Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बहुगुणी शतावरीचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !!

$
0
0

‘शतावरी’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘शंभर पती असणारी स्त्री’ असा होतो. शतावरी ही औषधी वनस्पती फार पुर्वीपासून स्त्रिच्या शरीरात पुनरूत्पादनासाठी वापरली जाते. शतावरी शतमूली, शकाकूल किंवा वाइल्ड अस्पॅरॅगस या नावांनीही ओळखली जाते. शतावरीची अगदी लहान वेल असते. शतावरी प्रामुख्याने भारत व श्रीलंका या देशांत पाहावयास मिळते. हिचे नाव वाइल्ड अस्पॅगॅरस असले तरी सर्वसामान्यपणे भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या अस्पॅगॅरसपेक्षा शतावरी वेगळी असते. शतावरीच्या कंदामध्ये स्त्रियांसाठी अनेक औषधी घटक असतात.

शतावरीमधील प्रमुख घटक –

शतावरीच्या मुळामध्ये शतावरीन 1-4 आणि सर्सेपोजीनीन नामक सॅपोनीनचे 4 घटक असतात. शतावरीमध्येरूटिन, क्वेर्टेसिन आणि केमफ्युरोल नामक फ्लॅवेनोइड घटक असतात.

शतावरीचे आरोग्यदायी फायदे –

आयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठी शक्तीवर्धक औषध मानले आहे. कारण, यामुळे स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर प्रभाव पडतो. मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनोपॉजनंतरचा त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते. स्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढण्यासाठीही शतावरी उपयुक्त आहे. शतावरी पाचक, अँटी-युक्लीअर, अँटी-ऑक्सिडंट व अँटी-कँसर घटक म्हणूनही काम करते. शतावरी यकृताचे संरक्षण करू शकते हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.

शतावरीचा वापर कसा करावा –

शतावरीची कंदमुळे विविध थेरपींसाठी वापरली जातात. शतावरी कल्प नामक औषधामध्ये शतावरी हा प्रमुख घटक असतो. परंतु हे औषध वैद्यकीय सल्यानुसार घ्यावे.

शतावरीचे दुष्परिणाम –

हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. काही लोकांचे शतावरीचे सेवन केल्याने वजन वाढल्याचे लक्षात आले आहे. अस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे.

संबंधित दुवे –

एरंडेल तेल – त्वचाविकारांना दूर करणारा जादूई उपाय

‘बेरीज’ आहारात ठेवा आणि आरोग्य सुधारा !

बहुगुणी वेलची : स्वादिष्ट अन आरोग्यदायी ही !

Translated by – Lina Bhalke

Source – Shatavari: Health benefits and side effects

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेजलाही नक्की लाईक करा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>