अन्नाचे कण दातावर चिकटून राहिल्यामुळे दातांवर डाग पडतात. त्यामुळे दातांच्या रंगात फरक पडतो. दात पिवळे, चॉकलेटी, हिरवे, ग्रे (करडे) होतात. तोंडाची स्वच्छता राखल्याने दात खराब होण्याचा धोका कमी होईल. दातांवर डाग पडण्याचे नेमके कारण कळले तर ती समस्या दूर करण्यास मदत होईल. दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे Senior Consultant, Dental Surgery डॉ. नीरज वर्मा यांनी दात स्टेनचे प्रकार सांगून त्यावर प्रतिबंध कसा करायचा यावर मार्गदर्शन केले.
Teeth discoloration चे प्रमुख दोन प्रकार आहेत:
- Extrinsic teeth stains
- Intrinsic teeth stains
Extrinsic teeth stains: या प्रकारात अन्नाचे कण दातांवर चिकटल्याने दातांचा रंग बदलतो. दात स्टेन करण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ दातांवर व दातांच्या फटीत जमा झाल्याने Extrinsic stains होतं. दात आतून खराब झाल्यामुळे नाही तर बाहेरील घटक Extrinsic stains होण्यास कारणीभूत ठरतात. दात चॉकलेटी, काळ्या किंवा ग्रे (करड्या) रंगाचे झाल्यास Extrinsic stains झाल्याचे ओळखावे. परंतु, काही वेळेस दातांवर हिरवे, पिवळे किंवा केशरी रंग ही चढतो. एका मिनिटात हटवा दातांचा पिवळेपणा !
Intrinsic teeth stains: स्टेनसाठी कारणीभूत ठरणारे बारीक कण दातांच्या enamel मध्ये जमा झाल्यास Intrinsic stains होतं. त्याचा परिणाम दाताच्या आतील भागावर होतो. यामध्ये दातांचा रंग लाल, गुलाबी किंवा पिवळा होतो. extrinsic stains चा परिणाम एका पेक्षा अधिक दातांवर होतो तर intrinsic stains चा परिणाम फक्त एका दातावर दिसून येतो. दात पिवळे होण्याची कारणं जाणा, भविष्यातील धोका टाळा
Teeth stains ला आळा कसा घालावा?
- दात स्टेन करणारे पदार्थ खाणे टाळा. म्हणजे ब्लु बेरीज, बीट इत्यादी यांसारखी फळे व भाज्या. तसंच चॉकलेट आणि चुईंग गम सारखे स्टिकी पदार्थ. जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे
- धूम्रपान टाळा. तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर रहा. कारण याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच नाही तर तोंडाच्या आरोग्यावर देखील होतो. त्यामुळे माऊथ अल्सर, श्वासाची दुर्गंधी आणि teeth stains अशा तोंडाच्या समस्या उद्भवतात. दात काढण्याचा निर्णय या ’5′ कारणांमुळे घ्यावा लागतो !
- तोंडाची स्वच्छता राखा. दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री जेवल्यानंतर. जर तुम्हाला टूथ सेन्सिटिव्हिटी असेल तर त्यासाठी योग्य अशी टूथपेस्ट वापरा. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जर तुमच्या दातांवर डाग असतील (stained teeth) तर अँटी स्टेनिंग किंवा टीथ व्हाटनिंग टूथपेस्ट वापरा. ब्रश करताना या ’7′ चुका टाळा
- फ्लॉस वापरा. त्यामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नाचे कण निघून जातील. त्यामुळे आजूबाजूचे दात स्टेन होण्यास आळा बसेल. त्याबरोबर प्रोफेशनल टीथ क्लीनिंग टेक्निक्सच्या साहाय्याने तुमचे दात शुभ्र राहण्यास मदत होईल. त्याचा लाभ तुम्ही ६ महिन्यातून एकदा घेऊ शकता. या सोप्या पद्धतीने दात होतील शुभ्र आणि चमकदार !
- जर तुम्हाला ही teeth stain ची समस्या असेल किंवा इतर कोणती तोंडाच्या आरोग्याबाबत समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर वेळीच उपचार घ्या. उपचार जर वेळेत झाले नाहीत तर समस्या गंभीर होऊन दात किडणे किंवा हिरड्यांचे विकार होऊ शकतात.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock