Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

उलटी करून मोकळं होण्यासाठी ’4′सुरक्षित पर्याय !

$
0
0

साधारणपणे शरीरात काही बिघाड झाल्यावर उलटी होते. खराब अन्नामुळे झालेली रिअ‍ॅक्शन किंवा काहीतरी विषारी घटक पोटात गेल्यास अथवा कॅन्सर ची वाढ होत असल्यास उलटी होणं हे एक लक्षण प्रकर्षाने आढळते. काही वेळेस हँगओव्हर किंवा अ‍ॅसिडिटीमुळेदेखील उलटी होते. उलटी केल्यानंतर बऱ्याचजणांना फार रिलॅक्स वाटते. परंतू, जबरदस्तीने उलटी केल्यास घशाला त्रास होऊ शकतो किंवा घशातून रक्त येऊ शकते. जर मायग्रेन किंवा हँगओव्हर बरं करण्यासाठी तुम्हाला उलटी करायची असल्यास या ट्रिक्स ट्राय करा. त्यामुळे उलटी होण्यास मदत होईल. उलटी व मळमळच्या त्रास वाढण्यामागील १२ कारणंं

भरपूर पाणी प्या: भरपूर पाणी प्यायल्याने उलटी करणे काहीसे सोपे होते. पुरेशा पाण्यामुळे पोटात, अन्ननलिकेत आणि घशात अडकलेले घटक बाहेर पडण्यास व ते भाग स्वच्छ होण्यास मदत होते. पाण्यामुळे पोटात असलेले घटक सौम्य होऊन बाहेर पडतात. परंतू पाणी प्यायल्यावर लगेचच ते बाहेर काढू नका. १० मिनिटे थांबून मग उलटी काढणे योग्य ठरेल.

tongue cleaner वापरा: दिवसातून ३-४ वेळा पूर्ण जीभ tongue cleaner स्वच्छ करा. त्यामुळे उलटी बाहेर येण्यास नक्कीच मदत होईल. जीभेवरून ओळखा शरीरातील या समस्यांचे संकेत !

बोटांचा वापर करा: उलटी बाहेर काढण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. मग हाताची दोन बोटं जिभेच्या मागच्या बाजूला लावा. त्यासाठी पहिल्या दोन बोटांचा म्हणजे तर्जनी आणि मधले बोट याचा वापर करा. काही वेळातच उलटी होईल.

उलटी करत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा: कोणालाही उलटी करताना पाहून तुम्हाला ही उलटी आल्यासारखे वाटते. बरोबर ना? मग उलटी करण्यासाठी कोणीतरी उलटी करत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा. त्यामुळे उलटी लवकर होण्यास मदत होईल. अशा वेळी व्हिडीओ बघण्याने देखील फायदा होतो.

कोमट पाण्याने गुळण्या करा: मळमळ दूर करण्याचा अजून एक उपाय म्हणजे कोमट पाण्याने गुळण्या करणे. १० सेकंद असे केल्याने आतील पदार्थ उलटीच्या स्वरूपात बाहेर येतील.

गोल गोल फिरा: लहानपणी गोल गोल फिरल्यावर गरगरायचं. मळमळ जाणवून उलटी येईल असं वाटायचं. आठवतंय? जर कशानेच फायदा झाला नाही तर हा पर्याय उपलब्ध आहे. चक्कर येईल असे वाटेपर्यंत गोलगोल फिरा. पण असे करताना स्वतःला इजा होणार नाही याची खबरदारी घ्या.

जुन्या आठवणी आठवा: पूर्वी एखादी अशी गोष्ट असेल ज्यामुळे तुम्हाला उलटी सारखे होत असेल. उदा. लहानपणी एखाद्या औषधाचा वास तुम्हाला आवडत नसेल तर तो आठवा.

उलटी केल्याशिवाय बरं वाटणार नाही, अशा परिस्थितीच उलटी करा. कारण सतत असे केल्याने घसा व अन्ननलिकेला त्रास होऊ शकतो. तसंच त्यामुळे दात देखील खराब होतील.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


लहान मुलांना खोटं बोलण्याच्या सवयीपासून कसं परावृत्त कराल ?

$
0
0

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं आपण म्हणतो. ती खरंच फार गोड, निरागस असतात. पण एका ठराविक वयानंतर त्यांच्यात होणारे बदल वेळीच लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे ३-५ या वयोगटात ती नकळत अगदी लहान सहान खोटं बोलू लागतात. त्यामुळे कोणाला त्रास होईल असे नाही. पण मी नाही ते खेळणं तोडलं, मी नाही केक खाल्ला किंवा मी नाही शूज घालून आत आले/आलो. यासारख्या साध्या साध्या गोष्टीत ते खोटं बोलतात. सुरवातीला आपल्याला त्याची गंमत वाटते. पण नंतर हेच खोटे बोलणे गंभीर होऊ लागते. ३-५ वर्षांची मुले त्यांना काही हवं असेल तरच खोटं बोलतात किंवा तुम्ही ओरडू, रागावू नये म्हणून ते अशी शक्कल लढवतात. तुम्ही त्यांचे खोटे बोलणे पकडल्यावर पालकत्वाच्या नात्याने त्यांना समजवता. प्रामाणिक राहण्याचा सल्ला देता. पण त्याचा क्वचितच परिणाम होतो. जरूर पहा: व्हिडियो: लहान मुलांच्या मनात नेमकं दडलयं काय ?

वेळीच आवर न घातल्यास त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते. आणि मग त्यांचे खोटे बोलणे फार निरागस नसते. म्हणजे होमवर्क केला असे खोटे सांगणे, शाळेतल्या गोष्टी घरी न सांगणे किंवा लोकांबद्दल खोटे बोलणे. जर तुमचं मूल खोटं बोलत असेल तर वेळीच सावध व्हा. खोटं बोलण्याची सवय होण्याआधी त्यांच्या वर्तवणुकीत बदल करा. चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. शुची दळवी यांनी मुलं खोटं बोलायला लागल्यावर काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.

  • स्वतःची वर्तवणूक तपासून बघा: बरेचदा दैनंदिन जीवनात आपल्या नकळत आपण खोटे बोलतो. आपली मुलं आपले निरीक्षण करत असतात. त्यातूनच ती शिकत असतात. याचे आपल्याला भान नसते. ट्राफिक सिग्नल तोडणे, गॉसिपिंग करणे, मी घरी नाहीये असं मुलांना सांगायला लावणे अशा प्रकारचे खोटे आपण बोलत असतो. कोणालाही फारसा त्रास न देणारे हे खोटं आहे, असं म्हणत स्वतःची समजूत घालतो. परंतु मुलांना त्याविरुद्ध शिकवत असतो. लहान मुलांसमोर या ’5′ गोष्टी करणे टाळाच !
  • तुमच्या प्रतिक्रीयांवर लक्ष ठेवा: तुम्ही रागावू नये म्हणून बरेचदा तुमचे मुल खोटं बोलतं. मुलाला खोटे बोलणे चुकीचे आहे किंवा ते का बोलू नये याची समज नसते. जर त्याचा एखाद्या चुकीवर तुम्ही खूप जोरात ओरडलात किंवा रागावलात तर पुढच्या वेळी मुलाकडून एखादी चूक झाल्यास ते नक्कीच खोट बोलेल. या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !
  • स्पष्ट पण सौम्य शब्दात बोला:  मुलांकडून चूक झाल्यावर त्यांना ओरडू, रागावू नये तर काय करावे? त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यावी? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. यासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे स्पष्ट पण सौम्य शब्दात बोला. तुम्हाला मुलाला काय शिकवायचे आहे त्याबाबत स्पष्ट रहा आणि त्या शिकवणुकीत सातत्य पाळा. पण ते शिकवताना सौम्य शब्दांत बोला. त्यांना जवळ घेऊन समजवा की काय योग्य आहे काय अयोग्य. शिस्तीचे महत्त्व पटवून द्या. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा

मुलाला खोटं बोलण्याची सवय लागण्याआधी ती वेळीच बदलणे योग्य ठरेल. मुलाशी तुमचे नाते हेल्दी असल्यास तुमचे म्हणणे मुलाला पटवून देणे सोपे होईल. मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Birth control pills घेणं बंद करताना ही काळजी नक्की घ्या

$
0
0

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकजणी बर्थ कंट्रोलचा पिल्सची मदत घेतात. पण जेव्हा एखादी स्त्री बर्थ कंट्रोलच्या गोळ्या घेणं थांबवण्याचा निर्णय घेतात अशा वेळी काही स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरुंधती धर यांनी दिलेला खास टीप्स तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील. पण गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Step 1: डॉक्टरांचा सल्ला घ्या

बर्थ कंट्रोल पिल्स / गर्भनिरोधक गोळ्यांचा दुष्परिणामही होतो अशी भीती अनेकींच्या मनात असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची निवड करा. गोळ्या घेत असतानाही तुमच्या मासिकपाळीचे चक्र सुरळीत असेल तर गोळ्या बंद केल्यानंतर त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही. पण मासिकपाळीचे चक्र अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.  ही ’6′ लक्षणंं देतात तुमची मासिकपाळी अगदी आरोग्यदायी असल्याचे संकेत !

Step 2: तयार रहा  

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही गोळ्या घेत असाल तर मासिकपाळीच्या चक्रावरही लक्ष द्या. मात्र स्क्रीन केअरचे औषध म्हणून तुम्ही या गोळ्या घेत असाल त्वचेची काळजीदेखील योग्यरित्या घ्या.  नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!

Step 3: गोळ्या घेणं थांबवा  

तुम्हांला दिलेल्या गोळ्यांचा पॅक पूर्ण झाल्यानंतरच गोळ्या घेणं थांबवा. मध्येच गोळ्या थांबवू नका. परिणामी तुमच्या मासिकपाळीचे चक्र बिघडू शकते. अनावश्यक रक्तप्रवाह होऊ शकतो.

Step 4: वेळ द्या  

गोळ्या बंद केल्यानंतर मूड स्विंग्स, अनियमित मासिकपाळी अअणि वेदनादायी क्रॅम्प्स तसेच अ‍ॅक्नेचा त्रासही वाढतो. गोळ्या बंद झाल्यानंतर हा त्रास होऊ शकतो. पण महिन्या – दोन महिन्यात हा त्रास हळूहळू कमी होतो. पण गोळ्या घेतल्यानंतर मळमळणे, ब्रेस्ट टेन्डरनेस / स्तनांमध्ये जाडसरपणा किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्यास गोळ्या बंद केल्यानंतर आरामदायी वाटेल.
Step 5: हेल्थ प्रॅक्टिशनरची मदत घ्या  

गोळ्या घेणं बंद केल्यानंतर तीन महिने थांबा आणि तुमची मासिकपाळी नियमित होते का ? हे पहा. मात्र यानंतरही मासिकपाळीमध्ये अनियमितता असेल किंवा पाळी खूप लवकर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्या.अनियमित मासिकपाळीच्या त्रासामागे दडली आहेत ही ’4′ कारणं

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

व्यस्त कामाचे स्वरूप असणार्‍या नोकदारांनी स्वतःचे वजन कसे सांभाळावे ?

$
0
0

8-10  तास काम करणं,त्याचा ताण,दिवसभर घेतलेला चुकीचा आहार यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच अडथळा येतो.जर तुम्ही दिवसाचे १० तास काम करत असाल तर तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ काढणे कठीण जाते.पण जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला व्यायामासाठी ठराविक वेळ काढणे,घरचे पौष्टिक जेवण जेवणे व पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक अाहे. जिरं आणि केळं- वजन कमी करण्याचा घरगुती उपाय !

व्यस्त जीवनशैलीत वजन कमी करण्यासाठी या टीप्स जरुर आजमावून पहा  -  

स्वत:कडे पुरेसे लक्ष द्या-

प्रथम स्वत:कडे एक महत्वाची व्यक्ती या दृष्टीने पहा.जर तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य दिलेत तर तुम्हाला शांत झोप व व्यायामासाठी पुरेसा वेळ काढणे सहज शक्य आहे.यासाठी ज्या गोष्टींकडे आता त्वरीत लक्ष देणे गरजेचे नाही अशा गोष्टी सध्या बाजूला ठेवा व जीम अथवा धावण्यासाठी थोडासा वेळ काढा. नक्की वाचा ‘बिझी’ यंगब्रिगेडसाठी खास वजन घटवण्याच्या टीप्स !!

दोन्हीवेळचा स्वयंपाक एकत्रच करुन ठेवा-

दिवसभर काम केल्यावर थकून घरी जाऊन स्वयंपाक करणे कंटाळवाणे होते.यामुळेच अनेक जण इन्संट फूड अथवा बाहेरुन जेवण मागवणे हे पर्याय निवडतात.यावर सोपा उपाय म्हणजे दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदाच करुन ठेवा.कारण घरी जेवण तयार असेल तर सहाजिकच बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय कमी होईल.वजन घटवा या 5 पिवळ्या पदार्थांनी !

स्वत:वर नियंत्रण ठेवा-

तुम्ही तुमच्या कामाची वेळ कमी करु शकत नाही पण घरातून जेवणाचा व स्नॅक्सचा डबा नेणे तुमच्या हातात नक्कीच आहे.त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ देखील जरुर काढू शकता.यासाठी प्रथम तुमच्या गरजाचे व्यवस्थित नियोजन करा.घरी आल्यावर टिव्ही अथवा मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आराम करा ज्यामुळे तुम्हाला ७ ते ८ तासांची शांत झोप मिळेल.वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना

बाहेर खाताना पोषक आहारच घ्या-

कामानिमित्त बाहेर केले जाणारे लंच,डिनर,बर्थडे ट्रीट हा तुमच्या कामाचाच एक भाग असतो.प्रत्येक वेळी अशा गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकत नाहीत.मात्र असे असले तरी अशा वेळी पौष्टिक पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा.

वजन कमी करण्यासाठी कमी वेळात पूर्ण करता येतील असे छोटी ध्येय निश्चित करा-

लॉर्ग टर्म गोल्स पूर्ण करणे कदाचित तुम्हाला कठीण जाऊ शकते.यासाठी शॉर्ट टर्म गोल्स सेट करा.तुम्ही पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्ही किती वजन कमी करु शकता याचा विचार करा.जर तुम्हाला ३ किलो वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी महिनाभर योगाक्लास किंवा जीममध्ये नित्यनेमाने जा.असे करता करता तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याचे मोठे ध्येय नक्कीच गाठता येईल. 

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

अॅन्टासिडचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ?

$
0
0

बरेच लोक अॅसिडीटी झाल्यास कोणताही विचार न करता अॅन्टासिड घेतात.अॅसिडीटीवर कधीतरी एखादी गोळी घेणे ठीक आहे पण सतत असे अॅन्टासिड घेत राहील्यास याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

मुंबईच्या होलिस्टिक न्यूट्रीशनिस्ट अॅन्‍ड इंटरग्रेटीव्ह अॅन्ड लाईफस्टाईल मेडिसिन एक्सपर्ट Luke Coutinho यांनी फेसबूक लाईव्हवरुन दिलेल्या त्यांच्या सल्लानूसार जाणून घेऊयात अॅन्टासिड तुमच्या शरीरावर काय परिणाम करते व तुम्ही अॅन्टासिड घेतल्यावर शरीरात नेमके काय घडते.

अॅन्टासिड कसे कार्य करते?

पोटातील पीएच मुळे पोट नैसर्गिक रित्या अॅसिडीक असते.तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे या पीएचमुळे कार्बोहायड्रेट,प्रोटीन व फॅट्समध्ये विभाजन होते.त्यांनतर अन्नाचे पचन होण्यासाठी ते अन्न स्वादुपिंडातून आतड्यांकडे ढकलले जाते.ज्या प्रोसेसमध्ये पीएच थोड्याप्रमाणात अल्कधर्मी होते.या स्थितीत अन्नातील पोषक घटक रक्तातून शरीरातील पेशींमध्ये शोषले जातात.

पण जर तुम्ही अॅन्टासिड घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या पोटातील आम्लावर व पर्यायाने तुमच्या पचनक्रियेवर होतो.जर पोटात योग्य प्रमाणात आम्ल निर्माण झाले नाही तर तुम्हाला पचन क्रियेत अडचणी येतात.त्यामुळे तुमचे पचन व्यवस्थित होत नाही व मोठे अन्नकण आतड्यांमध्ये गेल्यांमुळे आतड्याला दुखापत होते.यामुळे तुम्हाला आतड्यांमधून रक्तस्त्राव होणे अथवा आयबीएस अथवा ऑटोइम्युन डिसिस होऊ शकतात. जाणून घ्या अ‍ॅन्टासिड वरचेवर घेणे योग्य आहे का ?

जर तुम्ही अति प्रमाणात अॅन्टासिड घेतले तर काय होते ? 

तुम्हाला सतत अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास तुम्हाला अॅन्टासिड घेण्याची सवय लागते.मग अधिक बरे वाटण्यासाठी दुस-या वेळी तुम्ही एक तर जास्त प्रमाणात अॅन्टासिड घेता अथवा त्या अॅन्टासिडचा डोस अधिक तीव्र करता.अॅन्टासिडमध्ये अॅल्युमिनीयमचे घटक असतात.त्यामुळे सतत अॅन्टासिड घेतल्याने तुमच्या शरीरात अॅल्युमिनीयमचे प्रमाण वाढू लागते.असे अति प्रमाणात शरीरात अॅल्युमिनीयम साठल्याने तुम्हाला किडनीची समस्या,ओस्टिओपोरोसिस,अल्झामर हे विकार होऊ शकतात.अॅन्टासिडमध्ये मॅग्नेशियमचे घटक देखील असतात.याचा देखील तुमच्या किडनीवर दुष्परिणाम होतो.तसेच यामुळे तुम्हाला डायरियाचा देखील त्रास होऊ शकतो.सहाजिकच अॅन्टासिड घेतल्यामुळे तुम्हाला डायरिया किंवा बद्धकोष्ठतेवर देखील औषधे घ्यावी लागतात.त्यामुळे तुमचे औषध घेण्याचे प्रमाण वाढू लागते.अ‍ॅन्टासिड वरचेवर घेणे योग्य आहे का ?

अॅन्टासिड मुळे शरीराला लोह शोषण्यास अडथळा येतो.त्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन व फेरीटीन कमी होते.यामुळे तुम्हाला अधिक आयर्न सप्लीमेंट घ्यावी लागतात.आर्यन सप्लीमेंटच्या अतिसेवनाचा तुमच्या यकृताच्या कार्यावर दुष्परिणाम होतो.तुमच्या शरीरात फॅट्स वाढल्यामुळे तुम्हाला वजन कमी करणे कठीण जाते.सतत अॅन्टासिड घेतल्यामुळे तुमच्या यकृताला सूज देखील येऊ शकते.

या समस्येवर काय उपाय कराल?

या समस्येवर एकमेव उपाय हाच आहे की अॅन्टासिड घेणे त्वरीत बंद करा व योग्य आहार घेण्यास सुरुवात करा.त्याचप्रमाणे तुमच्या जीवनशैलीत काही विशेष बदल करुन देखील ही समस्या तुम्हाला सहज टाळता येऊ शकते.यासाठी प्रथम तुमचे पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न चाऊन खा,उपाशी पोटी,जेवणाआधी अथवा जेवणानंतर लगेच फळे खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.ताणात असताना खाऊ नका कारण तेव्हा शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढल्याने तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.दिवसभरात भरपूर पाणी प्या मात्र जेवताना पाणी कमी प्रमाणात पाणी प्या. अ‍ॅन्टासिडऐवजी ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी  !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

मधूमेह कॅन्सरचा धोकाही वाढवतो का ?

$
0
0

मधूमेह जडला की त्यातून अनेक गुंतागुंतीचे त्रास वाढतात. मधूमेह नियंत्रणात आणणे खूप कठीण असते. मधुमेहामुळे काचबिंदू,किडनी विकार व स्ट्रोक सारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.काही संशोधनात मधूमेह व उच्च इन्सुलीन च्या पातळीमुळे काही प्रकारचे कर्करोग देखील विकसित होण्याचा धोका असतो असे आढळून आले आहे. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?

भारती हॉस्पिटल कर्नाल चे कन्सल्टंट इन्‍डोक्रोनोलॉजीस्ट व साऊथ एशियन फेडरेशन ऑफ इन्डोक्रीन सोसायटीचे व्हाईस प्रेसीडंट डॉ.संजय कर्ला यांच्या कडून जाणून घेऊयात मधूमेहामुळे  कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो का ?

           एका  संशोधनानुसार डायबेटीस अथवा प्री-डायबेटीस असलेल्या रुग्णांंमध्ये काही प्रकारच्या कर्करोगाची वाढ होऊ शकते.अमेरिकन इनस्टिट्युट फॉर कॅन्सर रिसर्च नूसार मधुमेहींमध्ये किडनी,स्वादूपिंड व कोलोरेक्टल कॅन्सर विकसित होण्याचा धोका अधिक असतो.याशिवाय महिलांमध्ये यकृत,स्वादूपिंड,स्तन,इन्डोमेट्रिअल व कोलन या कर्करोगामुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका अधित असतो.भारतामध्ये ७७.२ दशलक्ष लोकांना डायबेटीस,प्री-डायबेटीस या विकारांमुळे हाय इन्सुलीनवर ठेवावेच लागते.प्री-डायबेटीस व टाईप २ डायबेटीस मुळे कॅन्सर सारखा आजार वाढण्याचा धोका असतो.यामागचे महत्वाचे कारण रुग्णाच्या शरीरातील फॅट्स वाढणे. ही एक गंभीर बाब असते.काही संशोधनात असे सिद्ध झाले आहे की रुग्णाच्या शरीरातील वाढलेली चरबी ही स्वादुपिंड व कोलोरॅक्टल कॅन्सर साठी कारणीभूत असते.यावरुन असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की काही ट्यूमर हे इन्सुलीन रिसेप्टर असतात त्यामुळे हायपरइन्सुलीनेमीयाचा कॅन्सरच्या वाढ व विकासामध्ये मोठा वाटा असतो.वाढते वय,लठ्ठपणा,अपुरा आहार व कमी शारिरिक मेहनत हे मधूमेहाच्या वाढीसाठी कारणीभूत घटक असतात.शिवाय हाय इन्सुलीन लेवल,हाय ब्लड ग्लूकोज लेवल,दाह ही मधूमेहींमधील लक्षणे कर्करोगाची वाढ व विकास याच्याशी संबधित असू शकतात.मधूमेहामध्ये रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी करणारे Metformin या औषधाचा देखील कोलोरेक्टल,यकृत व फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबध असू शकतो.

डॉ.संजय कर्ला यांच्या मते कर्करोग विकसित होण्यामागे रक्तातील ग्लूकोजची नेमकी भुमिका स्पष्ट झाली नसली तरी त्याचा कर्करोगाशी संबध असतो हे नाकारता येत नाही.कॅन्सर प्रोटेक्टीव्ह भुमिका असलेल्या Metformin या औषधाबद्दल देखील आज अधिक संशोधन करण्याची गरज आहे.चिकित्सकांनी देखील असा धोका असणा-या रुग्णांना अॅन्टी-हायपरग्लायकेमीक औषधे घेण्याचा सल्ला देताना खुप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.या विकारासाठी लठ्ठपणा कारणीभूत असल्याने रुग्णाने त्याबाबत अधिक काळजी घेत तो नियंत्रणात आणण्यासाठी उपचार घेण्याची आवश्यक्ता आहे.तसेच मधूमेही रुग्णांना या विकाराच्या शक्यतेबाबत अधिक जागरुक करणे ही आज काळाची गरज आहे.मधुमेहावर उपचार घेणा-या रुग्णांनी नियमित कॅन्सर स्क्रीनींग करणे व प्रतिबंधनात्मक जीवनशैली अवलंबणे देखील खुप गरजेचे आहे. योगासनांनी करा ‘मधुमेहावर मात !

थोडक्यात मधुमेहींनी कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी डायबेटीस व प्री-डायबेटीस या समस्यांना नियंत्रणात ठेवले पाहिजे.

संदर्भ-

2. Anjana RM, Pradeepa R, Deepa M, Datta M, Sudha V, Unnikrishnan R, Bhansali A, Joshi SR, Joshi PP, Yajnik CS, Dhandhania VK, Nath LM, Das AK, Rao PV, Madhu SV, Shukla DK, Kaur T, Priya M, Nirmal E, Parvathi SJ, Subhashini S, Subashini R, Ali MK, Mohan V; ICMR–INDIAB Collaborative Study Group. Prevalence of diabetes and prediabetes (impaired fasting glucose and/or impaired glucose tolerance) in urban and rural India: phase I results of the Indian Council of Medical Research-INdia DIABetes (ICMR-INDIAB) study. Diabetologia. 2011 Dec; 54(12):3022-7. doi: 10.1007/s00125-011-2291-5. PubMed PMID: 21959957

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ‘५’आयुर्वेदीक टीप्सने लवकर येणारा मेनोपॉज रोखा !

$
0
0

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाय वळतात, पोटात दुखत, मूड स्विंग्स होतात. हे सगळं आपण प्रत्येक महिन्यात सहन करतो. त्यामुळे काही वेळेस मासिकपाळी आल्यानंतर आपली चिडचिड होते तर ते येण्यास उशीर झाला तर आपण चिंता करतो. खरंतर मासिक पाळीचे हे चक्र आपण तरुण, आरोग्यदायी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या फर्टिलिटीचे लक्षण आहे. मासिकपाळी दरम्यानच्या वेदना घालवण्याचा नैसर्गिक उपाय

परंतु आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेक स्त्रियांना खूप लवकर मोनोपॉजला सामोरे जावे लागते. योनीमार्गाचा कोरडेपणा, सेक्सची इच्छा कमी होणे किंवा मासिक पाळी न येणे या मेनोपॉजच्या लक्षणांचा काहींना ५०शीत तर काहींना ३०शी नंतर अनुभव येतो. मेनोपॉजमुळे इन्फेर्टिलिटी बरोबरच हाडं, हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. परिणामी  osteoporosis आणि strokes होण्याची संभावना असते. मेनोपॉजच्या टप्प्यावर स्त्रियांमध्ये वाढतो या 5 गोष्टींमुळे ह्रदयविकाराचा धोका

धन्वंतरी केरला आयुर्वेदा च्या आर्युर्वेदिक फिजिशियन डॉ. नम्रता पवार यांच्या सल्ल्यानुसार या समस्येचा सामना करण्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीत काही खास बदल करण्याची गरज आहे. लवकर येणाऱ्या मेनोपॉजला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी या ५ गोष्टी सांगितल्या. मोनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये वाढतो या ’3′ समस्यांचा धोका

1. नृत्य करा: डॉ. पवार यांनी मासिकपाळीचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी अतिशय मस्त उपाय सांगितला. तो म्हणजे डान्स. आणि त्यासाठी नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची गरज नाही. मस्त गाणी लावा आणि तुम्हाला हवा तसा डान्स करा. रक्तप्रवाह सुधारण्याचा डान्स हा उत्तम पर्याय आहे. तसंच डान्समुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो.

2.व्यायाम: व्यायामाचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. त्यामुळे झोपेचा मोह जरा आवरता घ्या आणि लवकर उठा. चांगल्या आरोग्यासाठी अर्धा तास व्यायाम करा. तुम्ही squats, जॉगिंग करू शकता. किंवा नियमित योगासने करा. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.

3. आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करा: डॉ. पवार यांच्या सल्ल्यानुसार स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव होण्यास तिळाच्या तेलाचा फायदा होतो.  म्हणून तिळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. मासिक पाळीचे अनियमित चक्र सुरळीत करण्यासाठी तिळाचे तेल उपयुक्त ठरते. ४०शी नंतर स्त्रियांमध्ये वाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे oestrogen ची पातळी कमी होते. परिणामी हाडं कमकुवत होतात, त्वचा कोरडी होते आणि मेनोपॉज लवकर येतो. वात कमी करण्यासाठी तिळाचे तेल उत्तम आहे. तसेच त्यामुळे सांध्याचे आरोग्य राखण्यास मदत होते. असे डॉ. पवार यांनी सांगितले. तीळाच्या तेलाचे ’9′ आरोग्यवर्धक फायदे !

4. ताणमुक्त रहा: ताणामुळे आरोग्याच्या साध्या समस्यांना देखील गंभीर स्वरूप प्राप्त होते. काम करणाऱ्या स्त्रियांपासून गृहिणींपर्यंत सगळ्यांना कोणतीतरी चिंता, काळजी असतेच. डॉ. पवार यांच्या सल्ल्यानुसार यावर मात करण्यासाठी योगसाधना, प्राणायाम करणे योग्य ठरेल. वज्रासन, शवासन यांसारखी आसने आणि भ्रामरी, अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारखे ताणमुक्त करणारे प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. ताणमुक्त राहण्यासाठी करा अधो मुख श्वानासन !

5. संतुलित आहार: आहारात phytoestrogens ने युक्त अशा सोयाबीनचा समावेश करा. तसंच तीळ, अक्रोड चे सेवन करा. काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात रहा. शिमला मिरची, बीट, जांभळा कोबी, गाजर, टोमॅटो यांसारख्या अँटिऑक्सिडंटने युक्त अशा भाज्या आहारात समाविष्ट करा. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर या भाज्या देखील फायदेशीर आहेत. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली खाणं खरंच सार्‍यांंसाठी आरोग्यदायी आहे का ?

तुम्हाला देखील लवकर मेनोपॉज येण्याची भीती असेल तर तुमच्या दैनंदिन आयुष्यात हे लहानसे बदल नक्की करून बघा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

PCOS चा त्रास असणार्‍या स्त्रिया गरोदर राहू शकतात का ?

$
0
0

आजकाल पीसीओडी मुळे इन्फर्टिलिटी आणि co-morbidities चे प्रमाण वाढत आहे. विशेषतः सध्याच्या तरुणींमध्ये ही समस्या सामान्यपणे आढळून येते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४०% टीनएजर्स मध्ये ओपीडीएस आणि पीसीओएस ची समस्या दिसून येते. पीसीओएस मध्ये स्त्रियांच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. त्यामुळे गर्भधारणेची क्षमता कमी होते. PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !

पीसीओएस असताना प्रेग्नेंट कसे राहावे किंवा प्रेग्नेंट राहणे शक्य होईल का ? अशा चिंता डोक्यात असतील तर त्यावर मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटलचे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट डॉ. वाय. एस. नंदनवार यांनी मार्गदर्शन केले.

जर तुम्हाला पीसीओएस असेल तर प्रेग्नेंट राहणे कठीण आहे. कारण अशा परिस्थितीत ओव्यूलेशन (ovulation) अनियमित होते किंवा होतच नाही. म्हणजेच अंड्याची निर्मिती होत नाही. अंड्याची निर्मिती न झाल्याने ते फलित होऊन गर्भधारणा होण्याची शक्यताच नसते. याचा अर्थ असा नाही की ज्या स्त्रीला पीसीओएस आहे ती प्रेग्नेंट राहू शकत नाही. यासाठी अनेक ट्रीटमेंटस उपलब्ध आहेत. आई होण्याच्या प्रयत्नांमध्ये फायदेशीर ठरते ‘शतावरी’ !

ओव्यूलेशनसाठी औषधे आणि इंजेकशन्स घेणे ही सामान्यपणे वापरली जाणारी ट्रीटमेंट आहे. यासोबतच आहार, वजन आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या औषधांमध्ये असलेले हॉर्मोन्स अंडाशयाला एक किंवा अनेक अंड्यांची निर्मिती करण्यास प्रवृत्त करतात. म्हणून जर तुमच्यात ओव्यूलेशनची प्रक्रिया अनियमित होत असेल किंवा होतच नसेल तरीही तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता. काही वेळेस invitro fertilisation च्या मदतीने ही तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता. साधारणपणे जर शुक्राणू (sperm) आणि बीजांड (ovum) यांच्या मिलनात काही अडथळा येत असेल तर IVF (invitro fertilisation) ची आवश्यकता भासते. IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 70रीच्या वयात दलजिंदर कौर यांनी कसा दिला बाळाला जन्म?

जर तुम्हाला थायरॉईड, मधुमेह किंवा स्थूलता यांसारख्या गंभीर समस्या असतील तर त्या आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे यशस्वी गर्भधारणा होऊन सुदृढ बाळ होण्यास मदत होईल. म्हणून जर तुम्हाला थायरॉईड किंवा मधुमेह असेल तर ते आटोक्यात ठेवण्यासाठी त्यावर औषधं दिली जातात. परंतु, जर तुम्ही स्थूल असाल तर नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. चमचाभर अळशीच्या सेवनाने कमी करा PCOS चा त्रास !

परंतु, तुमचे आरोग्य आणि पीसीओडी असताना प्रेग्नेंट राहण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. गर्भधारणा होण्यासाठी काही वेळेस वजन नियंत्रित ठेवल्याने फायदा होतो तर काही वेळा औषधं-इंजेक्शनस घेण्याचा सल्ला दिला जातॊ. PCOS आणि PCODच्या समस्येवर नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात का ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


मधुमेहामुळे पुरुषांची ‘बाबा’होण्याची शक्यता कमी होते का ?

$
0
0

IDF (International Diabetes Federation) च्या अहवालानुसार जगभरात भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. आणि २०३० पर्यंत देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास ९% लोक मधुमेहाने ग्रासलेली असतील.

म्हणूनच ब्लड ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः बाळाचा विचार करत असलेल्यांनी ब्लड ग्लुकोजचे योग्य प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. कारण मधुमेहाचा तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो. गर्भारपणात होणाऱ्या मधुमेहाला gestational diabetes  म्हणतात. त्यामुळे आई व बाळ या दोघांनाही भविष्यात मधुमेह होण्याचा धोका असतो. परंतु, ब्लड ग्लुकोजचे अतिरिक्त प्रमाण पुरुषांमध्ये वंधत्व आणते. Shantah IVF Centre च्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशालिस्ट डॉ. अनुभा सिंग यांनी मधुमेहामुळे पुरुषांमध्ये वंधत्व कसे येते यावर मार्गदर्शन केले.

मधुमेहामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व कसे येते?

मधुमेह असणाऱ्या पुरुषांकडून स्त्री मध्ये गर्भधारणा होण्यास अधिक वेळ लागतो. पण हे बऱ्याचजणांना माहीत नाही. मधुमेहाचा परिणाम पुरुषाच्या फर्टिलिटीवर होतो. आणि याचा परिणाम स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या फर्टिलिटीवर अधिक होतो. या सहज सोप्या उपायाने वाढवा शुक्राणूची संख्या !

कारण अतिरिक्त ग्लुकोजमुळे oxidative stress येतो. ज्यामुळे स्पर्म्समधील DNA ची क्षमता कमी होते. कमी क्षमतेच्या DNA मुळे पेशी नैसर्गिकरित्या नष्ट होतात. आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडथळे येतात. फक्त इतकंच नाही तर मधुमेहाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तवाहिन्या, नस यावर परिणाम होऊन शिश्नाची ताठरता येण्यास अडचणी येतात. त्याचबरोबर वाढलेल्या ग्लुकोजचा परिणाम सेक्सची इच्छा उत्पन्न करणाऱ्या testosterone हार्मोनवर होतो. नवीन वर्षात मधुमेहींनी या ८ गोष्टींंची काळजी घेतलीच पाहिजे !

जर स्त्रीला टाईप १ किंवा टाईप २ चा मधुमेह असेल तर गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. gestational diabetes असलेल्या महिलांची बाळ मृत जन्मण्याची किंवा कुपोषित राहण्याची शक्यता असते. गर्भारपणात झालेला मधुमेह कसा नियंत्रित ठेवाल?

मधुमेह आपण नियंत्रित ठेवू शकतो का?

स्वादुपिंडातून पुरेसं इन्सुलिन तयार न झाल्यास किंवा शरीराच्या पेशींचा इन्सुलिनवर समाधानकारक परिणाम न झाल्यास मधुमेहासारखा गंभीर आजार होतो. परंतु जीवनशैलीत काही आवश्यक बदल केल्यास म्हणजेच नियमित व्यायाम व संतुलित आहारामुळे मधुमेहाचे प्रमाण आपण नियंत्रित ठेऊ शकतो. याचा सेक्स लाईफवर परिणाम होवून वंध्यत्व येण्याआधी ब्लड ग्लुकोजचे प्रमाण आटोक्यात ठेवणे योग्य ठरेल. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !

शिश्नाची ताठरता येण्याच्या समस्येवर औषधांनी परिणाम दिसून येईल. कारण औषधांमुळे शिश्नाजवळचा रक्तप्रवाह सुधारेल आणि ताठरता येण्यास मदत  होईल. परंतु, या सगळ्यावर उपचार करण्याआधी मधुमेहाची लक्षणं जाणून घेणे आणि तो नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुमचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुमचे वजन अधिक असेल किंवा कुटूंबात पूर्वी कोणाला मधुमेह असेल तर समस्या गंभीर होण्यापूर्वीच म्हणजे वंध्यत्व येण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मधुमेहाचा तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो का ?

$
0
0

आपण सगळेच जाणतो की मधुमेहाचा परिणाम डोळे, किडनी, रक्तवाहिन्या, हृद्यावर होतो. तसंच त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व जखम, आजार बरं करण्याची प्रक्रिया देखील मंदावते. परंतु, तुम्हाला हे माहीत नसेल की मधुमेहाचा परिणाम दात, हिरड्या, तोंडाच्या आरोग्यावर सुद्धा होतो. काही वेळेस तोंडाचे आरोग्य बिघडणे हे मधुमेहाचे पहिले लक्षण असू शकते आणि त्यामुळे मधुमेहाचे निदान होण्यास मदत होते.

वारंवार हिरड्यांना सूज येणे, त्यातून पू येणे, कमी कालावधीत हाडांची झीज होणे तसंच सामान्य ट्रीटमेंट नंतरही हिरड्यांचे आजार बरे न होणे ही सगळी लक्षणे मधुमेहाचा संकेत देतात. मधुमेहामुळे वारंवार हिरड्यांचे आजार उद्भवतात आणि ते बरे होण्यासाठी खूप वेळ लागतो. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

मधुमेहामुळे सामान्यपणे होणारे तोंडाचे आजार:

  • दात किडण्याचे प्रमाण वाढणे: तोंडातील बॅक्टरीयाचा स्ट्राच आणि अन्नातील साखरेशी संबंध आल्याने दातांवर प्लाग जमा होतो. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे दात किडण्याचा धोका देखील वाढतो. जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे
  • हिरड्यांच्या आजाराची तीव्रता वाढते: ज्या बॅक्टरीयांमुळे प्लाग तयार होतो, हिरड्याचे आजार होतात, दात किडतात त्या बॅक्टरीयांशी लढण्याची क्षमता आपल्या शरीरात असते. परंतु, मधुमेहामुळे शरीराची इम्म्युनिटी कमी होते व त्यामुळे प्लाग तयार होण्याचे प्रमाण वाढते. प्लाग मध्ये असलेल्या बॅक्टरीयामुळे हिरड्यांना सूज येते, त्या लाल होतात आणि परिणामी त्यातून रक्त येते. दात घासूनही प्लाग न निघाल्यास तो अधिक कठीण होऊन periodontitis सारखे हिरड्यांचे आजार होतात. ज्यामध्ये दाताला आधार देणारे सॉफ्ट टिशू आणि हाड नष्ट होतं. त्यामुळे दात तुटतो. या ’7′ समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश कराच !
  • तोंड कोरडे होणे: तोंड कोरडे होणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे mucus membranes कोरडे होते. पुरेसे पाणी न पिण्यामुळे आणि diabetic neuropathy  मुळे salivary glands (लाळग्रंथीचे) कार्य मंदावते. त्यामुळे लाळेची निर्मिती कमी प्रमाणात होते. तोंड कोरडे राहिल्यामुळे अल्सर, इन्फेकशन आणि दात किडण्याचे प्रमाण वाढते. या ‘५’ नैसर्गिक तेलांनी दात होतील मजबूत !
  • फंगल इन्फेकशन: रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण सलाईव्हाला Candida सारखे फंगसची निर्मिती करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे oral thrush सारखे इन्फेकशन होते. thrush मुळे तोंडात सफेद किंवा लाल रंगाचे ग्लॉसी पॅचेस येतात. ते अतिशय वेदनादायक असतात. तर काही वेळेस ते अल्सर असू शकते. जिभेवर आलेले thrush वेदनादायक असून त्याची जळजळ होते. त्यामुळे तोंडाची चव जाते व अन्न गिळण्यास त्रास होतो. हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर ’6′ घरगुती उपाय !
  • इन्फेकशन व आजार बरा होण्यास वेळ लागणे: इन्फेकशनला प्रतिकार करण्याची क्षमता मधुमेहामुळे कमी होते. तसंच तोंडाचे आजार बरे होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे हिरड्यांचे आजार गंभीर होवून सर्जरीची आवश्यकता भासते. सर्जरी नंतर देखील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे कठीण होते. सर्जरीपूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण चेक करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही वेळेस जर ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित नसल्यास सर्जरी पुढे ढकलण्यात येते. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की मधुमेहमुळे तोंडाच्या आरोग्यावर होणारे परिणाम गंभीर असतात. पण त्याबद्दल जागरूक राहिल्यास आणि काही प्रतिबंधात्मक गोष्टी केल्यास दीर्घ काळापर्यंत तोंडाचे आरोग्य जपण्यास व आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होईल.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

गर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू कता.

$
0
0

जगभरात अनेक महिला अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात.डॉक्टरांच्या मते या गोळ्या फक्त ९९.७ टक्के परिणामकारक असतात कारण त्या घेताना गायनेकॉलॉजीस्टचा सल्ला अगदी तंतोतंत पाळावा लागतो.जर गोळ्या घेताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्हाला अनियोजित गर्भधारणेला सामोरे जावे लागू शकते.कारण गोळी घेतल्यानंतरही अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे तुम्ही गरोदर राहू शकता. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या गायनेकॉलॉजीस्ट अॅन्ड इनफर्टिलीटी एक्सपर्ट डॉ.नंदीता पालशेतकर आणि मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज व सायन हॉस्पिटलचे गायनेकॉलॉजी विभागाचे प्रोफेसर अॅन्ड हेड ऑफ डिपार्टमेंट डॉ.वाय.एस.नंदनवार यांच्याकडून जाणून घेऊयात गर्भनिरोधक गोळ्यांसोबत कोणत्या पाच चुका केल्याने तुम्ही इच्छा नसतानाही गरोदर राहू शकता.

१.जर तुम्ही नियमित गोळ्या घेतल्या नाही तर-

सामान्यत: दोन गोळ्यामधील अंतर २४ तासांच्या वर नसावे. यासाठी दररोज ठरलेल्या वेळीच गर्भनिरोधक गोळी घ्या.

उदा.जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सकाळी सुरुवात केली असेल तर महिनाभर ती गोळी सकाळी ठरलेल्या वेळीच घ्या.जर तुम्ही चुकून एखादी गोळी रात्री घेतली तर तुम्ही घेतलेल्या गोळ्यांच्या वेळेमध्ये फरक पडेल.ज्यामुळे त्या गोळ्यांचा परिणाम देखील कमी होईल.तसेच गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी, कंडोम – अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कोणता पर्याय स्विकाराल?

२.जर तुम्ही दोन वेळा गोळी घेणे विसरला तर-

डॉ.नंदनवार यांच्यामते त्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना पेशंटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या वेळेवर न घेतल्यामुळे त्या गोळ्यांचा परिणाम कमी झाल्याचे अनेकवेळा आढळले आहे.सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या सुरु केल्यावर एकदा जरी तुम्ही गोळी घेण्यास विसरलात तर तुम्ही गरोदर होण्याची शक्यता अधिक असते.कारण पहिल्या आठवड्यामध्ये या गोळ्यांमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यापासून प्रतिबंध करण्यात येतो.त्यामुळे जर पहिल्या आठवड्यात एखाद्या दिवशी तुम्ही गोळी घेण्यास विसरला तर गर्भधारणा टाळण्यासाठी दुस-या दिवशी लगेच दोन गोळ्या घ्या.पण जर तुम्ही दोन दिवस गोळ्या घेण्यास विसरला व त्या दरम्यान जर तुम्ही असुरक्षित सेक्स केले तर तुम्ही गरोदर रहाण्याची शक्यता अधिक असू शकते.अशा वेळी २४ तासांच्या आत इमरजन्सी पील्स घ्या अथवा तुमच्या गायनेकॉलॉजीस्टचा त्वरीत सल्ला घ्या.जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर गोळी घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये वेळेसाठी अर्लाम सेट करा अथवा डायरी मध्ये नोंद करा. या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

३.जर तुम्हाला डायरिया अथवा उलटीचा त्रास असेल तर-

डॉ.पालशेतकर यांच्यामते जर तुम्हाला २४ तासांच्या वर डायरियाचा त्रास झाला अथवा काही तास उलटीचा त्रास झाला असेल तर तुम्ही घेतलेली गोळी शरीराकडून व्यवस्थित शोषली जात नाही.सहाजिकच त्यामुळे तुम्ही गरोदर रहाण्याची शक्यता वाढू शकते.अशा वेळी असुरक्षित सेक्स करणे कटाक्षाने टाळा.जाणून घ्या Emergency contraceptive pills किती वेळा घेणं सुरक्षित आहे ?

४.गोळी सुरु केल्यावर लगेच असुरक्षित सेक्स केले तर-

सामान्यत: गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळीच्या दुस-या अथवा पाचव्या दिवशी सुरु करण्यात येतात.पण जर तुम्ही मासिक पाळीच्या मध्यावर गर्भनिरोधक गोळी सुरु केली असेल तर त्यानंतर तुम्ही कमीतकमी सात दिवस असुरक्षित सेक्स करु शकत नाही.अशा वेळी सेक्स करताना तुमचा जोडीदार सुरक्षेसाठी कंडोम वापरेल याची दक्षता जरुर घ्या.असुरक्षित सेक्सनंतर घ्या हे ’3′ खबरदारीचे उपाय !

५.जर तुम्ही गोळ्या उष्ण तापमानात ठेवल्या तर-

जर गर्भनिरोधक गोळ्या उष्ण तापमानात ठेवल्या तर त्यांचा परिणाम कमी होतो.यासाठी उन्हाळ्यात जेव्हा तापमान ४० अंश डिग्रीच्या वर असते तेव्हा या गोळ्या गाडीत अथवा खिडकीमध्ये ठेऊ नका.ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश येणार नाही अशा सुरक्षित ड्राव्हर मध्ये त्या गोळ्या ठेवा.त्याचप्रमाणे डॉ.नंदनवार यांच्यामते सहा महिन्यांसाठी लागणा-या जास्तीच्या गोळ्या आधीच खरेदी करुन ठेऊ नका कारण त्यामुळे देखील त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते.यासाठी फक्त एक महिना पुरतील एवढयाच गोळ्या खरेदी करा.जाणून घ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

लवकर येणा-या मॅनोपॉजला पुढे ढकलण्यासाठी एक्सपर्ट टीप्स

$
0
0

मेनॉपॉज ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अशी नैसर्गिक स्थिती आहे ज्या स्थितीत तिच्या शरीरातील स्त्रीबीजांची निर्मिती बंद होते तसेच तिच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडतात.प्रत्येक स्त्रीला अंदाजे वयाच्या ४७ वयाच्या जवळपास मॅनोपॉजला सामोरे जावे लागते.मात्र आजकाल स्त्रीयांमध्ये लवकर मॅनोपॉज येण्याचे प्रमाण वाढले आहे.लवकर येणा-या या मॅनोपॉजची लक्षणे मॅनोपॉज प्रमाणेच असतात.लवकर मॅनोपॉज अनुभवण्याची वेळ आल्यास उष्णता व मूड स्वींग ही लक्षणे स्त्रीमध्ये आढळतात.सहाजिकच अनेक स्रीयांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की लवकर येणारी ही मॅनोपॉजची स्थिती पुढे ढकलता येते का? किंवा येत असेल तर ती कशी करावी ?

मुंबई लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज व सायन हॉस्पिटलचे प्रोफेसर व गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड डॉ.वाय.एस.नंदनवार यांच्याकडून जाणून घेऊयात मॅनोपॉज पुढे ढकलण्याचे काही सोपे मार्ग.

एस्ट्रोजनची पातळी वाढेल असा आहार घ्या-

पोषक व सतुंलित आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व फीट रहाता तसेच तुम्हाला मॅनोपॉज पुढे ढकलण्यास देखील मदत होते.मॅनोपॉजच्या काळात तुमच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी कमी होते.त्यामुळे एस्ट्रोजन वाढेल असा आहार घ्या.यासाठी सोया,शेंगदाणे,फ्लेक्स सीड तुम्ही आहारात घेऊ शकता.

नियमित व्यायाम करा-

व्यायामामुळे तुमचे हॉर्मोन्स सतुंलित रहातात व मॅनोपॉज पुढे ढकलण्यास देखील मदत होते.यासाठी तुम्हाला दररोज जीममध्ये जाण्याची काहीच गरज नाही.त्यापेक्षा दररोज तीस मिनिटे ब्रीस्क वॉक घ्या किंवा आठवड्यातून कमीतकमी पाच वेळा घरीच योगासने करा.याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.त्याचबरोबर यामुळे मॅनोपॉजच्या काळातील लक्षणांची तीव्रता देखील कमी होण्यास मदत होईल.

ताणापासून दूर रहा-

जर तुम्ही सतत ताणात असाल तर तुम्हाला लवकर मॅनोपॉजला सामोरे जावे लागेल.कारण तुम्ही जेव्हा ताणात असता तुमचे शरीर काही हॉर्मोन्स निर्माण करते ज्यामुळे शरीराचे कार्यात अडथळा येतो.या हॉर्मोन्सच्या निर्मिती हे मॅनोपॉजचे एक लक्षण असू शकते.हा ताण टाळण्यासाठी मेडीटेशनचा सराव करा अथवा तुमचा एखादा आवडता छंद जोपासा.या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !

हॉर्मोन रीप्लेसमेंट थेरपी-

तुम्ही एचआरपी अथवा हॉर्मोन रीप्लेसमेंट थेरपीच्या सहाय्याने हॉर्मोन सप्लीमेंट घेतली तर त्यामुळे तुमच्या शरीरात एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सची पातळी वाढू लागते.या काळात शरीरातील हॉर्मोन्सची निर्मिती कमी होऊ लागल्यास मॅनोपॉज टाळण्यासाठी तुम्ही या थेरपीची मदत घेऊ शकता.मात्र यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.कारण या थेरपीमुळे देखील तुमच्या शरीरातील इतर अनेक हॉर्मोन्सवर परिणाम होतो त्यामुळे प्रथम ही थेरपी तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासणे आवश्यक असते. तसेच या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

बाळाने ढेकर दिल्याशिवाय त्याला का झोपवू नये ?

$
0
0

लहान बाळ म्हणजे घरातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याचा छोट्या छोट्या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष दिले जाते. विशेषतः त्याच्या आरोग्याकडे. तुम्ही कधीतरी पाहिले असेल की लहान बाळाला भरवल्यानंतर त्याने ढेकर दिला की आई-आजी यांसारखी मोठी मंडळी खुश होतात. त्यामागे कारणही तसेच आहे. बाळाला भरवताना पोटात गेलेली अतिरिक्त हवा ढेकराच्या मार्फत बाहेर निघते. कारण ती जर पोटातच राहीली तर पोटात दुखू लागते. नक्की वाचा: बाळाच्या रडगाण्यामागे दडल्यात या ’5′ भावना !

परंतु, बरेचदा या छोट्याशा गोष्टीला आपण फार महत्त्व देत नाही. बाळाला भरवताना बाळ झोपल्यास तुम्ही त्याला बेडवर ठेवता आणि निश्चिंत होता. तुम्हाला असं वाटत की आता काही तास तरी बाळ शांत झोपेल आणि तुम्हाला निवांत वेळ मिळेल. पण असे न होता बाळ काही वेळातच रडत उठतं. झोपेतून उठण्याची अनेक कारणं असू शकतात. पण ढेकर न दिल्यामुळे पोटात दुखू लागतं आणि त्यामुळे ही बाळ उठतं. या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !

The Pediatric Network च्या Founder & Director, Dr Chaitali Laddad यांच्या सल्ल्यानुसार बरेचदा भरवल्यानंतर बाळ ढेकर देत नाही. तरी पण त्याला खांद्यावर घेऊन पाठीवर हलक्या हाताने थोपटणे योग्य ठरेल. त्यामुळे पोटात गेलेली अतिरिक्त हवा हलकेच बाहेर पडेल. असे करून देखील बाळाला ढेकर आला नाही तरी काही प्रमाणात हवा बाहेर पडून पुढे होणारी पोटदुखी टाळता येईल. आणि त्यामुळे बाळाची झोप मोड होणार नाही. या ’5′ कारणांंसाठी बाळाचे रडणे फायदेशीर !

भरवताना ढेकर न देता बाळ झोपी गेलं तर काय करावे ?

भरवताना बाळ झोपल्यानंतर देखील १५-२० मिनिटांसाठी बाळाला उचलून घ्या. तरीही बाळाला ढेकर न आल्यास बाळाच्या अंथरुणाखाली उशी ठेवा. त्यामुळे पोटात गेलेल्या हवेमुळे होणाऱ्या पोटदुखीला आळा बसेल. असे Dr. Laddad यांनी सांगितले. हिंग – लहान मुलांमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय !

परंतु, तुमचं बाळ दोन वर्षाचं झाल्याशिवाय उशीचा वापर करू नका. कारण त्यामुळे मानदुखी, डोकं मागून सपाट होणे किंवा choking hazards यांसारखे त्रास होऊ शकतात. जरूर वाचा:  या लक्षणांनी वेळीच ओळखा ऑटिझम आणि त्यावरील उपाय !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

डाळीचे पाणी की पातळ डाळ बाळासाठी काय योग्य ठरेल ?

$
0
0

आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला काय द्यावे हा सगळ्याच मातांना पडणारा प्रश्न आहे. हे द्यावे की दुसरे काही. हा पदार्थ योग्य ठरेल की हा. अशा अनेक शंका प्रत्येक आईच्या डोक्यात असतात. त्यात परत बाळाला काय आवडेल, काय पचेल हा मोठा प्रश्नचिन्ह समोर असतोच. आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळ दुसरं काही खायला सुरुवात करेपर्यंत अनेक शक्कल लढवाव्या लागतात. गोष्टी सांग, नक्कल करून दाखव, चिऊ-काऊ चा घास अशा अनेक ट्रिक्स वापराव्या लागतात. स्तनपान देणार्‍या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !

इतर पदार्थ द्यायला सुरुवात करताना प्रथमतः हलके द्रव पदार्थ द्या. म्हणजेच फळांचा रस, फळ-भाज्यांची प्यूरी, मॅश केलेले पदार्थ. आपल्याकडे याची सुरुवात साधारणपणे डाळीच्या पाण्याने होते. परंतु, एक्सपर्ट्स आणि पिडीयाट्रीशन यांच्या सल्ल्यानुसार डाळीचे पाणी दिल्याने बाळाला फार कमी किंवा काहीच फायदे मिळत नाहीत. लहान मुलांचा नेमका आहार कसा असावा ?

यावरून असे दिसते की डाळीचे पाणी देणे ही वर्षानुवर्षे एका पिढीकडून पुढच्या पिढीला मिळालेली परंपरा आहे. या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही The Pediatric Network च्या Founder & Director, Dr Chaitali Laddad यांच्याशी संपर्क साधला. लहान मुलांना सुवर्ण भस्म देण्याचे आरोग्यदायी फायदे !

त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार बाळ सहा महिन्याचे किंवा त्याहून थोडे मोठे झाल्यावर आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न द्यायला सुरुवात करावी. सुरुवातीला पचण्यास हलके असे मऊ अन्नपदार्थ देणे योग्य ठरेल. परंतु, त्यासाठी डाळीचे पाणी देणे हा तितकासा फायदेशीर पर्याय नाही. डाळीच्या पाण्यात कोणतेही पौष्टीक घटक किंवा पुरेसे प्रोटीन देखील नसते. त्यातून फक्त शरीराला पाणी मिळते. या १० कारणांसाठी एक वर्षापेक्षा लहान बाळाला गायीचे दूध देऊ नका !

खरंतर बाळाची वाढ व विकास योग्य पद्धतीने व्हावा हा इतर पदार्थ देण्यामागचा उद्देश असतो. डाळीच्या पाण्याऐवजी स्मॅश डाळ (डाळ थोडी पातळ करून घेणे) देणे योग्य ठरेल. त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असल्याने बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. लहान मुलांच्या आहारात साजूक तूपचा समावेश का करावा ?

बाळाला मॅश डाळ देताना या गोष्टी लक्षात ठेवा:

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय !

$
0
0

अनेक लोकांना डोळे कोरडे होण्याची समस्या असते.डोळ्यातील ग्रंथींकडून पुरेसे अश्रू निर्माण न झाल्यास डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.तसेच डोळ्याला सतत वंगण न मिळाल्यामुळे डोळे लाल होतात,त्यातून खाज येते व जळजळ होते.हे नक्की वाचा डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजक अन महत्त्व पूर्ण गोष्टी !

बीजी रोड बेंगलोरच्या फोर्टीस हॉस्पिटलमधील चिफ डायटीशन मिस शालीनी अरविंद यांच्या कडून जाणून घेऊयात डोळे कोरडे होणे टाळण्यासाठी कोणते नैसर्गिक घरगुती उपाय करावेत.

पाणी-

भरपूर पाणी प्यायल्याने कोरडे डोळे होण्याच्या समस्येमध्ये नक्कीच आराम मिळतो.डोळे कोरडे होणे हे तुमचे शरीर डीहायड्रेट असल्याचा एक संकेत असू शकते.सतत एअर कंडीशन वातावरणात काम करणारे लोक पाणी पिण्याकडे सहज दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना ही समस्या निर्माण होऊ शकते.यासाठी दिवसभरात २ लीटर अथवा ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो.मात्र असे असले तरी डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे आवश्यक असते.

                  विशेषत: जर तुम्ही कॉफी अथवा कॅफेन पेय सतत घेत असाल तसेच जर तुम्ही थंड व कोरड्या वातावरणात रहात असाल तर तुम्ही भरपूर पाणी पिणे गरजेचे अाहे.पुरेसे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी सतुंलित रहाते व त्यामुळे डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण होण्याचे कार्य सुरळीत होते. अश्रूंमुळे डोळ्याच्या आतील त्वचा श्लेष्मल,ओलसर रहाते ज्यामुळे डोळ्यांचे इनफेक्शन पासून संरक्षण होते.त्यामुळे तज्ञांच्या मते कोरडे डोळे ही समस्या टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या.जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

ओमेगा ३ फॅटी अॅसिड-

ओमेगा ३ फॅटी अॅसिड व इसेंशीयल फॅटी अॅसिडमुळे डोळयातील द्रवपदार्थांचा योग्य निचरा होतो व डोळ्यांचे काचबिंदू आणि डोळ्यांवर दाब येण्यापासून संरक्षण होते.तसेच त्यामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या देखील टाळता येते.यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फ्लॅक्स सीड ऑईल,फीश ऑईल,चीना सीड्स, अक्रोड,माश्यांची अंडी,फॅटी फीश,सीफूड,सोयाबीन आणि  पालक असे ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ वाढवा.

पोटॅशियम-

पोटॅशियम आपल्या शरीरातील संपुर्ण पेशींच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व असते.पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्यास डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.स्वीट पोटॅटो,पालक,टोमॅटो प्युरी व रस,केळी,सुकामेवा,लिंबूवर्गीय फळे,शहाळे व रागी यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.

बी व्हिटॅमिन-

डोळ्यांचेआरोग्य,दृष्टी व अश्रू पटल यांच्यासाठी सर्वच व्हिटॅमिन उपयुक्त असतात.मात्र  व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अॅसिड यांचा सबंध पेशींच्या पुर्ननिर्माण व दुरुस्ती यांच्याशी येतो.त्यामुळे तुमच्या डोळ्यातील श्लेष्मल पडद्याला फॉलिक अॅसिडची अधिक गरज असते.तुम्हाला व्हिटॅमिन बी मांस,अंडी,मासे,पोल्ट्री प्रॉडक्टस,तृणधान्य,मशरुम,सुर्यफुलाच्या बीया,बटरफ्रुट,ब्रोकोली,केळी,शिंबी व हिरव्या भाज्या यामधून मिळू शकते.जाणून घ्या डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6  सुपरफुड्स !

व्हिटॅमिन ई-

व्हिटॅमिन ई हे एक उत्तम अॅन्टी-ऑक्सिडंट असून ते शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीचा एक प्रमुख भाग असते.ते झिंक व बीटा कॅरोटीन सोबत घेतल्याने वयोमानानूसार डोळ्यात येणारा कोरडेपणाचा धोका कमी करता येतो.तसेच यामुळे मोतीबिंदू होण्यापासून देखील बचाव करता येतो.सुर्यफुलाच्या बीया,वनस्पती तेल,पालक,शेंगदाणे,बटर फ्रुट,बदाम,ब्रोकोली आणि मासे हे व्हिटॅमिन ई चे काही स्त्रोत आहेत.जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


बेलपत्राने ठेवा मधूमेहावर नियंत्रण !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

७ मार्च  २०१६- महाशिवरात्री 

……………………………………………………………………………………………

महादेवाच्या पूजेमध्ये प्रामुख्याने वापरले जानारे पान म्हणजे बेलपत्र. बेलपत्रासोबतच बेलफळ (कवठ) हेदेखील अर्पण केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात बेलफळाचा मुरंबा प्रामुख्याने खाल्ला जातो. धार्मिक महत्त्वाप्रमाणेच बेल आणि बेलफळाचे आरोग्यदायी गुणधर्मदेखील आढळतात. आयुर्वेदामध्ये बेलाला दशमूळांपैकी एक मानले जाते. मधूमेहींसाठी बेल अतिशय गुणकारी आहे. यासोबतच ताप, बद्धकोष्ठता आणि डोळ्यांच्या विकारामध्येही बेल गुणकारी ठरतो. पण तुम्ही तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?

  • कशी ठरतात बेलाची पानं गुणकारी ? 

बेलपत्रामध्ये अ‍ॅन्टी -डाएबिटीक गुणधर्म आढळतात हे वैज्ञानिकदृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे. बेलपत्राचा रस रक्तातील साखरेप्रमाणे कोलेस्टेरॉलवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. बेलपत्राच्या रसात हायपोग्ल्यास्मिक आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्माने परिपूर्ण असतो. ज्या पदार्थांमध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी तितका तो पदार्थ मधूमेहींसाठी फायदेशीर ठरतो. बेलपत्राच्या पानांमुळे स्वादूपिंडाच्या कार्याला चालना मिळते. परिणामी इन्सुलिनची निर्मिती सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. बेलपत्रासोबतच मधूमेह नियंत्रित करतील हे ’10′ घरगुती उपाय !

  • कसा कराल बेलपत्राचा आहारात समावेश ?  

#1 रिकाम्या पोटी किमान 4-5 स्वच्छ धुतलेली आणि ताजी बेलपत्राची पानं चघळा. हा प्रयोग नियमित केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

#2  काही ताज्या बेलपत्राच्या पानांचा मिक्सरमधून रस काढून घ्या. त्यामध्ये काळामिरीची चिमूटभर पावडर मिसळा. तयार मिश्रण नियमित प्या. ( नक्की वाचा : मधुमेहींसाठी खास औषधी चहाचे 5 पर्याय ! )

#3  बेलपत्रासोबत तुम्ही काही तुळशीची पानंदेखील चघळून खाऊ शकता. यामुळे मधूमेहासोबत कोलेस्ट्रेरॉलवरही नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

खबरदारीचा उपाय -: बेलफळ किंवा बेलपत्राचे सेवन गरोदर स्त्रियांनी टाळावे. बाळासाठी प्रयत्न करत असल्यास किंवा गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच  बेलफळ किंवा बेलपत्राचा आहारात समावेश करावा. नक्की जाणून घ्या बाळ कसे होते ? आणि तुम्ही आई होण्याचा विचार करत असल्यास गर्भारपणात हे 6 पदार्थ खाणे टाळा.

References:

  1. Ankita, G., & Gupta, S. K. Wound Healing Activity of Topical Application of A. marmelos and Cow Ghee. International Journal Of Drug Discovery And Herbal Research (Ijddhr) 4(2&3): April-September.: (2014), 741-445
  2. T. Gohil, N. Pathak, N. Jivani, V. Devmurari and J. Patel. Treatment with extracts of Eugenia jambolana seed and Aegle marmelos leaf extracts prevents hyperglycemia and hyperlipidemia in alloxan induced diabetic rats. African Journal of Pharmacy and Pharmacology Vol. 4(5), pp. 270-275, May 2010
  3. Gupta, P. Preparation and standardization of Jamun RTS supplemented with Amla Juice and Bael Juice Pankaj Gupta. Online International Interdisciplinary Research Journal, {Bi-Monthly}, ISSN 2249-9598

#महाशिवरात्र विशेष –कसा कराल आरोग्यदायी पद्धतीने महाशिवरात्रीचा उपवास

$
0
0

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

7 मार्च 2016  - महाशिवरात्र 

………………………………………………………………………

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. मंदिरात दुग्धाभिषेक आणि बेलपत्र वाहले जाते. परंतू तेच बेलपत्र  मधूमेहींसाठी एक वरदान आहे. काही जण या दिवशी  उपवास करतात. सार्‍याच धर्मामध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. मात्र चुकीच्या खान-पानाच्या पद्धतीमुळे अनेकांना उपवासादरम्यान पित्ताचा त्रास होतो. उप + अवास अशी उपवास या शब्दाची फोड होते. यामध्ये  उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे अर्थात उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे. उपवासादरम्यान सात्विक आणि अल्पप्रमाणात आहार घ्यावा. 

योग्यरित्या उपवास केल्यास  शरीराच्या काही क्रियांना विश्रांती मिळते, पचन क्रिया सुधारते. शरीर शुध्दीसाठी उपवास फायदेशीर ठरतो.  परिणामी आपल्या शरीरातील आम म्हणजे विषद्रव्यांचे (हेच आम पुढे अनेक विध रोगास कारणीभुत ठरते.) ज्वलन होते. म्हणूनच आरोग्यदायी पद्धतीने उपवास करण्यासाठी लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या डॉ. कविता पवन लड्डा यांनी सुचवलेला हा डाएट प्लॅन आज नक्की अंमलात आणा.  

  • कसा असावा तुमचा उपवासा दरम्यानचा आहार ? 

# सकाळ - 

सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी प्या. त्यांनतर कमी पत्तीचा चहा (उपवासाला चालत असेल तर) प्यावा.

सकाळी ताजे ताक 1-2 ग्लास ज्यामध्ये पुदिना, जिरे, काळामिरी पूड, आलं खिसुन टाकावे. हे पेय स्वादीष्ट आणि आरोग्यदायीदेखील ठरते.  किवा  1-2 राजगिरा लाडू खाऊन दिवसाची सुरवात करा. याव्यतिरिक्त तुम्ही 1 वाटी दहयातील काकडीची कोशिंबीर खाणे हा देखील फायदेशीर पर्याय आहे.

( नक्की वाचा : उपवास विशेष-: राजगिर्‍याचा उपमा कसा बनवाल )

# दुपार -

दुपारी  1 मध्यम आकाराची प्लेट भगर किंवा पोटभरुन पपई किंवा अननस किंवा सफरचंद किंवा डाळींब किंवा मोसंबी – संत्रा यापैकी आवडीनुसार फळ खा.

# संध्याकाळ - 

संध्याकाळी भूक लागल्यास 1 ग्लास कमी साखरेचे लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्या.

# रात्री -

रात्री 7 च्या आत जेवण करावे. रात्रीच्या जेवणात राजगि­याच्या लाहया किंवा राजगिरा लापशी किंवा राजगिरा लाडू किंवा राजगिरा चपाती व राजगिरा­याची कढी घ्या. तसेच पहा कसा बनवाल उपवास विशेष रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा 

रात्री झोपताना गरज असेल तर 1 ग्लास गरम गोड दुध अन्यथा 1 ग्लास कोमट पाणी पिऊन झोपा. पण दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !

  • उपवासादरम्यान कोणती खास काळजी घ्याल ? 

#  उपवास आहे म्हणून एकदाच भरपोट न खाता चारपाच वेळा थोडे थोडे आपण खायला हवं . 
# उपवासाच्या काळात सुध्दा आपली जेवणाची वेळ ही नियमित असावी .
#  उपवासाच्या काळात योग्य मात्रेत पाणी प्यायला हवे.

Urinary Retention ची समस्या म्हणजे काय व त्यावरील उपचार !

$
0
0

रात्री लघवीला झाल्यामुळे तुम्ही उठता व बाथरुममध्ये जाता पण काही केल्या तुम्हाला लघवीलाच होत नाही.तुमच्या ओटीपोटात खुप वेदना होतात पण एक थेंब देखील लघवी होत नाही.तुम्ही वेदनेमुळे जमिनीवर पडून लोळू लागता.हे चित्र कदाचित तुम्हाला एखाद्या हॉरर मुव्ही प्रमाणे वाटू शकते.पण असे वास्तवात देखील होते व या समस्येला युरीनरी रीटेंशन असे म्हणतात.ज्या स्थितीत तुमचे मूत्राशय मूत्राने पुर्णपणे भरलेले असते पण तुम्हाला लघवीला होत नाही.

यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या युरो-ऑन्कोलॉजीकल सर्जन डॉ.अनूप रमाणी यांच्याकडून जाणून घेऊयात या समस्येवर नेमके काय उपाय करावेत.

युरीनरी रीटेंशन होण्याचे काय कारण असते?

डॉक्टरांच्या मते महिला असो की पुरुष दोघांच्या देखील शरीरातून मूत्र स्वत:हून बाहेर पडत नाही.मूत्राशय मूत्र विशिष्ट दाबाने बाहेर फेकते.त्यामुळे शरीराला लघवी बाहेर टाकण्यासाठी मूत्राशयाच्या या शक्तीची गरज असते.लघवी करताना त्रास का जाणवतो ?

मूत्र बाहेर टाकण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यक्ता असते.

  • मूत्र बाहेर टाकण्यासाठी आकुंचन पावणारे मूत्राशयाचे स्नायू

  • लघवी बाहेर टाकण्याची जागा उघडी असणे

या दोघांपैकी एका जरी गोष्टीमध्ये बिघाड झाला तर त्या व्यक्तीला लघवी करण्यास त्रास होतो.

पुरुषांमध्ये ब्लेडर रीटेंशन होण्याची दोन कारणे असतात-

  • प्रोस्टेटच्या आकारात बदल

  • मूत्राशयाचे स्नायू कमजोर असणे

ही समस्या स्त्रीयांमध्ये फार कमी प्रमाणात आढळते.एखाद्या स्त्रीला सर्विकल कॅन्सर असल्यास तीला या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

युरीनरी रिटेंशनची लक्षणे-

  • मूत्राशयात वेदना

  • तीव्रतेने लघवीला होणे

  • ओटीपोटाच्या भागात सूज येणे

युरीनरी रिटेंशन मुळे काय त्रास होतो?

