जगभरात अनेक महिला अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात.डॉक्टरांच्या मते या गोळ्या फक्त ९९.७ टक्के परिणामकारक असतात कारण त्या घेताना गायनेकॉलॉजीस्टचा सल्ला अगदी तंतोतंत पाळावा लागतो.जर गोळ्या घेताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्हाला अनियोजित गर्भधारणेला सामोरे जावे लागू शकते.कारण गोळी घेतल्यानंतरही अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे तुम्ही गरोदर राहू शकता. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या गायनेकॉलॉजीस्ट अॅन्ड इनफर्टिलीटी एक्सपर्ट डॉ.नंदीता पालशेतकर आणि मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज व सायन हॉस्पिटलचे गायनेकॉलॉजी विभागाचे प्रोफेसर अॅन्ड हेड ऑफ डिपार्टमेंट डॉ.वाय.एस.नंदनवार यांच्याकडून जाणून घेऊयात गर्भनिरोधक गोळ्यांसोबत कोणत्या पाच चुका केल्याने तुम्ही इच्छा नसतानाही गरोदर राहू शकता.
१.जर तुम्ही नियमित गोळ्या घेतल्या नाही तर-
सामान्यत: दोन गोळ्यामधील अंतर २४ तासांच्या वर नसावे. यासाठी दररोज ठरलेल्या वेळीच गर्भनिरोधक गोळी घ्या.
उदा.जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सकाळी सुरुवात केली असेल तर महिनाभर ती गोळी सकाळी ठरलेल्या वेळीच घ्या.जर तुम्ही चुकून एखादी गोळी रात्री घेतली तर तुम्ही घेतलेल्या गोळ्यांच्या वेळेमध्ये फरक पडेल.ज्यामुळे त्या गोळ्यांचा परिणाम देखील कमी होईल.तसेच गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी, कंडोम – अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कोणता पर्याय स्विकाराल?
२.जर तुम्ही दोन वेळा गोळी घेणे विसरला तर-
डॉ.नंदनवार यांच्यामते त्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना पेशंटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या वेळेवर न घेतल्यामुळे त्या गोळ्यांचा परिणाम कमी झाल्याचे अनेकवेळा आढळले आहे.सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या सुरु केल्यावर एकदा जरी तुम्ही गोळी घेण्यास विसरलात तर तुम्ही गरोदर होण्याची शक्यता अधिक असते.कारण पहिल्या आठवड्यामध्ये या गोळ्यांमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यापासून प्रतिबंध करण्यात येतो.त्यामुळे जर पहिल्या आठवड्यात एखाद्या दिवशी तुम्ही गोळी घेण्यास विसरला तर गर्भधारणा टाळण्यासाठी दुस-या दिवशी लगेच दोन गोळ्या घ्या.पण जर तुम्ही दोन दिवस गोळ्या घेण्यास विसरला व त्या दरम्यान जर तुम्ही असुरक्षित सेक्स केले तर तुम्ही गरोदर रहाण्याची शक्यता अधिक असू शकते.अशा वेळी २४ तासांच्या आत इमरजन्सी पील्स घ्या अथवा तुमच्या गायनेकॉलॉजीस्टचा त्वरीत सल्ला घ्या.जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर गोळी घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये वेळेसाठी अर्लाम सेट करा अथवा डायरी मध्ये नोंद करा. या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या
३.जर तुम्हाला डायरिया अथवा उलटीचा त्रास असेल तर-
डॉ.पालशेतकर यांच्यामते जर तुम्हाला २४ तासांच्या वर डायरियाचा त्रास झाला अथवा काही तास उलटीचा त्रास झाला असेल तर तुम्ही घेतलेली गोळी शरीराकडून व्यवस्थित शोषली जात नाही.सहाजिकच त्यामुळे तुम्ही गरोदर रहाण्याची शक्यता वाढू शकते.अशा वेळी असुरक्षित सेक्स करणे कटाक्षाने टाळा.जाणून घ्या Emergency contraceptive pills किती वेळा घेणं सुरक्षित आहे ?
४.गोळी सुरु केल्यावर लगेच असुरक्षित सेक्स केले तर-
सामान्यत: गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळीच्या दुस-या अथवा पाचव्या दिवशी सुरु करण्यात येतात.पण जर तुम्ही मासिक पाळीच्या मध्यावर गर्भनिरोधक गोळी सुरु केली असेल तर त्यानंतर तुम्ही कमीतकमी सात दिवस असुरक्षित सेक्स करु शकत नाही.अशा वेळी सेक्स करताना तुमचा जोडीदार सुरक्षेसाठी कंडोम वापरेल याची दक्षता जरुर घ्या.असुरक्षित सेक्सनंतर घ्या हे ’3′ खबरदारीचे उपाय !
५.जर तुम्ही गोळ्या उष्ण तापमानात ठेवल्या तर-
जर गर्भनिरोधक गोळ्या उष्ण तापमानात ठेवल्या तर त्यांचा परिणाम कमी होतो.यासाठी उन्हाळ्यात जेव्हा तापमान ४० अंश डिग्रीच्या वर असते तेव्हा या गोळ्या गाडीत अथवा खिडकीमध्ये ठेऊ नका.ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश येणार नाही अशा सुरक्षित ड्राव्हर मध्ये त्या गोळ्या ठेवा.त्याचप्रमाणे डॉ.नंदनवार यांच्यामते सहा महिन्यांसाठी लागणा-या जास्तीच्या गोळ्या आधीच खरेदी करुन ठेऊ नका कारण त्यामुळे देखील त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते.यासाठी फक्त एक महिना पुरतील एवढयाच गोळ्या खरेदी करा.जाणून घ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock