घोरणे म्हणजे झोपेमध्ये श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारा एक कंपनयुक्त आवाज.घोरण्यासाठी नाकपुडीच्या आतील भागातील टीश्यू,टाळू,जीभ,पडजीभ आणि टॉन्सिल्स या गोष्टी कारणीभूत असतात.जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा नाक अथवा तोंडावाटे हवा आत घेतली जाते व पुढे ती घशाच्या आतून फुफ्फुसांपर्यंत पोहचते.त्यानंतर जेव्हा तुम्ही उश्वास बाहेर टाकता तेव्हा फुफ्फुसांमधून हवा पुन्हा घशामध्ये येते व नाक अथवा तोंडाद्वारे शरीराबाहेर टाकली जाते.ज्या माणसांना रात्री झोपेत घोरण्याची समस्या असते त्यांचा श्वसनमार्ग अरुंद झालेला असतो.कारण त्यांच्या श्वसनमार्गातील स्नायू शिथिल होतात त्यामुळे हवा आतबाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो व श्वसनक्रिया थांबते.श्वसनक्रिया थांबण्याचा कालावधी साधारपणे काही सेकंद ते काही मिनीटांचा असू शकतो.
या कालवधीमध्ये मेंदू जागृत होतो व श्वसन पुन्हा सुरु होते.पण या काळानंतर देखील श्वसनमार्ग अरुंदच राहतो.त्यामुळे श्वसनमार्गातील टीश्यूमध्ये कंपने निर्माण होतात ज्यामुळे घोरण्याच्या आवाजाची निर्मिती होते.श्वसनक्रिया काही सेंकदापेक्षा अधिक काळ थांबणे हे धोकादायक असू शकते कारण त्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडची पातळी वाढते.या स्थितीला हायपोक्सिया असे म्हणतात.घोरण्याचा तुमच्या प्रमाणेच तुमच्या न घोरण्या-या जोडीदाराच्या आयुष्यावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.ब-याचदा घोरणे हे एखाद्या आजारबाबत धोक्याची सूचना देणारे एक लक्षण असू शकते.यासाठी घोरण्याच्या समस्येतून मिळवा ‘विनाशस्त्रक्रिया’ सुटका !
Obstructive sleep apnoea (OSA)-
ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अॅप्निया या झोपेच्या विकारामध्ये घोरणे हे लक्षण प्रामुख्याने आढळते.या विकारामुळे दिवसा प्रंचड झोप येते.ज्यामुळे दिवसा गाडी चालवताना भयंकर अपघात होण्याची अथवा कामात चुका होण्याची शक्यता असते.तसेच या विकारामुळे ह्रदयविकार आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.झोपेमध्ये वारंवार श्वसनमार्गात अडथळा आल्यामुळे स्लीप अॅप्निया हा विकार निर्माण होतो.हा अडथळा कधीकधी तात्पुरता अथवा कधीकधी कायम असू शकतो.शास्त्रज्ञांच्या मते स्टेडी घोरणे नियंत्रणात आणता येते पण नियमित घोरण्याचा धोका तेव्हाच कमी असू शकतो जेव्हा तुमचे घोरण्याचे प्रमाण १५ टक्कांपेक्षा कमी असेल.तुम्ही घरीच तुमच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन ही घोरण्याची टक्केवारी काढू शकता.तसेच रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !
Metabolic Syndrome-
घोरणे हे नेहमीच ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अॅप्नियामुळे असू शकते असे नाही.कारण घोरणे हे मेटाबॉलिक सिन्ड्रोम या गंभीर आरोग्य समस्येचे देखील लक्षण असू शकते.जसे की रक्तदाब वाढणे,हाय ब्लड शूगर, कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य असणे,पोटावर अति चरबी असणे या समस्यांमुळे देखील तुम्हाला मधुमेह,स्ट्रोक व ह्रदयविकार होण्याचा धोका असतो.
खालील पैकी तीन अथवा अधिक लक्षणे असल्यास तुम्हाला मेटाबॉलिक सिन्ड्रोम असू शकतो.
-
triglycerides ≥१५० mg/dl (१.७ mmol/liter)
-
हाय-डेस्टिनी लिपोप्रोटीन high-density lipoprotein (HDL) कोलेस्टेरॉल < ४० mg/dl (१.० mmol/l) पुरुषांसाठी व < ५० mg/dl (१.३ mmol/l) स्त्रीयांसाठी
-
रक्तदाब ≥१३०/८५ mm Hg
-
फास्टींग ग्लूकोज ≥१०० mg/dl
-
कंबरेचा घेर ≥९० cm (पुरुष) अथवा ≥८० cm (महिला)
संशोधकांना घोरण्याचा संबध हा मेटाबॉलिक सिन्ड्रोमसोबत विशेषत: मधुमेहाच्या धोक्यासह अधिक असल्याचे आढळले आहे.
उदा.चेन्नईमधील एका संशोधनात ६५ टक्के घोरणा-या लोकांमध्ये IDRS scores (मधुमेहाचा धोका मोजमाप) साठ पेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे तर न घोरण्या-या लोकांमध्ये हे प्रमाण ४६ टक्के आढळले.न घोरणा-या लोकांपेक्षा घोरणा-या लोकांमध्ये अगदी पोटाकडील भागावर लठ्ठपणा नसला तरी देखील मेटाबॉलिक सिन्ड्रोम होण्याची शक्यता अधिक असते.
त्याचप्रमाणे आणखी एका संशोधनामध्ये असे आढळले आहे की ३० ते ६९ वयातील घोरणा-या पुरुषांमध्ये दहा वर्षात मधुमेह होण्याची शक्यता वाढू शकते.संशोधकाच्या मते लठ्ठपणा हा मधुमेहाचा धोका विकसित करणारा महत्वाचा घटक आहे.जर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर यात अधिकच भर पडते.
मधूमेह-
मधूमेह व घोरण्याचा फार जवळचा संबध असतो.शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की महिलांमध्ये मधुमेहासह घोरणे जास्त प्रमाणात असते.त्याचप्रमाणे प्री-मॅनोपॉजच्या काळातील महिलांमध्ये यासह पीसीओएस(पॉलिस्टीक ओव्हरी सिन्ड्रोम)ची समस्या देखील आढळते.असे असले तरी घोरण्याचा मधुमेहाशी नेमका कसा संबध असू शकतो याचे कारण संशोधकांना अद्याप खात्रीदायक रित्या सापडलेले नाही.त्यांच्यामते हायपोक्सियामुळे(ऑक्सिजनची पातळी खालावते)श्वसनक्रिया काही सेकंदासाठी थांबल्यामुळे ऑक्सिडेटीव्ह तणाव निर्माण होतो ज्यामुळे इन्सुलीनला प्रतिकार निर्माण होतो.यासाठी मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय जरुर करा.
Dyslipidemia,ह्रदयविकार,उच्च रक्तदाब-
Dyslipidemia हा विकार प्रामुख्याने हाय कोलेस्टेरॉलची पातळी दर्शवतो.याबाबत योग्य उपचार त्वरीत न केल्यास Atherosclerosis(रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे) cirrhosis (बरा न होण्यासारखा यकृत विकार) तसेच कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसिज निर्माण होतात.अनेक संशोधनात असे आढळले आहे की घोरण्याचा व Dyslipidemia या विकाराचा घनिष्ट संबध असतो.तसेच बीएमआय २५ पेक्षा अधिक,मधुमेह व उच्चरक्तदाब या समस्यांची देखील घोरण्यासह Dyslipidemia विकार असण्यामागे महत्वाची भुमिका असते.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉर्गं इन्टेन्सिव्ह स्नोरींग पेक्षा लो इन्टेन्सिव्ह स्नोरींग चा Dyslipidemia विकाराशी अधिक संबध असतो.ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस मुळे ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अॅप्निया,मेटाबॉलिक सिन्ड्रोम अथवा इन्फ्लैमशन या समस्या निर्माण होतात.
त्याचप्रमाणे रक्तदाब वाढणे व घोरणे यांचा देखील याचाशी संबध असतो.हायपरटेंशच्या प्रभावामुळे घोरण्याच्या प्रमाणात देखील वाढ होते.घोरणे,वय,बीएमआय,मद्यपानाचे प्रमाण हे हायपरटेंशनचा धोका वाढवणारे घटक असतात.हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात हे देखील जरुर वाचा.
Carotid artery atherosclerosis-
वर उल्लेख केलेल्या विकारांचा एक किंवा अनेक माध्यमातून घोरण्याशी संबध येत असतो.पण Carotid artery atherosclerosis ही अशी आरोग्य समस्या आहे जी घोरण्यामुळे होते. Carotid arteries या डोके व चेहरा यांना रक्तातून ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या असतात.जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये फॅट,कोलेस्टेरॉल,कॅलशियम आणि इतर घटकांमुळे अडथळा निर्माण होतो तेव्हा त्या टणक होतात.ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा रक्तपुरवठा करण्यास त्यांना मर्यादा येतात.कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये अडथळा आल्यास त्यामुळे हार्टअटॅक व स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.आता तर Laryngoscope या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानूसार Carotid arteries व Pharyngeal wall हे एकमेकांच्या अगदी जवळ अाहेत असे सिद्ध झाले आहे.त्यामुळे जोरात घोरण्याच्या आवाजामुळे Carotid arteries मध्ये कंपने निर्माण होऊ शकतात.ज्यामुळे Carotid arteries च्या आतील थराची जाडी बदलून जखम अथवा दाह झाल्यामुळे Atherosclerosis ही समस्या होऊ शकते.
या रक्तवाहिनीचा आतील भाग हा इन्डोथिलील पेशींच्या अस्तराचा असतो.ज्या पेशींमुळे रक्त व टीश्यू मध्ये द्रव,पोषकमुल्ये,गॅसेस व टाकाऊ पदार्थ झिरपणे यावर नियंत्रित करता येते.त्याचप्रमाणे या इन्डोथिलील पेशींमुळे कोणताही अडथळा नसल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.पण जेव्हा या भागात अडथळा निर्माण होतो तेव्हा इन्डोथिलील पेशी दाह नियंत्रणात आणण्यासाठी cytokine निर्माण करतात.तसेच या पेशींचा आकार देखील ही कंपने निर्माण झाल्यामुळे बदलतो.रासायनिक प्रक्रिया सतत झाल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीवर लिपिड जमा होते ज्याला Intima असे म्हणतात.ज्यामुळेAtherosclerosis ही समस्या होऊ शकते.
Henry Ford च्या Otolaryngology-Head & Neck Surgery विभागाचे डॉ.रॉबर्ट डीब यांच्या मते झोपताना घोरण्याची समस्या ही त्रासदायक असल्याने तिच्याकडे दुर्लक्ष करु नका.तसेच या सोबत इतर वैद्यकीय समस्या असल्यास त्यावर लगेच योग्य उपचार करा.तसेच जाणून घ्या लहान मुलांमधील घोरण्याच्या समस्येमागे दडलीत ही ’8′ कारणं
संदर्भ-
-
Alakuijala A, Salmi T. Predicting Obstructive Sleep Apnea with Periodic Snoring Sound Recorded at Home. Journal of Clinical Sleep Medicine : JCSM : Official Publication of the American Academy of Sleep Medicine. 2016;12(7):953-958. doi:10.5664/jcsm.5922.
-
Roopa M, Deepa M, Indulekha K, Mohan V. Prevalence of Sleep Abnormalities and Their Association with Metabolic Syndrome among Asian Indians: Chennai Urban Rural Epidemiology Study (CURES – 67). Journal of Diabetes Science and Technology. 2010;4(6):1524-1531.
-
Elmasry, A., Janson, C., Lindberg, E., Gislason, T., Tageldin, M. A. and Boman, G. The role of habitual snoring and obesity in the development of diabetes: a 10-year follow-up study in a male population. Journal of Internal Medicine. 2000. 248: 13–20. doi:10.1046/j.1365-2796.2000.00683.x.
-
Xiong X, Zhong A, Xu H, Wang C. Association between Self-Reported Habitual Snoring and Diabetes Mellitus: A Systemic Review and Meta-Analysis. Journal of Diabetes Research. 2016;2016:1958981. doi:10.1155/2016/1958981.
-
Zhang N, Chen Y, Chen S, et al. Self-Reported Snoring Is Associated with Dyslipidemia, High Total Cholesterol, and High Low-Density Lipoprotein Cholesterol in Obesity: A Cross-Sectional Study from a Rural Area of China. Clifton P, ed. International Journal of Environmental Research and Public Health. 2017;14(1):86. doi:10.3390/ijerph14010086.
-
Liu Jianhong, Liang Dahua, Wei Cai Zhou, et al. Analysis of blood pressure in snoring population in Guangxi [J]. Chinese Journal of Tuberculosis and Respiratory Diseases. 2007,30 (5): 347-351.
-
Nordqvist, Christian. Snoring Can Affect The Carotid Artery. Medical News Today. MediLexicon, Intl., 27 Jan. 2013. Web.
-
Deeb, R., Judge, P., Peterson, E., Lin, J. C. and Yaremchuk, K. Snoring and carotid artery intima-media thickness. The Laryngoscope. 2014; 124: 1486–1491. doi: 10.1002/lary.24527.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock