येऊ शकते. अशा वेळेस रुग्णाला शुद्ध आल्यानंतर इलेक्ट्रोरल पावडरचे पाणी, फळांचा रस किंवा साखर-मीठाचे पाणी, लिंबूपाणी द्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलेट बॅलन्स नियमित राहण्यास मदत होते.
- चक्कर आल्यानंतर लगेजच बाहेर पडू नका. रुग्णाला किमान अर्धा तास आराम करू द्या. त्यानंतर पुन्हा कामाला सुरवात करू द्या.
- 90% चक्कर येण्याचे प्रमाण तरूणांमध्ये असते. तसेच चक्कर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांना पुन्हा भानही येते. मात्र शुद्ध न आल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. मात्र चक्कर येण्याचा त्रास सतत होत असल्यास किंवा एकाच महिन्यात अनेकवेळा चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. एखादी इजा/ अपघात झाला असल्यास तात्काळ उपचार सुरू करा. चक्कर आल्यानंतर रुग्णाला आघात झाल्यास, रक्तस्त्राव झाल्यास ते रक्त विशिष्ट दाबाने रोखा आणि त्यावर उपचार सुरू करा. लहान-मोठ्या जखमांवर कसे कराल घरच्याघरी औषध ?
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock