Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

घरच्या घरी मिळवा सर्दी –खोकल्यापासून आराम !

$
0
0

कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु  शकले तर ?

 लसूण

लसणात  एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म  असून सर्दी खोकल्यावर  ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील  ‘आलाय्झीन ‘ हा घटक  जंतूंचा नाश करतो .

  • टीप  १ -

जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे,ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ  शकतो . अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून  कापडात बांधा व कानात वरच्यावर  ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.

  • टीप २ -

लसणाच्या  ४-५  पाकळ्या  ठेचून त्या तुपात परतून खा.  हा  सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा  रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .

हळद 

स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.

  • टीप १ -

घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम  दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर  तुम्हाला दिवसभर उर्जा देते.

  •  टीप २ -

हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून  उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.

  •  टीप ३

चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

आयुर्वेदिक काढा

हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी  व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.

  • टीप १ -

चार वेलची , काळामिरीचे दाणे, लवंगा , ताजं आलं व  दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे   उकळा . उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा . त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.

  • टीप २ -

१५-२० तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा . दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर  लिंबाचा रस मिक्स करा . यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते .

  • टीप ३-

कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.

कंठसुधारक वडी

आज काल घशातील खवखव , सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे  सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे

कशी कराल कंठसुधारक वडी ?

आलं  बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे  चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .

कफाच्या खोकल्यापासून मिळवा आराम -

कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे  फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी  ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.

  • टीप १

चार पाच मिरीचे दाणे , थोडे जिरे व गुळ पाण्यात एकत्र करून  हे मिश्रण उकळा . हे मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड करून प्या . यामुळे तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल .

  •  टीप २

सुपारीची  पाने कुटून रस काढून घ्या. या २ चमचे  रसात एक चमचा मध घालून रोज दोनदा जेवणानंतर  अर्ध्या  तासाने घ्या . यामुळे कफाच्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होइल.

छायाचित्र सौजन्य – Getty Images


ट्रेडमीलवर करा हे काही हटके व्यायामप्रकार !

$
0
0

अनेकजण ट्रेडमीलवर भरपूर व्यायाम करतात. अशाप्रकारे ट्रेडमीलवर व्यायाम केल्यानंतर शरीराला उर्जा आणि चालना मिळते. तसेच कॅलरीज बर्न होतात, हृद्याच्या कार्याचा वेग सुधारतो असा सल्ला Technogym चे मॅनेजिंग डायरेक्टर पंकज अरोरा यांनी दिला आहे. पण ट्रेडमीलवर व्यायाम करून स्वास्थ्य सुधारण्यासाठी या वर्कआऊट्सच्या प्रकाराचाही नक्की प्रयत्न करून पहा. ट्रेडमिल वापरताय ? मग या 5 खास टिप्स पहाच !

  • वॉकिंग लंग्स - या व्यायामामध्ये ट्रेडमीलमध्ये कोणताच अडथळा नसतो. त्यामुळे तुमच्या मूव्हवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येते. परिणामी तुमच्या लेग बर्निंग लंग्जचा ( leg-burning lunge) योग्य परिणाम मिळतो.
  • साईड शफल्स - याप्रकारच्या शफल्समुळे मांड्यांच्या आतील आणि बाहेरील भागांना पुरेसे स्ट्रेचिंग मिळते.म्हणूनच कार्डियो व्यायामामुळे शरीर सुडौल होण्यास मदत होते.
  • वॉकिंग प्लान्क - या व्यायामामुळे खांद्याच्या पुढच्या भागाला स्ट्रेचिंग मिळते. यामध्ये स्टेबिलायझर अधिक तीव्रतेने काम करतात.
  • रिव्हर्स माऊंटन क्लाईम्बर्स - नियमित केल्या जाणार्‍या माऊंटन क्लाईम्बर्समध्ये शरीराचा व्यायाम होतो. मात्र रिव्हर्स माऊंटन क्लाईम्बर्स मध्ये पायांच्या मागच्या बाजूला, गुडघ्यांच्या विरुद्ध दिशेला स्ट्रेचिंग होते. तुम्ही मागच्या भागाला टोनअप करत असाल तर हा पर्याय उत्तम आहे.
  • क्रॅब वॉक - अनेकजणांनी शेवटचा क्रॅब वॉक केवळ शाळेतच केला असेल. पण हा एक उत्तम व्यायाम आहे. ट्रेडमीलवर हा व्यायाम केल्याने हार्मस्टिंग, ट्रायसेप्स, कोअर मसल्स बळकट होण्यासाठी मदत होते.
  • ट्रेडमील पुश – वजनदार स्लेड ढकलणं  कठीण आणि सोबतच आव्हानात्मक व्यायाम आहे. म्हणूनच ट्रेडमील बंद करून पुढे धावण्याचा सराव करा.

मात्र सार्‍याच ट्रेडमीलवर त्या बंद असताना पट्टा पुढे सरकत नाही. अशाप्रकारे पट्टा सरकत नसेल तर त्यावरच वेळ वाया घालवू नका. इतर कोणता तरी व्यायामप्रकार आजमावून पहा.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

रात्री दूध दिल्यानंतर बाळाला पाणी का पाजावे ?

$
0
0

बाळ झाल्यानंतर त्याची नाना प्रकारे काळजी घ्यावी लागते. बाळाचा आहार, आरोग्य याबाबत सतत सतर्क राहावे लागते. त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळत त्याचे लसीकरण इतपर्यंत सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या सगळ्यात आपले लहान सहान गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष होते. म्हणून या काही सोप्या टीप्स ज्यामुळे तुमचं बाळ हेल्दी आणि गुटगुटीत राहील. नक्की वाचा: नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड !

रात्री आईने दूध पाजल्याशिवाय अनेक बाळ झोपत नाहीत. परंतु, दात यायला लागल्यानंतर रात्रीचे दूध देऊ नये. कारण त्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीज होतात. असा सल्ला अनेक डॉक्टर देतात. या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !

रात्री दूध पाजल्याने दात खराब होतात का?

बाटलीने दूध पिताना किंवा ब्रेस्टफिडींग करताना थोडेसे दूध बाळाच्या तोंडात राहते. ते पूर्णपणे गिळले जात नाही. त्यामुळे बाळाच्या नवीन येणाऱ्या दातांना हानी पोहचते. म्हणून दात येत असताना रात्रीचे दूध न पाजण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विशेषतः बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर असे करणे टाळावे. परंतु, रात्रीचे दूध दिल्याशिवाय बाळ झोपत नसेल किंवा दूध न देणे कोणताही कारणामुळे कठीण होत असल्यास दूध पाजल्यानंतर बाळाला थोडं पाणी पाजा. त्यामुळे दोन फायदे होतील:

१. त्यामुळे तोंडात राहिलेले दूध गिळून टाकण्यास मदत होईल. बाळाच्या रडगाण्यामागे दडल्यात या ’5′ भावना !

२. तसंच दातांचे कॅव्हिटीपासून संरक्षण होईल. म्हणून लहान मुलांना दात येताना वेळीच काळजी घ्या. लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !

हे करण्याची योग्य पद्धत कोणती?

दूध पाजताना बाळ झोपी जात असले तर त्याला/तिला अलगद उचला आणि अर्धा चमचा पाणी पाजा. त्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून सावकाश हात फिरवा म्हणजे बाळाला ढेकर येईल. ढेकर न आल्यास बाळाच्या पोटात दुखू लागेल व मध्यरात्री बाळ रडत उठेल. जाणून घ्या: बाळाने ढेकर दिल्याशिवाय त्याला का झोपवू नये ?

रात्री भूक लागल्यावर बाळ मध्ये मध्ये जागे होते. तेव्हा दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाला १-२ चमचे पाणी पाजा. हे करणे थोडेसे कठीण असले तरी त्यामुळे बाळाचे दात सुरक्षित राहतील. जरूर वाचा: बाळाला दात येताना ही काळजी नक्की घ्या

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

वृद्धांच्या या ‘१०’भावनिक गरजा पूर्ण केल्यास त्यांना नैराश्य मात करण्यास मदत होईल !

$
0
0

वृद्धांना फक्त शारीरिक आजार आणि थकलेले शरीर याच समस्या नसतात तर नैराश्य या मानसिक त्रासाला देखील त्यांना सामोरे जावे लागते. नैराश्याचा परिणाम शरीरावर झाल्याने अनेक आजार गंभीर रूप धारण करतात आणि ते बरे होणे अवघड होऊन जाते. त्याचबरोबर या व्यस्त जीवनशैलीत कामाच्या व्यापामुळे तरुणांना देखील त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित, परवलंबी वाटते. परिणामी स्वाभिमान दुखावला जातो व मानसिक खच्चीकरण होते.

इतर तरुण मंडळींपेक्षा वृद्धांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. त्यांना भावनिक आधार दिल्याने त्यांच्यातील एकटेपणा, हतबलता, उदासीनता यांसारख्या नकारात्मक भावनांवर मात करता येते.  Portea Medical चे मेडिकल डिरेक्टर  Dr M Udaya Kumar Maiya, यांनी वृद्धांना नैराश्यावर मत करण्यासाठी फायदेशीर ठरतील अशा त्यांच्या महत्त्वाच्या १० भावनिक गरजा सांगितल्या.

सुरक्षितता: वाढत्या वयाबरोबरच अनेकांना सुरक्षिततेची चिंता सतावत असते. म्हणून वडीलधाऱ्या मंडळींना शारीरिक व मानसिक सुरक्षिततेची गरज असते. घरातील वातावरण त्यांना सुरक्षितता देणारे असेल तर ते आनंदी असतात.

लक्ष देणे: लहान मुलांप्रमाणे जेष्ठांना देखील त्यांच्याकडे सारखे लक्ष द्यावे असे वाटत असते. कारण बाहेरच्या जगाशी त्यांचा अधिक संबंध येत नाही. त्यांच्याकडे लक्ष दिल्याने आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आहे असे त्यांना वाटते. व ही भावना त्यांच्यासाठी सुखद असते.

काही गोष्टी मनाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र: तुम्ही त्यांच्याकडे कितीही लक्ष दिले तरी बऱ्याच जेष्ठ लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचे असते. म्हणून जे काम ते स्वतः करू शकतात, ते त्यांना करू देणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील सहज सोप्या गोष्टी त्यांना करू द्या. त्यामुळे त्यांचे सगळ्यावर नियंत्रण आहे अशी भावना त्यांच्यात जागृत होते व त्यातूनच त्यांना आनंद मिळतो.

भावनिक बंध: त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला की ते सगळे भावनिक बंध लगेच तोडून टाकतात. म्हणून काळजी घेण्यासाठी, आपुलकी दाखवून ते भावनिक बंध कायम टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या.

अपराधीपणाची भावना दूर करा: आपल्या मुलांसोबत राहणाऱ्या जेष्ठ लोकांच्या मनात आपण मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहोत ही भावना असते. तसंच मुलांच्या मनात आपण त्यांची पुरेशी काळजी घेऊ शकत नाही हा अपराधभाव असतो. जर असं काही असेल तर एकमेकांशी संवाद साधा. वाढीलधाऱ्यांच्या भावना चुकीच्या असल्याची जाणीव त्यांना करून द्या आणि त्यांना गरज असेपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत आहात हा विश्वास त्यांना द्या.

आपलेपणाची भावना: जे जेष्ठ लोक कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत बांधलेले असतात ते इतर वृद्धांच्या तुलनेत म्हणजे ज्यांना अशा प्रकारचा आधार नसतो त्यांच्यापेक्षा अधिक आनंदी आणि समाधानी असतात. कुटुंब आणि मित्रांशी असलेल्या बंधनामुळे त्यांना आपलेपणाची भावना आणि आनंद मिळतो. तसंच समवयस्क मंडळींसोबत विचारांची देवाणघेवाण होते. म्हणून अशा एकट्या असलेल्या जेष्ठांना मायेचा हात पुढे करा.

मैत्री: टिनएजर्स आणि तरुण लोकांप्रमाणे आनंददायी जीवनासाठी वृद्धांना देखील मैत्रीची गरज असते. म्हणून वृद्धांना देखील नवी मैत्री करण्याची संधी द्या.

एकांत: इतर तरुण लोकांप्रमाणे वृद्धांना देखील त्यांच्या आयुष्यात एकांत हवा असतो. म्हणून त्यांच्या या भावनेचा आदर करा. त्यासाठी साजेसं वातावरण तयार करा. काही वेळेला एखाद्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना त्यांचा असा वेळ हवा असतो.

पात्रतेची जाणीव: वाढत्या वयानुसार आपली पात्रता कमी झाल्याची भावना अनेक वृद्ध व्यक्तींमध्ये असते. परंतु, हे भावना चुकीची असल्याची जाणीव त्यांना करून द्या आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा.

