प्रसुतीसाठी घरातून हॉस्पिटलमध्ये निघण्यापुर्वी तुमची मॅटर्निटी बॅग आधीच तयार ठेवा.अशा वेळी भावनावश न होता विचारपुर्वक ही बॅग भरा.लक्षात ठेवा फॅशनेबल गोष्टींपेक्षा तुम्हाला आवश्यक असणा-या गरजेच्या गोष्टी बॅगेत असणे खूप महत्वाचे आहे.
प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर तुमच्या मॅटर्निटी बॅगेत या गोष्टी असाव्यात-
१.तुमची मेडीकल फाईल व रेकॉर्ड-
तुम्ही ही फाईल घरी विसरु शकत नाही.त्यामुळे प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापुर्वी आठवणीने ही फाईल तुमच्या बॅगेत भरुन ठेवा.
२.तुमचा गाऊन अथवा नाईटीज-
अशा वेळी एखादा हलका व सैल कपड्यांचा जोड तुमच्यासोबत असू द्या.प्रसुतीसाठी तुमच्या हॉस्पिटलकडून तुम्हाला कपडे देण्यात येतात पण तरीही एक कपड्याचा जोड तुमच्यासोबत असणे नेहमीच चांगले.
३.एक हलके स्वेटर-
हवामानानूसार एखादे हलके स्वेटर देखील सोबत ठेवा.कारण तुमची प्रसुती हिवाळ्यात असेल तर थंडीमुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.
४.मोजे-
कधीकधी सामान्य तापमानात देखील तुमच्या हातापायामध्ये वेदना जाणवतात.अशा वेळी जर तुमच्याकडे तुमचे मोजे असतील तर तुम्ही ते तुमच्या मदतनीसांना तुम्हाला घालण्यास सांगू शकता.
५.लोशन व लीप बाम-
तुमची त्वचा सतत कोरडी पडत असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला मॉश्चराईजर लोशन अथवा लीप बाम उपयोगी पडू शकतो.तसेच डिलीवरी नंतर देखील तुम्हाला या गोष्टीची गरज भासू शकते.
६.संगीत साहित्य-
जर प्रसुतीपुर्व वर्गात अथवा मेडीटेशन सेशन मध्ये तुम्हाला गर्भसंस्कार श्लोक देण्यात आले असतील तर या श्लोकांमुळे प्रसुतीदरम्यान तुम्ही व बाळ शांत राहू शकता.यासाठी हे श्लोक तुमच्या मोबाईलमध्ये अथवा एमपीथ्री प्लेअर मध्ये साठवून ठेवा व गरज पडल्यास ते ऐका.हे ही वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
७.खाण्याचे पदार्थ-
तुम्ही प्रसुतीवेदना भुकेल्या पोटी सहन करु शकत नाही.यासाठी तुमच्यासोबत फळे,सुकामेवा,बिस्किटे असा हलका आहार ठेवा.त्याचप्रमाणे याकाळात हायड्रेट रहाण्यासाठी पाणी अथवा पेय देखील सोबत घ्या.
८.फ्लीप-फ्लॉप्स-
तुमच्यासोबत हलक्या व फ्लॅट स्लीपर सोबत ठेवा.
प्रसुतीनंतर लागणा-या गोष्टी-
९.नर्सिंग गाऊन-
तुम्ही प्रसुतीनंतर हॉस्पिटल मध्येच रहाणार असल्याने तुम्ही कमीतकमी तीन-चार गाऊन तुमच्या बॅगेत ठेवणे आवश्यक आहे.हे गाऊन तुम्हाला स्तनपान करण्यासाठी व बाळाला हाताळताना उपयोगी पडतील असे असावेत.
१०.नर्सिंग बीब्स-
जर तुम्हाला व बाळाला भेटण्यासाठी कोणत्याही वेळी तुमच्या ओळखीची माणसे येत असतील तर सोबत नर्सिंग बीब्स घ्या ज्यामुळे तुम्ही तुम्हाला व बाळाला झाकून निसंकोचपणे स्तनपान करु शकता.स्तनपान देणार्या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !
११.नर्सिंग ब्रा व पॅड्स-
प्रसुतीनंतर स्तनपान करताना तुम्हाला या साधनांची गरज भासू शकते.
१२.मॅटर्निटी पॅड्स-
लक्षात ठेवा तुमच्या सोबत मॅटर्निटी पॅड्सचे कमीतकमी दोन पॅक असणे खूप आवश्यक आहे.कारण प्रसुतीनंतर होणा-या रक्तस्त्रामध्ये ते तुम्हाला उपयोगी पडतील.जाणून घ्या सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर काय त्रास होतो ?
१३.आरामदायक अंडरवेअर-
अशा वेळी तुमच्या आवडीपेक्षा सुती व आरामदायक अंडरवेअर चा वापर करा.यासाठी तुमच्या मॅटर्निटी बॅगेत त्या जरा जास्तीच्या सोबत घ्या.तसेच अशा वेळी तुमच्या नेहमीपेक्षा साईजपेक्षा एक साईज मोठ्या निकर घ्या.त्यामुळे जर तुम्हाला कदाचित सिझेरीयन ला सामोरे जावे लागले तर तुमच्या जखमा दुखावल्या जाणार नाहीत.जाणून घ्या सिझेरियन प्रसुतीची निवड कोणत्या कारणांमुळे करावी लागते ?
१४.फीडींग पिलो-
बाळाला स्तनपान करताना या उशीमुळे तुम्हाला वेदना होत नाहीत.
१५.टॉयलेटरी साहित्य-
टुथब्रश,टुथपेस्ट,हॅन्ड सॅनिटाईझर,पेपर सोप,फेस वॉश,वेट व ड्राय टीश्यू पेपर,डिओड्रंट व टुथपिक अशा साहित्याचे एक पाऊच तयार ठेवा.एक मोठा व एक छोटा टॉवेल देखील बॅगेमध्ये ठेवा.
१६.घरी जाताना घालायचे कपडे-
प्रसुतीनंतर जरी तुम्ही पुर्वीप्रमाणे सडपातळ झाला असला तरी तुम्ही गरोदर असताना घालायचा तसेच सैल कपडे काही दिवस वापरा ज्यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळेल व तुमचे सि-सेक्शन झाल्यास जखमा दुखावल्या जाणार नाहीत.
बाळासाठी लागणारे साहित्य-
जर तुम्ही घरातील मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे बाळाच्या जन्माच्या आधीच त्यासाठी खरेदी केली नसेल तर या साहित्याची यादी बाळाच्या बाबांना द्या व त्यांना ती लेबररुममध्ये घेऊन येण्यास सांगा.
१७.बाळाचे कपडे-
खास नवजात बाळासाठी तयार करण्यात आलेले सुती कपडे घ्या.नवजात बाळासाठी सुती झबले,लंगोट खूप उत्तम असतात.
१८.डायपर-
शक्य असेल तर डायपरचा मोठा पॅक विकत घ्या.कारण नवजात बाळाला दिवसरात्र सतत डायपर चेंज करण्याची गरज भासू शकते.जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी डायपर वापरायचे नसतील तर घरातील आयाकडून सुती लंगोट मागवून घ्या. बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय
१९.सॉक्स व बूटीज-
बाळासाठी सुती व रंगबिरंगी मोजे व बूट बाजारात उपलब्ध असतात.
२०.टोपरे-
बाळाला उबदार वाटण्यासाठी त्याचे डोके व कान झाकून ठेवणे गरजेचे असते यासाठी टोपरे देखील घ्या.
२१.स्वेडल-
बाळासाठी सुती व हलक्या वजनाचे,ज्याला टोपरे जोडलेले असते असे स्वेडल देखील सहज उपलब्ध असतात.
२२.बेबी ब्लॅकेट-
तुमच्या बाळाला उबेसाठी ब्लॅकेट देखील गरजेचे असते.
२३-स्वेटर अथवा जॅकेट-
थंड वातावरण असेल तर बाळासाठी स्वेटर देखील घ्या. नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock