मुलींचे सौंदर्य चेहर्यावर जितकं अवलंबून असतं तितकंच त्यांच्या केसांमुळे अधिक खुलते. घनदाट, लांब आणि काळेभोर केस भारतीय स्त्रियांच्या सौंदर्याला चार चांद लावतात. पण केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी केवळ तेल, शाम्पू,कंडिशनर आणि खर्चिक ब्युटी ट्रीटमेंट्स पुरेशा नाहीत. तुमचा आहारही सकस असणं गरजेचे आहे. आहारातून मिळणारे पौष्टीक घटक, पोषणद्रव्य यावर केसांचं सौंदर्य अवलंबून असते. म्हणूनच तुमच्या केसांचे आरोग्य खुलवण्यासाठी सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट / हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी दिलेल्या डाएट सिक्रेट्स सोबतच या खास टीप्सकडेही लक्ष द्या.
- डाएट - केसांना नैसर्गिकरित्या खुलवण्यासाठी, सतेज दिसण्यासाठी दिवसभरात 1-2 लीटर पाणी पिणं आवश्यक आहे. यासोबतच सकाळ-संध्याकाळ एक ग्लास दूधही अवश्य प्या. नक्की वाचा : या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
- पाण्याचा वापर - तुम्ही वापरत असलेले शाम्पू, साबण, कंडीशनर या वस्तूंनादेखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच शाम्पू आणि कंडिशनरने केस धुताना स्वच्छ पाण्याचा वापर करा. तसेच मुबलक पाण्यात केस धुवा. अपुर्या पाण्यात केस धुतल्यास केसांमध्ये शाम्पू, कंडिशनर राहिल्यास केसांच्या समस्या अधिक वाढतात. गरम की थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर !
- कंडिशनिंग - केसांना चमकदार बनवण्यासाठी कंडीशनरचा वापर करा. त्यासाठी नियमित केसांची काळजी घ्या. केस धुण्यापूर्वी तेलाचा मसाज करा. अशा प्रकारे प्री- कंडीशनिंग केल्याने केसांचे नुकसान कमी होते. एकापेक्षा अधिक तेलांचा वापर करण्याऐवजी एकाच प्रकारच्या बेसिक तेलाचा वापर करा. केसांना तेल लावल्यानंतर ते सौम्य शाम्पूने स्वच्छ करा.
- हेअर स्टाईल - केसांना वेळच्या वेळी कापणे गरजेचे आहे. किमान 8-10 आठवड्यांनंतर कापणं गरजेचे आहे. तुमच्या केसांच्या पोतानुसार हेअर स्टाईल निवडा. ट्रेंडमध्ये सद्ध्या काय आहे यापेक्षा तुमच्या केसांना काय योग्य आहे ते तपासून हेअर स्टाईलिंग करा. तुम्ही एखादी नवी स्टाईल करून पाहणार असाल तर त्यासाठी हेअर एक्सपर्टचा सल्ला आवर्जून घ्या. केसांची वाढ नैसर्गिकरित्या सुधारण्यासाठी किमान 6-8 आठवड्यांनंतर केस कापा. यामुळे निस्तेज केस आपोआपच कमी होण्यास मदत होईल. केसांच्या वाढीसाठी दूर करा हे ’5′ गैरसमज !
- केसांची योग्यरित्या काळजी घ्या - डोक्याच्या टाळूच्या भागाची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे केस अकाली पांढरे होणे, कोरडे होणे अशा समस्या वाढणार नाहीत. केसांमधील शुष्कपणा डॅन्डरफचा त्रास वाढत असल्यास आठावड्यातून एकदा केस अवश्य अॅन्टी डॅन्डरफ शाम्पूने नक्की स्वच्छ धुवा.
स्रोत: हेयर एक्सपर्ट जावेद हबीब
Read this in Hindi
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – जावेद हबीब