Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात दुस-या व तिस-या तिमाहीत या टेस्ट नक्की करा

$
0
0

गरोदरपणाचा पहिल्या तिमाहीचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यावर तुम्ही दुस-या तिमाहीत प्रवेश करता.पहिल्या तिमाहीत तुम्ही स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतली असेल तर तुम्हाला गरोदरपणात जास्त त्रास होत नाही.खरंतर गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यीतील एक अत्यंत नाजूक अवस्था असते.त्यामुळे गरोदरपणाच्या दुस-या व तिस-या तिमाहीमध्ये देखील तुम्ही तुमची व बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायला  हवी.यासाठी जाणून घ्या या स्थितीमध्ये नेमक्या कोणत्या टेस्ट करणे तुमच्यासाठी महत्वाचे असू शकते.

दुस-या तिमाहीतील स्क्रीनींग टेस्ट-

या टेस्ट करण्यासाठी तुमच्याकडून नेहमीप्रमाणे रक्त व लघवीचे नमुने घेण्यात येतात.

सीबीसी- कम्प्लीट ब्लड काऊंट.दुस-या तिमाहीत सीबीसी टेस्ट तुमच्या रक्तातील पेशींची एकाग्रता व संख्या मोजण्यासाठी करण्यात येते.यामुळे डॉक्टरांना आईला अॅनिमिया अथवा रक्ताचा कोणता विकार झाला आहे का ते देखील समजू शकते.सीबीसी टेस्टमुळे आईला गरेदरपणाच्या सुरुवातीलाच रक्तात एखादे इनफेक्शन अथवा विकार झाला आहे का ते देखील समजल्यामुळे योग्य ते उपचार करणे सोपे जाऊ शकते.जाणून घ्या गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

जीसीटी-ग्लूकोज चॅलेंज टेस्ट.ही टेस्ट गरोदरपणाच्या २४ किंवा २८ व्या आठवड्यामध्ये करण्यात येते.यासाठी त्या गरोदर स्त्रीला ७५ ग्रॅ. ग्लूकोज तोंडावाटे देण्यात येते व त्यानंतर दोन तासांनी तिची गरोदरपणातील मधूमेहाची तपासणी करण्यात येते.गुरगाव येथील पारस हॉस्पिटलच्या कन्सल्टंट गायनेकॉलॉजीस्ट डॉ.पुजा मेहता यांच्यामते जर गरोदरपणात स्त्रीला मधुमेह झाला तर त्यामुळे बाळ प्रमाणापेक्षा मोठे होणे,प्रसुतीमध्ये समस्या व इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.जर त्या स्त्रीच्या टेस्टचा परिणाम १४० mg/dl पेक्षा अधिक असेल तर तीला गरोदरपणातील मधुमेह असतो.जाणून घ्या गर्भारपणात झालेला मधुमेह कसा नियंत्रित ठेवाल?

मार्कर टेस्ट-

पहिल्या तिमाहीत डबल मार्कर टेस्ट करुन देखील जर डॉक्टरांना बाळात एखादी विकृती असल्याचा संशय आला तर ते तुम्हाला ट्रिपल अथवा क्वार्डपल मार्कर टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात. ट्रिपल मार्कर टेस्टसाठी गरोदर स्त्रीच्या रक्ताचे नमुने घेऊन तिच्या शरीरातील एस्ट्रिओल व एचसीजी हॉर्मोन्सची पातळी तपासण्यात येते.गरज असल्यास क्वार्डपल मार्कर टेस्ट देखील करण्यात येते.

अल्फा-फेटोप्रोटीन ची लेवल तपासण्यात येते.यात बिघाड जाणवला तर त्याचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाउंड अथवा Amniocentesis करण्यात येते.अल्ट्रासाउंड टेस्ट विषयी या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Amniocentesis-

ही टेस्ट गरोदर महिलांसाठी असलेली एक पर्यायी टेस्ट आहे.तसेच प्रत्येक लॅबमध्ये ही टेस्ट करण्याची सोय असतेच असे नाही.कारण लॅबला ही टेस्ट करण्यासाठी सरकारकडून विशिष्ट परवाना घ्यावा लागतो.जर मार्कर टेस्टचा रिझल्ट संशयित असेल तर डॉक्टर ही टेस्ट करण्याचा सल्ला देतात.या टेस्टसाठी गरोदर स्त्रीच्या ओटीपोटात सुई घालून गर्भपिशवीतील गर्भजल बाहेर काढण्यात येते व त्यानंतर एखादा बिघाड अथवा अनुवंशीक आजार आहे का याची तपासणी करण्यात येते.या टेस्टमुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता अधिक असते.मात्र या टेस्टमुळे बाळाच्या मज्जासंस्थेतील बिघाड ९९ टक्के व अनुवंशिक विकृती १०० टक्के ओळखता येऊ शकतात.गर्भपातानंतर पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी करा या ५ डायग्नोस्टीक टेस्ट

युरीन टेस्ट-

रुटीन युरीन टेस्ट गरोदर स्त्रीला एखादे इनफेक्शन,मधुमेह अथवा किडनी विकार आहे का हे तपासण्यासाठी करण्यात येते.

तसेच जाणून घ्या गरोदरपणात दुस-या अथवा तिस-या तिमाहीमध्ये वजन कमी होणे चिंतेची बाब आहे का ?

तिस-या तिमाहीतील स्क्रीनींग टेस्ट-

सीबीसी-

ब्लड काउंट टेस्ट.डॉ.मेहता यांच्या मते गरोदर मातेच्या शरीरातील हिमोग्लोबीन ची पातळी तपासण्यासाठी व तिला कोणते इनफेक्शन अथवा आजार झाला नसल्याची खात्री करण्यासाठी ही टेस्ट करण्यात येते.जाणून घ्या ब्लड टेस्ट रिपोर्ट कसा समजून घ्याल?

Group B streptococcus स्क्रीनींग -

गरोदर महिलेला ग्रुप बी स्ट्रेप बॅक्टेरियल इनफेक्शन झाले आहे का हे तपासण्यासाठी ही टेस्ट करण्यात येते.यासाठी गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यामध्ये तिच्या योनीमार्ग व गुदद्वाराची तपासणी करण्यात येते.कारण हे इनफेक्शन नवजात अर्भकासाठी प्राणघातक असून त्यामुळे बाळ मतिमंद,दृष्टीदोष असेलेल अथवा बहिरे जन्माला येऊ शकते.ज्या गरोदर महिलेची ही टेस्ट पॉझिटिव्ह असते त्या महिलेच्या बाळाला या इनफेक्शनच्या संक्रमणापासून वाचविण्यासाठी तिला डिलीव्हरी पर्यंत अॅन्टीबायोटीक्स चे उपचार देण्यात येतात.हे ही वाचा गरोदरपणात धर्नुवात प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असते का ?

पीटी/आयएनआर-

प्रसुती जवळ आली असताना गरोदर स्त्रीच्या रक्ताच्या गोठण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी ही टेस्ट करण्यात येते.

नॉन-स्ट्रेस टेस्ट-

बाळाच्या आईच्या पोटाला मॉनिटर करुन बाळाचे ठोके मोजण्यासाठी ही टेस्ट करण्यात येते.ज्या गरोदर स्त्रीला गर्भारपणात अधिक धोका असतो त्या स्त्रीची ही टेस्ट तिस-या तिमाहीत दर आठवड्याला करण्यात येते.

युरीन टेस्ट-

तिस-या तिमाहीत नियमित युरीन टेस्ट देखील करण्यात येते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>