जीवनाचा उद्देश: आयुष्यात आता काही राहिले नाही, असा त्यांचा समज असतो. काही वेळा तर जीवन जगण्याची इच्छा संपलेली असते तर कधी आयुष्यावरचा विश्वास उडालेला असतो. परंतु, हा समज चुकीचा आहे. त्यांच्या या एकटेपणाच्या भावनेकडे, डिप्रेशनच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी उद्देश असतो. असा नवा, सकारात्मक विचार त्यांना द्या.

नैराश्यावर मात करण्यासाठी:

होम हेल्थकेयर हा नवा विचार भारतात रुजत आहे. वृद्धांचे आयुष्य सुधारणे हा यामागचा उद्देश आहे. नैराश्य आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, वाढते वय या सगळ्याचा विचार करून त्यांचे काळजीपूर्वक मूल्यमापन होईल.

लक्षणांचे निदान न झाल्याने वृद्धांमध्ये डिप्रेशन वाढते. त्यांच्या गुंतागुंतीच्या विचारांमुळे समस्या अधिक गंभीर होते. खूप कमी लोकांना योग्य ते उपचार वेळीच मिळतात. याला अनेक कारणे आहेत. उदा. जागरूकता नसणे, कोणाचा आधार नसणे, भीतीमुळे आपल्या भावना, विचार इतरांना न सांगणे, इत्यादी. काही शारीरिक आजारांचे निदान व उपचार वेळीच होतात. परंतु, मानसिक आजाराचे काय? त्यांना सातत्याने प्रेम दिले, काळजी घेतली तर त्यांचे मानसिक दुःख कमी होण्यास आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास मदत होईल. नैराश्यावर नियंत्रण ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे निदान वेळीच होणे.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

घाम न आल्यास व्यायामाचा फायदा होत नाही का ?

$
0
0

उन्हाळ्यात व्यायाम करताना येणाऱ्या अधिक घामामुळे लवकर वजन कमी होईल, असं वाटतंय का तुम्हाला? परंतु, हा गैरसमज आहे. तुम्हाला कितीही घाम आला तरी तुम्ही किती व्यायाम करता यावरूनच तुम्हाला परिणाम दिसून येईल.

अतिरिक्त घाम आल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून लवकर वजन कमी होते. हा समज सामान्यपणे सगळ्यांमध्ये रूढ आहे. कारण आपल्या शरीरात अधिक प्रमाणात (७५%) पाणी असते. घामाच्या रूपात ते बाहेर पडल्याने बारीक होण्यास मदत होते. परंतु, हा परिणाम तात्पुरता असतो, असे इव्हा केयर जिमच्या ओनर आणि फिटनेस ट्रेनर Pratichi Thakare यांनी सांगितले. मला दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या दरमान्य अधिक क्लायंटस भेटतात. पण उन्हाळा संपल्यानंतर ते व्यायाम करणे सोडून देतात. कारण पावसाळ्यात त्यांना जास्त घाम येत नाही. आणि म्हणून उन्हाळा संपल्यावर त्यांचे वजन कमी होत नाही. असे प्राची यांनी सांगितले. फक्त स्त्रियाच नाही तर ज्या पुरुषांना सिक्स पॅक्स हवे असतात असे पुरुष देखील उन्हाळयात जिम लावतात.

जितका जास्त घाम येईल, तितके वजन जास्त कमी होईल, हा गैरसमज अनेकांच्या मनात आहे, असे युअर फिटनेस क्लबचे फिटनेस ट्रेनर नितीन पावले यांनी सांगितले. ज्या पुरुषांचे वजन जास्त आहे ते उन्हाळ्यात जिम लावतात. तसंच मला वर्कआऊटचा वेळ वाढण्यास सांगतात म्हणजे ते कमीतकमी वेळात अधिक वजन कमी करू शकतील. पण नियमित व्यायामानेच वजन कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार. योग्य शरीरयष्टीसाठी आहार देखील योग्य असणे गरजेचे आहे, असे नितीन यांनी सांगितले. वजन कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे फॅट बर्न करणे. त्यासाठी कॅलरीज कमी घेणे आणि त्याबरोबरीनेच योग्य आहार व व्यायामाची गरज आहे. घाम आल्याने वजन कमी होते या चुकीच्या समाजामुळे काहीजण अधिक व्यायाम करतील आणि ते शरीरासाठी धोकादायक ठरेल. तसंच अधिक घाम आल्याने शरीराच्या इतर समस्या उद्भवतील.

अतिरिक्त घाम आल्याने शरीरावर काही परिणाम तर दिसणार नाही तर आरोग्यासाठी हानीकारक ठरेल. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन येईल. महत्त्वाची मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट्स कमी होतील. किडनीचे विकार, कार्डिओव्हॅस्कुलर प्रॉब्लेम्स आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतील, असे तळवळकर्स जिमचे फिटनेस एक्स्पर्ट शरद चौहान यांनी सांगितले.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

जे. जे. रुग्णालयात सुरू झाली खास डॉक्टरांसाठी जिम

$
0
0

मुंबई – 24 x 7  रुग्णांच्या सेवेत सेवेत असणार्‍या डॉक्टरांकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसतो. पण आता डॉक्टरांचेही आरोग्य निरोगी राहण्यासाठी जे.जे रुग्णालयात खास सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते  नुकतेच जे.जे रुग्णालयातील अद्ययावत व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

डॉ.दीपक सावंत यांनी या व्यायमशाळेसाठी आमदार निधीतून खास अद्ययावत साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. तसेच  या व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी लवकरच महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशी रिक्रेशन सेंटर्स उभारली जातील अशी माहिती डॉ.सावंत यांनी दिली आहे. व येत्या पाच वर्षांत डॉक्टरांचा मेंटल व फिजिकल स्ट्रेस कमी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. (सलंब सर्वांगासन – ताण दूर करण्याचा उपाय )

  • संबंधित दुवे- 

ट्रेडमिल वापरताय ? मग या 5 खास टिप्स पहाच !

जिममध्ये व्यायामापूर्वी नाश्त्याला खा हे 5 पदार्थ

छायाचित्र सौजन्य – Getty Images

उद्या निकाल ‘बारावी’चा !

$
0
0

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या (27 मे) रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या एच.एस.सी बोर्डाच्या परीक्षेचा  निकाल  बोर्डाच्या अधिकृत संकेतसंस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल.

बारावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निकालाची काळजी करत न बसता शांतपणे त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा.

कुठे पहाल बारावीचा निकाल ? 

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.hscresult.mkcl.org

ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर 4 जून रोजी विद्यार्थांना दुपारी तीन वाजता निकालाची प्रत हाती मिळेल. तर त्यानंतर 15 जून पर्यंत विद्यार्थी गुणपडताळणी बाबत अर्ज दाखल करू शकतात.

एका परीक्षेच्या आधारे सार्‍या जीवनाचा निर्णय घेऊ नका. तसेच मुलांना परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांनी त्यांना रागवताना या ५ चुका टाळा.

 

संबंधित दुवे-  

युरिन इंन्फेक्शनवर परिणामकारक ‘दुधी भोपळ्याचा’रस!

$
0
0

मुत्रविसर्जन करताना जळजळ होणे, वेदना होणे ही मुत्रमार्गातील संसर्गाची लक्षणं आहेत. मग त्यावर इतर औषधोपचार करण्याआधी ‘दुधीभोपळ्याचा रस’ हा घरगुती उपाय नक्की करून पहा. दुधीमध्ये पाण्याचा अंश अधिक असल्याने मुत्रमार्गाच्या संसर्गापासून आराम मिळण्यास मदत होते.  दुधी भोपळ्याच्या रसासोबतच आहारातही दुधीचा वापर केल्यास मुत्रविकारांपासून लवकर आराम मिळण्यास मदत होते.

का आहे दुधी भोपळा गुणकारी ? 

मुत्रमार्गात संसर्ग झाल्यास, मूत्रविसर्जन करताना जळजळ होते. कारण या दरम्यान मुत्रामध्ये अ‍ॅसिडची (आम्ल) मात्रा अधिक असते. दुधी भोपळयात 96% पाण्याचा अंश असतो. त्यामुळे दुधीच्या सेवनाने शरीरात थंडावा निर्माण होतो. अल्काईन स्वरुपाचा दुधी अ‍ॅसिडची दाहकता कमी करून मूत्रविसर्जनाच्या वेळी होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

कसा कराल दुधी भोपळ्याचा आहारात समावेश 

  • मुत्रविसर्जन करताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी नियमित सकाळी ग्लासभर ताजा दुधी भोपळ्याचा रस प्यावा.
  • दुधीचा रस बनवताना त्यात एका लिंबाचा रस मिक्स करावा. लिंबामुळे ‘व्हिटामिन सी’ व ‘अ‍ॅन्टीऑक्सिडंट’ यांचे प्रमाण वाढते.
  • अ‍ॅन्टीबॅक्टेरीएल गुणधर्म वाढवण्यासाठी त्या रसात पुदीना किंवा कोथींबीरीची पाने वाटताना मिसळावीत.

खबरदारीसाठी 

दुधीचा रस बनवताना स्वच्छता बाळगा.

दुधीचा रस हा चवीला कडवट असल्याने पचनसंस्थेत बिघाड करु शकतो. जर त्याचा त्रास होत असेल तर  दुधीचा रस घेणे टाळा.

Translated by  - Dipali Nevarekar

Source - lauki-juice-the-secret-remedy-for-urinary-tract-infections


बारावीचा निकाल 91.26 %; कोकण ठरले अव्वल !

$
0
0

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील नऊ विभागांत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (27मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 91.26 टक्के लागला असून, कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 95.68 टक्के निकाल लागला आहे.

विभागवार निकाल - 
कोकण 95.68 टक्के
अमरावती 92.50 टक्के
कोल्हापूर 92.13 टक्के
नागपूर 92.11 टक्के
लातूर 91.97 टक्के
औरंगाबाद 91.77 टक्के
मुंबई 90.11 टक्के
नाशिक 88.13 टक्के
पुणे 91.96 टक्के

                                आज दुपारी 1 वाजता  विद्यार्थ्यांना  ऑनलाईन निकाल  पाहता  येईल. तसेच 4जून रोजी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.  परीक्षेच्या निकालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने २७८९ ३७ ५६ या दूरध्वनी क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर भेट  द्या -

संबंधित दुवे -

‘त्रिफळा’- केसांच्या समस्या दूर करणारा घरगुती उपाय

$
0
0

आयुर्वेदामध्ये अनेक जुनाट आणि नियमित भेडसावणर्‍या समस्यांवर उपाय आहेत. आज आबालवृद्धांना भेडसावणारी समस्या म्हणजे केसगळती ! मग केसांच्या समस्या टाळण्यासाठी ‘त्रिफळा’चा वापर नक्की करा.

त्रिफळा म्हणजे काय ? 

आवळा, हरडा व बेहडा यांचे मिश्रण म्हणजे त्रिफळा.  त्रिफळा हे ‘व्हिटामिन सी’, अ‍ॅन्टीऑक्सिडंट व अ‍ॅन्टी फंगल यांनी परिपूर्ण असते. त्रिफळामुळे केसांची मुळं मजबूत होतात. केसगळती थांबते तसेच केसांतील कोंड्याची समस्यादेखील कमी होण्यास मदत होते. बाजारात  किंवा आयुर्वेदीक औषधं विक्रेत्यांकडे तयार त्रिफळा चूर्ण उपलब्ध असते.  कॅपसुल्स, पावडर किंवा अर्क अशा विविध स्वरुपात मिळणारे त्रिफळा चूर्ण  तुमच्या सोयीनुसार निवडा.

कशी वापराल त्रिफळा पावडर - 

  • 2 कप पाण्यामध्ये 1  चमचा त्रिफळेची पावडर मिसळावी.
  • हे मिश्रण, मंद आचेवर गरम करून निम्मे होईपर्यंत उकळावे.
  • मिश्रण थंड झाल्यावर, टाळूवर लावावे.
  • 30मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने किंवा शिकाकाई युक्त शाम्पूने स्वच्छ धुवावेत.

हा प्रयोग आठवड्यातून दोनदा करावा. शिकाकाईमुळे केसांची चमक व घनता वाढायला मदत होते.

संबंधित दुवे 

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Prevent HairFall with Trifala

छायाचित्र सौजन्य – Getty Images

थंडगार दुधाने हटवा, डार्क सर्कल्सची समस्या!

$
0
0

रात्री उशिराभर जागल्याने, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची समस्या अनेकांना भेडासवते. मग त्यांना लपवण्यासाठी आता सौंदर्यप्रसाधनांची काहीच गरज नाही. कारण थंडगार दूध या समस्येपासून तुमची झटपट सुटका करू शकते. हे तुम्हाला ठाऊक  आहे का?

थंड दुधाचे फायदे -

थंडगार दुधामुळे डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं, सूज यांचप्रमाणे सुरकुत्यादेखील कमी होण्यास मदत होते. दुधाचा थंडावा रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करतो . तसेच दुधातील प्रोटीन्स डोळ्यांच्याखालील त्वचेचे पोषण करते व लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचा मऊसूद होते. [1]

कसा कराल थंड दुधाचा वापर?

  • थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो काही वेळ  डोळ्यांवर ठेवावा. 5-10  मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.
  • याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी,  थंड दुधाचा डोळ्यांवर हलका मसाज केल्याने सकाळी तुमचा चेहरा टवटवीत होईल.

डार्क सर्कलची समस्या कमी करण्याचे अधिक उपाय पाहण्यासाठी, खालील फोटोवर क्लिक करा. 

dark-circles

 

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - natural-remedy-will-reduce-your-dark-circles-overnight

Reference:

[1] John Davidson. Grandma’s Ancient Beauty Remedies From Her Kitchen, Series-43, 2013, 5 Page

छायाचित्र सौजन्य – Getty Images

अनंत ‘मोनिका’ची ध्येयासक्ती, बारावीत मिळवला फर्स्ट क्लास!

$
0
0

वर्षभरापूर्वी घाटकोपर स्टेशनवर ट्रेन पकडताना , पाय सटकून मोनिका मोरेला अपघात  झाला. या अपघातात तिने दोन्ही हात गमवले मात्र जिद्द सोडली नाही . इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या मोनिकाने बारावीच्या परीक्षेत 63% गुण मिळावत घवघवीत यश संपादन केले आहे. परेल येथील केईम रुग्णालयात 6 महिने उपचार घेतल्यानंतर मोनिकाने अवघ्या अडीच ते तीन महिन्यात सचोटीने अभ्यास केला. यामध्ये शिक्षकांचा आणि मित्र-मैत्रिणींचे मोलाचे सहाय्य मिळाल्याचे मोनिका सांगते.  बारावीत फर्स्ट क्लास मिळवणार्‍या मोनिकाला भविष्यात वाणिज्य (कॉमर्स) शाखेत पदवीधर व्हायचे आहे.

कृत्रिम हातांनी पुन्हा जागवल्या आशा 

रेल्वे अपघातात हात गमावल्यानंतर मोनिकाने  केईम रुग्णालयाच्या ऑर्थोपेडीक विभागात  उपचार घेतले. आता मायोइलेक्ट्रीकल तंत्राच्या सहाय्याने कार्यांन्वित होणार्‍या कृत्रिम हातांनी मोनिका आपली नेहमीची सारी कामे करते. कृत्रिम हातांनी मोनिका लिहण्याचा आणि टाईपिंग करण्याचा सराव करते.

इच्छा तेथे मार्ग 

अपघातानंतर पुन्हा जीवनाची घडी बसविणं ही प्रक्रिया कठीण होती. मात्र डॉक्टर , माझे मित्र- मैत्रीणी , कुटुंब आणि शिक्षकांच्या मदतीनेच मला अपघाताच्या धक्क्यातून बाहेर पडणं सोपे झाले. हॉस्पिटलमधून डीस्चार्ज मिळाल्यानंतर मोनिकाने लगेचच कॉलेजला जायला सुरवात केली. मित्र – मैत्रीणींसोबत दिवसाचा बराच वेळ घालवल्यामुळे, हळूहळू अपघाताचा विसर पडला असे मोनिका सांगते.

आयुष्यातील त्या कटू आठवणीत न राहता हाती असलेल्या अडीच ते तीन महिन्यांत मोनिकाने शक्य तितका अभ्यास केला होता.  मात्र कॉलेज आणि घरगुती क्लासच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचे मोनिका सांगते. मोनिकाला बुक-किपिंग विषयांत सर्वाधिक मार्क मिळाले आहेत.

धीर सोडू नका 

आनंदाने मजा-मस्ती करण्याचा काळात, मोनिकाला झालेल्या या गंभीर अपघातानंतर तीने न खचता पुन्हा नव्याने जीवनाकडे पहाण्याचा मार्ग निवडला आहे. ‘एखाद्या परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे निराश न  होता पुन्हा प्रयत्न करा.’ असा सल्ला  मोनिकाने दिला आहे.

संबंधित दुवे -

छायाचित्र सौजन्य – India.com / Marathi

त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’!

$
0
0

अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण  तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर  निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

  • केसांतील कोंडा कमी होतो  

आवळा हे एक उत्तम हेअर कंडीशनर आहे. पण त्याचबरोबर केसातील कोंडा कमी करण्यासही आवळा मदत करतो.

  • आवळ्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट टाळूवर लावावी.
  • 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावेत.

तुम्ही आवळा सुकवून साठवूनही ठेवू शकता.

  • गरजेनुसार सुकलेला आवळा पाण्यासोबत वाटून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळावा.
  • ही पेस्ट टाळूवर लावून शिकाकाईच्या पावडरने केस धुवावेत.

केसातील कोंडा कमी करण्यासाठी आवळ्यासोबत तुळशीची पानेही फायदेशीर आहेत.

  • आवळा पावडरमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवावी.
  • अंदाजे 10 तुळशीच्या पानांचा रस काढून तो आवळ्याच्या पेस्टमध्ये मिसळावा.
  • हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावून 30 मिनिटांनी केस पाण्याने स्वच्छ धुवावेत.

नैसर्गिकरित्या चमक देतात 

अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आवळा फारच फायदेशीर आहे. आवळ्यामुळे केसांना रंग चढत नाही पण हीनामध्ये आवळा मिसळल्याने त्याचा अंतिम परिणाम सुधारतो. केसांना हीना (मेहेंदी) लावल्यानंतर केसांना चमक मिळण्यास मदत होते. केसांना मेहेंदी लावताना, आवळा पावडर सगळ्यात शेवटी म्हणजेच केसांना मेहेंदी लावताना मिसळावी. केसांचे आरोग्य राखणारे हे हीना – हेअर पॅक्सदेखील नक्की आजमावून पहा.  

केसांचे समूळ पोषण करते 

‘व्हिटामिन ए’ ने परिपूर्ण असलेला आवळा, शारीरिक आरोग्यासोबतच केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत  करतात. आवळ्यामुळे केसांना चमक मिळते, टाळूवरील शुष्कता कमी होते. तसेच केस  मऊसुद  होण्यास  मदत होते. तसेच आवळ्यांमुळे केसांना फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो परिणामी केसांची मूळं मजबूत होतात.

  • आवळा पावडरमध्ये पाणी मिसळून त्याची पेस्ट रात्रभर भिजत ठेवा. दुसर्‍‍या दिवशी सकाळी आवळ्याची पेस्ट केसांना लावून काही तासांनंतर केस सौम्य  शाम्पूने धुवावेत.

स्किन एजिंगची समस्या कमी होते 

  • आवळ्याच्या रसात ‘व्हिटामिन ए’ चे प्रमाण मुबलक असते. ‘व्हिटामिन ए’मुळे कोलेजनची निर्मिती वाढते. यामुळे त्वचा चिरतरूण राहते.
  • रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने कोलेजन घटण्याची शक्यता कमी होते व शरीरात कोलेजनची निर्मिती वाढते.
  • रोज आवळ्याचा रस बनवणे शक्य नसल्यास, बाजारात मिळाणारा तयार आवळ्याचा रस रोज सकाळी प्यावा.

संबंधित दुवे -

केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !

Translated By  -  Dipali Nevarekar

Source – Amla-or-gooseberry-the-magical-remedy-for-hair-and-skin-problems

Image Source – Getty images

पित्ताचा त्रास कमी करण्याचे 5 घरगुती उपाय

$
0
0

महाराष्ट्रभरात उन्हाच्या झळा वाढ्त्या आहेत. वातावरणात उष्णता वाढल्याने अनेकांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मग काही औषधं आणि गोळ्या खाण्याऐवजी हे 5 घरगुती उपाय नक्की करून पहा. पण हे उपाय खरचं परिणामकारक आहेत का ? असा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतोय? तर काळजी करू नका.  हे उपाय आहार व पोषणतज्ञ डॉ. दीपशिखा अग्रवाल यांनी सुचवले आहेत.

  • गुळ :  गुळाचा छोटासा तुकडा चघळत रहा. हळूहळू तो तोंडात विरघळेल. गुळाचा परिणाम पाच मिनिटांत सुरू होईल. 
  • थंड दुध : पिताचा त्रास होत असल्यास ग्लासभर थंड दुध  प्यावे. थंड दुध प्यायल्याने 15 मिनिटांत जळजळ कमी होण्यास मदत होते.
  • ओव्याचे पाणी :  ग्लासभर गरम पाण्यात अर्धा चमचा ओव्याची पूड व चिमूटभर मीठ टाकून ते पाणी प्यावे. यामुळे छातीतील जळजळ 8 मिनिटांत कमी होण्यास मदत होते.
  • दही:  जेवल्यानंतर तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवतो का? मग त्यापासून आराम मिळवण्यासाठी वाटीभर दही खावे. मात्र त्यात साखर किंवा मीठ टाकणे टाळावे.
  • शहाळ्याचे पाणी : पित्ताचा त्रास  कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे शहाळ्याचे पाणी. थंडगार पाणी प्यायल्याने पचनाचा मार्ग सुधारतो.

तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास रोज सकाळी 3-4 तुळशीची पानं, पाण्यासोबत गिळावी. ( चावू/चघळू नये)

संबंधित दुवे -

डी-हायड्रेशन पासून बचावण्यासाठी खास ’9′ टीप्स !

Translated By  -  Dipali Nevarekar

Source  -  5-quick-fixes-for-acidity-you-can-try-at-home

दालचिनीच्या पेस्टने करा मुरुमांचा नाश !

$
0
0

अ‍ॅक्ने किंवा मुरुमांचा त्रास हा चेहर्‍याचे सौंदर्य कमी करतो. नकळत याचा परिणाम त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही होतो.   मग मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ‘दालचिनी आणि लिंबाचा रस’ हा घरगुती उपाय करून पाहिला आहे का ?

दालचिनीमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, मुरुमांची निर्मिती करणार्‍या बॅक्टेरियांचा नाश होण्यास मदत होते. तसेच चेहर्‍यावरील घाण, अतिरिक्त तेल व ब्लॅकहेड्स कमी होण्यासही मदत करतात. तर लिंबामुळे मुरुमांवर व त्याच्या डागांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. लिंबू मुरुमांमुळे येणारी सूज, लालसरपणा कमी करण्यास मदत करतो.

  •  ‘दालचिनी आणि लिंबाची’ पेस्ट 

मुरुमांच्या आकार  व संख्येनुसार दालचिनीची पावडर घेऊन त्यात ताज्या लिंबाचा रस मिसळा.

तयार पेस्ट मुरुमांवर लावून काही तासांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

मात्र चेहरा धुतल्यानंतर लगेचच साबण किंवा फेसवॉशचा वापर करू नये.

मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती फेसपॅक्सचादेखील वापर करू शकता. तर मग नक्की करा घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !

Translated By –  Dipali Nevarekar

Source  -  Try this cinnamon-lemon mix to banish acne

Image Source – Shutterstock


साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! ( 10-16 ऑगस्ट )

$
0
0

मेष –:

या आठवड्यांत तुम्हांला व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता असल्याने शरीराकडून मिळणार्‍या संकेतांकडे लक्ष ठेवा आणि वेळीच उपाय करा. सोबतच कमकुवत पचनशक्ती तुम्हांला अधिकच त्रासदायक ठरू शकते.  त्यामुळे  औषधांची  टाळाटाळ करू नका. तसेच व्यायाम आणि जेवणाची वेळ पाळा. यामुळे तुमची आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

वृषभ -:    

तुमच्या राशीतील शनी आणि सूर्याची  स्थिती पाहता  तुमचे आरोग्य  बिघडण्याची दाट  शक्यता आहे.   व्हायरल   इंफेक्शनपासून दूर रहा. घसा खवखवण्याची शक्यता आहे.  रक्तदाबाचा  त्रास  होत असल्यास  नियमित चेकाअप  करून घ्या   आणि    त्यावर   नियंत्रण   ठेवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन -:  

‘गणेशा’च्या सल्ल्यानुसार  या आठवड्यांत सर्दी-खोकल्याकडे दूर्लक्ष करू नका. अन्यथा  त्याचा  अधिक  गंभीर त्रास  होण्याची शक्यता आहे. शरीराच्या खालच्या भागाला  इजा होण्याची शक्य ता  आहे. रक्तदाब   किंवा  मधूमेहासारख्या आजारांशी तुम्ही सामना करत असल्यास या आठवड्यांत  विशेष दक्षता घ्या.  वेळच्या वेळी   औषध  घ्यावीत.

कर्क -:

तणावपूर्ण परिस्थितींमुळे या आठवड्यांत तुम्हांला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. तुमची पचनशक्ती कमकुवत होण्याची शक्यता अधिक आहे. या आठवड्यांत शांत आणि आरामदायी राहण्याचा  प्रयत्न करा यामुळे तणाव आणि आरोग्यही सुधारेल. तसेच दातदुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने त्यावर वेळीच योग्य उपचार करा.

सिंह -:

या आठवड्यात  तुमचे आरोग्य ठणठणीत राहील. परंतू पचनाचे विकार, सर्दी-पडसे अशा समस्या डोके वर काढण्याची शक्यता आहे. परंतू म्हणून आरोग्याची हेळसांड न करता चांगल्या सवयी बाळगा.

कन्या -:

या आठवड्यात आरोग्यसंबंधित फारश्या तक्रारी नसल्या तरीही काही पचनाचे विकार तुम्हांला  पुन्हा त्रास देऊ  शकतात.  त्यामुळे औषध, व्यायाम याचा नियमित सराव करा.

तूळ -:

काही जुने विकार पुन्हा   त्रासदायक ठरण्याची चिन्हा असल्याने  आरोग्याची विशेष काळजी घ्या.   काही   औषधी वनस्पती तुम्हांला यावर परिणामकारक  निकाल देऊ शकतील.  इतरांसाठी  हा आठवडा आरामदायी असला तरीही सर्दी, खोकला अशा लहान-सहान आजारांकडे दूर्लक्ष करू नका.

वृश्चिक -:  

सर्दी -खोकला असे लहान  आजार  त्रासदायक वाटत नसले तरीही   त्याच्याकडे  दुर्लक्ष  करणं   तुम्हांला महागात पडू शकते. अशा आजारांवर वेळीच  उपचार न केल्यास  त्याची  गंभीरता  वाढल्याने  तुम्हांला सक्तीचा आराम करण्याची   परिस्थिती  निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यमवयीन  लोकांनी  जीवनशैलीत होणार्‍या बदलांकडे लक्ष द्यावे.

धनु -:   

या आठवड्यात शनी आणि शुक्राच्या प्रभावामुळे  आरोग्यासंबंधित कुरबूरी वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन चालणार्‍या काही आजारांशी सामना करत असल्यास काळजी घ्या. सांधेदुखीच्या रुग्णांनी औषधांमध्ये बदल करून पहावा.

मकर -:  

पचनाच्या विकारांवर तात्काळ औषधोपचार करून घेणेच तुमच्यासाठी हितावह आहे. अन्यथा तुमचे आरोग्य चांगले आहे.मध्यमवयीन व वृद्ध लोकांनी मधूमेह, रक्तदाब अशा आजारांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. काही अनियमित लक्षणं आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कुंभ -:

या आठवड्यात ग्रहांचा तुमच्या राशीतील प्रभाव पाहता काही आजार गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजारांची लक्षण दिसताच त्यावर उपाय करा. वयोवृद्ध लोकांनी  फीट राहण्यासाठी संध्याकाळी चालण्याचा व्ययाम करावा.

मीन -:    

या आठवड्यात सिझनल फ्ल्यू तसेच  लहान-सहान आजार यांमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. काही दिवस तुम्हांला सक्तीचा आराम करण्याची गरज आहे. त्यामुळे काही प्रतिबंधात्मक उपाय करूनच आजारांवर नियंत्रण मिळवा. तसेच जंक-फूड खाणे टाळा.

 

GaneshaSpeaks logo

 

 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

शहाळ्याच्या पाण्याने कमी करा पिंपल्सचे डाग !

$
0
0

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा शहाळ्याचे पाणी प्यायला असाल पण त्याचा वापर त्वचेची कांती सुधारण्यासाठीदेखील होतो. हे तुम्हांला ठाऊक आहे का ? शहाळ्याचे पाणी चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते. पिंपल्सप्रमाणेच कांजण्याचे व्रण  देखील कमी करण्यास शहाळ्याचे पाणी मदत करते.

का आहे शहाळ्याचे पाणी फायदेशीर ? 

  • शहाळ्याच्या पाण्यामध्ये त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्याने  त्वचेवरील डाग, समान रंग सुधारण्यास मदत होते.
  • शहाळ्याच्या पाण्यामुळे त्वचा  नैसर्गिकरित्या ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण सुधारते. परिणामी त्वचेचे सौंदर्य सुधारते.
  • शहाळ्यातील ‘सायटोकायनीन्स’ घटक त्वचेचा पोत सुधारून नव्या पेशींची निर्मिती सुधारण्यास मदत होते.
  • शहाळ्याच्या पाण्यातील अ‍ॅन्टीमायक्रोबियल, अ‍ॅन्टीफंगल आणि अ‍ॅन्टीव्हायरल गुणधर्म त्वचेचा  संसर्गापासून बचाव करतात.
  • शहाळ्याच्या पाण्यात अ‍ॅन्टीऑक्सिडंट  घटक असल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच त्वचेचे नुकसान टळते.

कसे वापराल ? 

  • शहाळ्याच्या पाण्यात कापसाचा बोळा बुडवून तो त्वचेवर फिरवावा.
  • रात्रभर चेहरा असाच राहू द्यावा. दुसर्‍यादिवशी सकाळी मात्र चेहरा कोमट पाण्याने धुवा.

याचसोबत,

  • 2 चमचे शहाळ्याच्या पाण्यात 1 चमचा काकडीचा रस मिसळावा.
  • त्यात चमचाभर कच्चे दूध  मिसळावे.
  • तयार मिश्रण चेहर्‍यावर  लावून 15 मिनिटे सुकू द्यावे.
  • हा प्रयोग नियमित केल्यानंतर तुमच्या चेहर्‍यावरील डाग  हळूहळू कमी होण्यास मदत होईल.

संबंधित दुवे 

‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !

घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !

गुलाबपाणी व काकडीचा रस – ब्लॅकहेड्स हटवण्याचा जादूई घरगुती उपाय !

Translated By  -  Dipali Nevarekar

Source – use-coconut-water-to-remove-acne-scars-naturally

छायाचित्र सौजन्य – Getty Images

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

Reference:

Tanushree Podder, Beauty Solutions, 2005, 150- Page

 

 

शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’फायदेशीर !

$
0
0

भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्‍या मसाल्यांमध्ये आहे.  जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.  रात्री झोप येत नाही ? यामागे कामाचा नाही तर या ’7′ पदार्थांचा ताप आहे !

  • जायफळाचे फायदे 

जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी  स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता. मग पहा तुम्हांला अजून किती तास झोपेची गरज आहे. 

  • कसा कराल जायफळाचा आहारात समावेश 

1. जायफळ – मधाचे मिश्रण :

जायफळाची चिमूटभर पावडर चमचाभर मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी घ्यावे. मधात हे ‘5’ पदार्थ मिसळा आणि तुमचे वजन घटवा

2. जायफळाचा काढा : 

प्राचीन काळापासून शांत झोप येण्यासाठी जायफळाचा वापर केला जात असे.  जायफळाची पूड करून कपभर पाण्यात मिसळून उकळा. उकळ आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हांला आरामदायी झोप येण्यासाठी हा चहा नक्कीच मदत करेल.

3. जायफळयुक्त दूध :

रात्री झोपण्यापूर्वी तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ मिसळा. दुधामुळे  सेरोटोनीन आणि मेलाटोनीनचे प्रमाण वाढते. या दोन्हींमुळे तुम्हांला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणे फायद्याचे आहे.

4. जायफळ आणि आवळ्याचा  रस :

ग्लासभर  आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड  मिसळल्यास पचन सुधारते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी झोप येण्यास मदत होते. वजन घटवणारी 15 हेल्दी घरगुती ड्रिंक्स !

5. जेवणात  जायफळ :

रात्री झोपण्यापूर्वी चहा,कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा. तसेच रात्रीच्या जेवणात सूप, कढी किंवा दह्याचा समावेश करत असल्यास त्यात जायफळाची पूड जरूर मिसळा.

6. जायफळ पावडर :

तुम्हांला एखाद्या पेयात किंवा जेवणाच्या पदार्थात जायफळ पूड मिसळणे  आवडत नसल्यास चिमुटभर पूड पाण्यासोबत घ्यावी.  रात्री झोपण्यापूर्वी  हा प्रयोग केल्यास निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होईल.

  • खबरदारीचा उपाय – :

निद्रानाशावर जायफळ परिणामकारक असले तरीही त्याचा अतिवापर टाळा. चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका.  जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्त, मळमळणं, अस्वस्थ  वाटणं, तोंड सुकणं, सतत तहान लागणं असा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यास दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक असतो. रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !

Translated By  -  Dipali Nevarekar

Source – 6 ways to use nutmeg for a good night’s sleep

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

सीताफळ हटवेल केसातील ‘कोंड्या’ची समस्या !

$
0
0

केसातील कोंडा हा केसांप्रमाणेच तुमच्या त्वचेचही नुकसान करते. यामुळे चेहर्‍यावर, पाठीवर संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. यावर उपाय म्हणून तुम्ही काही  अ‍ॅन्टी-डॅन्डरफ  शाम्पूचा वापर करत असाल पण काही वेळेस त्यातील घटकांचा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. मग असा धोका पत्करण्यापेक्षा ‘सीताफळा’हा नैसर्गिक आणि घरगुती उपाय तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

  • कसे आहे ‘सीताफळ’  फायदेशीर ? 

सीताफळाच्या बीया आणि गर हे दोन्ही  अ‍ॅन्टीफंगल, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल  आणि अ‍ॅन्टीसेप्टिक असतात. त्यामुळे टाळूवरील संसर्ग कमी करून कोंड्याच्या समस्येवर मात करणे शक्य होते. तसेच याबरोबरीने खोबरेल तेलाचा वापर केल्यास टाळू व केसांचे आरोग्य सुधारते. ते अधिक हायड्रेटेड राहण्यास मदत होते. परिणामी कोंड्याचा त्रासही कमी होतो.

कसे वापराल सीताफळ ? 

  • तुमच्या केसांच्या उंचीप्रमाणे सीताफळाचा गर घेऊन त्याची पेस्ट करा.
  • तवा गरम करून त्यात थोडेसे खोबरेल तेल गरम करून त्यात सीताफळाची पेस्ट घाला व सतत ढवळत रहा. मात्र तेल खूप गरम होणार नाही याची खात्री करा.
  • तेलाचा रंग़ हलकाच बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण वाटीत काढून ठेवा.

हे मिश्रण  थोडे थंड झाल्यावर टाळूवर लावा आणि तासाभराने केस स्वच्छ धुवा. हे मिश्रण  लावताना केसांना हलकाच मसाजही करावा. यामुळे ते टाळूत  नीट मुरेल.  यासाठी तुम्ही गरम टॉवेलनेही केस घट्ट बांधून ठेवू शकता.

हा प्रयोग आठवड्यातून 2-3 वेळा करावा.

टीप :  हा उपाय केस धुण्यापूर्वी काही वेळ करायचा असल्याने त्यातील तेलाचे प्रमाण तुम्ही ठरवू शकता. सीताफळाच्या सालीऐवजी तुम्ही बीयादेखील वापरू शकता मात्र त्या वाटताना थोडी काळजी घ्या.

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Sitaphal or custard apple — natural dandruff fighter

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

मुंबई उच्च न्यायालयाने हटवली ‘मॅगी’वरील बंदी !

$
0
0

मॅगीमध्ये शरीराला घातक असलेल्या घटकांचे प्रमाण अधिक आढळल्याने काही महिन्यांपूर्वी देशभर गदारोळ माजला होता. परिणामी मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी मुंबई  उच्च न्यायालयाने हटवली आहे.

मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजेच शिसे अतिरिक्त प्रमाणात असल्याचे काही चाचण्यांमध्ये उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्यावर बंदीचे आदेश दिले होते. मात्र हे दावे खोटे असल्याचे सांगत  नेस्लेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.  त्यावर आज सुनावणी करताना आज  सार्‍या चाचण्यांमधून बाहेर पडलेल्या मॅगीला बाजारात विक्रीसाठी हिरवा कंदील दाखवत त्यावरील बंदी हटवली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने बंदी उठवली असली तरीही देशभरात इतरत्र मॅगीबाबात नेमका काय निर्णय घेतला जाणार याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

संबंधित दुवे –  

’2′ मिनिटांत बनतात हे पाच हेल्दी पदार्थ, मग मॅगी कशाला हवी?

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 

 

Viewing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>