Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या एक्सपर्ट टीप्सने कमी करा परीक्षेचा ताण !

$
0
0

परीक्षा ! या नुसत्या शब्दाच्या उच्चाराने देखील अनेक विद्यार्थ्यांची झोप उडू शकते.अनेक विद्यार्थ्यांना वाटते की परीक्षा नसतीच तर किती बरे झाले असते.पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा परीक्षा तुमच्यासाठी फक्त एखादी चाचणी नसून तुमचे उज्जल भविष्य ठरवणारी एक सुर्वणसंधी आहे.भावी आयुष्यात तुम्हाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे आणि त्याची सुरुवात आता या दहावी व बारावीच्या परीक्षेने होत अाहे.त्यामुळे घाबरण्यापेक्षा या परीक्षेला धैर्याने व खंबीरपणे सामोरे जा.

फोर्टीस एस.एल रहेजा हॉस्पिटलच्या कन्सल्टंट सायक्रॅटीस्ट डॉ.इरा दत्ता यांचा याबाबत विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा सल्ला जरुर जाणून घ्या-

पालकांनी मुलांना परीक्षेपुर्वी या गोष्टी जरुर सांगाव्यात-

१.स्वत:ची परीक्षा घ्या-

परीक्षेपुर्वी तयारी करताना मुलांनी स्वत:चीच एक चाचणी घ्यावी.यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधून एक प्रश्नपत्रिका तयार करावी व ती वेळ लाऊन सोडवावी.ज्यामुळे तुम्हाला पेपर वेळेत सोडवण्याचा अंदाज येईल.मात्र पेपर सोडवताना कॉपी न करण्यासाठी तुमचा मोबाईल,टॅबेल्ट प्रामाणिकपणे स्वत:च स्वीच ऑफ करा.

२.ठळक मुद्यांची उजळणी घ्या-

ब-याचदा मुले परीक्षेआधी केलेला अभ्यासाची रिव्हीजन करण्याचा कंटाळा करतात.असे करु नका कारण ठळक मुद्यांची उजळणी केल्याने तुमचा अभ्यास लक्षात रहाण्यास अधिक मदत होते.

३.रात्री पुरेशी झोप घ्या-

जागरण करुन अभ्यास करीत बसण्यापेक्षा रात्री शांत झोप घ्या.ज्यामुळे तुम्हाला  फ्रेश वाटेल व झालेला अभ्यास लक्षात रहाण्यास मदत होईल.या ‘४’ टीप्स परीक्षेच्या काळात मुलांना शांत झोप देतील !

४.सकारात्मक विचार करा-

सकारात्मक विचार करण्याची सोपी पद्धत म्हणजे स्वत:च स्वत:शी संवाद साधा. “मी हे नक्कीच करु शकेन” या अशा सकारात्मक वाक्याचे सतत चिंतन व मनन केल्याने परीक्षेआधी तुम्हाला अभ्यास करण्याची चालना मिळेल.  कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?

५.अभ्यास करताना छोटासा ब्रेक घ्या-

४५ ते ६० मिनीेटे सतत अभ्यास केल्यावर एक छोटासा ब्रेक घेतल्याने तुम्हाला आराम मिळू शकेल.या ब्रेकमध्ये घरातल्या घरात थोडे चाला,घरच्यांसोबत गप्पा मारा अथवा स्ट्रेचेस करा,पाणी प्या.किंवा अधिक फ्रेश होण्यासाठी काही सेकंद फक्त डोळे बंद करुन शांत बसून रहा. 

६.सोशल मिडीया सतत अपडेट करत बसू नका-

परीक्षेच्या वेळी सोशल मिडीया अथवा व्हॉट्स अॅपवर वेळ घालवत बसू नका.अभ्यास करताना तुमचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी तुमचा मोबाईल दूरच ठेवा.मोबाईलचा वापर फक्त अर्लाम सेट करुन अभ्यासासाठी वेळेचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी करा.

परीक्षेच्या काळात काय कराल-

१.पोटभर नास्ता करा-

परीक्षेच्या काळात चिंतेमुळे काही विद्यार्थी सकाळी नास्ता करणे टाळतात.लक्षात ठेवा हे अत्यंत चुकीचे आहे.कारण उपाशी राहील्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी,मळमळ,डोकेदुखी चा त्रास होऊ शकतो ज्याचा परिणाम तुमच्या पेपर सोडवण्याच्या परफॉर्मन्सवर पडू शकतो.यासाठी परिक्षेला जाण्यापुर्वी घरातून हेल्थी नास्ता करुन जा.हे जरुर वाचा आल्या परीक्षा …. आरोग्य सांभाळा

२.परीक्षेसाठी वेळेत जा-

परीक्षेला जाताना खूप आधी जाऊ नका नाहीतर तिथल्या वातावरणामुळे तुम्ही अधिक नर्व्हस व्हाल.तसेच तिथे गेल्यावर पुन्हा पुन्हा नोट्स वाचत बसण्यापेक्षा शांत रहा.शांत रहाण्यासाठी काही वेळ दीर्घ श्वास घ्या व सोडा ज्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल.

३.प्रश्नपत्रिका सावध पणे वाचा-

काही विद्यार्थी भरभर प्रश्नपत्रिका वाचतात व काही प्रश्नांची उत्तरे न आठवल्यास चिंता करीत बसतात.त्याऐवजी शांतपणे प्रश्नपत्रिका वाचा व तुमच्या वेळेचे नियोजन करुन येत असलेली उत्तरे आधी लिहा ज्यामुळे तुम्हाला इतर प्रश्नांची उत्तरे देखील वेळेत आठवतील.

४.परीक्षा देताना फक्त प्रश्नपत्रिकेवरच लक्ष द्या इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका-

इतर मुले किती उत्तरपत्रिका घेतात अथवा तुमचा मित्र किती स्पीडने पेपर सोडवत आहे हे पाहत बसण्यापेक्षा तुमचा पेपर सोडवण्याकडे अधिक लक्ष द्या.त्याचप्रमाणे पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नानंतर थोडी जागा ठेवा ज्यामुळे नंतर त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्हाला काही अधिक माहिती आठवली तर ती लिहिण्यासाठी तुमच्या पेपरमध्ये जागा असेल.

परीक्षा झाल्यावर काय कराल-

१.पेपर नंतर चर्चा करणे टाळा-

झालेल्या पेपर मध्ये काय चुका झाल्या अथवा काय करायला हवे होते या निष्फळ गप्पा मारत परिक्षा केंद्रा बाहेर थांबू नका.त्यापेक्षा पेपर झाल्यावर सरळ घरी जा व पुढच्या पेपरचा अभ्यास करा.

२.जास्त विचार करीत बसू नका-

झालेल्या पेपरचा खूप विचार करीत बसू नका.जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले असेल तर काहीच हरकत नाही.आता त्याचा विचार करीत बसल्याने तुम्हाला  त्रास होऊ शकतो त्यापेक्षा शांत रहा व उगाचच चिंता करीत बसू नका.नक्की वाचा: मुलांच्या निकालाच्या टेन्शनवर करा ‘स्मार्ट’ली मात !

३.ब्रेक घ्या-

शांत रहा,खा व थोडा आराम करुन पुढच्या पेपरची तयारी करा.यासाठी घरी गेल्यावर प्रथम जेवून घ्या व जरा आराम करा.त्यामुळे तुम्हाला पुढच्या पेपरचा अभ्यास करताना शांत वाटेल.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>