Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

शेफ संजीव कपूर रेसिपी: उन्हाळ्यासाठी खास भाज्या व फळांचे सलाड

$
0
0

या सतत वाढणाऱ्या उन्हात भूक न लागणे हे अगदी सामान्य आहे. पण योग्य प्रमाणात खाणे आणि भरपूर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे. उन्हाळ्यात सलाड, कच्च्या भाज्या, फळे खाल्याने तुमचे पोट भरलेले राहते व तुम्हाला हलके वाटते. म्हणून उन्हाळ्यासाठी खास शेफ संजीव कपूर यांनी सांगितलेले फळं आणि भाज्यांचं तिखट व मसालेदार सलाड नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात घ्या आस्वाद या ’5′ स्वादिष्ट अन अल्हाददायक सलाड्सचा !

सायट्रस फाळांचे फायदे, काकडीचा थंडावा आणि शिमला मिरचीत असलेल्या लो कॅलरीज यामुळे उन्हाळासाठी हे सलाड एक उत्तम पर्याय ठरेल. तसंच हे पदार्थ अन्नपचनास फायदेशीर ठरतात आणि त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात. द्राक्षात भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुम्ही हायड्रेटेड राहता. द्राक्षांमुळे इम्म्युनिटी वाढीस लागते. तसंच त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा फळे घालू शकता. लिंबाचा रस, चाट मसाला घालून हे मस्त सलाड तयार होते. मग जाणून घेऊया हा उन्हाळा सुसह्य करणारी ही हेल्दी सलाड रेसिपी. कलरफूल आणि टेस्टी बीटरूट सॅलॅड

साहीत्य:

  • २ कापलेले सफरचंद.
  • २ संत्री (संत्राच्या फोडी).
  • १०-१२ हिरवी द्राक्षे कापलेली.
  • १०-१२ काळी द्राक्षे कापलेली..
  • १ हिरवी शिमला मिरची कापलेली
  • १ काकडी कापलेली. उन्हाळा विशेष -: थंडगार काकडी रायता
  • १ टोमॅटो कापलेला.
  • १ कांद्याची पात बारीक चिरलेली.
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
  • १ छोटा चमचा चाट मसाला.
  • १ छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल.
  • मीठ चवीनुसार.
  • २ छोटे चमचे लिंबाचा रस. उन्हाळ्यातील रिफ्रेशिंग पेय – जलजीरा

कृती:

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


या आयुर्वेदीक उपचारांनी करा डिप्रेशनवर मात !

$
0
0

वर्ल्ड हेल्थ डे च्या निमित्ताने WHO (World Health Organization) यांनी डिप्रेशन या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे ठरवले आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही Dr Vaidya’s – New Age Ayurveda च्या आयुर्वेदीक एक्स्पर्ट डॉ. सूर्या भगवती यांच्यांशी संवाद साधला. डिप्रेशनवर मात करण्यासाठी आयुर्वेद कसे फायदेशीर आहे आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने तुम्ही अधिक आरोग्यदायी आयुष्य कसे जगू शकता यावर त्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि शरीरात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे असंतुलन याचा परिणाम डिप्रेशन मध्ये होतो. आयुर्वेदात डिप्रेशन म्हणजे मनोअवस्था. सत्त्व, राजस,  तामस या मानसिक ऊर्जेचे असंतुलित प्रमाण आणि वात, पित्त, कफ या शारीरिक ऊर्जेचे असंतुलन यामुळे मानसिक पातळीवर असंतुलन निर्माण होते. डिप्रेशनमध्ये सात्विक ऊर्जा कमी होवून राजसिक आणि तामसिक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. प्रामुख्याने कफ प्रवृत्तीत झालेले असंतुलन हे डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरते. etiological factors शी संबंध आल्यास वात आणि पित्त प्रवृत्तीत असंतुलन होते. त्याचा परिणाम न्यूरोहार्मोन्सवर होतो. neuroendocrine सेल्स मधून स्त्रवणाऱ्या हार्मोन्स म्हणजे न्यूरोहार्मोन्स. हे सेल्स मेंदू, पाठीचा कणा आणि हृदयात असतात. नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी

जर तुमची कफ प्रवृत्ती असेल तर तुम्ही आळशी, सुस्तावलेले, घाबरलेले आणि डिप्रेसड असता. अतिरिक्त कफ ऊर्जेमुळे शरीरात मॉईश्चर तयार होते. जेव्हा तुम्ही तुमची कफ प्रवृत्ती योग्य आहाराने संतुलित करता तेव्हा तुम्हाला शरीरात जडत्व जाणवते. डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !

कोणते अन्न घ्यावे?

  • फळे: सफरचंद, चेरीज, ब्लॅकबेरीज, आंबा, पेर, सुकलेले अंजीर, सुकलेल्या क्रॅनबेरीज, जर्दाळू, डाळिंब, मनुका.
  • भाज्या: ब्रोकोली, शतावरी, बीट, गाजर, फ्लॉवर, लसूण, पालेभाज्या, मशरूम, कांदा, बटाटा, पालक, मुळा, रंगीत शिमला मिरची, मटार, भेंडी आणि मोड आलेली कडधान्ये.
  • धान्य: सातू, मका, ज्वारी.
  • डाळी: काबोली चणे, मसूर.
  • दुग्धजन्य पदार्थ: तूप, बकरीचे दूध. (प्रमाणात)
  • दाणे आणि बिया: भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया. (प्रमाणात)
  • तेल: मक्याचे तेल, मोहरीचे तेल. ( mustard oil)
  • गोड पदार्थ: मध (कच्च्या स्वरूपात)
  • मसाले: काळीमिरी, आलं, हळद, कोथिंबीर, जिरं.
  • औषधी वनस्पती: अश्वगंधा, ब्राम्ही, शंखपुष्पी, शतावरी, वेलची आणि वेखंड.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

खाण्यापूर्वीच कशी ओळखाल भेसळयुक्त आणि खराब अंडी !

$
0
0

कोलकत्ता, चैन्नई पाठोपाठ डोबिंवलीतही अंड्यामध्ये प्लॅस्टिक सदृश्य घटक सापडल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मांसाहारी प्रेमींसाठी अगदी नाश्त्यालाही अंड्यापासून अनेक टेस्टी पदार्थ झटपट तयार होत असल्याने अनेकजण आहारात अंड्यांची निवड करतात. परंतू अंड्यांमध्येही आता भेसळ होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर अंडी विकत घेताना तसेच त्यापासून पदार्थ बनवताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Central Poultry Development Organization, गोरेगाव येथील असिसटंट डिरेक्टर डॉ.सत्यनारायण स्वामी यांनी याबाबत काही टीप्स शेअर केल्या आहेत.

डॉ. स्वामी यांच्या सल्ल्यानुसार, प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात अंडी कोल्ड स्टोरेजमधून थेट बाहेर काढल्यानंतर खराब होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे या दिवसात अंड खाताना थोडी काळजी आणि सजगता पाळणं गरजेचे आहे. काही घातक केमिकल्सचा वापर करून नकली अंडी बनवली जातात. जाणून घ्या गावठी की पांढरी अंडी खाणे अधिक फायदेशीर ?

अंड्यामधील भेसळ कशाप्रकारे ओळखाल ?

  • अंड्याच्या कवचावरून, रंगावरून तुम्ही साधारण अंदाज लावू शकता.
  • आपल्याकडे अंड्याचे कोणतेच विशिष्ट किंवा स्टॅन्डर्ड वजन असावे असा नियम नाही. त्यामुळे बाजारात विविध वजनात अंडी उपलब्ध आहेत. पण अंड नकली बनवले असेल तर सहाजिकच ते जड असण्याची शक्यता असते. जड वाटणारी अंडी नीट पडताळून निवडा.
  • सामान्य अंड्यामधील पिवळा बल्क हा मऊ असतो. पण अंड्यांमध्ये भेसळ केलेली असेल तर ते कडक असते. तव्यावर टाकल्यानंतर व्यवस्थित पसरत नाही.
  • अंड नीट फेटता येत नसेल, वॉटर पेंटप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असेल, आतील बॅटर सामान्य अंड्यांप्रमाणे पातळ नसेल तर ते भेसळयुक्त असल्याची शक्यता असते.
  • अंड्याच्या आतील भाग रबरी जाणवल्यास त्याचा वापर टाळा.

आहारतज्ञ कांचन पटवर्धन यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार 22-35 डिग्री सेल्सिअलमध्ये अन्नपदार्थांमध्ये मायक्रोबायल बदल झपाट्याने होतात. त्यामुळे अन्न उन्हाळ्याच्या दिवसात खराब होते. अंड्याच्या कवचामध्ये डोळ्यांना दिसत नसले तरीही सुक्ष्म छिद्र असू शकतात. यामधून मायक्रोबायल वाढ होऊन अंड खराब होते.

सुमारे 42-45 डिग्री सेल्सिअस तापमान असल्यास कोल्ड स्टोरेजमधून काढलेली अंडी थेट उष्ण वातावरणात गेल्यास  अंड्यातील पांढरा भाग, त्यामधील प्रोटीन घटक यामध्ये स्टीफनेस वाढतो. परिणामी पांढर्‍या रंगांच्या गुठ्ळ्या वाढण्याची शक्यता असते. या तापमानात अन्न पूर्ण शिजत नाही मात्र त्याच्यामध्ये काही बदल होतात.

उन्हाळ्याच्या दिवसात अंड खाण्यापूर्वी ते चांगल्या स्थितीत असल्याची खात्री कशी कराल ?

  • अंड्याचा वापर करण्यापूर्वी ते पातेल्याभर पाण्यात  भिजत ठेवा. जर अंड वर तरंगले तर ते खाण्यास योग्य आहे. मात्र ते तळाशी गेल्यास खराब झाल्याचे संकेत देते.
  • अंड फोडल्यानंतर त्यामधील पिवळा भाग मऊ असावा तर पांढरा भाग हा पारदर्शी असावा.
  • अंड फोडल्यानंतर त्यामधील भागात लालसर डाग दिसल्यास त्याचा वापर टाळा.
  • अंड फोडल्यानंतर फार उग्र वास आल्यास त्याचा वापर कटाक्षाने टाळा.

अंड्यांना सुद्धा एक्सपायरी डेट असते. सामान्यपणे सात दिवसांपेक्षा अधिक दिवसांपूर्वीची अंडी जेवणात वापरू नका.मायक्रोबायल वाढ झालेली,खराब अंडी पोटात गेल्यास पचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळेस पोटात गॅस होणं, अपचन किंवा लूझ मोशनचा त्रास होऊ शकतो. मग उन्हाळ्यात अंड खाणे टाळावे का ? याबाबतचा सल्ला नक्की जाणून घ्या.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मधुमेहामुळे बहिरेपणा येतो का ?

$
0
0

मी ५० वर्षांचा असून मला मधुमेह आहे. गेल्याच महिन्यात माझ्या एका मित्राला बहिरेपणाची समस्या उद्भवली. त्याचे असे म्हणणे आहे की अनियंत्रित मधुमेहामुळे त्याला हा त्रास होत आहे. खरंच मधुमेहामुळे बहिरेपणा येतो का ? अनियंत्रित ग्लुकोजमुळे कानाच्या आरोग्यावर परिणाम होतो, हे कसे ओळखावे? मला खूप चिंता वाटते. कृपया मला मार्गदर्शन करा.

या प्रश्नाचे उत्तर एसआरव्ही हॉस्पिटलचे डायबोटोलॉजिस्ट डॉ. अभय विसपुते यांनी दिले.

सध्या, भारतात ६५.१ मिलियन पेक्षा अधिक लोकांना मधुमेह आहे आणि प्रत्येक वर्षी हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे अवेळी जेवणे, अपुरी झोप, शारीरिक व्यायामाचा अभाव, बदलेली जीवनशैली, अन्नाचे अति सेवन आणि भावनिक अस्वस्थता. या सगळ्या बदलांमुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्यास अडथळा येतो. तसंच मधुमेह नियंत्रित करण्यासाठी शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे वापरले जात नाही आणि त्यामुळे मधुमेहामुळे होणारे त्रास वाढीस लागतात.  त्यापैकी एक म्हणजे बहिरेपणा. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

अनियंत्रित ब्लड शुगर, रक्तदाब आणि ब्लड लिपिड्स मुळे कानाच्या आतील भागातील रक्तवाहिन्यांत ब्लॉकेजेस होतात व बहिरेपणा येतो. माझ्या सुमारे १३-१५% मधुमेही रुग्णांना बहिरेपणाचा त्रास आहे. साधारणपणे हा त्रास ज्याचे वय ४५ पेक्षा जास्त आहे आणि त्यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे, त्यांना होतो. कानात खाज येणे, कानातून आवाज येणे असे त्रास सुरुवातीला होतात आणि हळूहळू बहिरेपणाला सामोरे जावे लागते. मधुमेहींमध्ये मायक्रोव्हॅस्कुलर ब्लड सप्लाय कमी प्रमाणात होतो. त्यामुळे कानातील आतल्या भागात डीजेनेरेटिव्ह चेंजेस जलद गतीने होतात. त्यामुळे दोघांपैकी एका कानात कमी किंवा अधिक प्रमाणात रक्तपुरवठा होतो. परिणामी कानाच्या आतील भागावर ताण येतो. म्हणून जर तुम्हाला कोणत्याही एका कानात इको साऊंड ऐकू येत असेल तर हा बहिरेपणाचा संकेत असू शकतो. नक्की वाचा:  तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?

बहिरेपणावर एकच उपाय म्हणजे ऐकू येण्याची मशीन वापरणे. म्हणून नियमित कान तपासून घेणे योग्य ठरेल. २-३ वर्षांतून एकदा audiogram करून घ्या. तसंच बहिरेपणाला आळा घालण्यासाठी बहिरेपणाच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बहिरेपणा हा मधुमेह नसलेल्या व्यक्तीला ही येऊ शकतो. परंतु, मधुमेह असणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

बॉडी शेपर वापरल्यामुळे शरीर सुडौल होते का?

$
0
0

अनेक महिला वाढलेले शरीर लपवण्यासाठी टमी टकर अथवा बॉडी शेपर,शेप वेअर चा वापर करतात.काही विशिष्ट प्रकारच्या आउटफीट मध्ये बॉडी शेपर घातल्याने तुमचे शरीर सुडौल दिसू लागते.कारण त्यामुळे तुमचे वाढलेले शरीर तात्पुरते लपविले जाते.पण टमी टकर अथवा बॉडी शेपर वापरण्याबाबत अनेकांच्या निरनिराळ्या शंका असतात.

यासाठी Unmonk of Wellness चे फाउंडर व वेलनेस कोच आणि एंटरप्रेनर विक्रम दत्ता यांच्याकडून जाणून घेऊयात बॉडीशेपरचा तुम्हाला कितपत फायदा होऊ शकतो व सुडौल दिसण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स.

सर्वात प्रथम टोनिंग दी अॅब्स म्हणजे काय ते समजावून घेऊयात.जेव्हा एखादी व्यक्ती मला बॉडी टोनिंग करायचे असे सांगते तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे लेअर कमी करायचे असतात.त्वचेच्या खाली असलेल्या चरबीला अॅडीपोज टीश्यू असे म्हणतात जे फ्लॅबी व सॉफ्ट असतात ज्यामुळे ते दुमडले जातात.त्वचे खालील चरबी कमी झाल्यामुळे शरीर सुडौल दिसू लागते.यासोबत वाचा सिक्स पॅक अ‍ॅब्स हवेत? मग करा ‘प्लान्क’ व्यायामाचे हे 5 प्रकार

टमी टकर अथवा बॉडी शेपर घालल्यामुळे दाब येऊन शरीराचा आकार बदलतो.याचा आंतरिक शरीररचनेवर कोणताही परिणाम होत नाही.चरबी कमी झाल्यामुळे टोनिंग दी अॅब्स ही एक शारीरिक गोष्ट घडते.त्यामुळे शरीर निराळे दिसू लागते.आपले शरीर हे आपण जे अन्न खातो त्यातून तयार होत असते.त्यामुळे आपले शरीर फॅट आहे की फीट आहे हे खरेतर आपण शरीराला काय अन्न देतो,बसून काम करतो की कार्यशील आहोत यावर अवलंबून असते.टमी टकर अथवा बॉडी शेपर हे फक्त कॉस्टमेटीक टेम्पररी फिक्सेस असतात.त्यामुळे त्यांचा खरे वास्तवात शरीर सुडौल होण्यासाठी उपयोग होत नाही.तसेच वाचा कसा प्रिया बापटचा नवा फिटनेस फंडा तुम्हांलाही प्रेरित करेल !

जर दिवसभर किंवा दीर्घ काळ किंवा व्यायाम करताना बॉडी शेपर घातले तर फायदा होऊ शकतो का?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉडी शेपरमुळे स्नायूंवर काहीही परिणाम होत नाही तर त्यामुळे फक्त शरीर काही काळासाठी दाबले जाते.स्नायूंचे आंकूचन पावणे ही एक निराळी गोष्ट आहे.स्नायू आंकुचन व प्रसरण पावल्यामुळेच आपण शरीराची हालचाल करु शकतो.आपल्या शरीराच्या अंतर्गत ही प्रक्रिया सुरु असते.त्याचप्रमाणे पोटाचे स्नायू आंकुचन पावल्याने पोटाचा भाग कमी होणे,त्या भागातील चरबीचे लेअर कमी होणे असे काहीही होत नाही.सहाजिकच बॉडी शेपर घालल्यामुळे फक्त शरीराचा बाहेरील भाग दाबला जातो,ज्यामुळे श्वसन करण्यास त्रास होतो व शरीर तात्पुरते बनावट रितीने सुडौल दिसते.

बॉडी शेपर चा तुमच्या शरीराच्या अंतर्गत रचनेवर काहीही परिणाम होत नसल्यामुळे ते घातल्याने तुमच्या शरीरातील फॅट कमी होत नाहीत.त्यामुळे चरबी कमी न झाल्यामुळे शरीर देखील सुडौल होत नाही.बॉडी शेपर मुळे शरीर सुडौल होते हा एक गैरसमज आहे.पोटाची चरबी कमी करण्यात, ‘ कडूलिंबाची फुले’ गुणकारी !हे देखील जरुर वाचा.

जर शरीर सुडौल करायचे असेल तर शरीर निरोगी ठेवणे हाच एक उत्तम उपाय आहे.यायाठी संपुर्ण शरीराला नियमित व्यायामाची गरज असते.(फक्त अॅब्जसाठी नाही)तसेच चांगल्या आहाराची देखील आवश्यक्ता असते.त्याचप्रमाणे व्यायाम करताना बॉडी शेपर घालल्याने देखील काहीही चांगला परिणाम होणार नाही.अॅब एक्सरसाइज केल्यास पोटातील स्नायू मजबूत होतात.चांगल्या वर्कआउट रुटीन व योग्य आहारामुळे तुमचे फॅट कमी होणे हा बीएमआर(बेसल मेटाबॉलीक रेट) सुधारल्याचा परिणाम असतो.फक्त अॅब एक्सरसाइज करुन बीएमआर सुधारु शकत नाही अथवा त्यामुळे स्नायू मजबूत व शरीर सुडौल होत नाही.

स्ट्रेन्थ,इंन्डूरन्स व फ्लेक्सिबिलीटी ट्रेनिंगचे कॉम्बिनेशन व योगा प्रॅक्टीस मुळे शरीरावर चांगले परिणाम होतात.तसेच शरीराचे कार्य देखील सुधारते.त्यामुळे सहाजिकच शरीर सुडौल देखील होते.यासाठी जाणून घ्या अतिलठ्ठ लोकांनी कशी कराल योगाभ्यासाला सुरवात ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह स्वभावाच्या माणसांना कसे ओळखाल?

$
0
0

मनिष हा एक कामाप्रती प्रामाणिकपणा दाखवणारा तरुण एका नामांकित कंपनीमध्ये एका मोठ्या टीमसोबत काम करतो.लहान वयापासून त्याने असे अनुभवले आहे की जे लोक रागावतात व भांडतात त्यांच्याकडे इतरांचा पाहण्याचा दृष्टीकोन हा कलूषित असतो.त्याच्या हे ही लक्षात आले आहे की जे लोक खंबीर व स्पष्टवक्ते असतात तेही लोकांना फारसे आवडत नाहीत.त्यामुळे तो नेमका कसा वागतो? तर तो सर्वांसोबत अगदी गुडीगुडी वागण्याचा प्रयत्न करतो.ब-याचदा लोकांना त्याचे हे असे वागणे आवडते.पण गुडीगुडी वागण्याच्या सोबत त्याला असे देखील वाटत असते की लोक त्याला सतत गृहीत धरतात.त्याच्या बॉसला त्याने केलेले चांगले काम कधीच दिसत नाही त्यामुळे तो त्याच्या कलीग्सनां प्रमोशन देण्याचा निर्णय घेतो.खरेतर यामुळे मनिषला खूप वाईट वाटते पण त्याबद्दल बॉसला जाऊन विचारण्याऐवजी तो अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा निर्णय घेतो.यासाठी ज्या दिवशी त्याच्या टीमला त्याची खरंच गरज असते तेव्हा तो अचानक आजारी पडतो व त्याच्या टीममेंबर्सना धडा शिकवतो.

तुम्ही देखील अशा एखाद्या माणसाला भेटला आहात का? मनिष हे एक पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह व्यक्तीमत्व आहे.या उदाहरणावरुन आपण आपल्या आजूबाजूला असणा-या अशा व्यक्तीला ओळखून त्याच्या स्वभावाविषयी अधिक जाणून घेऊयात.तसेच कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !देखील जरुर वाचा.

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे सुरुवातील खूपच चांगली वाटतात.पण हळूहळू त्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यामधील हे अवगुण तुमच्या लक्षात येऊ लागतात.अशा माणसांसोबत काम करणे त्यांच्या निष्क्रियपणा मुळे खूपच त्रासदायक होऊ शकते.

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसांना ओळखण्यासाठी ही त्यांची आठ लक्षणे जरुर जाणून घ्या-

१.अशी माणसे कामात दिरंगाई करतात-

दिरंगाईमुळे एखादी व्यक्ती काम करण्यासाठी मागे राहू शकते.समजा तुम्ही मनिषची एखाद्या कामासाठी मदत मागितली तर तो ते काम करण्यासाठी उत्साह दाखवत नाहा अथवा पुढे येत नाही.उलट तो ते काम करु शकत नाही हे सांगण्यासाठी देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहतो.यातून तो तुम्हाला कामासाठी त्याच्याकडे पुन्हा मदत मागू नये हे शिकवत असतो.

२ धुसमुसत काम करतात-

जेव्हा मनिषला कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी सोपवण्यात येत तेव्हा तो ते काम करण्यासाठी अजिबात उत्साही नसतो.ते काम करण्याची इच्छा नसल्यामुळे तो आतल्याआत धुसमुसत रहातो.तुम्ही जर अशा व्यक्तीला काय झाले असे विचारले तर तो तुम्हाला उडवाउडवीचा उत्तरे देतो अथवा शांत बसतो.

३.मुद्दाम वाईट काम करतात-

अशी माणसे खरेतर षडयंत्री असतात.मनिष कडे लिखाणाचे कौशल्य आहे. तुम्हाला त्याची तुमच्या एखाद्या ऑफिशल ड्राफ्ट अथवा लेटरसाठी मदत हवी असते.पण त्याला असे वाटते की तो कामामध्ये बिझी असताना तुम्ही त्याच्यावर अधिक कामाची भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहात.अशा वेळी शांतपणे त्याला हे काम करणे आता शक्य नाही असे सांगण्याऐवजी तो तुम्ही त्याच्याकडून पुन्हा मदत मागू नये यासाठी कसेतरी चुकीचे अथवा अर्धवट काम तुम्हाला करुन देतो.

४.सारासार विचार न करताच निषेध व्यक्त करतात-

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे इतर लोक त्यांना चुकीची वागणूक देतात अशी सतत तक्रार करतात.ब-याचदा अशा आरोपामध्ये काहीही तथ्य नसते.स्वत:मध्ये काहीतरी कमतरता आहेे हे त्यांना मुळीच पटत नाही.मनिष नेहमी त्यांच्या बॉस अथवा मित्रांकडून त्याचे बुलींग केले जाते अशी तक्रार करत असतो.पण ते थांबविण्यासाठी त्याविरुद्ध लढण्यास मात्र तो कधीच तयार नसतो.

५.जबाबदारी विसरण्याचे नाटक करतात-

समजा मनिषची कलीग मिनाक्षी हिने मनिषकडे त्याचे एखादे पुस्तक मागितले.तर मनिष  त्याच्या पुस्तकांच्या बाबतीत फारच पझेसिव्ह असल्याने तिला थेट नाही म्हणत नाही.मात्र तो तिला सोयीस्करपणे प्रत्येकवेळी ते पुस्तक विसरल्याचे सांगतो.पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे नेहमी आपल्या जबाबदा-यांपासून पळ काढण्यासाठी काहीतरी शुल्लक कारण सांगतात.

६.सल्ला सकारत्मक दृष्टीने घेत नाहीत-

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे नेहमी त्यांच्या क्षमतेचा अपमान होत आहे असा विचार करतात.समजा जर मनिषची बॉस लक्ष्मी हिने त्याला त्याचे काम वेळेत करण्यासाठी एखादा चांगला सल्ला दिला तर तो दिवसभर त्यांच्या आत्मविश्वासाबाबत अविश्वास दाखविल्याची तक्रार करत अथवा धुसफुस करत राहतो.

७. आयत्यावेळी कामात अडथळे आणतात-

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसांकडे षडयंत्र करुन कामात अडथळा आणणे हा एक शेवटचा मार्ग असतो.समजा अशा व्यक्तीचे प्रमोशन नाही झाले तर त्याच्या टीममेंबर्स व बॉस ने त्याची काहीही चुक नसताना त्याला उगाचच टारगेट केले आहे असे वाटते.अशा वेळी तो त्याच्या इतर टीममेंबर्संना धडा शिकवण्यासाठी एखाद्या महत्वाच्या प्रेझेंटेशन मधून आयत्यावेळी काढता पाय घेतो.

८.वरिष्टांबाबत नेहमी तक्रार करतात-

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसांना नेहमी अधिकारी व्यक्ती जसे की बॉस,पालक अथवा जोडीदार यांच्यासोबत समस्या असतात.अशी माणसे सतत या लोकांची तक्रार करीत असतात.

जसे की  वैैयक्तिक आयुष्यात मनिषची बायको ही एक खंबीर व एक डॉमिनंट व्यक्ती आहे जी कोणासमोरही बेधडकपणे बोलण्यास घाबरत नाही.त्यामुळे तिच्यासमोर काही बोलण्याची मनिषची अजिबात हिंमत नसते.मात्र तो तिच्याबाबत त्याच्या आईकडे सतत तक्रार करतो.ज्यामुळे त्याच्या आईचे व त्याच्या पत्नीचे नाते चांगले नाही.

पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे माणसांसोबत राहणे फारच त्रायदायक असते.त्यामुळे अशा माणसांसोबत संवाद साधताना या काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा-

  • त्यांच्याकडून एखादे आश्वासन घेताना ते पुर्ण केले जाईल याची खात्री करुन घ्या.

  • जर तुमचे ऑफीस कलीग पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह असतील तर त्यांच्यावर पुर्णपणे अवलंबून राहू नका.त्याऐवजी कामाचा एखादा पर्याय तुमच्यासाठी नेहमीच खुला ठेवा.

  • अशा लोकांसमोर खंबीरपणे वागा.

  • पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे काहीही कारण देतात त्यामुळे त्यांना अशावेळी योग्य उत्तर द्या.

  • जर तुमचा जोडीदार पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह असेल तर त्यांच्या सोबत चांगले वागा व त्याचा विश्वास संपादन करा.ज्यामुळे ते देखील तुमच्यासोबत चांगले वागतील.

संदर्भ-

1.  Whitson, S. (2013). The Passive Aggressive Conflict Cycle. Storms, 16. 2. Freeman, A., Pretzer, J., Fleming, B., & Simon, K. M. (1990). Passive-Aggressive Personality Disorder. In Clinical Applications of Cognitive Therapy (pp. 291-304). Springer US.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ४ प्रकारच्या Stalkers पासून सुरक्षित कसे रहाल ?

$
0
0

अलिकडे सतत महिलांवर स्टाल्कर्सकडून हल्ले झाल्याच्या अनेक घटना ऐकू येतात.मागच्या वर्षी देशभरात स्टाल्किंग व त्यासंबधित हिंसाचाराच्या अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे.फेब्रुवारीमध्ये केरळ मधील एका मुलीला तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डने तिच्यावर पाळत ठेऊन तिला जिंवत जाळले.तर वर्ष भरापूर्वीच चेन्नई मधील एका मुलीची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.थोडक्यात Stalkers या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.कारण अशाने या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना अधिक प्रोत्साहन मिळू शकते.

Mind Matterz च्या फाउंडर व डायरेक्टर,सायकॉलॉजिस्ट श्रद्धा संकुलकर यांच्याकडून जाणून घेऊयात अशा ट्विस्टेड माइंड स्टाल्कर विषयी अधिक माहिती व त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स-

Stalkers कोण असतात?

Stalkers म्हणजे अशी एक व्यक्ती जी एखादा अथवा एखादीचा वेड्यासारखा पाठलाग करते व त्यांना छळते. स्टाल्कर छळ करत असलेल्या व्यक्तीला त्यांच्यासोबत सतत फोन कॉल,पत्र व्यवहार अथवा मेलच्या माध्यमातून संवाद साधण्यास भाग पाडू शकतात.मिडीयावर सतत जरी पुरुष स्टाल्कर महिलांवर हल्ले करत असल्याच्या बातम्या सांगितल्या जात असल्या तरी संकुलकर यांच्या मते पुरुष व महिला या दोघांमध्ये देखील स्टाल्कर प्रवृत्ती आढळू शकते.स्टाल्कर ही भावनिक दृष्या असुरक्षित माणसे असतात.त्यांचे लहानपणी जसे संगोपन होते तसे ते मोठेपणी वागू लागतात.स्टाल्करीश टेंडसी असलेल्या माणसांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची पोकळी असते जी ते या वेडाच्या भरात तात्पुरती भरुन काढण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यांच्या अशा वागण्यातून त्यांच्यामधील भावनिक अस्थिरता व कमी आत्मसन्मान या दोन्ही बाबींची झलक दिसत असते.यासोबत हे प्रेम नसून आकर्षण असल्याचे संकेत देतात या ‘९’ गोष्टी हे देखील जरुर वाचा.

तरुणपणीच ही समस्या निर्माण होेते-

जेव्हा एखादे मुल टीनएज मध्ये प्रवेश करते तेव्हा त्याचे खरे व्यक्तिमत्व विकसित होऊ लागते.मानशास्त्रज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व त्याचे करीयर,रिलेशनशिप व कला-कौशल्य या तीन गोष्टींमधून घडत असते.कारण या माध्यमातून लोक एकमेकांना आपली ओळख पटवून देत असतात.(जसे की करीयर-“मी एक उद्योजक आहे.” रिलेशनशिप-“मी दोन मुलांची आई आहे.” कला-कौशल्य-“मी संगीतकार आहे.”)

स्टाल्कर व्यक्तीला त्याची ओळख त्याच्या आयुष्यातील रिलेशनशिप मधून करायची असते.वयात येताना अशी माणसे त्याच्या पालकांसोबत हेल्थी रिलेशनशिप निर्माण करण्यात अपयशी ठरतात.मानसशास्त्रज्ञांच्या मते पालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा मुलांच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण होते.त्यामुळे त्यांना आवडणा-या एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करुन अथवा त्याच्यासोबत काल्पनिक रिलेशनशिप असल्याचे स्वप्नरंजन करुन स्टाल्कर त्यांच्यावर कोणाचे तरी खरोखरच प्रेम आहे अशी त्यांची फॅन्टेसी पुर्ण करण्याचा प्रयत्न करतात.तसेच जाणून घ्या नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी

स्टाल्करचे प्रकार-

  • रिजेक्टेड स्टाल्कर -रिजेक्टेड प्रेमी कधीतरी प्रेम मिळेल या आशेपोटी त्याच्या पूर्व जोडीदाराचा पाठलाग करतात.

  • इन्टीमसी-सीकींग स्टाल्कर-काही स्टाल्करनां ते छळत असलेली व्यक्ती कधीतरी त्यांच्या प्रेमात पडेल या आशेपोटी त्यांच्यासोबत इन्टीमेट होण्याची फॅन्टेसी असते.

  • इनकम्पीटंट स्टाल्कर- ते त्रास देत असलेल्या व्यक्तीचे त्यांच्यावर प्रेम नाही हे त्यांना माहित असते.पण तरीही देखील पाठलाग करुन अथवा छळून त्यांना मिळवण्याचा ते प्रयत्न करीत असतात.

  • प्रीडेटोरी स्टाल्कर-अशा स्टाल्करनां त्यांना बळी पडलेल्या व्यक्तीमध्ये सेक्शुअल इंटरेस्ट असतो.त्यामुळे ते लैंगिक भूक शमवण्यासाठी त्यांचा सतत पाठलाग करतात.

स्टाल्करच्या बळी पडलेल्या लोकांवर याचा नेमका काय परिणाम होतो?

  • स्टाल्करच्या बळी पडलेल्या लोकांची चिंता वाढते.

  • त्यांना झोप लागत नाही.

  • काही जणांमध्ये पोस्ट ट्रॉमेटीक स्ट्रेस डिसॉर्डर विकसित होतो.

  • त्यांच्यामध्ये निराधार असल्याची व नैराश्याची भावना विकसित होते.

  • काही लोक स्टाल्करच्या तावडीतून सुटण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.यासोबत वाचा या ’10′ कारणांमुळे मनात येतात आत्महत्येचे विचार !

  • सामान्यपणे असे लोक स्टाल्करच्या अत्याचार व हिंसाचाराचे बळी पडतात.

स्टाल्करपासून सुरक्षित राहण्याचे मार्ग कोणते?

जर तुम्हाला तुमचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय असेल तर या  महत्वाच्या टीप्स जरुर करा-

  • तुमच्या सोशल मिडीया अकाउंटची प्रायव्हर्सी सेटींग बदला.ज्यामुळे तुमची महत्वाची वैयक्तिक माहिती कोणापर्यंत पोहचणार नाही.

  • तुमच्या घरातील मंडळींच्या सुरक्षेची काळजी घ्या.कारण स्टाल्कर त्यांचा तुम्हाला त्रास देण्यासाठी गैरवापर करु शकतात.

  • काहीही झाले तरी स्टाल्कर सोबत संवाद करु नका.कारण यामुळे तुम्हाला त्यांच्यामध्ये रस आहे असा चुकीचा संदेश त्यांना मिळेल व पुढे समस्या निर्माण होतील.

  • अशा व्यक्तीला सुधारण्याचा विचार करुन त्यांच्यासोबत बोलू नका कारण यामुळे देखील त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल.

  • जर तुमचा पाठलाग होतोय असे वाटत असेल तर तुमचा मार्ग व वेळ सतत बदला.

  • एकटयाने प्रवास करु नका.

  • स्टाल्करच्या विरोधातील पत्र,मेल,फोन कॉल्स रेकॉर्ड जमा करुन ठेवा.कदाचित या गोष्टींचा तुम्हाला पुढे उपयोग होऊ शकतो.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

गरोदर महिलांनी इन्हेलर वापरणे सुरक्षित आहे का?

$
0
0

गरोदरपणात गरोदर महिलेला अनेक सल्ले दिले जातात.कधीकधी हे सल्ले तिच्या भल्याचे असतात तर कधीकधी हे सल्ले म्हणजे गरोदरपणाबाबत असलेले फक्त काही समज असू शकतात.गरोदरपणाबाबत लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज असतात.गरोदर महिलेने अस्थमा या समस्येसाठी इन्हेलर वापरणे याबाबत देखील काही समज व गैरसमज आहेत.याबाबत केलेल्या अनेक संशोधनातून काही शक्यता समोर आल्या आहेत.संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की अस्थमाचा त्रास व फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी प्रभावी इनहेलर कोर्टीकोस्टिरॉइड थेरपी गर्भारपणातील धोका कमी करते.पण फक्त यावर विश्वास ठेवण्यापेक्षा गरोदरपणात कोणतेही औषध सुरु अथवा बंद करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

मॅक्स हॉस्पिटलचे सिनीयर कन्सल्टंट डॉ.के.के.पांडे यांच्या मते गरोदरपणी अस्थमाचा धोका टाळण्यासाठी कोर्टीकोस्टिरॉइड असलेले इन्हेलर वापरुन अस्थमा नियंत्रणात आणता येतो.बाळाच्या योग्य वाढ व विकासासाठी बाळाला नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे असते.बाळ आईच्या गर्भात असताना हा पुरवठा तिच्या रक्तामधून बाळाला होत असतो.पण यासाठी आईची अस्थमा तपासणी नियमित होणे आवश्यक अाहे.ज्यामुळे तिच्या फुप्फुसांचे कार्य सुरळीत आहे का व गर्भाला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे का हे समजू शकते.कारण जर आईला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर याचा दुष्परिणाम बाळावर होऊ शकतो.यासाठी जाणून घ्या योग्य अस्थमा इन्हेलर कसा निवडावा?

इन्हेलर बाबतीत सांगायचे झाल्यास स्त्री गरोदर असेल अथवा नसेल तरी देखील तिच्यावर अस्थमा औषधांचा परिणाम हा समानच होत असतो.त्यामुळे गरोदरपणी अस्थमा नियंत्रणात ठेवण्यासाठी अस्थमा थेरपी सोबत इन्हेलर वापरणे,अस्थमा वाढवणा-या अॅलर्जीपासून दूर राहणे फार गरजेचे आहे.अस्थमाचा धोका वाढवणा-या अॅलर्जी, धुळ, धळीकण, प्रदुषके, धुम्रपान अशा गोष्टींपासून स्वत:ला कसे दूर ठेवावे याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत देखील चर्चा करु शकता.तसेच गरोदर स्त्रीला याबाबत काय दक्षता घ्यावी किंवा सेल्फ-मॉनिटरींग कसे करावे,डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत कशा पाळायच्या,वेळेवर औषधे कशी घ्यायची,वैद्यकीय मदतीची तुम्हाला केव्हा गरज असू शकते व  इन्हेलरचा योग्य वापर याबाबत देखील अचूक ज्ञान असणे गरजेचे आहे.यासाठी अस्थमावर फायदेशीर असे आयुर्वेदीक उपचार !देखील जरुर वाचा.

मॅक्स हॉस्पिटलचे सिनीयर कन्सल्टंट डॉ.पांडे याच्या सल्लानूसार गरोदर महिलेने यासाठी धुळ,फर,तीव्र सुंगध व इतर प्रदुषके अशा गोष्टींपासून दूर रहावे.धुळीकणापासून दूर राहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चादर व उशीचा वापर करावा.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धुम्रपान करणे टाळावे व धुम्रपान करणा-या लोकांपासून देखील दूर रहावे.यासाठी जाणून घ्या या ’10′ कारणांमुळे येऊ शकतो अस्थमाचा अ‍ॅटॅक !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !

$
0
0

आजकाल डिप्रेशन म्हणजे काय हे सांगण्याची गरजच नाही कारण अगदी टीनएज मुले व तरुण मुलांमुलींच्या आयुष्यात देखील नैराश्य आल्याच्या अनेक केसेस आपण सतत पहात असतो.अशा नैराश्याच्या अधीन गेलेल्या लोकांना त्यामधून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे.डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी इतरांची मदत घेणे हाच त्यावर चांगला उपाय असू शकतो.

Spiritual healer Mynoo Maryel यांनी त्यांच्या मुलाच्या ११ ते १७ या वयातील नैराश्य व चिंतेबाबतच्या वैयक्तिक अनुभवातून नैराश्य दूर करणारे काही उपाय शेअर केले आहेत.हे उपाय तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना नैराश्य दूर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.यासाठी लक्षात ठेवा नैराश्य ही एक व्यापकतेने पसरणारी स्थिती असून तुम्ही त्यातून पुर्णपणे बाहेर पडू शकता.तसेच जाणून घ्या आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

जाणून घेऊयात डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही प्रभावी उपाय-

१.यासाठी सर्वप्रथम तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात या वास्तव स्थितीचा स्वीकार करा.डिप्रेशन एका रात्रीत येत नाही.त्यासाठी चिंता-काळजी निर्माण करणा-या अनेक घटना कारणीभूत असू शकतात.डिप्रेशनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:ला अंधारात ढकलण्यासारखे आहे.कारण त्यामुळे नंतर एखादी भावनिक गोष्ट देखील तुम्हाला नैराश्य आणू शकते.तसेच नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी.

२.दुसरी गोष्ट म्हणजे या वाईट काळात देखील तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही यातून पुर्णपणे नक्कीच बरे व्हाल व पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकाल.जसे एखाद्या काळ्याकुट्ट अंधा-या रात्रीनंतर सुर्योदय हा होणारच असतो.यासाठी नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे करता येणे शक्य आहे ते करा.तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या मित्र-मंडळी,कुटूंबातील माणसे अथवा एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगू शकता.तसेच यासाठी प्रोफेशनल मदत देखील घ्या ज्यामुळे तुम्हाला ही समस्या दूर करणे सहज शक्य होईल.

३.जीवनात घडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वत:चे लक्ष वेधा.तुमच्या मनाला उभारी आणणा-या गोष्टी शोधा.तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा.या गोष्टी केल्याने तुम्हाला अधिक आनंद व प्रोत्साहन मिळेल.सुरुवातीला या गोष्टी करणे तुम्हाला थोडे कठीण जाईल पण हळूहळू त्यातून तुम्हाला आशेची किरणे दिसू लागतील.एकदा का तुम्हाला तुम्ही कशामुळे आनंदी होता हे समजू लागले की तशा अनेक गोष्टी तुम्हाला जीवनात दिसू लागतील व तुम्ही पुन्हा आनंदाचा अनुभव घेऊ लागाल. Mynoo Maryel यांनी मुलाच्या नैराश्यातील कठीण काळात त्याला सहकार्य केल्यामुळेच त्यांच्या मुलाच्या जीवनात आमुलाग्र बदल घडू शकला.

४.त्यांच्या मुलांमधील डिप्रेशन दूर करण्यासाठी त्यांना सकारात्मक वायब्रेशन व मनाला उभारी आणणा-या गोष्टींची मदत झाली.त्यामुळे एखादे चांगले ध्येय साध्य करण्यासाठी वाईट गोष्टींपासून दूर रहाणे हाच यावर एक उत्तम मार्ग असू शकतो.यासाठी सावध रहा,दक्ष रहा,स्वत:कडे पहा व स्वयंप्रेरीत व्हा.तुम्ही निराश होताय असे तुम्हाला वाटू लागले की तुम्हाला आवडणा-या गोष्टी करा अथवा तशा गोष्टींचा शोध घ्या.ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतील.स्वत:बद्दल शंका येऊ लागल्यास व उदासीन वाटू लागल्यास एखादा मनोरंजक व्हिडीओ,सुंदर फोटो अथवा निसर्गसौदर्य पहा.

५.पोषक आहार घ्या(हाय वायब्रेशन फूड ज्याला रेन्बो फूड असे म्हणतात)तुमच्या आहारात विविध रंगाच्या पदार्थांचा समावेश करा.कारण पोषक आहार तुम्हाला डिप्रेशन दूर करण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने सुदृढ करतो.आहार शाकाहारी अथवा मांसाहारी कोणताही असला तरी त्यातून तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतील याची दक्षता घ्या.त्याचसोबत डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !

६.मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी तुम्हाला आवडणा-या गोष्टींची यादी करा.डिप्रेशनमध्ये निराश भावनिक अवस्थेत असे करणे थोडे कठीण जाऊ शकते.पण लक्ष विचलित करण्यासाठी व मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी या गोष्टीची तुम्हाला चांगली मदत होऊ शकते.या आयुर्वेदीक उपचारांनी करा डिप्रेशनवर मात !

७.इतर काही गोष्टी करुन तुमच्या भावनिक अवस्थेला बदला.जसे की यासाठी संगीत ऐका,बागेतून अथवा झाडांच्या सानिध्यात फिरण्यास जा ज्यामुळे तुम्हाला ताजे वाटेल.निसर्ग तुम्हाला तुमच्या मनातील भावना समजून घेण्यास उत्तेजन देईल.यासोबत स्वास्थ्य सुधारायला binaural beats ऐकणं अशाप्रकारे करते मदत !हे देखील जरुर वाचा.

८.आधार देणा-या गोष्टींना तुमच्या मनातील कृतज्ञतेच्या भावनेने जोडा.यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात याचे चिंतन करा.कृतज्ञतेने माणसाचे मन शांत होते.तुम्ही जितके कृतज्ञ व्हाल तितकी तुम्हाला मनशांती देखील अधिक मिळेल.कृतज्ञता व्यक्त करणे ही गोष्ट स्मरणात राहण्यासाठी लहान लहान गोष्टींची मदत घ्या.जसे की एखादी गाठ मारुन ठेवणे किंवा पाकीटामध्ये एखादी स्मरण करणारी गोष्ट ठेवणे.त्यामुळे त्या गोष्टीला पाहताच तुम्हाला कोणाबद्दल तरी कृतज्ञता व्यक्त करायची आहे याचे स्मरण होईल.यासोबतच केवळ शारिरीक नाही तर मानसिक समस्यांचाही वेळीच निचरा करा हे देखील जरुर वाचा.

९.नकारात्मक माणसे,टिव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी तुमची स्थिती अधिक खराब करु शकतात.त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच रहा.तसेच ताणात देखील आनंदी व सकारात्मक असल्याची कल्पना करा.आणि अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं अवश्य वाचा

१०.प्रत्यक्षात पाहणे शक्य नसल्यास फोटोमध्ये सुर्योदय व सुर्यास्त पहा.कारण सोनेरी व केशरी रंगामुळे तुम्ही तुमच्या आत्मशक्तीसोबत पुन्हा जोडले जाल.जीवनामधील जादू अनुभवण्याचे हे एक भक्कम पाऊल असेल.

Note: Spiritual healer Mynoo Maryel is a corporate leader turned seer, who lives in Bali. Her ‘The BE book’ is an Amazon bestseller.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !

$
0
0

भविष्यातील नैराश्याबाबत शोध घेणा-या संशोधनामुळे ड्रिपेशन व मानसिक आजारांवर उपचार करणे सोपे झाले आहे.

जर तुम्हाला असे समजले की तुम्ही चार वर्षानंतर डिप्रेशन मध्ये जाणार आहात तर काय कराल? नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात एक ब्रेन मार्कर आढळला आहे.या ब्रेन मार्करमुळे एखादी व्यक्ती चिंता-काळजी मुळे भविष्यात डिप्रेशनमध्ये जाऊ शकते का याचा अंदाज घेतला जाऊ शकतो.या शोधामुळे भविष्यात येणा-या ड्रिपेशन व मानसिक आजारांवर उपचार करणे देखील सोपे झाले आहे.सहाजिकच यामुळे एखाद्याचे आयुष्य नक्कीच वाचविता येऊ शकते.यासाठी वाचा नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी

Neuron जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानूसार शास्त्रज्ञांना मेंदूच्या आत खोल अशा एका रचनेचा शोध लागला आहे ज्या रचनेला Amydgala असे म्हणतात.या रचनेमुळे निरनिराळी माणसे ताणतणावाच्या परिस्थितीला निरनिराळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात.ड्यूक विद्यापीठातील Psychology व Neuroscience चे प्रोफेसर व जेष्ठ लेखक अहमद हरीरी यांच्या मते एखाद्या माणसाचा मेंदू आपल्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यात चार वर्षानंतरच्या काळातील भावनिक असुरक्षितता ते ताण याबाबतचा अंदाज सांगू शकतो हा शोध खरच खूप उल्लेखनीय आहे. तसेच हरीरी यांच्या लॅबमधील Postdoctoral Researcher व First author Johnna Swartz यांच्यामते या ब्रेन मार्करमुळे त्या व्यक्तीचा मानसिक विकार बळावण्याआधीच त्याला योग्य ते उपचार देऊन बरे करता येऊ शकते.ज्यामुळे त्या व्यक्तीला त्याचे पुढील आयुष्य उत्तमरित्या जगता येते.

या नव्या संशोधनात ७५३ लोक सहभागी झाले होते.यासाठी काही रागवलेल्या व भयंकर चेह-यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मेंदू देखील स्कॅन केले गेले.तसेच Amydgala चे कार्य उत्तेजित करण्यासाठी Functional Magnetic Resonance Imaging (FMRI) ही टेक्नॉलॉजी निर्धारित करण्यात आली.संशोधनात असे आढळले की अनेक जण संशोधन सुरु होताच Amydgala ला रिएॅक्टीव्ह झाले.तर काही जणांमध्ये ताणामुळे चिंता अथवा डिप्रेशन येण्याची लक्षणे स्कॅनींग नंतर आढळली.यासाठी नक्की वाचा आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

डिप्रेशन पासून वाचण्यासाठी व डिप्रेशन नियंत्रणात आणण्यासाठी करा या काही टीप्स-

१.नियमित व्यायाम करा-

डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवणे फार गरजेचे आहे.व्यायाम ही शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारी एक नैसर्गिक अॅन्टीडिप्रेस्टंट क्रिया आहे.संशोधनात काही लोकांना त्यांच्या आवडीनूसार आठ आठवडे अॅरोबिक्स व्यायाम व नॉन-अॅरोबिक्स व्यायाम आठवड्यातून तीनदा करण्यास सांगण्यात आले.यामुळे त्या लोकांचे डिप्रेशनचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाल्याचे आढळले.तसेच रात्रीच्या शांत झोपेसाठी करा हे ’3′ मिनिटांचे श्वसनाचे व्यायाम !

२.पुरेशी झोप घ्या-

२००५ साली स्लीप जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये सर्व काही चांगले असताना केवळ निद्रानाशामुळे डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता १० पट असते असे आढळले आहे.त्यापुढील संशोधनात बॉ़डी क्लॉक अथवा जीवनचक्रामध्ये बदल झाल्यामुळे मेंदूमधील केमिकल पॅटर्न बदलतो व त्यामुळे मानसिक विकार होऊ शकतात असे आढळले.रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !

३. आहारात साखरेचे प्रमाण कमी करा-

संशोधनानूसार साखरेचे प्रमाण आहारात अधिक असल्यास देखील भविष्यात एखाद्याला डिप्रेशन येण्याची शक्यता असते.कारण साखरेच्या अति प्रमाणाचा थेट तुमच्या मेंदूवर परिणाम होतो व ज्यामुळे डिप्रेशन येऊ शकते.साखरेच्या अति सेवनामुळे ऑक्सिडेटीव्ह ताण वाढतो.ज्यामुळे मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात व डिप्रेशन येते.यासाठी डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !हे देखील जरुर वाचा.

४. मद्यपान कमी करा-

जर तुम्हाला आधी डिप्रेशनचा त्रास झाला असेल किंवा भविष्यात तशी लक्षणे दिसत असतील तर मद्यपान करणे टाळणे हाच एकमेव उत्तम उपाय असू शकते.अल्कोहोल हे मूड-अल्टरींग डिप्रेसंट ड्रग म्हणून ओळखले जाते.त्यामुळे मद्यपानामुळे एखादी व्यक्ती पुर्णपणे डिप्रेशनमध्ये अथवा दारुच्या आहारी जाऊ शकते.यासाठी करा हे दारूची नशा उतरवणारे घरगुती उपाय !

५. नियमित ध्यान करा-

अनेक संशोधनात असे आढळले आहे की मेडीटेशनचा मेंदूवर चांगला परिणाम होतो.खरेतर नॉन-डायरेक्टीव मेडीटेशन हे फोर्स मेडीटेशनपेक्षा अधिक प्रभावी असू शकते.कारण नॉन-डायरेक्टीव मेडीटेशन मेंदूमधील भावना व आठवणींना कार्यान्वित करते.ज्यामुळे डिप्रेशनची लक्षणे नियंत्रित राहतात व  तुम्हाला जीवनातील ताण-तणावसोबत जुळवून घेण्यास मदत होते.तसेच या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

Psychiatrist आणि psychologist मध्ये नेमका फरक काय ?

$
0
0

सायकॉलॉजिस्ट आणि सायक्रायटिस्ट या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.पण अनेकांंचा यामध्ये  गोंधळ होतो.  नेमक्या ठिकाणी चुकीचा शब्द वापरतात. पण या दोन शब्दांमध्ये फरक आहे. हा फरक शिक्षण, ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस यावर आधारित आहे. या दोघांमधला फरक समजून घेण्यासाठी आम्ही मुंबईचे  psychiatrist आणि sexologist, डॉ. संघनायक मेश्राम यांच्याशी संवाद साधला. तसंच गरजेनुसार कोणाची मदत घ्यायला हवी याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले. जाणून घेऊया त्या दोन शब्दांमधला त्यांनी सांगितलेला फरक.

Psychiatrist: सायक्रायटिस्ट होण्यासाठी मेडीकल स्कूलमधून ग्रॅजुएट होण्याची गरज आहे. सायकायट्रिस्ट हे MBBS ची डिग्री किंवा बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जेरी ही सहा वर्षांची डिग्री घेतल्यानंतर पुढे तीन वर्ष ते सायकॅट्रीचा अभ्यास करतात. ते सतत प्रॅक्टिस करत असतात. त्यांना मेंदू, भावना, विचार याबद्दल सखोल ज्ञान असते आणि मानसिक आरोग्याचे विकार असलेल्यांनावर ते उपचार करतात. पेशंटशी बोलल्यानंतर ते पेशंटचे कॉउंसलिंग करतात, गरज असल्यास औषधे देतात. नैराश्य, बाय पोलार आणि इतर मानसिक त्रास किंवा ताण असल्यास त्यावर ते पेशंटशी संवाद साधून, त्यांचे काउंसलिंग करतात. तसंच पेशंटचे मानसिक आरोग्य जाणून घेण्यासाठी आवश्यक टेस्ट करतात. यात देखील स्पेशालिस्ट असतात. उदा. जनरल सायक्रायटिस्ट, चाईल्ड सायक्रायटिस्ट, सायकोअनॅलिसिस, इत्यादी. ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !

Psychologist: सायकॉलॉजिस्ट हे सायकॉलॉजी (मानसशास्त्र) मध्ये पदवी घेतल्यानंतर कॉउंसलिंगचा अॅडव्हान्स कोर्स करतात. ते कॉउंसलिंग करतात. त्याचबरोबर पेशंटच्या समस्येनुसार वेगवेगळ्या थेरपी घेण्याचा सल्ला देतात. ते काही ठराविक सायकॉलॉजिकल टेस्ट घेतात. उदा. अँटिट्यूट टेस्ट, रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हियर थेरपी, cognitive behaviour analysis, इत्यादी. यावरून त्यांना पेशंटच्या मानसिक आरोग्याबद्दल निदान करता येते. परंतु, मानसिक समस्या दूर करण्यासाठी ते औषधे देत नाहीत आणि गरज भासल्यास सायक्रायटिस्टची भेट घेण्याचा सल्ला देतात.

कॉउंसलिंगसाठी कोणाची मदत घ्यावी?

स्पष्टपणे सांगायचे तर कोणीही ज्यांच्यासोबत तुम्हाला बोलून हलके  वाटेल अशा व्यक्तीशी बोला. आपल्याकडे मित्र, नातेवाईक, जवळचे काका-मामा अगदी भरमसाठ सल्ले देतात. यामुळे आपण गोंधळतो आणि समस्या अधिक गंभीर होत जाते. कारण त्यात तज्ज्ञांच्या सल्ल्याचा अभाव असतो. म्हणून कोणाची मदत घेऊ असा विचार करत बसण्यापेक्षा सायकॉलॉजिस्ट किंवा सायक्रायटिस्ट कोणाचीही मदत घेणे योग्य ठरेल, असा सल्ला डॉ. मेश्राम देतात.

तरीही तुम्हाला असं वाटत का? की त्यामुळे तुमच्या उपचारांमध्ये फरक पडेल? म्हणून डॉ. मेश्राम यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. सायक्रायटिस्ट हे औषधे देण्यास, मानसिक आजारांची लक्षणे जाणण्यास, मानसिक अस्वस्था जाणून घेण्यास समर्थ असतात. थायरॉईड, अ‍ॅनिमियामायग्रेन या आजारांसाठी मानसिक आरोग्य कारणीभूत ठरते व त्यासाठी औषधांची गरज असते. यावर सायक्रायटिस्ट उपचार करू शकतात, थेरपी सुद्धा देऊ शकतात. तर सायकॉलॉजिस्ट तुमच्या समस्यांवर काउंसलिंग आणि थेरपीच्या मदतीने समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतात.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मासिकपाळीपूर्वी काही दिवस आधी वजन वाढल्यासारखे का वाटते ?

$
0
0

मी 21 वर्षीय तरुणी असून मॉडल आहे. जसजशी माझ्या मासिकपाळीची तारीख जवळ येते. तसा माझ्या वजनात बदल होते. ते थोडे वाढते. वजनकाट्यावर ते फारसे वाढलेले दिसत नाही. पण कपडे घालताना मला हे तीव्रतेने जाणवते. मी मॉडेल असल्याने या दिवसात मला काम करणं आव्हानात्मक बनते. पण मासिकपाळीच्या त्या दिवसांनंतर मी पुन्हा नॉर्मल होते. वजन आणि साईझ पुन्हा नॉर्मल होते. असा वजनामध्ये, आकारामध्ये बदल होत राहणं त्रासदायक आहे का ? आणि त्यावर मात करणं  शक्य आहे का ?

नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. माया लुल्ला यांच्या सल्ल्यानुसार, मासिकपाळीच्या काही दिवस आधी तुला जो शरीरात बदल जाणवतो तो वजनाबद्दल नसून प्री-मेन्स्टुनल ब्लॉटींग किंवा वॉटर रिटेन्शनची समस्या आहे. अनेक स्त्रियांमध्ये हा त्रास मासिकपाळीच्या सुमारे एक-दोन आठवडे आधी हा त्रास जाणवतो. मासिकपाळीदरम्यान शरीरात काही हार्मोनल बदल झाल्याने पाण्याचे प्रमाण वर खाली होण्याची शक्यता असते. अशा वेळेस शरीरात पाणी साचून राहते. त्यामुळे अनेकांना मासिक पाळीच्या दिवसात वजन वाढल्यासारखे वाटते. या दिवसात स्त्रियांना ब्रेस्टजवळही जाडसरपणा वाढल्याचा अनुभव येतो.

या दिवसांमध्ये साखरेचे किंवा खारट पदार्थ खाण्याची इच्छा प्रकर्षाने वाढते. खारट पदार्थ अधिक खाल्ल्याने शरीरात पाणी साचून राहण्याची समस्याही वाढते. यामुळे तुम्हांला वजन वाढल्याचा भास होतो. अशाप्रकारे फ्लुईड्सचे प्रमाण वाढल्याने मेंदू आणि पोटाजवळील रक्तवाहिन्यांवरही दाब वाढतो. हे त्रासदायक असते. डायरिया आणि पोटात गॅस वाढण्याची समस्या यामुळे ब्लोटींगचा त्रासही अधिक बळावतो. अशातच तुम्ही इमरजन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्यास अधिक प्रमाणात हार्मोनल बदल होतात. परिणामी ब्लोटींगचा त्रासही वाढतो.

  • या समस्येवर मात कशी कराल ?  

शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्याने शरीराच्या आकारात बदल होतो. अशावेळेस आहारातील मीठाचे प्रमाण नियंत्रनात ठेवा. लोणची, पाव. प्रोसेस्ड फूड,सोडायुक्त पदार्थ खाणं टाळा. यामुळे सहाजिकच ब्लोटींगचा त्रास कमी होईल. संतुलित आहार आणि पुरेशी फळं, भाज्या यांचा आहारात समावेश करा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल. आहारात चांगले पण लहान सहान बदलही फायदेशीर ठरतात.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वापरामुळे युरिनरी इन्फेकशन व लैंगिक आजार होतात का?

$
0
0

सार्वजनिक स्वच्छतागृह  वापरणे अगदी सगळ्यांचा नकोसे वाटते. तिथली अस्वच्छता, दुर्गंधी असह्य होते. तसंच यापूर्वी ते कितीजणांनी वापरलं असेल याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे अस्वच्छतेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. Herpes किंवा Chlamydia सारखे आजार यामुळेच होतात.

परंतु, सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याची वेळ आपल्यावर कधी ना कधी येतेच. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना आपल्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशावेळी स्वच्छतागृह स्वच्छ असण्याची अपेक्षा करु नये, कारण ते शक्य नसते. अस्वच्छ स्वच्छतागृह वापरण्याचा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक होतो. कारण स्त्रियांच्या योनीमार्गाचा संबंध थेट टॉयलेट सीटशी येतो.

परंतु, आतापर्यंत साधारणपणे आपल्याला अस्वच्छ शौचालय, संपलेले टिशू, टॉयलेट पेपर याबद्दल कल्पना आली आहे. तरी ओलसर सीटवर बसणे गैरसोयीचे होते. तसंच इन्फेकशनचा धोका असतो. म्हणून सीट वर न बसता थोडे जवळ उभे राहून आपले काम करण्याची सवय आपल्याला झाली आहे.

परंतु, खरंच अस्वच्छ टॉयलेटमुळे धोका असतो? की ही आपली मानसिकता आहे? आपल्या भीतीला काही आधार आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही Uro-Oncological robotic surgeon डॉ. अनुप रमाणी यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांचे उत्तर.

  • हे सगळे आपल्या डोक्यात असते.

सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यामुळे कोणाला UTI (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेकशन) झाल्याचे मी माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवात ऐकले नाही किंवा तसा पेशंट ही माझ्या पाहण्यात आला नाही, असे डॉ. रमाणी यांनी सांगितले. आपल्याला इन्फेकशनची भीती वाटते कारण अस्वच्छ टॉयलेटमध्ये बॅक्टरीया असतात. पण ते Proteus आणि Staphylococcus saprophyticus असतात. त्यामुळे UTI होत नाही. त्यांचा मूत्रमार्गाशी थेट संबंध येणे फार दुर्मिळ आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना योग्य ती काळजी घेतल्यास UTI चा धोका टाळता येतो. यासाठी अधिकाधिक स्वच्छता पाळणे गरजेचे असते, असे डॉ. रमाणी म्हणाले. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना या ‘९’ स्टेप्स नक्की पाळा!

  • लैंगिक आजारांचे काय?

यावर डॉ. रमाणी म्हणाले, ज्या मायक्रोब्समुळे  herpes, Chlamydia यांसारखे लैंगिक आजार होतात. परंतु, ते मायक्रोब्स अतिशय नाजूक असतात. अधिक वेळ हवेशी संबंध आल्यास ते नष्ट होतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे STDs किंवा UTIs होण्याची शक्यता खूप कमी असते.

  • स्वच्छता कशी राखावी?

सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे लैंगिक आजार किंवा युरिनरी इन्फेकशनचा धोका नसला तरी ते अतिशय स्वच्छ असतात, असे नाही.  म्हणून योग्य ती स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये जाताना सॅनिटाईझर आणि टिश्यूज सोबत ठेवा. दिल्लीच्या  Right Step Project या कंपनीने ‘पी बडी’ नावाचे डिव्हाईस लाँच केले आहे. हे फिमेल युरीनेशन डिव्हाईस असून त्यामध्ये स्त्रियांना उभं राहून मूत्रविसर्जन करता येणे शक्य आहे. त्यामुळे टॉयलेट सीटशी त्वचेचा येणारा थेट संबंध टाळता येईल.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार ‘७’दिवसांचा डिटॉक्स डाएट प्लॅन

$
0
0

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना डाएट हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. पण कोणाच्याही सल्ल्यावरून चुकीचे डाएट करणे आरोग्यास घातक ठरते. पण वजन कमी करण्याबरोबरच शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी विशेष डाएट केले जाते. त्याला डिटॉक्स डाएट असे म्हणतात. त्यामुळे तुमचे शरीर स्वच्छ होते. हे डाएट कसे करायचे यासाठी  FITSO – Your Fitness Coach च्या न्यूट्रीशिनल कोच हरप्रीत कौर यांनी मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी ७ दिवसांचा डाएट प्लॅन सांगितला आहे. आयुर्वेदीक डिटॉक्स डाएटने कसे कराल शरीर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी !

पहिला दिवस:

  • सकाळी उठल्यावर: शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून घ्या.
  • नाश्ता: नाश्त्याला ग्लासभर भाज्यांचा रस घ्या. त्यासाठी एक गाजर, एक बीट, अर्ध सफरचंद, आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रस यात थोडं पाणी घालून याचा ज्यूस करा. ज्यूस गाळून घ्या आणि प्या.
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस: या वेळेस लागणाऱ्या भुकेसाठी पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी, जर्दाळू यांसारखी फळे खा.
  • दुपारचे जेवण: उकडलेल्या वेगवेगळ्या भाज्या किंवा कच्चा हंगामी भाज्या यांपासून बनवलेले बाऊलभर सलाड दुपारच्या जेवणासाठी खा. भाज्या शक्यतो ऑरगॅनिक असाव्या.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: भाज्यांचे सूप किंवा हलक्या शिजवलेल्या ग्रिल्ड भाज्या अथवा चिकन. उन्हाळ्यात शरीराला डीटॉक्स करण्याचे ’6′ नैसर्गिक उपाय !

दुसरा दिवस:

  • सकाळी उठल्यावर: पहिल्या दिवसाप्रमाणेच कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून घ्या.
  • नाश्ता: स्ट्राबेरी, रासबेरी, ब्लुबेरी आणि पालक यापासून बनवलेली अर्धा कप स्मूथी.
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस: पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी, मनुका, जर्दाळू यांसारखी फळे खा.
  • दुपारचे जेवण: बाऊलभर डाळी आणि कोथिंबीरचे सूप घ्या.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, चिया सीड्स खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: ब्रोकोली आणि पनीरचे सलाड घ्या. त्यामुळे पोट भरेल व मध्यरात्री भूक लागणार नाही.

तिसरा दिवस:

  • सकाळी उठल्यावर: ग्लासभर आवळ्याचा रस घ्या. (ग्लासभर पाण्यात २ चमचे आवळ्याचा रस घाला. )
  • नाश्ता: बाऊलभर दह्यात फळे घालून खा. व सुकामेवा खा. शरीर डीटॉक्स करण्याचे ७ सहज सोपे पर्याय !
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस:  पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी, मनुका, जर्दाळू  यापैकी तुमच्या आवडीची कोणतीही दोन फळे खा.
  • दुपारचे जेवण: दुपारच्या जेवणाला quinoa घ्या आणि साखर न घालता लिंबाचा रस घ्या.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, चिया सीड्स खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: तुमच्या आवडीनुसार हलक्या शिजवलेल्या भाज्या किंवा चिकन खा.

चौथा दिवस:

  • सकाळी उठल्यावर: रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून घ्या किंवा आवळ्याचा रस घ्या.
  • नाश्ता: पालकापासून बनवलेली प्रोटीन स्मूथी त्यात चार बदाम व चार खजूर घालून प्या.
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस: पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी, मनुका, मनुका, जर्दाळू यांसारखी कोणतीही दोन फळे खा.
  • दुपारचे जेवण: उकडलेल्या भाज्या खा.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, चिया सीड्स खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: चौथ्या दिवशी भाज्या व फळांचे सलाड खा. त्यासाठी गाजर, पपई, टोमॅटो, शिमला मिरची यात लिंबाचा रस आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल घाला.

पाचवा दिवस:

  • सकाळी उठल्यावर: पाचव्या दिवशी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून घ्या.
  • नाश्ता: सकाळच्या नाश्त्यासाठी wheatgrass ज्यूसमध्ये चिया सीड्स घालून घ्या.
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस: पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी, मनुका, मनुका, जर्दाळू यांपैकी तुमच्या आवडीचे कोणतीही दोन फळे खा.
  • दुपारचे जेवण: दुपारच्या जेवणासाठी अर्धा कप ब्राउन राईस आणि उकडलेल्या भाज्या खा.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, चिया सीड्स खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: बाऊलभर ग्रीन सलाड खा. कोबी, पालक, टोमॅटो, रंगीत शिमला मिरची यात दोन लहान चमचे पनीर किंवा उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग घाला. त्यावर सूर्यफुलाच्या बिया, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस घालून खा. ‘आपन मुद्रा’ – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय !

सहावा दिवस:

  • सकाळी उठल्यावर: दिवसाची सुरवात आवळ्याच्या रसाने करा.
  • नाश्ता: दह्यात जर्दाळू, अळशी, बदामाचे काप, मनुका यासारखा सुकामेवा घाला आणि खा.
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस: पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी, मनुका, मनुका, जर्दाळू यांपैकी कोणतीही दोन फळे खा.
  • दुपारचे जेवण: उकडलेल्या भाज्या आणि अर्थ कप quinoa घ्या.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, चिया सीड्स खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: माशाचे सूप किंवा डाळीचे सूप घ्या.

सातवा दिवस:

  • सकाळी उठल्यावर: पहिल्या दिवसाप्रमाणे कोमट पाण्यात लिंबाचा रस घ्या.
  • नाश्ता: केळ, नारळ (मलाई) आणि खजूर युक्त स्मूथी घ्या. त्यामुळे पोट दुपारच्या जेवणापर्यत भरलेले राहील.
  • नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेस: पेर, सफरचंद, संत्र, स्ट्राबेरी,मनुका, जर्दाळू  यापैकी कोणतीही दोन फळे खा.
  • दुपारचे जेवण: व्हेज ऑम्लेट किंवा टोफू सलाड घ्या.
  • संध्याकाळचा स्नॅक्स: मूठभर अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, चिया सीड्स खा. ग्रीन टी घ्या.
  • रात्रीचे जेवण: शेवटच्या दिवशी देखील हलका आहार घ्या. त्यासाठी रात्रीच्या जेवणात पालकाचे सूप घ्या. शरीर नैसर्गिकरीत्या डीटॉक्स करा या ’5′ पदार्थांनी !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

सिझेरियननंतर वाढलेले वजन आणि नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

$
0
0

सिझेरियन प्रसूतीमध्ये स्त्रिची शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्ट्रेंथ खर्च होते. प्रसूतीनंतर पहिल्या दोन आठवड्यात होणार त्रास, वाटणारी चिंता आणि प्रसूतीनंतर येणारे नैराश्य यामुळे स्त्री अगदी खचून जाते, उदास होते. परंतु, या सगळ्यावर योगसाधनेने मात करता येते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आर्ट ऑफ लिव्हिन्ग मधून मेडिसिनची डिग्री मिळवलेल्या सिनियर योगा एक्स्पर्ट यांच्याशी संवाद साधला.

  • भावनिक स्थैर्य साधण्यासाठी योगसाधना आणि प्राणायाम यांची मदत होते.

इतर व्यायामाचा परिणाम फक्त स्नायूंवर होतो तर योगसाधनेचा परिणाम endocrine system वर होतो, असे पुण्याच्या योग एक्स्पर्ट गीतांजली मुळ्ये यांनी सांगितले. म्हणूनच नवमातेने नियमित योगसाधना व प्राणायाम केल्यास सिझेरियन प्रसूतीनंतर येणारे नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होईल. प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

  • सिझेरियन प्रसुतीवर मात करण्यासाठी योगासन फायदेशीर ठरतात.

सूक्ष्म योगा, जॉईंट रोटेशन, लेग रोटेशन यासारख्या हलक्या योगा व्यायामप्रकार सिझेरियननंतर महिनाभर करावे, असा सल्ला स्त्री रोग तज्ज्ञ आणि योग ट्रेनर डॉ. मिनाक्षी गुप्ता यांनी दिला.  या काळात कठीण योगासन विशेषतः ज्यात पेल्विक मसल्सचा सहभाग असेल अशी आसने करू नका. सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !

सूक्ष्म योगा:

सूक्ष्म योगा मुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात व शरीरात ऊर्जेची निर्मिती होते. हे व्यायामप्रकार ७ मिनिटांसाठी केल्यास तुम्हाला खूप फरक जाणवेल. जाणून घेऊया ते करण्याची योग्य पद्धत.

  • सुरवातीला कपाळावर मसाज करा.
  • अंगठा आणि तर्जनीने भुवयांवर ५-६ वेळा हलकेसे चिमटे काढा.
  • ५-६ वेळा डोळे डावीकडून उजवीकडे आणि त्याचा विरुद्ध फिरवा.
  • डोळे घट्ट बंद करा आणि मग मोठे उघडा. असे १०-१५ वेळा करा.
  • १०-१५ सेकंदासाठी कान खेचा. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कानाच्या खालच्या बाजूला असलेल्या नसा प्रग्या जागृत करतात.
  • कान पकडून तो गरम होईपर्यंत उजवीकडून डावीकडे आणि विरुद्ध दिशेने फिरवा.
  • हाताची पहिली तीन बोटे (तर्जनी, मधले बोट आणि अनामिका) जबड्यापासून हनुवटीपर्यंत फिरवा आणि गालांना मसाज करा.
  • तोंड पूर्णपणे उघडा आणि बंद करा. असे ८-१० वेळा करा.
  • तोंड उघडा आणि जबडा उजवीकडे-डावीकडे असा ८-१० वेळा फिरवा.
  • मानेचे रोटेशन करा. श्वास घेत डोकं वरच्या बाजूला न्या आणि श्वास सोडत हनुवटी छातीला लावा. डोकं उजवीकडून डावीकडे आणि विरुद्ध दिशेने ५-६ वेळा फिरवा. मानेचं रोटेशन करताना श्वास घेत डोकं उजवीकडून मागे न्या आणि श्वास सोडत मागून डाव्या बाजूने पुढे आणा.
  • २ मिनिटांसाठी हात झटकून घ्या. (शेक करा).

प्राणायाम

  • योगासनांप्रमाणे सिझेरियननंतर काही ठराविक श्वसनप्रकार करायला सुरवात करा. श्वासावर लक्ष केंद्रीत केल्याने इतर विचार व दुःखातून बाहेर पडण्यास मदत होते. डॉ. मुळ्ये यांनी काही श्वसनप्रकार करण्याचा सल्ला दिला.
  • नाडीशोधन प्राणायाम: यामुळे मनावरील ताण हलका होतो. नियमित केल्याने मन व शरीर शांत, शुद्ध होते.
  • भ्रामरी प्राणायाम: हा प्राणायाम टेन्शन, चिंता, राग दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
  • नोट: कपालभाती, भस्रिका यांसारखे पोटावर ताण येणारे श्वसनप्रकार करताना काळजीपूर्वक करा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उत्तम ठरेल.
  • पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही योगासने:

सिझेरियननंतर पोट वाढतं. यासाठी सूर्यनमस्कार, धनुरासन, भुजंगासन, वीरभद्रासन आणि बाजूला झुकण्याची आसने करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच वजन कमी करण्यासाठी जलद गतीने सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला डॉ. मिनाक्षी देतात. परंतु, तीन महिन्यानंतर सूर्यनमस्कार घालावेत. आसनाच्या अंतिम स्थितीत अधिक वेळ म्हणजेच वेदना किंवा शरीराची थरथर जाणवेपर्यंत रहा. त्याचबरोबर कठीण आसने ट्रेन्ड योगा टीचरच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा सल्ला डॉ. मुळ्ये यांनी दिला आहे.

  • आहारासंबंधी टीप्स:

प्रसूतीनंतर खूप तूप किंवा तेल खाण्याची गरज नाही, असे योगा एक्स्पर्ट कविता सोनावणे हिने सांगितले. तेलकट पदार्थ खाल्याने अतिरिक्त वजन वाढते. स्तनपानाच्या काळात स्त्रीने हेल्दी राहणे गरजेचे आहे. यासाठी नवमातेने भरपूर प्रमाणात फ्लुईड्स घ्यावे. त्याचबरोबर सात्विक आणि शाकाहारी आहार घ्यावा. कारण शाकाहारी अन्नात अधिक प्रमाणात प्राण (लाईफ फोर्स) असतात.

नवमातेला तिच्या शारीरिक वेदना आणि भावनिक ताण दूर करून नवीन आयुष्यात नव्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार करण्यास योगसाधना उपयुक्त ठरते.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


ही लक्षणं देतात मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे संकेत !

$
0
0

आपल्या मुलांचे होणारे लैंगिक शोषण हे पालकांसाठी अतिशय धक्कादायक असते. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण शक्य तितकी काळजी घेतो, तरीही अशा भयानक घटना घडतात. अशा वेळी काय करावे ते समजत नाही. काही वेळा अशा घटना फार उशिरा लक्षात येतात. म्हणून चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. शुची दळवी यांनी मुलांचे होणारे लैंगिक शोषण याची काही लक्षणे सांगितली. त्यामुळे अशा घटनांची जाणीव वेळीच होवून त्यावर तुम्हाला पाऊल उचलता येईल.

  • Bruises: लैंगिक शोषणाचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे शरीरावर विशेषतः हातावर bruises दिसू लागतात. असे साधारणपणे मुलं खेळताना किंवा उड्या मारताना देखील होते. परंतु, असे किती वेळा होते याकडे नीट लक्ष द्या. लहान मुलांना त्यांच्या मित्रांकडून होणारा त्रास रोखायला कसे शिकवाल ?
  • गुप्तांगात किंवा छातीवर सूज येणे: गुप्तांगात किंवा छातीवर सूज येणे हे लैंगिक शोषणाचे अजून एक लक्षण आहे. तसंच तो भाग लालसर दिसत असल्यास त्याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. त्याचबरोबर शरीरावर इतर ठिकाणी काही ओरखडे दिसत आहेत का, याकडे बारकाईने लक्ष द्या.
  • चालताना किंवा बसताना त्रास होणे: जर तुमच्या मुला/ मुलीला चालताना किंवा बसताना त्रास होत असेल तर ती/तो लैंगिक शोषणाचे बळी आहेत, हे ओळखा. यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • जर मुलं शांत बसत असेल किंवा काहीतरी लपवत असेल: जर तुमचे मुलं शांत बसत असेल किंवा तुमच्या पासून काहीतरी लपवत असेल तर हा लैंगिक शोषणाचा संकेत आहे. शाळेतील किंवा दिवसभरातील घटना सांगताना तिला/ त्याला कम्फरटेबल वाटत नसेल किंवा इतर वेळी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेयर करत असताना मुलं काहीतरी लपवत आहे, असे तुम्हाला जाणवल्यास तर ही बाब गंभीर आहे आणि त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. नक्की बघा: व्हिडियो: लहान मुलांच्या मनात नेमकं दडलयं काय ?
  • अचानक चिडचिड करणे: खूप बडबड, दंगा करणारे तुमचे मुलं अचानक चिडचिड करत असेल, अत्यंत घाबरलेलं दिसत असेल आणि सतत चिंतेत, काळजीत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचे घडले आहे. तसंच रात्री नीट झोपत नसेल किंवा अचानक दचकून उठत असेल तर तुम्हाला याकडे गंभीरपणे बघायला हवे. सगळ्यात आधी तिच्याशी/ त्याच्याशी शांतपणे, प्रेमाने बोलण्याची गरज आहे. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

उन्हाळ्यात त्वचेला झटपट तजेलदार बनवेल हा घरगुती स्प्रे !

$
0
0

वाढत्या उन्हाबरोबरच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अॅक्नेची समस्या तर अत्यंत सामान्य आहे. उन्हाळ्यात येणारे पिंपल्स सहजासहजी जात नाही. त्यासाठी तुम्हाला डर्मोटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा लागतो. म्हणून यासाठी हे समर फेशियल स्प्रे ट्राय करा. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहील, पिंपल्समुळे येणारे डाग, जळजळ कमी होईल आणि बॅक्टरीया नष्ट होतील. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. तसंच ते बनवणे देखील सोपे आहे. या चिकचिकत उन्हाळ्यात या फेशिअल स्प्रे ने चेहरा चटकन उजळेल.

तुम्हाला यासाठी ग्रीन टी, टी ट्री ऑईल, गरम पाणी आणि रिकामी स्प्रे बॉटल या साहित्याची आवश्यकता आहे. ही बॉटल तुम्ही तुमच्यासोबत  ठेऊ शकता आणि गरजेच्या वेळी स्प्रे करा व मिनिटाभरात फ्रेश व्हा. उन्हाळ्यात तेलकट त्वचेलाही तजेलदार बनवेल हा घरगुती फेसपॅक !

अॅक्नेसाठी ग्रीन टी चा वापर का करावा?

  • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन टी सहज उपलब्ध होते.
  • ग्रीन टी मध्ये अँटीबॅक्टरील आणि अँटी इंमफ्लामेंटरी गुणधर्म असल्याने अॅक्नेवर परिणामकारक ठरते.
  • ग्रीन टी मध्ये असलेल्या Epigallocatechin gallate (EGCG) मुळे त्वचेला नवी झळाळी मिळते. तसंच एजिंग प्रोसेस मंदावते.
  • अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ग्रीन टी मुळे त्वचेतून स्त्रवणाऱ्या सिबमचे प्रमाण ७०% नी कमी होते.
  • ग्रीन टी त्वचेवर लावल्याने ब्लॅकहेड्स व पिंपल्स कमी होतात.

टी थ्री अॅक्ने कमी करण्यासाठी कसे परिणामकारक ठरतात?

साहीत्य:

  • १ ग्रीन टी बॅग
  • १ कप पाणी
  • २ थेंब टी ट्री ऑईल
  • २ थेंब लिंबाचा रस
  • १ रिकामी स्प्रे बॉटल

कृती:

एक कप पाणी उकळवा आणि त्यात टी बॅग घाला. त्यात २ थेंब टी ट्री ऑईल आणि लिंबाचा रस घाला. पाणी थंड झाल्यानंतर त्यातून टी बॅग काढा. त्यानंतर ते मिश्रण स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये काढा. बाहेर जाण्यापूर्वी त्वचेवर स्प्रे करा. याचा वापर तुम्ही गरजेनुसार दिवसभर करू शकता. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी आणि रिफ्रेश दिसण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तसंच टी ट्री ऑईल आणि ग्रीन टी यामुळे पिंपल्स, डाग दूर होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात येणाऱ्या  घामाच्या दुर्गंधीला दुर ठेवा, घरगुती ‘बॉडी स्प्रे’ने!

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

References:
1. Katiyar, S. K., Ahmad, N., & Mukhtar, H. (2000). Green tea and skin. Archives of Dermatology, 136(8), 989-994.
2. Hsu, S., Bollag, W. B., Lewis, J., Huang, Q., Singh, B., Sharawy, M., … & Schuster, G. (2003).
3. Mahmood, T., Akhtar, N., Khan, B. A., Khan, H. M. S., & Saeed, T. (2010). Outcomes of 3% green tea emulsion on skin sebum production in male volunteers. Bosn J Basic Med Sci, 10(3), 260-264.
4. Elsaie, M. L., Abdelhamid, M. F., Elsaaiee, L. T., & Emam, H. M. (2009). The efficacy of topical 2% green tea lotion in mild-to-moderate acne vulgaris. Journal of drugs in dermatology: JDD, 8(4), 358-364.
5. Raman, A., Weir, U., & Bloomfield, S. F. (1995). Antimicrobial effects of tea‐tree oil and its major components on Staphylococcus aureus, Staph. epidermidis and Propionibacterium acnes. Letters in Applied Microbiology, 21(4), 242-245.
6. Malhi, H. K., Tu, J., Riley, T. V., Kumarasinghe, S. P., & Hammer, K. A. (2016). Tea tree oil gel for mild to moderate acne; a 12 week uncontrolled, open‐label phase II pilot study. Australasian Journal of Dermatology.

 

 

World Homeopathy Day : होमिओपॅथीने नैराश्यावर मात करणं शक्य आहे का ?

$
0
0

जगभरात हळूहळू डिप्रेशनच्या गंभीरतेबाबत जागरुकता होत आहे ही एक खरंच चांगली बाब आहे.कारण डिप्रेशनचा त्या सबंधित प्रत्येक व्यक्तीवर दुष्पपरिणाम होत असतो.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिप्रेस लोकांवर करण्यात येणा-या पारंपरिक उपचार पद्धतीबाबत मात्र विशेष बोलले जात नाही.पारंपारिक उपचारांमध्ये सायकोथेरपी व काही स्थितीत त्या व्यक्तीला Antidepressants औषधोपचार करण्यात येतात.पण दीर्घकाळ ही औषधे घेतल्यामुळे डिप्रेस व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीत बिघाड होऊ शकतात.परिस्थिती अधिकच गंभीर होते जेव्हा अशी औषधे बंद केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. Antidepressants मुळे वजन वाढणे ते अगदी सेक्शुअल समस्येपर्यंत अनेक विनाशक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा औषधांचा वापर हा जवळजवळ काऊंटर इंट्युटिव्ह आहे. वाचा ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !

डिप्रेस लोकांची काळजी घेणारे देखील रुग्णाचा विकार व औषधांचा साईड इफेक्ट याबाबत द्विधा मन:स्थितीत सापडतात.यासाठीच डिप्रेशनवर उपचार करण्यासाठी व्यापक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे.ज्यामुळे डिप्रेस व्यक्तीच्या फक्त वरवरच्या लक्षणांवरच नाही तर या समस्येच्या मुळापर्यंत पोहचता येऊ शकेल.तसेच डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !जरुर करा.

होमिओपॅथीनूसार डिप्रेशन येण्याची प्रमुख कारणे-

  • शोषण- भूतकाळातील शारीरिक,सेक्शुअल व भावनिक शोषणामुळे भविष्यात एखादी व्यक्ती गंभीर नैराश्यामध्ये जाऊ शकते.अशा अनेक प्रकरणांमध्ये लहान मुलांना म्हणजे अगदी पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील याचा तडाखा बसू शकतो.आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

  • औषधे- काही अॅलोपॅथीक औषधांमुळे त्या व्यक्तीच्या मूडवर घातक परिणाम होऊ शकतो.अॅक्नेसारख्या समस्येवर घेण्यात येणारे Isotretinoin , Interferon-alpha ही अॅन्टी व्हायरल, Corticosteroids या औषधांमुळे डिप्रेशनचा धोका अधिक वाढतो.या औषधांमुळे नॅचरल डिफेंस मॅकेनिझम दाबला जातो ज्यामुळे डिप्रेशनची समस्या निर्माण होते.

  • संघर्ष- घरातील मंडळीसोबत अथवा मित्रमंडळींसोबत वैयक्तिक मतभेद अथवा संघर्ष देखील डिप्रेशनसाठी कारणीभूत असू शकतात.अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं

  • मृत्यु अथवा वैयक्तिक नूकसान- जवळच्या व्यक्तीच्या मृत्युच्या दु:खामुळे देखील एखाद्याला डिप्रेशन येऊ शकते.

  • आनुवंशिक- घरामध्ये डिप्रेशनची फॅमिली हिस्ट्री असल्यास डिप्रेशन येऊ शकते.

  • एखादी घटना- नवीन नोकरी लागणे, पदवीधर होणे अथवा लग्न होणे अशा चांगल्या घटनांमुळे देखील डिप्रेशन येऊ शकते.तसेच नोकरी जाणे,जॉब बदलणे अथवा पैशांचे नुकसान, घटस्फोट, निवृत्ती अशा त्रासदायक घटना देखील नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात.

  • वैयक्तिक समस्या- मानसिक आजारामुळे किंवा घराबाहेर अथवा समाजाबाहेर काढणे अशा सामाजिक बहिष्कारामुळे देखील डिप्रेशनचा धोका वाढू शकतो.

  • गंभीर आजारपण-एखाद्या गंभीर आजार अथवा आरोग्य समस्येमुळे देखील एखाद्याला डिप्रेशन येऊ शकते.नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी देखील जरुर वाचा.

  • एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे-जवळजवळ ३० टक्के लोकांना यामुळे डिप्रेशन येण्याची गंभीर समस्या निर्माण होते.

होमिओपॅथीमध्ये डिप्रेशनवर कसे उपचार करतात?

होमिओपॅथी उपचारांचा उद्देश केवळ रुग्णाच्या वरवरच्या लक्षणांवर उपाय करणे हा नसून त्या व्यक्तीचे संपुर्ण आरोग्य सुधारणे हा असतो.त्यामुळे यामध्ये त्या व्यक्तीला आयुष्यभर Antidepressants घ्यावी लागू नयेत यावर भर दिला जातो.या उपचारांमध्ये डिप्रेशनला कारणीभूत ठरणा-या भावनिक कारणांवर उपचार करण्यात येतात.तसेच या आयुर्वेदीक उपचारांनी करा डिप्रेशनवर मात ! हे देखील अवश्य वाचा.

ताण-तणाव निर्माण करणा-या भावनांवर परिणामकारक ठरतात ही होमिओपॅथी औषधे-

  • मनातील राग-Aconite, Aurum metallicum, Belladona, Coffea cruda, Nux-vomica, Bryonia, Chamomila, Sulphur, Veratrum album

  • एखाद्या जवळची व्यक्ती अथवा पाळीव प्राणी गमावणे-Aurum metallicum, Belladona, Hyocyamus, Ignatia, Natrum-mur, Causticum, Antimonium crudum, Phosphoric acid

  • आनंद (serotonin आणि endorphin वाढणे)-Opium, China, Coffea, Aconite, Pulsatilla

  • बिझनेस, धन, प्रतिष्टा गमावणे-Arnica, Rhust-tox, Veratrum album, Sarsaparilla, Arsenicum Album, Calcarea Carbonica, Ignatia, Nux-vomica

ही औषधे वापरणे सुरक्षित असून त्यामुळे Antidepressants औषधांप्रमाणे होणारे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.तसेच या औषधांचे दीर्घकाळ दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत किंवा यांची सवय देखील लागत नाही.मात्र ही औषधे होमिओपॅथी तज्ञांच्या सल्लानूसार घेणे गरजेचे आहे.

डॉ.श्रीपाद खेडेकर यांनी जगप्रसिद्ध टेनिस स्टार Novak Djokovic याच्यावर अस्थमा या समस्येसाठी उपचार केले आहेत.तसेच युरोपियन प्रिमियर लीगमध्ये खेळणा-या अनेक युरोपियन फुटबॉल स्टार्सनां देखील बरे केले आहे.ते युरोपमध्ये प्रॅक्टीस करतात व त्यांनी केलेल्या संशोधनातील शेकडो केसेस एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय मेडीकल जर्नल मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिजीशन,शिक्षक,संशोधक व लेखक आहेत.तसेच त्यांनी होमिओपॅथीवर चार पुस्तके लिहिली आहेत.एका साधा व व्यापक दृष्टीकोनातून गंभीर व गंुतागुंतीच्या Pathologies हाताळणे ही त्यांची स्पेशलिटी आहे.ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक असून त्यांचा विषय Understanding the Genetic Basis of Homoeopathic Treatment हाआहे.ते आक्रमक व प्रभावीपणे अनेक कठीण व दुर्धर रोगांवर उपचार करण्यात यशस्वी झाले आहेत.त्यांचा असा दृढ विश्वास आहे की एखाद्या गंभीर आरोग्य स्थितीचे कारण हे त्या व्यक्तीच्या ताण-तणावामध्येच दडलेले असते.तसेच ते तुम्हाला अचूक सल्ला व परिणामांची हमी देऊ शकतात.ते त्यांच्या दादर व बेलग्रेडमधील क्लिनीक मधून कार्य करतात व मुंबईच्या सुश्रूषा हॉस्पिटचे कन्सल्टंट देखील आहेत.

अधिक माहिती साठी भेट द्या- www.imperialclinics.com

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

वाळा –उन्हाळा सुसह्य करायला या ’5′मार्गांनी मदत करणारी आयुर्वेदीक वनस्पती !

$
0
0

महाराष्ट्रभरात उन्हाचा पारा चाळीशी पलिकडे जात असल्याने डीहायड्रेशन,पित्त, उष्माघात असे त्रास वाढत आहेत. अशावेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून एसीत राहणं, विकतची सॉफ्ट ड्रिंक्स पिणं अशा गोष्टींची मदत घेतली जाते. मात्र हे पर्याय खर्चिक आणि कालांतराने शरीराला अपायकारक ठरतात. म्हणूनच यंदाच्या उन्हाळ्यात थंडगार राहण्यासाठी काही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक मार्गाचा वापर करून पहा.

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी हमखास फायदेशीर ठरणारी एक वनस्पती म्हणजे ‘वाळा’. सुकलेल्या गवताप्रमाणे दिसणारा वाळा उन्हाळ्यात फारच उपयुक्त ठरतो. मग या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करून उन्हाळा कसा सुसह्य होऊ शकतो याबाबत आयुर्वेदीक वैद्य डॉ. परीक्षित शेवडे ( आयुर्वेद MD) यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

डॉ. शेवडे यांच्या सल्ल्यानुसार, वाळा ही एकमेव अशी वनस्पती आहे. जी थंड स्वरूपाची असली तरीही उन्हाळ्यात मंदावलेल्या पचनशक्तीला चालना देण्यासाठी मदत करते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ‘कूल’ राहण्यासाठी विविध स्वरूपात वाळ्याचा समावेश करता येतो.

1) पाण्याच्या भांड्यात वाळा घाला -

उन्हाळ्यात फ्रीजचं पाणी पिणं हा उपाय तात्पुरता फायदेशीर वाटत असला तरीही आरोग्यासाठी अशाप्रकारचे पाणी पिणं त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच फ्रीजऐवजी माठात पाणी भरून ते प्यावे. माठांत किंवा इतर भांड्यात पाणी भरून ठेवले असेल तर ते नैसर्गिकरित्या थंड करण्यासाठी त्यामध्ये वाळ्याची जुडी घालून ठेवा.

मात्र पाण्यात वाळा घालून ठेवण्यापूर्वी त्याला बांधलेली साधी दोरी कापून केवळ वाळा पाण्यात मिसळा. साधा दोरा फार काळ पाण्यात राहिल्यास त्यावर बॅक्टेरिया वाढण्याची  शक्यता असते. पण वाळा पाण्यात सडत नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून दर 15 दिवसांनी वाळा पाण्यातून काढून उन्हात वाळवून पुन्हा वापरू शकता. अशाप्रकारे एक वाळ्याची जुडी सुमारे महिना, दीड महिना वापरणे अगदीच सुरक्षित आहे. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य 

2) वाळ्याचा लेप

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पित्त वाढण्याची शक्यता दाट असते. अशावेळेस शरीरावर चंदनाची उटी किंवा वाळ्याचा लेप लावणं फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीरात थंडावा राहण्यास मदत होते.

3) वाळ्याचं सरबत

उन्हाळ्याच्या दिवसात सतत घाम येत असल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी सतत लागणारी तहान शमवण्यासाठी वाळ्याचं सरबत फायदेशीर ठरतं. यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो तसेच शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. वाळ्याचं सरबत किंवा वाळ्याचं चूर्ण पाण्यात मिसळून ते सकाळी नाश्त्यानंतर प्यायल्यास उन्हाळ्याच्या दिवसात ते एनर्जी ड्रिंकप्रमाणे कमाल करू शकते.मंदावलेली पचनशक्ती  सुधारून, उन्हाळ्याच्या दिवसातील मरगळ झटकण्यास मदत होते. या ’5′ घरगुती आणि हेल्दी सरबतांनी उन्हाळ्यात रहा कूल !

4) वाळ्याच्या टोप्या

तीव्र सूर्यकिरणांचा त्रास झाल्यास हीटस्ट्रोक / उष्माघाताचा त्रास होतो. अशावेळेस उन्हांत कामानिमित्त बाहेर पडणार असाल तर वाळ्याच्या टोप्या घालून बाहेर पडणं अधिक सुरक्षित ठरेल.नक्की वाचा : हीटस्ट्रोकचा त्रास जाणवल्यास ताबडतोब करा हे प्रथमोपचार ! 

5) वाळ्याचे पडदे / पंखे  

वाळ्याचे पडदे आणि पंखे हे उन्हाळ्यात नैसर्गिक स्वरूपातील एअर  कंडिशनप्रमाणे काम करतात. प्रामुख्याने विदर्भात उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचे पडदे किंवा पंखे वापरले जातात. त्यावर पाणी मारल्यानंतर पड्द्यांना छेदून येणारी हवा थंडगार असते. त्यामुळे उन्हाळ्यात घरात थंडावा निर्माण करणारा हा इको फ्रेंडली पर्यायही नक्की आजमावून पहा.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

हनुमान जयंती विशेष: प्रसादाला दिल्या जाणार्‍या सुंठवड्याचे आरोग्यदायी फायदे

$
0
0

चैत्र महिन्यात येणाऱ्या रामनवमीला आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो. परंतु, सुंठवडा देण्यामागचे नेमके कारण काय? तो चिमूटभरच का दिला जातो? त्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत का ? आपल्या या प्रश्नांवर ठाण्याच्या आरोग्यधाम हॉस्पिटलच्या मेडीकल डायरेक्टर आणि आयुर्वेदीक स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

रामनवमी व हनुमान जयंती चैत्र महिन्यात येते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात. याचे कारण म्हणजे शरीरात न पचलेला भाग शरीरात काही इम्मफ्लामेंटरी बदल घडवून आणतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.

आलं वाळवलं की सुंठ बनतं. आलं उष्ण आहे. ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो. म्हणून एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. सुंठाला ‘विश्वा’ असं दुसरं नाव आहे. अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला ‘विश्वऔषध’ असे म्हणतात.

सुंठाचे फायदे:

कंबरदुखी, आमवात, संधीवात यावर सुंठ उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या वेळेस उद्भवणारी पोटदुखी आणि प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वावस्थेत आणण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. तसंच नैराश्य येणं, भीती वाटणं, आत्मविश्वासाची कमतरता यांसारखे मानसिक त्रास होऊ नयेत म्हणून देखील सुंठ फायदेशीर आहे.

सुंठ किती प्रमाणात खावे?

सुंठाचा शरीरावर होणारा परिणाम गोड असला तरी सुंठ उष्ण असल्याने ते कमी प्रमाणात खावे. पित्त व उष्ण प्रकृती असलेल्यांना सुंठ फार सहन होईल असे नाही म्हणून त्यांनी सुंठ साजूक तुपासोबत खावे. गर्भाशयाच्या दुखण्यासाठी सुंठ एरंडेल तेलासोबत घेतात. उष्ण प्रवृत्ती आहे पण संधीवात कमी करायचा असल्यास सुंठ तुपासोबत घ्यावी. आपण सुंठ कशाबरोबर खातो यावरून त्याचा परिणाम ठरत असतो. शरद व ग्रीष्म ऋतूत म्हणजेच ऑक्टोबर आणि मे महिन्यात सुंठ खाऊ नये, असा सल्ला डॉ. कुलकर्णी देतात.

सुंठवडा कसा बनवावा?

१० ग्रॅम सुंठ तुपावर परतून त्यात वेलची, जायफळ. चारोळी, केशर घालून १० दिवस सकाळी घेतल्यास मानसिक आरोग्य सुधारते.

तसंच सुंठवडा बनवण्यासाठी सुंठ, खोबरं, खडीसाखर भाजून मग बारीक वाटून घ्या. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही त्यात खसखस घालून व्हेरिएशन आणू शकता.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Viewing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>