Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्तनपानाच्या काळात बाळाचे कमी वजन ही तुमच्या चिंतेची बाब आहे का?

$
0
0

प्रत्येक बाळाच्या वजनात वाढ व त्याचा विकास हा त्याच्या प्रकृतीनूसार होत असतो.पण तरीही प्रत्येक आईला तिच्या बाळाच्या वजन वाढीची चिंता सतावत असतेच.बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने जरी बाळाच्या वाढ व विकासासाठी खूप महत्वाचे असले तरी त्या काळात त्याचे वजन वाढेलच असे नाही.

पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाच्या वजन वाढीवर लक्ष ठेवावे.जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला डॉक्टरकडे नेता डॉक्टर प्रथम त्याचे वजन तपासा.या काळात जर तुमच्या बाळाच्या वजनात फक्त काही किलोग्रॅम वजनाची वाढ होत असेल तर लगेच काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

दी पिडीयाट्रिक नेटवर्क च्या फाउंडर व डायरेक्टर Dr Chaitali Laddad यांच्या मते प्रत्येक बाळाची वाढ ही निराळ्या पद्धतीने होत असते त्यामुळे बाळाच्या माता-पितांनी याबाबत काळजी करण्यापेक्षा बाळाकडे लक्ष देणे गरजेचे असते.तसेच सहा महिन्यानंतरही बाळाच्या वजन वाढीसाठी फार चिंता करीत बसणे योग्य नाही.जर तुमच्या बाळाची इतर बाबतीत चांगली प्रगती असेल तर ते थोड्या कमी वजनाचे जरी असेल तरी त्याबाबत फार काळजी करु नका.यासाठी अधिक वाचा स्तनपान देणार्‍या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !

जर तुमच्या बाळाचे वजन अपु-या स्तनपानामुळे अथवा त्याला भुक कमी लागल्यामुळे कमी असेल तर यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.डॉ.चैताली यांच्या मतानूसार यासाठी डॉक्टर प्रथम बाळाचे योग्य पोषण होत आहे का हे तपासतात.यासाठी बाळाचे स्तनपानाआधी व स्तनपानानंतर वजन मोजण्यात येते.तसेच ते दिवसभरात किती वेळा शू करते हे पहाण्यात येते ज्यावरुन बाळाचे योग्य पोषण होत आहे का ते समजू शकते.खरेतर स्तनपान केल्या जाणा-या बाळांमध्ये याबाबतीत फारच कमी वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतो.

पुरेसे स्तनपान करुन देखील जर तुमच्या बाळाचे वजन वाढत नसेल तर काय कराल-

  • लेक्टेशन कन्सल्टंटकडे जा व त्याच्याकडून जाणून घ्या की तुमचे नेमके काय चुकत आहे.

  • बाळ संतुष्ट होईपर्यंत त्याला पाजा.कधीकधी काही माता बाळाला प्रत्येक स्तनातून ५ ते १० मिनीटे दूध पाजतात व त्याचे पोट भरण्याआधीच त्याला दूध पाजणे थांबवतात.बाळाचे पुरेसे पोषण न झाल्यामुळे त्याचे वजन कमी असते.

  • बाळाची वाढ व विकास मोजण्यासाठी दर पंधरा दिवसांनी त्याचे वजन मोजा.

बाळाच्या वजन कमी असण्याबाबत चिंता करणे कधी गरजेचे आहे?

असे फार कमी वेळा होते की बाळ स्तनपान करताना त्याचे वजन व वाढ योग्य प्रमाणात होत नाही.ही गोष्ट फारच दुर्मिळ प्रमाणात घडत असल्याने त्याबाबत फार काळजी करण्याचे कारण नाही.डॉक्टरांच्या मते यासाठी काळजी करण्यापुर्वी बाळाची सहा महिन्यात होणारी वाढ ही वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनायझेशच्या सल्लानूसार होत आहे का ते तपासा.नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles