प्रश्न- मी एक मुंबईत राहणारी ३६ वर्षांची महिला आहे.काही महिन्यांपूर्वी माझ्या मासिकपाळीविषयी मला कोणतीही समस्या नव्हती.माझे मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे आहे.मला मासिक पाळी मध्ये अगदी नगण्य वेदना होतात.मला मासिक पाळीत चार दिवस व्यवस्थित रक्तस्त्राव होतो.तसेच मूड स्वींग सारखी समस्या देखील होत नाही.पण मला या महिन्यामधील मासिक पाळीत मात्र फक्त दोन दिवसच अंगावरुन गेले.तसेच खूप वेदना व मूडस्वींगचा देखील त्रास झाला.मला चिंता वाटत आहे की हे माझ्यामधील अर्ली मॅनोपॉजचे तर लक्षण नसेल ना ?कारण माझ्या आईला तिच्या चाळीशीमध्ये मॅनोपॉजला सामोरे जावे लागले होते त्यामुळे मला देखील तसाच अनुभव येण्याची शक्यता असू शकते.यासाठी मला जाणून घ्यायचे आहे की अर्ली मॅनोपॉज ही समस्या अानुवंशिक असू शकते का ? तसेच एखाद्या स्त्रीला अर्ली मॅनोपॉजला का सामोरे जावे लागते?
धन्वतंरी केरला आयुर्वेदिक क्लिनीकच्या आयुर्वंदीक फिजीशन डॉ.नम्रता पवार यांच्याकडून जाणून घेऊयात या प्रश्नाचे सविस्तर उत्तर.जरुर वाचा लवकर येणा-या मॅनोपॉजला पुढे ढकलण्यासाठी एक्सपर्ट टीप्स
हे खरे आहे की अर्ली मॅनोपॉज अानुवंशिक असू शकतो.पॉली सिस्टीक ओव्हेरीयन सिन्ड्रोम व अती मासिक रक्तस्त्राव या समस्या तुम्हाला तुमच्या कुटूंबाकडून मिळू शकतात.त्यामुळे तुमचा मॅनोपॉज पॅटर्न तुमच्या आईप्रमाणेच असण्याची दाट शक्यता अाहे.पण याचा अर्थ तुम्हाला आता होत असलेला त्रास अर्ली मॅनोपॉजचाच असे नाही.तुम्हाला मासिक पाळीबाबत समस्या असण्याचे काय कारण आहे याबाबत प्रथम एखाद्या उत्तम फिजीशन कडून जाणून घ्या व मगच कोणत्याही निकर्षापर्यंत जा.या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या
कारण अर्ली मॅनोपॉज येण्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात.आर्युवेद शास्त्रानूसार तुमच्या मासिक पाळीच्या चक्राची लांबी तुम्हाला मॅनोपॉज ही स्थिती लवकर येणार की उशीरा हे निर्धारित करते.थोडक्यात ज्यांचे मासिक चक्र ३० ते ३५ दिवसांचे असते त्यांना मॅनोपॉज या स्थितीला उशीरा सामोरे जावे लागते तर ज्यांचे मासिक पाळीचे चक्र २१ ते २८ दिवसांचे असते त्यांना मॅनोपॉजची स्थिती लवकर येऊ शकते.प्रत्येक स्त्रीच्या जीवनात तिला मासिक पाळी कितीवेळा येणार हे तिच्या जन्मापासूनच ठरलेले असते.मात्र जर तिचे मासिक चक्र छोटे असेल तर तिला अर्ली मॅनोपॉजला सामोरे जावे लागते.जाणून घ्या दर महिन्याला मासिकपाळी लवकर येण्यामागील कारण काय ?
त्याचप्रमाणे ताणतणावात्मक जीवनशैली,अपुरी झोप,अयोग्य आहार आणि शरीरात वाताचे असलेले अति प्रमाण यामुळे हॉर्मोनल बदल घडत असतात.यासाठी आहारात अक्रोड,तीळ आणि रंगीत भाज्या समाविष्ट करा.वेळेवर झोपा व रात्रीची जागरणे करणे टाळा.या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock