Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

कोरफड –अ‍ॅसिडीटी आणि अल्सरवर रामबाण उपाय !

$
0
0

आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे  पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मग त्यावर उपाय म्हणून बाजारात मिळणारी ‘अ‍ॅन्टासिड्स’ घेण्याऐवजी ‘कोरफडी’चा रस हा घरगुती उपाय नक्कीच सुरक्षित आणि आरामदायी आहे.

कसे आहे गुणकारी ?  

पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी ‘कोरफ़ड’ अत्यंत फायदेशीर  आहे. कोरफड रेचक असल्याने बद्धकोष्ठता,  पोटातील अल्सर, जळजळ कमी होण्यास मदत होते.

कसे बनवाल हे पेय ? 

  • कोरफडीचा गर
  • ताक

कृती - 

  • कोरफडीची पात कापून स्वच्छ धुवून घ्यावे.
  • पात मधून कापून त्यातील गर काढून घ्यावा. हा गर धुवून त्यावरील पिवळा भाग काढून घ्यावा. असा सल्ला डॉ. शक्ती सुब्रमण्यम यांनी दिला आहे.
  • दोन चमचे कोरफडीचा गर ताकात मिसळून अंदाजे 20 मिली मिश्रण बनवावे.

योग्य मात्रा

हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदा होतो.

Translated By  -  Dipali Nevarekar

Source – aloe-vera-home-remedy-for-acidity-and-ulcers

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! (17- 23 ऑगस्ट)

$
0
0

मेष - 

तुमच्या राशीचे ग्रहमान पाहता, पचनशक्ती कमकुवत झाल्याने या आठवड्यांत आरोग्यविषयक कुरबुरी वाढतील. त्यामुळे काही कामं खोळबण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यायाम टाळू नका. योगा, ध्यानसाधना  तुम्हांला  शारिरीक  आणि मानसिकदृष्ट्या  स्थिर ठेवेल.

वृषभ -

ऋतूमानात झालेल्या बदमामुळे तुम्ही आजारी पडण्याची चिन्ह आहेत. लहान- सहान आजारांकडे दूर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्दी- खोकल्या सारख्या आजारांवर औषध परिणामकारक ठरत नसतील तर  वेळीच अन्य पर्यायी औषधांचा विचार करा.

मिथून- 

तुमच्या सक्षम रोगप्रतिकारशक्तीमुळे, वातावरणात झालेल्या बदलाचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे  हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल. मात्र काही जुन्या आजारांवर लक्ष ठेवा. विशेषतः संधिवाताच्या रुग्णांनी काळजी घ्यावी.

कर्क 

काही जुन्या आजारांशी सामना करणारे रुग्ण वगळता इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी आहे. मात्र अपघाताने इजा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे  वाहन चालवताना, स्वयंपाक घरात  काम करताना  तसेच जिने चढता-उतरताना काळजी घ्या.

सिंह -

या आठवड्यात काही अनपेक्षित कारणांमुळे तुम्ही आजारी पडण्याची  शक्यता आहे. त्यामुळे शारिरीक कुरबुरींकडे दूर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मध्यमवयीन व त्याहून वयस्कर  लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. पचनासंबंधित काही जुने आजार असल्यास खाण्यावर ताबा ठेवा.

कन्या -

या आठवड्यात पचनाचे विकार डोकं  वर काढण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या. अन्यथा त्याचे स्वरूप गंभीर  झाल्यास आजारपण वाढल्याने  सक्तीचा आराम करावा लागेल. त्यामुळे ‘गणेशा’च्या सल्ल्यानुसार जंक फूड टाळून पोषक आहाराकडे भर द्यावा.

तूळ -

तुमच्या आरोग्यविषयक जुन्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय मिळण्यासाठी या आठवड्याचे ग्रहमान अनुकूल आहे. इतरांसाठीही हा आठवडा निरोगी जाण्याची शक्यता आहे. वयोमानानुसार काही कुरूबुरी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - 

तुमच्या राशीतील केतूच्या प्रभावामुळे आरोग्यासंबंधित काही अनपेक्षित आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ग्रहमानाच्या संकेतानुसार आरोग्याची काळजी घ्या. तसेच काही प्रतिबंधक उपायांनीच आजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा.

धनू -

ऋतूमानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यावर  परिणाम होण्याची शक्यता आहे. व्हायरल इंफेक्शनपासून दूर रहा. रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तींनी तणावग्रस्त स्थितीपासून दूर रहावे. तसेच नियमित वैद्यकीय चाचणी करावी. ध्यान व योग साधना नियमित करावी.

मकर - 

ग्रहमानाची पुरेशी साथ नसल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन, वातावरणाच्या बदलांमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. वेळीच लक्ष न दिल्यास लहान आजार देखील गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. या आठवड्यात अपघातांपासून सावध रहा.

कुंभ -

कमकुवत झालेल्या पचनशक्तीमुळे तुमचे आरोगु बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर काही घरगुती उपाय वेळीच करावेत. तसेच काही अपघातांमुळे तुम्हांला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  वाहन जरा जपूनच चालवा.

मीन - 

अति खाल्ल्याने किंवा खायचा वेळा न पाळल्याने तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. ही समस्या लहान वाटत असली तरीही त्याकडे कानाडोळा केल्यास तुम्हांला काही दिवस सक्तीचा आराम करावा लागेल. त्यामुळे आहारतज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

GaneshaSpeaks logo

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

अश्वगंधाच्या पानांनी वजन घटवा झटपट !

$
0
0

वजन कमी करणं हे तुम्हांला आव्हान वाटत असेल तर ‘अश्वगंधा’ हे  तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.  परंतू वजन कमी करण्याची क्षमता ही फक्त अश्वगंधाच्या पानांमध्ये आहे. अश्वगंधाची मूळं ही वजन वाढवण्याचे काम करतात. ( वजन वाढवायचे 10 ‘हेल्दी उपाय ‘)

  • कसे आहे उपयुक्त ‘अश्वगंधाचे पान’ ? 
अश्वगंधाचे पान हे बहूगुणी आहे. त्यातील औषधी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारशक्ती सक्षम होते, कफ, पित्त, मधूमेहांमध्ये  वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास, थकवा कमी करण्यास मदत होते. तसेच अश्वगंधा पचनसंस्थेचे  कार्य सुधारण्यास मदत करते.
            पचनक्रियेला चालना मिळाल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार नियमित अश्वगंधाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचन सुधारते परिणामी शरीराचे मेटॅबॉलिझम वाढते  व वजन कमी होण्यास मदत होते.
  • कसे वापराल ?

अश्वगंधाची दोन मोठी पानं कुटून त्याची पेस्ट करावी. सकाळी  उठल्याउठल्या रिकाम्या पोटी ग्लासभर गरम पाण्यासोबत ही पेस्ट घ्यावी. हा प्रयोग नियमित दोन आठवडे करावा. याप्रमाणेच खायचे पानही वजन घटवण्यास मदत करते.

खबरदारीचा उपाय :

तुम्ही नियमित डाएट आणि व्यायाम केल्यास ‘अश्वगंधा’ तुम्हांला अपेक्षित निकाल देऊ शकतात. तसेच हा एक घरगुती उपाय आहे त्याला वैद्यकीय औषध समजू नका. त्यामुळे हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

संबंधित दुवे -

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Sourece  - Use ashwagandha leaves for weight loss

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

हळदीने ठेवा मधूमेह काबुत !

$
0
0
हळद  हा भारतीय स्वयंपाकगृहातील महत्त्वाचा घटक आहे. त्यातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटकांमुळे घरगुती आणि नैसर्गिक उपचार म्हणून त्याचा वापर केला जातो. सर्दी-खोकला,अपचन, जखमा भरण्यासाठी हळद प्रामुख्याने वापरली जाते.   पण नुकत्याच एका संधोधनातून पुढे आलेली बाब म्हणजे हळद टाईप -2 डायबेटीस पासून आपला बचाव करते तसेच तो जडण्याची शक्यताही कमी होते. हळदीतील क्युरक्युमिन घटक ओमेगा 3 फ़ॅट्ससोबत एकत्र आल्यानंतर मधूमेहावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?

हीना- मोहरीच्या तेलाचे मिश्रण दूर करेल ‘केसगळती’ची समस्या !

$
0
0

सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’ ही अनेकांच्या जीवाला घोर लावते. म्हणूनच तुमच्या केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते. बर्‍याच जणांमध्ये केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने केसगळती होते. मग अशांसाठी हीना -मोहरीच्या तेलाचे मिश्रण नक्कीच फायदेशीर ठरू शकते.  केसगळती रोखण्यासाठी टाळा या ’7′ चुका !

हीना व मोहरीच्या तेलाचे मिश्रण –  

केसांच्या आरोग्यासाठी ‘हीना’ अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांचा पोत सुधारतो तसेच टाळूचेदेखील  पोषण होते. हीनामुळे केसांचे नुकसान टाळण्यास मदत होते.  परिणामी केस चमकदार आणि दाट होतात. ( ‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय )

तर  मोहरीचे तेल अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीफंगल असल्याने टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यास तसेच डॅन्डरफ ( कोंडा) कमी करण्यास मदत करतात. यामुळे केसगळतीची  मूळ कारणंच रोखण्यात मदत होते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते.

कसे बनवाल हे मिश्रण ? 

250 ग्रॅम मोहरीचे तेल वाडग्यात गरम करा. त्यात 60 ग्रॅम हीना (मेहंदी) ची पानं मिसळून तेल पुरेसे गरम करा.   पानं चॉकलेटी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर तेल गरम करा. थोड्या वेळाने  गॅस बंद करून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळा. आता हे तेलाचे मिश्रण हवाबंद डब्यात झाकून ठेवा.

कसे वापराल तेल ? 

या तेलाच्या मिश्रणाचा नियमित टाळूवर हलका मसाज करा. यामुळे केसगळती रोखण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मसाज केल्यानंतर डोक्याला गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळून ठेवावा. यामुळे तेल डोक्यात झिरपण्यास मदत होते. यासोबतच  केसगळती रोखणारी ‘५’ हर्बल ऑईल्स नक्की  वापरून पहा.

  • संबंधित दुवे 

केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा

केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !

‘त्रिफळा’- केसांच्या समस्या दूर करणारा घरगुती उपाय

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - No more hair fall! Try this henna-mustard hair oil for strong, silky hair

छायाचित्र सौजन्य – Getty Images

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

केसगळती रोखणारा ‘वन मिनिट’उपाय !

$
0
0

केसगळती ही काही प्रमाणात प्रत्येकामध्ये आढळून येते. केसगळतीचे प्रमाण दिवसाला 100 पेक्षा अधिक असल्यास ती समस्या गंभीर आहे. या समस्येचे एक कारण म्हणजे  टाळूला होणारा अपुरा रक्तप्रवाह ! मग त्यावरचा एक उपाय म्हणजे  टाळूला मसाज करा.

डॉ. एच. के. भाकरू  यांच्या मते, केस धुतल्यानंतर बोटांनी टाळूला मसाज करणे हा केसगळती रोखण्याचा एक सहज- सोपा घरगुती उपाय आहे. मग केसगळती रोखण्यासाठी जरूर टाळा या चूका ! 

कसे आहे फायदेशीर ? 

डॉ. एच. के. भाकरू, यांच्या ‘होम रेमेडीज फॉर कॉमन इएलमेंट्स’ या पुस्तकात लिहल्यानुसार थंड पाण्याने केस धुतल्यानंतर टाळूवर हातांच्या बोटांनी मसाज करावा. यामुळे डोक्याजवळील रक्तवाहिन्यांना चालना मिळाल्याने रक्तप्रवाह सुधारतो.परिणामी केसांची वाढदेखील सुधारते.

तुम्ही काय कराल ? 

तुमच्या सोयीनुसार पाण्याचे तापमान, शाम्पूने केस धुवा. मात्र शेवटी ते कोमट किंवा साध्या पाण्याने धुवून निथळत ठेवा. यामुळे केस गुंतण्याची शक्यता कमी होते. केसांचे गुंतणे रोखण्यासाठी करून पहा हे उपाय.

काही वेळाने केस टॉवेलने पुसा आणि कोरडे करा. त्यानंतर हाताच्या बोटांनी गोलाकार दिशेने मसाज करा.

खबरदारीचा उपाय - 

मसाज करताना तो हळूवार आणि समान प्रमाणात असावा. खूप जोरजोरात केस घालणे, मसाज करताना नखांचा वापर करणे टाळा. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

संबंधित उपाय 

केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा

हीना- मोहरीच्या तेलाचे मिश्रण दूर करेल ‘केसगळती’ची समस्या !

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ( 28 सप्टेंबर – 4 ऑक्टोबर )

$
0
0

मेष –

गणेशाच्या सल्ल्यानुसार या आठवड्यात तुम्हांला आरोग्यविषयक चिंतेचे कारण नाही. ऋतूमानातील बदलांमुळे व्हायरल इंन्फेक्शनपासून दूर रहा. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगासनं आणि प्राणायम करा.

वृषभ -

मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींना काही जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. येत्या सोमवारी,मंगळवारी अपघाताची शक्यता आहे. तसेच भविष्यात पचनाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.

मिथून-

तुमच्या राशीतील ग्रहमानाच्या संकेतानुसार ऋतूमानातील बदल तुम्हांला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. व्हायरल तापामुळे तुम्हांला काही दिवस घरीच आराम करावा लागेल. तसेच औषधांकडे दुर्लक्ष करू नका. रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करा.

कर्क -

श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच उपचार न घेतल्यास हे लहानसहान आजारदेखील गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने डायटरी सप्लिमेंट्सचा आधार घ्या.

सिंह -

या आठवड्यात तुम्ही त्वचेचे विकार किंवा रक्तातील कमतरतेमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तचाचणी करून डॉक्टरांकडून योग्य निदान आणि औषधोपचार घ्यावेत. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. गंभीरता वाढल्यास ही समस्या दीर्घकाळ  त्रासदायक ठरू शकते.

कन्या -

गणेशाच्या अंदाजानुसार या आठवड्यात तुम्हांला अपघातांचा धोका आहे. काही गंभीर नसले तरीही डॉक्टरांच्या सल्लाकडे तसेच काही दिवस आराम करण्याकडे दुर्लक्ष करू नका. मांड्यांना इजा होण्याची शक्यता अधिक आहे. रक्तदाब आणि हृद्यरोगींनी मात्र मेडिकल चेकअप करून आजार नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.

तूळ -

या आठवड्यात तुम्हांला आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही. काही जुन्या आणि त्रासदायक ठरणार्‍या आजारांवर मात करण्यासाठी काही नवे औषधोपचार फायद्याचे ठरणार आहेत. वाहन चालवताना काळजी घ्या म्हणजे अपघातापासून तुमचा बचाव होण्यास मदत होईल.

वृश्चिक -

काही अनपेक्षित आजार या आठवड्यात उद्भवण्याची शक्यता असल्याने काळजी वाढू शकते. आजरपणामुळे तुम्हांला काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल. मात्र फार काळजीचे काही कारण नाही. मजबूत रोगप्रतिकारशक्तीमुळे तुम्ही आजारपणातून लवकर बरे व्हाल.

धनू -

तुमच्या राशीतील गुरूच्या प्रभावामुळे काही जुने आजार कायमचे नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. शारिरीकरित्या निरोगी राहण्यासाठी नियमित संध्याकाळी चालण्याची सवय लावा.

मकर -

या आठवड्यात सांधेदुखीचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे दुखणे दूर करण्यासाठी पेनकिलरवर अवलंबून राहू नका. मधूमेहींनी खाण्यावर ताबा ठेवावा. इतरांनी आरोग्य गृहीत न घेता व्यायाम, योगसाधना तसेच ध्यानाधारणा करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ  -

अनपेक्षितपणे काही आजारपण उद्भवल्याने चिंता वाढू शकते. यामुळे तुम्हांला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल.त्यामुळे काही लक्षण आढळल्यास त्वरीत उपचार घ्यावेत. मध्यमवयीन लोकांनी आहाराबाबतचे पथ्य पाळावे. तसेच नियमित संध्याकाळी चालण्याची सवय  लावा. यामुळे मन आणि शरीर निरोगी राहण्यास मद्त होते.

मीन -

या आठवड्यात तुम्ही व्हायरल इंफेक्शनमुळे आजारी पडण्याची लक्षण आहेत. तापामुळे तुमची तब्येत नाजूक राहील. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट घेण्यासाठीन स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या. ‘सेल्फ मेडीटेशन’ टाळा. ग्रहमान आरोग्यविषयक फारसे अनुकूल नसल्याने विशेष काळजी घ्यावी.

GaneshaSpeaks-Logo1

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

चणे-गूळ खा, अ‍ॅनिमिया हटवा !

$
0
0

तुम्हांला थकवा किंवा दिवसभर कमजोर वाटते का ? यामागील एक कारण म्हणजे रक्तातील हिमोग्लॉबिनची कमतरता. यामुळे अ‍ॅनिमियापासून बचावण्यासाठी फायदा होतो.  आयर्नच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते परिणामी अ‍ॅनिमियाचा त्रास वाढतो. त्यामुळे संतुलित आहाराचा समावेश करावा. ( कामाचा थकवा कमी करणारे ’7′ पदार्थ !)

भाजलेले चणे आणि गुळ खाणे हा हिमोग्लोबीन वाढवण्याचा उत्तम घरगुती उपाय आहे. मग पहा स्पोर्ट्स न्युट्रीशनिस्ट आणि डाएटीशन दिपशिखा अग्रवाल यांचा काय आहे विशेष सल्ला -

चणे आणि गूळ कसे ठरतात फायदेशीर ? 

गुळामध्ये उच्च प्रमाणात आयर्न आणि साध्या सवरूपातील साखर असते. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात आयर्न मिळते तसेच हिमोग्लोबीनचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.  तर भाजलेल्या चण्यांमध्ये  प्रोटीन्स, आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात. गुळ- चणे एकत्र खाल्ल्याने हिमोग्लोबीन सोबतच शरीरात उर्जा वाढते. (गूळ खा आणि या ’7′ समस्या दूर ठेवा )

कसे खाल ? 

बाजरात गूळ आणि चणे सहज उपलब्ध होतात. नियमित मूठभर चणे गुळाच्या खड्यांबरोबर खावेत. हे एकत्र खाणे चविष्ट लागतात. तसेच आरोग्यालाही हितकारी आहेत.

संबंधित दुवे - 

बीटरूट – अ‍ॅनिमियावर मात करणारा नैसर्गिक उपाय !

आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन


डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

$
0
0

मंद प्रकाशात मोबाईल स्क्रिन, टीव्ही, मोबाईल स्क्रिनकडे पाहणे डोळ्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. अपुरी झोप सुद्धा डोळ्यांना  त्रासदायक ठरू शकतात. मग या चूकीच्या सवयींपासून परावृत्त होण्याबरोबरच काही घरगुती आणि सहज-सोप्या पद्धतींदेखील तुमच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत करतात.

मसाज :

तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकेंद हलक्या हाताने मसाज करा.  मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत  होते.

हाताच्या तळव्यांचा स्पर्श : 

योगविद्येमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे. हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा.  नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा.  2-3 मिनिटांनंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

थंड दूध : 

डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

काकडी :

काकडीमध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलूनमध्ये फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडीमधील अ‍ॅस्ट्रींजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप 3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.

गुलाबपाणी

नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अ‍ॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात.  गुलाबपाण्यात  कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसा.

संबंधित दुवे -

जवळचे दिसणे सुकर करेल हे ’5′ घरगुती उपाय

डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजक अन महत्त्वपूर्ण गोष्टी !

डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6 सुपरफुड्स !

‘अ‍ळशी’चे देखील ’6′दुष्परिणाम !

$
0
0

अळशी आरोग्यदायी असल्याने नवमातांपासून तरूणांच्या आहारात त्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. वजन घटवण्यासाठी अनेक बीयांबरोबरच अळशीदेखील प्रामुख्याने वापरली जाते. पण झटपट निकाल मिळवण्यासाठी आंधळेपणाने त्याचा वापर करणे त्रासदायक ठरू शकतो. हेदेखील जरूर लक्षात ठेवा .

  • पोट बिघडते - 

अतिप्रमाणात अळशी खाणे काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकते. त्यातील रेचक गुणधर्मांमुळे डायरिया, छातीत जळजळणे, पचनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे तुमचे पोट बिघडले असल्यास अळशी खाणे टाळा.

  • जखम भरण्याची प्रक्रिया मंदावते -

अळशीमधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड सूज किंवा दाह कमी करण्यास मदत करतात.परंतू अळशीतील काही घटकांमुळे रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरू राहतो. त्यामुळे अ‍ॅस्प्रिनसारख्या रक्त पातळ करणारी औषधं घेण्यापूर्वी नक्की  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (जखमांचे व्रण कमी करणारे ’8′ घरगुती उपाय !)

  • पोटात गॅस होतो -

अळशीमध्ये फायबर घटक अधिक असल्याने पोटात ग़ॅस होण्याचीदेखील शक्यता असते. काही जणांमध्ये पोटात गॅस होण्याबरोबरच बद्धकोष्ठतेचाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरड्या बीया खाऊ नका.

  • औषधांच्या परिणाम  मंदावू शकतो - 

औषध-गोळ्यांसोबत अळशी खाणे टाळा. यामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. म्हणूनच  आहारात अळशी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते -

अळशी खाणे काही वेळेस त्रासदायक ठरू शकते. त्याच्या अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनमुळे पोटात दुखणे, मळमळणे, उलट्या होणे असा त्रास होऊ शकतो. त्याची गंभीरता वाढल्यास अचानक रक्तदाब कमी होणे, श्वास  घेण्यात अडथळा निर्माण होण्याचा त्रास होऊ शकतो.

  • मासिकपाळीचे चक्र बिघडते -

अतिप्रमाणात अळशी खाल्ल्यास मासिकपाळीचे चक्र बिघडू शकते. पाळीच्या संदर्भात आजार असलेल्या स्त्रियांनी अ‍ळशीचे सेवन टाळावे. (मासिकपाळीच्या वेदना हमखास दूर करणारे ’10′ नैसर्गिक उपाय !)

संबंधित दुवे -

कोरफडीचेदेखील आहेत ’7′ दुष्परिणाम

 

पिंपल्सचं वाढणं कमी करण्यासाठी ही ‘एक’सवय टाळा

$
0
0

पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात. यामागील एक कारण म्हणजे आपल्या काही चूका. अशापैकी एक म्हणजे सतत चेहर्‍याला हात लावणे. तुमच्या या सवयीमुळे अ‍ॅक्नेच्या ब्रेकआऊट्सचे प्रमाण वाढते. यामुळे पिंपल्सचा त्रास असणार्‍या तरूण-तरूणींमध्ये निराशेची भावना वाढते. नक्की वाचा – : मी कधीच फेशियल, ब्लिचिंग केलं नाही : तेजस्विनी पंडीत ( Exclusive Beauty Secrets )

आपण जेवतो, ठिकठिकाणी नकळत हाताचा स्पर्श होतो असा हात सतत  चेहर्‍याला लागल्यास जंतूसंसर्गाची शक्यता वाढते. हजारो जंतू तुमच्याही  नकळत हा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अनेकजण दिवसभरात केवळ दोनदा चेहरा स्वच्छ करतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान करण्यास जंतूंना पुरेसा वेळ मिळतो. (या घरगुती पॅक्सने मुरूमांचा करा समुळ नाश )

तुमच्या या सवयीमुळे अ‍ॅक्नेची समस्या अजून बिघडू शकते. त्वचेवर घाम आणि सेबम एकत्र झाल्यास अ‍ॅक्नेची समस्या वाढीस लागते. यामुळे तुमची त्वचा पिंपल फ्री  होईलच असे काही नाही. मात्र त्याचे प्रमाण नक्कीच आटोक्यात राहण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्हांला पिंपल्सचा त्रास असल्यास सतत चेहर्‍याला हात लावणे किंवा त्या नखांनी फोडणे टाळा. यामुळे चेहर्‍यावर डाग पडण्याची शक्यता असते. (पिंपल्स गेले पण स्कार्स कसे हटवाल ?)

संबंधित दुवे - 

तेलकट त्वचेसाठी 5 उपयुक्त फेसवॉश

‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ( 5-11 ऑक्टोबर )

$
0
0

मेष - 

मधूमेहींनी या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित चेकअप आणि आहाराचे पथ्य पाळा. इतरांनी पचनाच्या विकाराकडे दूर्लक्ष करू नका. नियमित योगा, ध्यान करा.

वृषभ -

तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता ते आरोग्यास अनुकूल नाही. अनपेक्षितपणे काही आजार उद्भवू शकतात. पूर्ण चेकअप केल्यानंतरच त्याचे योग्य निदान करणे शक्य होईल. योग्य उपचारांसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मध्यमवयीन लोकांनी अपघातांपासून सावध रहा.

मिथून -

तुमच्या राशीतील ग्रहांच्या स्थितीनुसार पचनाचे विकार हा चिंतेचा विषय बनू शकतो. घरीच पुरेसा आराम करा  म्हणजे डीहायड्रेशनचा त्रास होणार नाही. इतरांनीदेखील आहराच्या बाबतीत काळजी घ्या. जंकफूड खाणे टाळा.

कर्क -

मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. काही जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यावर काही अल्टरनेटीव्ह उपाय करा म्हणजे हा त्रास समूळ नष्ट होण्यास मदत होईल. काहींना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यावर वेळीच उपचार करा.

सिंह –  

आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. परंतू गुरूच्या प्रभावामुळे हा त्रास गंभीर होणार नाही. तरूणांनी व्यायाम, ध्यानसाधना करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारिरीकरित्या फीट रहाल.

कन्या -

बदलत्या ऋतूमानामुळे तुम्ही या आठवड्यात आजारी पडण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे अनियमित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच उपचार न केल्यास भविष्यात त्रास अधिक गंभीर होण्याची  शक्यता आहे.

तूळ -

गुरूचा तुमच्या राशीतील 6व्या  स्थानावर प्रभाव असल्याने संबंधित आजारावर योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच इतरांनी आरोग्य गृहित धरू नये. नियमित व्यायाम करून तुमचा फीटनेस वाढवण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक - 

या आठवड्यात व्हायरल इंन्फेक्शन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्याच्या कुरबुरी वाढू शकतात. त्यामुळे काही दिवस घरीच आराम करा. वाढत्या वयानुसार मधूमेह, रक्तदाब यासारख्या येणार्‍या आरोग्याच्या समस्यांकडे दूर्लक्ष करू नका.

धनू - 

काही पचनाचे विकार तुम्हांला या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र इतर त्रास होण्याची शक्यता नाही. मधूमेहींनी आहाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. आहार आणि जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करा म्हणजे तुमचा फीटनेस सुधारेल.

मकर -

तुमच्या राशीतील ग्रहाची स्थिती आरोग्यास प्रतिकूल असल्याने काही जूने विकार पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे.  प्रतिबंधात्मक उपायाने हे आजार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांनी श्वसनाच्या विकारांकडे लक्ष द्यावे. फीट राहण्यासाठी योगा आणि ध्यानसाधना करणे गरजेचे आहे.

कुंभ - 

या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.लहान-सहान वाटणार्‍या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार न केल्यास त्याची गंभीरता वाढू शकते. काही दीर्घकाळ चालणारे आजार जडण्याची शक्यता असल्याने आराम आणि काळजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळेस चालण्याचा  व्यायाम करा.

मीन -

मधूमेहींनी आहाराचे पथ्य पाळणे  गरजेचे आहे. त्यासाठी नियमित चाचणी करणे गरजेचे आहे.  अपघाताची शक्यता असल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

GaneshaSpeaks-Logo1

सांधेदुखीचा त्रास कमी करणारे घरगुती तेल !

$
0
0

पूजाविधींमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा कापूर धर्मशास्त्राप्रमाणेच आरोग्यशास्त्रातदेखील गरजेचा आहे. आयुर्वेदामध्ये कापूर पचन सुधारण्यास फायदेशीर ठरते असे सांगितले आहे. तसेच मधूमेहाचा त्रास कमी करणे, कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास, कामवासना उत्तेजित करण्यास मदत करते. कापूराचे तेल हे गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी वरदान आहे. ( नक्की वाचा – सांधेदुखीचा त्रास कमी करणारे ‘हेल्दी घरगुती पेय’)

कापराचे फायदे -:

कापरामध्ये  अ‍ॅन्टी-अर्थ्राइटिक (anti-arthritic),  अ‍ॅन्टी रूमेटिक (anti-rheumatic) व एंटीफ्लोजिस्टिक (antiphlogistic) गुणधर्म आढळतात. त्वचेवर हे तेल लावल्याने सूज कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तप्रवाह सुधारण्यास मदत झाल्याने सांध्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते. काही दिवस कापराचे तेल दुखणार्‍या सांध्यांवर लावल्यास,  सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. हे अभ्यासातून सामोरी आले आहे. कापूर थंड प्रवृत्तीचे असल्याने जळजळ कमी करण्यास, सांधेदुखी व स्नायूंचे दुखणे कमी करण्यास मदत करते. कापरामुळे पायात आलेला गोळा / क्रॅम्सचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गरोदर स्त्रियांना अंतिम ट्प्प्यांत होणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यात कापूर फायदेशीर ठरते. कापूर लावल्याने नर्व्ह्स मोकळ्या होण्यास मदत होते. ( नक्की वाचा: योगासनांनी कमी करा संधिवाताच्या वेदना)

कसे वापराल कापूर ? 

कापराचे तेल दुखणार्‍या भागावर लावून हलकासा मसाज करा. नियमित हा प्रयोग केल्यास दुखणे कमी होण्यास मदत होते. (अंगदुखीची ही ’10′ कारणं देतात तुम्हांला आजाराचे संकेत !)

कसे  बनवाल कापराचे तेल ?

कापराचा मोठा खडा कपभर गरम तेलात मिसळा.

हळूहळू कापूर वितळ्यास सुरवात होईल.

तयार मिश्रण हवाबंद बाटलीत साठवा.

गरजेनुसार नियमित या तेलाने मसाज करा.

संबंधित दुवे - 

संधिवाताच्या रुग्णांसाठी 9 सुपरफुड्स !!

मोहरीने करा ‘सांधेदुखी’वर मात

एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय

सकाळी हिरवळीवर चालण्याचे ’5′फायदे !

$
0
0

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग करा हा सल्ला तुम्हांलाही ठाऊक असेल.  मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळी केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच आरोग्यदायी ठरतो. मग मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच या ’5′ आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळी चाला.

  • मन शांत करण्यास मदत करते  -

ताजी  हवा, कोवळे उन  आणि शांत वातावरण सारेच सकाळच्या वेळी प्रसन्न असते. ताज्या हवेतील ऑक्सिजन तुमचे स्वास्थ्य सुधारते, सुर्यप्रकाश प्रफुल्लित करते, व्हिटामिन डीचा पुरेसा पुरवठा करते. तर शांत वातावरण तुम्हांला रिलॅक्स व्हायला मदत करते. या सार्‍यामुळे तुमच्यावरील ताणदेखील हलका होण्यास मदत होते. हिरवळीचा हिरवा रंग शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. (सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपाय)

  • शरीर निरोगी होण्यास मदत होते –

पायाच्या तळव्यामध्ये शरीरातील विविध अवयवांचे कार्य निगडीत असते. विशेषतः डोळे, कान, फुफ्फुस,चेहरा, पोट, मेंदू, किडनी यांचे कार्य तळव्याच्या बिंदूंमध्ये असते.  त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांच्या बिंदूंचा व्यायाम होतो. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो.श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडीकल इन्सस्टिट्युट -दिल्ली येथील सिनियर कन्सलटंट  डॉ.अंजली शर्मा,  यांच्या मते, ‘हिरवळीवर चालल्याने नर्व्ह्स मोकळ्या होतात.तसेच शरीरातील अनेक नर्व्हच्या एंडींग़ मोकळ्या झाल्याने शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते.’

आपण चालताना शरीराचा सारा भार आपल्या पायांवर असतो. विशेषतः पहिल्या बोटांवर !डोळ्यांचे आरोग्य सुधारणारे  रिफ्रॅक्सोलॉजी प्रेशर पॉईंटस दुसर्‍या आणि तिसर्‍या बोटामध्ये असते. त्यामुळे हिरवळीवर चालण्याचा सर्वाधिक फायदा डोळ्यांसाठी होतो.

  • इलेक्ट्रिकल एनर्जी  न्युट्रलाईज होते –

डॉ.अंजलीच्या मते, ‘ नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते.’ त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी.  त्यातून येणार्‍या मॅगनेटीक व्हेव्जमध्ये काही उर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पृथ्वी आणि या मॅगनेटीक व्हेव्जच्या एकत्र येण्याने शरीरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. परिणामी यातून उद्भवणारे आजारही रोखण्यास मदत होते.

  • कोवळ्या उन्हाचा आनंद घ्या –  

सकाळी जिममध्ये घाम गाळण्याऐवजी हिरवळीवरून चालल्याने कोवळ्या सुर्यप्रकाशाचा आनंद घेता येतो. डॉ. अंजलीच्या मते, सुर्य  हा उर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे दिवसभर लागणारी उर्जा उत्तेजित करण्यास सकाळी हिरवळीवर चालणे फायदेशीर ठरू शकते. कोवळ्या उन्हामुळे शरीर डिसइन्फेक्ट होण्यास,  स्नायू आणि नर्व्ह्स बळकट होण्यास मदत होते. शरीराला ‘व्हिटामिन डी’ चा पुरवठा होतो.  

सकाळी 6.30  ते 9  आणि सायंकाळी 4.30- 5 ते 6.30 पर्यंत चालणे फायदेशीर ठरू शकते. मात्र दुपारच्या कडक उन्हांत फिरणे टाळा. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. असे डॉ. अंजली सांगतात.

  • व्हिटामिन डी ची कमतरता टाळा  - 

आजकाल ठिसूळ सांध्यांमुळे अनेक विकार वाढतात. याचे प्रमुख कारण सुर्यप्रकाशाचा प्रभाव आहे. त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेत चालल्याने आपोआपच शरीराला आवश्यक  व्हिटामिन डी मिळते. यामुळे हाडाचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते. गर्भवती स्त्रियांसाठी हे व्हिटामिन फारच आवश्यक आहे.

संबंधित दुवे - 

जमिनीवर बसून जेवण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !

बाप्पाच्या पूजेत प्रामुख्याने वापरल्या जाणार्‍या ‘दुर्वां’चे ’9′ आरोग्यदायी फायदे !

केसगळती रोखण्यासाठी दिवसातील ’5 मिनिटं’हा उपाय नक्की करा

$
0
0

फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत  दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का? यामुळे केसगळती रोखते असा काहींचा समज आहे. पण यामध्ये खरचं काही तथ्य आहे का  ?

ऑनलाईन सर्च केले तर काहींना ही पद्धत निव्वळ मूर्खपणा वाटतो. तर काहींना असे नियमित  केल्याने खरचं बदल जाणवला आहे. तर मग पहा या कृतीमागील खरे वैज्ञानिक सत्य !

या कृतीमागील वैज्ञानिक सत्य :

चायनिज अ‍ॅक्युप्रेशरतंत्रानुसार, शरीराचा काही भाग हलकासा दाबल्यास किंवा घासल्यास दुसर्‍या ठिकाणी त्याचा प्रतिसाद दिसतो. बोटांच्या टोकांशी संपणार्‍या नसा टाळूशी जोडलेल्या असतात. त्यामुळे नखं एकमेकांवर घासल्यास तयार होणार्‍या घर्षणातून टाळूजवळील नसांना चालना मिळते. टाळूला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी या कृतीमुळे केसांची वाढही सुधारते. त्यामुळे फावल्या वेळेत किंवा अगदी टीव्ही पाहता  पाहता टाळूला स्पर्शही न करता थेट मसाज देऊ शकता. ( नक्की वाचा : ‘अ‍ॅक्युप्रेशर’ तंत्राने करु आजारांवर मात !)

किती वेळ कराल ही कृती : 

दिवसभर हातांची नख एकमेकांवर घासण्याची गरज नाही. दिवसभरात हा प्रयोग केवळ 5-10 मिनिटे मात्र नियमित करणे पुरेसे आहे.

त्यामुळे केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही किमान एवढा वेळ काढूच शकता. आणि पहा काय बदल होतो… या सोबतच केसगळती रोखणारा ‘वन मिनिट’ फंडा तुम्हांला ठाऊक आहे का ?

 

संबंधित दुवे -

केसगळती रोखणारी ‘५’ हर्बल ऑईल्स !

केसगळती रोखण्यासाठी टाळा या ’7′ चुका !

 केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा

Translated By  -  Dipali  Nevarekar

Source –  Does the nail rubbing exercise really prevent hair loss?


साप्ताहिक राशिभविष्य आरोग्याचे ! ( 29 फेब्रुवारी- 6 मार्च)

$
0
0

मेष -: 

या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून तुम्हांला एखादी समस्या त्रास देत असल्यास त्यावर वेळीच उपचार करा. उच्च रक्तदाबाचा  त्रास असल्यास त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार सुरू करा आणि रक्तदाब आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान सहान समस्यांवर कायमचे उपचार करण्यासाठी काही  अल्टरनेटीव्ह उपचारांची मदत घ्या.

वृषभ -: 

श्वसनाशी निगडीत समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा. सांधेदुखीचा त्रास असणार्‍यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कॅल्शियलयुक्त फळं आणि भाज्या आहारात ठेवल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल. मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित इवनिंग वॉक केल्यास तुमचे स्वास्थ्य सुधारायला मदत होईल.

मिथून -: 

तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती पाहता, या आठवड्यात व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. तशी लक्षणं आढळताच वेळीच त्यावर उपाय करा. रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या आठवड्यात अपघाताची शक्यता आहे.

कर्क -:

तुम्हांला जुनाट किंवा दीर्घकाळ एखाद्या समस्येचा त्रास होत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. सांध्यांचे दुखणे कमी करण्यासाठी त्यावर वेळीच उपचार करा. शारिरीक समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार करा.

सिंह -:

आरोग्याच्या समस्यांवर तात्काळ मात करणे आवश्यक आहे. पित्ताच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा. हा त्रास अंनेक दिवस होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता औषधोपचारांनी त्यावर मात करा.

तूळ -:

या आठवड्यात व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्हांला ताप येण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हांला काही दिवस सक्तीचा आराम करणे गरजेचे आहे. अस्थमा, सांधेदुखी यांचा त्रास असणार्‍यांनी औषाधांच्या वेळांमध्ये टाळाटाळ करणे टाळा.

GaneshaSpeaks-Logo1

वृश्चिक-: 

रक्तदाबाचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. औषाधांच्या वेळा टाळू नका. मधूमेहींना या आठवड्यात चिंतेची गरज नाही. मात्र खाण्याचे पथ्य पाळा. साखरेचे,गोडाचे पदार्थ टाळा. तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल करा.

धनू -:

राशीतील ग्रहमान पाहता, अनेक दिवसांपासून चालणार्‍या समस्यांवर या आठवड्यात रामबाण औषध मिळण्याची शक्यता आहे. मात्र मंदावलेली पचनशक्ती या आठवड्यात चिंतेचे कारण ठरू शकते. त्यावर काही अल्टरानेटीव्ह उपचारांनी मात करण्याचा प्रयत्न करा.

मकर -: 

राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान सहान समस्यांकडेदेखील दुर्लक्ष करणे या आठवड्यात त्रासदायक ठरू शकतो. श्वसनाशी निगडीत समस्यांना असणार्‍यांना या आठवड्यात काळजी घेणे आवश्यक आहे. श्वसनविकारांचा त्रास होत असल्यास तात्काळ उपचार सुरू करा.

कुंभ -: 

अतिश्रमाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ राखून आराम करा. तसेच काही त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. जुन्या व्याधींवर तात्काळ उपचार करा.

मीन -:

हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी राहील. सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. पचनाचा काही त्रासा जाणवल्यास तात्काळ उपचार सुरू करा. अन्यथा काही दिवस तुम्हांला कमकुवतपणा जाणवेल. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा.

 

केंद्रिय अर्थसंकल्प 2016 : स्वस्त दरात आणि जिल्हा स्तरावर उपलब्ध होणार ‘डायलिसीस सेवा’

$
0
0

छायाचित्र सौजन्य -: IANS  Photos

केंद्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून सुरेश प्रभूंनी प्रवाशांचा रेल्वेप्रवास अधिक सुरक्षित आणि आनंदादायी करण्यासाठी 8 विविध योजना मांडल्या  आहेत. रेल्वे अर्थसंकल्पानंतर भारतीयांचे लक्ष बहूप्रतिक्षीत केंद्रीय अर्थसंकल्प 2016 कडे लागले होते. केंद्रिय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यानुसार अर्थमंत्री अरूण जेटली  यांनी यंदाचा अर्थसंकल्पात ‘आरोग्य क्षेत्राशी’ निगडीत केलेल्या या काही महत्त्वाच्या घोषणा -:

#1  एलपीजी गॅस  सिलेंडर प्रत्येक घराला मिळणार –

स्त्रियांचे आरोग्य धोक्यात घालणारे चुलीवर जेवण बनवण्याची पद्धत आता कायमची हद्दपार करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. सिलेंडर गॅस हा केवळ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गासाठी असल्याचा समज होता. आजही ग्रामीण भागात हजारो घरघरात उघड्यावर/ चूलीवर जेवण बनवले जाते. परंतू यामुळे धूर शरीरात गेल्याने त्या स्त्रीप्रमाणेच कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच 17 लाख घरात एलपीजी गॅस सिलेंडर मिळावा म्हणून  2000 करोड रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

#2 आरोग्य विमा योजना - 

आरोग्य विमा योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबीयांचा 1 लाखाचा प्रतिवर्षीचा विमा काढण्यात येणार आहे. तर वयोवृद्ध लोकांसाठी या  रकमेत 40,000 रांची वाढ करण्यात  आली आहे. पीपीपी मॉडेलनुसार नॅशनल हेल्थ स्कीम राबवणार. 

#3 जेनरीक औषध उपलब्ध होणार - 

ग्रामीण भागामध्ये औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत याकरीता जेनरीक औषध केंद्र उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा जाणवू नये तसेच स्वस्त दरात औषधं उपलब्ध व्हावीत याकरिता देशभरात 3000 जेनरिक औषध केंद्र उभारण्यात येणार आहेत.

 #4 स्वस्त दरात आणि जिल्हा स्तरावर डायलेसिस केंद्र उपलब्ध होणार - 

मधूमेह तसेच किडनी विकारांच्या अनेक रुग्णांना नियमित डायलीसिसची गरज असते. ( नक्की वाचा -: किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !) ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात तसेच अत्यावत डायलीसीस यंत्रणा उपबद्ध  नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी सरकारकडून जिल्हास्तरावर डायलिसीस केंद्र उभारण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 2000 डायलेसिस  केंद्र उभारण्यात येणार आहेत.

 

 

त्रिफळा चूर्ण –अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर रामबाण घरगुती उपाय !

$
0
0

           Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

                     आपले केस कायम काळेभोर आणि चमकदार राहावेत असे प्रत्येकालाच वाटते. परंतू ताणताणाव, चिंता आणि वाढत्या वयानुसार केस अकाली पांढरे होतात. मग त्याला लपवण्यासाठी मेहेंदी / हीनाचा पॅक लावला जातो, हेअर कलर केले जातात किंवा अगदी उपटून तोडले जातात. उतरत्या वयात केस पांढरे होणे हे अगदीच नैसर्गिक आहे. परंतू आजकाल तरुणांमध्ये केस अकाली पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मग ही समस्या लहान वाटत असेल तरीही हाताबाहेर जाण्याआधी त्यावर नैसर्गिक उपायांनी मात करा. हिना सोबतच ‘त्रिफळा चूर्ण’देखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कसे ठरते त्रिफळा चूर्ण फायदेशीर ? 

हरड, बेहडा आणि आवळा यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे त्रिफळा. या आयुर्वेदीक मिश्रणाने बद्धकोष्ठता तसेच पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते. परंतू त्यासोबत अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका होते. यामधील व्हिटामिन सीमुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रादूर्भाव कमी होण्यास मदत होते. परिणामी केसांची वाढ सुधारते.

अकाली केस पांढरे होण्यामागे मिनरल्सची कमतरता तसेच हार्मोनल बदलही कारणीभूत ठरतात. त्रिफळा चूर्णामध्ये आयर्न, पोटॅशियम सारखे मिनरल्स आढळतात. यामुळे केसांची वाढ सुधारते तसेच केसगळती रोखण्यास आणि अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णामुळे शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते. तसेच टाळूला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. घरगुती तेलाच्या मिश्रणानेदेखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते. 

कसा कराल हा उपाय ? 

  1. एक टीस्पून त्रिफळा पावडर एक टेबलस्पून खोबरेल किंवा बदामाच्या तेलामध्ये मिसळा. हे मिश्रण एकत्र करून उकळा. 2-3 मिनिटे मिश्रण उकळल्यानंतर ते एकजीव होण्यास मदत होते.
  2.  तीन मिनिटे मिश्रण उकळल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्या.
  3. केसांना आणि त्वचेला सोसवेल इतके तेल कोमट झाल्यानंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.

अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून किमान दोन वेळा करा. या त्रिफळा चूर्णामुळे केसातील कोंडा, टाळूवरील खाज कमी होण्यासही मदत होते.

References

  1. Dweck, A. C. (2002). Natural ingredients for colouring and styling. International journal of cosmetic science, 24(5), 287-302.
  2. Gaud K. Sharangadhara – samhita – Sharangadharacharya virachita (14th Cen. A.D.) Lucknow: Tejjkumar; 1967. p. 419. Chapter 2(9):161,162.

मूठभर द्राक्षाच्या सेवनाने सुधारा हृद्याचे आरोग्य !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

फळांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारी द्राक्षं चविष्ट आणि आरोग्यदायीदेखील असतात. आठवड्यातून किमान तीन दिवस वाटीभर द्राक्षं खाल्ल्यास हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. द्राक्षातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉल्स घटक हृद्यविकार नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आरोग्यदायी द्राक्षं शरीरातील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत करते. द्राक्षांपासून तयार केली जाणारी वाईन पिण्याऐवजी मूळ स्वरूपातील द्राक्षं खाणं अधिक फायदेशीर ठरते. द्राक्षं खाल्ल्याने शरीराला फायबरचादेखील मुबलक पुरवठा होतो. परिणामी पोट आरोग्यदायी राहते.

वाटीभर द्राक्षं कसे सुधारते हृद्याचे कार्य ?

#1 अथेरोस्लेरॉसिस (atherosclerosis) चा त्रास कमी करतो -:

अथेरोस्लेरॉसिस (Atherosclerosis) म्हणजे रक्तवाहिन्या जाड होणे. यामुळे अनेक हृद्यविकार जडण्याची तसेच हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. जर्नल ऑफ सर्क्युलेशनच्या 2001 मधील अहवालानुसार द्राक्षाचा रस प्यायल्यास ( प्रामुख्याने जांभळ्या) प्लेटलेट्सचा दाह वाढतो. तसेच नायट्रिक ऑक्साईडचा प्रवाह सुधारतो. यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते. यामुळे रक्तवाहिन्या जाड होण्यापासून बचावतात.

#2 वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते :

द्राक्षामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल्स घटक हृद्यविकारांना कमी करण्यास मदत करते. तसेच एलडीएल कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाणही कमी होते. द्राक्षांमुळे ऑक्सिडेटीव्ह ताण कमी होण्यास मदत होते. तसेच हृद्याच्या आतील नाजूक त्वचेचेदेखील नुकसान होण्यापासून बचाव होतो.

#3 रक्तदाब कमी करण्यास मदत करतो -:

द्राक्षातील आरोग्यदायी गुणधर्म रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. तसेच रक्तावाहिन्यांना सदृढ आणि स्वास्थ्यकारक बनवण्यास मदत करतात.

Reference 

1. Freedman JE, Parker C 3rd, Li L, Perlman JA, Frei B, Ivanov V, Deak LR,Iafrati MD, Folts JD. Select flavonoids and whole juice from purple grapes inhibit platelet function and enhance nitric oxide release. Circulation. 2001 Jun 12;103(23):2792-8. PubMed PMID: 11401934.

2. Wightman JD, Heuberger RA. Effect of grape and other berries on cardiovascular health. J Sci Food Agric. 2015 Jun;95(8):1584-97. doi: 10.1002/jsfa.6890. Epub 2014 Oct 6. Review. PubMed PMID: 25171728.

3. Dohadwala MM, Vita JA. Grapes and cardiovascular disease. J Nutr. 2009 Sep;139(9):1788S-93S. doi: 10.3945/jn.109.107474. Epub 2009 Jul 22. Review.PubMed PMID: 19625699; PubMed Central PMCID: PMC2728695.

कफाचा त्रास दूर करेल खडीसारखेचे तुकडे !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे. खडीसाखरेमुळे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास, ताण तणाव हलका करण्यास मदत होते. तसेच घशातील खवखव, खोकला दूर करण्यास मदत होते. कफाचा खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर मदत करते.( नक्की वाचा : खोकल्याच्या प्रकारानुसार करा योग्य औषधाची निवड !)

  • कफाचा त्रास कमी करण्यासाठी कशी वापराल खडीसाखर
  • काळामिरी आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र वाटावी. या मिश्रणाची बारीक पूड तयार करा.
  • चहामध्ये हे मिश्रण एकत्र करून दिवसातून पिणे हितावह आहे. यामुळे  तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच कफाचा त्रास नियंत्रणात राहतो. काळामिरी आणि मधाचे मिश्रणदेखील दूर ठेवेल कफाचा त्रास !

खडी साखर ही कच्चा स्वरूपातील साखर आहे. त्यामुळे नेहमीच्या वापरातील साखरेपेक्षा खडीसाखर खाणे अधिक फायदेशीर ठरते. दक्षिण भारतात उन्हाळ्यात रिफ्रेशिंग पेय बनवण्यासाठी खडीसाखरेचा वापर केला जात असे. ग्लासभर पाण्यात खडीसाखरेची पूड मिसळली जाते. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. तसेच ताणदेखील हलका होतो. ग्लुकोजमधून मिळणारी उर्जा इंद्रियांना शांत करते.

पण साखरेतून मिळणार्‍या कॅलरीबाबत काय ?

खडी साखरेत किती असतात कॅलरीज

नेहमीच्या वापरातल्या साखरेपेक्षा पत्री साखरेत कॅलरीज कमी असतात. ‘हेल्दी फाय  मी’ नुसार एक टीस्पून नेहमीच्या वापरातील साखरेतून 12 कॅलरीज मिळतात. तर एक टीस्पून खडीसाखरेतून 10 कॅलरीज मिळतात. नेहमीच्या वापरातील साखरेच्या तुलनेत खडीसाखरेतून मिळणारी कॅलरी सारखीच वाटत असली तरीही खडीसाखर चवीला उग्र असते. त्यामुळे थोड्या प्रमाणात त्याचा वापर केला तरीही तुमचे समाधान होऊ शकते.

कोणताही पदार्थ प्रमाणात खाणे हितकारी आहे. त्यामुळे अतिप्रमाणात साखर खाऊ नका. स्त्रियांनी साखर प्रतिदिन 100 कॅलरीज आहारात घ्यावी  तर पुरूषांच्या आहारात 150 कॅलरीज पुरेशा आहेत.

मधूमेही आणि खडीसाखर

मधूमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी इतर स्विटनिंग एजंट वापरणे चूकीचे आहे. असे श्रेया डायबेटिक सेंटरचे डॉ.प्रदीप गाडगे सांगतात. कारण गूळ, साखर आणि खडीसाखर हे तिन्ही पदार्थ उसापासूनच बनतात.पण मधूमेहींनी सुकामेवा खाणे योग्य आहे का ? पोषणद्रव्यांच्या तुलनेत साखरेपेक्षा खडीसाखर अधिक चांगली असली तरीही साखरेचे प्रमाण समानच आहे. म्हणूनच मधूमेहींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. 

Viewing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>