  • मूत्राच्या दाबामुळे मूत्राशयामध्ये बिघाड

  • युरीनरी इनफेक्शन होण्याची शक्यता

  • किडनीमध्ये बिघाड

वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार-

डॉ.रमाणी यांच्या मते पुरुषांमध्ये युरीनरी रीटेंशनचे एक प्रमुख कारण प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे हे असते.प्रोस्टेट ग्रंथी मूत्राशयाच्या गळ्याजवळ असते व या मध्ये शुक्राणूंच्या निर्मितीसाठी लागणारे द्रवपदार्थ स्त्रवतात.ही ग्रंथी एखाद्या डोनटच्या आकारासारखी असून त्यामध्ये मध्यभागी एक छेद असतो ज्यातून मूत्र बाहेर पडते ज्याला मूत्रमार्ग असे म्हणतात.पुरुषांमध्ये त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतर ही ग्रंथी सर्वबाजूने वाढू लागते ज्यामुळे मूत्रमार्गावर दाब येतो व मूत्र बाहेर पडण्याचा मार्ग संकुचित होतो.

ज्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीची लक्षणे दिसून येतात ते अगदी मूत्रमार्गाचे छिद्र पुर्ण बंद होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करतात व शेवटी यूरोलॉजीस्टचा सल्ला घेतात.डॉ.रमाणी यांच्या मतानूसार अशा वेळी डॉक्टर प्रथम कॅथटर या एका लवचिक नळीला मूत्रमार्गाच्या छिद्रात घालून मूत्राशय रिकामे करतात.त्यानंतर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर ७० ते ८० टक्के रुग्ण मूत्रमार्ग खुला झाल्यामुळे व्यवस्थित लघवी करु शकतात.मात्र २० ते ३० टक्के रुग्णांवर पुन्हा उपचार करावे लागतात.अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया अथवा लेझर उपचार करण्यात येतात. कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांमुळे prostate cancer चा धोका वाढतो?

ब्लॅडर कमजोर असल्यास काय उपचार करण्यात येतात?

स्पाईन सर्जरी,मधुमेह,डोक्यावर केलेली सर्जरी यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमजोर होतात.कधीकधी मज्जातंतूच्या बिघाडामुळे मेंदू व मूत्राशय यामधील संदेशवाहन व्यवस्थेत अडथळा येतो ज्यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात.डॉ.रमाणी यांच्यामते या समस्येमुळे मूत्राशयाचे स्नायू मूत्र बाहेर ढकलण्यास अक्षम होतात.मात्र यास्थितीतील युरीनरी रीटेंशन मध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे होणा-या युरीनरी रीटेंशन इतक्या वेदना होत नाहीत.

डॉक्टरांच्या मते यासाठी ते रुग्णांना स्वत:हून मूत्राशय व ओटीपोटावर दाब देऊन लघवी काढण्याचा सल्ला देतात.त्याचबरोबर रुग्णांना कॅथटर वापरण्यास शिकविण्यात येते ज्यामुळे रुग्ण त्यांना त्रास होऊ लागल्यास स्वत:च उपचार करु शकतात.

अधिक माहितीसाठी नक्की वाचा: दूर करा प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे हे 6 गैरसमज

ही समस्या कमी करण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला या समस्येची लक्षणे आढळली तर प्रथम यूरोलॉजीस्टचा सल्ला घ्या.डॉ.रमाणी च्या एका अनुभवावरुन एक वृद्ध गृहस्थ जे ब्लेडर रीटेंशनची लक्षणे आढळून देखील ते त्यावर औषध घेत नव्हते.त्यांना एका रात्री अचानक भयानक वेदनेला सामोरे जावे लागले पुढे अशा परिस्थितीत डॉक्टरांना त्यांना कॅज्युल्टी मध्ये घ्यावे लागले.जर त्या गृहस्थांनी आधीच याबाबत औषध-उपचार सुरु केले असते तर त्यांना या वेदना टाळता आल्या असत्या.

जीवनशैलीत योग्य बदल,काही विशिष्ट सवयींमध्ये बदल व मधुमेहाला नियंत्रित केल्यास ही समस्या नक्कीच नियंत्रणात आणता येते.डॉ.रमाणी यांच्या मते यासाठी पुरुषांनी पन्नाशीनंतर त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी प्रोस्टेट चेकअप करावे.ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकता.प्रोस्टेटचा वाढलेला आकार तपासण्यासाठी सोनोग्राफी व प्रोस्टेट स्पेसिफिक अॅन्टीजन टेस्ट जरुर करा.जाणून घ्या मूत्रपरिक्षणावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

निवांत झोपेसाठी योग्य उशीची निवड कशी कराल ?

$
0
0

काही लोकांना उशी शिवाय झोपण्याची सवय असते तर काहींना उशी न घेता झोपच येत नाही.अर्थात ही सवय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असू शकते.निरनिराळ्या व्यक्तीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या उशा योग्य असतात.त्यामुळे सहाजिकच तुमच्या मनात आम्ही कोणती उशी वापरावी व अयोग्य उशीमुळे नेमकी काय समस्या होते ? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या जुनी उशी वेळेवर बदलणे का गरजेचे आहे? म्हणूनच उशीची निवड कशी करावी यावर मुंबईतील स्पेशलिटी इएनटी हॉस्पिटलचे इएनटी सर्जन अॅन्ड स्लीप अॅप्निया स्पेशलिस्टडॉ.विकास अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून  घ्या.

  • योग्य उशी का महत्वाची असते?

 शांत झोप लागण्यासाठी व श्वसन कार्य सुरळीत चालण्यासाठी  तुम्ही योग्य स्थितीत झोपणे गरजेचे असते.झोपताना मान ताठ असेल तर तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य होतो. पण जेव्हा तुम्ही अयोग्य उशी घेता तेव्हा तुमच्या मानेला आधार मिळत नाही.ज्यामुळे श्वसनमार्गात अडथळा येतो व तुम्हाला स्लीप अॅप्निया अथवा घोरण्याची समस्या निर्माण होते.यासाठी झोपताना योग्य प्रकारची उशी निवडा.उशी अगदी मऊ नसावी किंवा खूप कडक देखील नसावी.तसेच तिचा आकार देखील खूप पातळ अथवा खूप जाड नसावा.जर तुम्हाला स्लीप अॅप्निया अथवा घोरण्याची समस्या असेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेली अॅन्टी-स्नॉरींग पिलो देखील खरेदी करु शकता ज्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळेल.जाणून घ्या आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ?

  • तुमच्या खांद्याची रुंदी लक्षात घ्या-

जेवढा तुमचा खांदा रुंद असेल तेवढी रुंद व लांब उशी तुमच्यासाठी योग्य ठरेल.पुरुषांचे खांदे स्त्रीयांपेक्षा अधिक रुंद असतात त्यामुळे त्यांना स्त्रीयांपेक्षा मोठी उशी गरजेची असते.त्यामुळे योग्य स्थितीत झोपण्यासाठी या उशीमुळे तुमच्या खांदे व डोक्यामधील पोकळी भरुन निघेल.

  • उशीमधील मऊ व टणकपणा-

तुमची उशी अधिक मऊ व अधिक कडक नसेल याची जरुर काळजी घ्या.कारण जास्त मऊ उशीमुळे तुमच्या मानेला योग्य आधार न मिळाल्यामुळे तुमची झोपण्याची स्थिती बिघडून सकाळी उठल्यावर तुम्हाला मानदुखीचा त्रास होऊ शकतो.तसेच जास्त कडक उशीमुळे तुमच्या डोक्यावर जास्त दाब येतो व मानेला देखील त्रास होतो.यासाठी मध्यम मऊ-टणक असलेली उशी निवडा.

उशीचे कापड-

यासाठी सिन्थेंटीक अथवा नायलॉन उशी पेक्षा सुती कापडाची उशी निवडा कारण त्यामुळे तुम्हाला श्वास घेणे सोपे जाईल व थंडावा देखील मिळेल.मात्र असे असले तरी डॉ.अग्रवाल यांच्या मते उशीच्या सुती कापडामुळे अनेकांना अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो यासाठी तुम्ही फायबरचा वापर करु शकता.

उशीची जाडी-

जर उशी खूपच जाड असेल तर तुमची हनुवटी छातीच्या दिशेला झुकून मानेवर अधिक ताण येईल.यामुळे तुम्हाला गंभीर मानदुखीची समस्या तर होईलच शिवाय स्लीप अॅप्निया अथवा घोरण्याचा त्रास देखील होईल.त्याचप्रमाणे जर उशी खूपच कमी जाडीची असेल तर त्यामुळे तुम्हाला श्वसनमार्गात अडथळा येईल व घोरण्यासोबत झोप देखील चांगली लागणार नाही.

झोपताना पाठीवर झोपावे की कुशीवर झोपावे?

डॉ.अग्रवाल यांच्यामते पाठीवर झोपण्यापेक्षा कुशीवर झोपणे हे नेहमीच आरोग्यासाठी हितकारक असते.कारण जेव्हा तुम्ही कुशीवर झोपता तेव्हा तुमची मान ताठ रहाते व तुमच्या श्वसनमार्ग खुला रहातो त्यामुळे तुम्हाला झोपल्यावरही पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो.पण जर तुम्ही पाठीवर झोपला तर झोपेत तुमची जीभ पाठच्या दिशेने झुकते व तुम्हाला घोरण्याची समस्या निर्माण होते.त्याचप्रमाणे नेहमी कुशीवर झोपल्याने तुमचे पचन देखील चांगले होते.हे नक्की वाचा डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ’7′कारणांमुळे स्त्रियांच्या पेल्विक भागात वेदना जाणवतात !

$
0
0

महिलांमध्ये मासिकपाळीच्या काही दिवस आधी ओटीपोट दुखणे हे एक सामान्य लक्षण आहे.मात्र जर तुम्हाला ओटीपोटात सतत वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.कारण या वेदना पेल्विक इनफ्लैमटरी डिसिस चे लक्षण देखील असू शकतात.काही वेळा अशा वेदनांचे कारण जेनीटल टीबी असणे देखील असू शकते.

गुरगावच्या वेल वुमॅन क्लिनीकच्या डायरेक्टर,कन्सल्टंट गायनेकॉलॉजीस्ट अॅन्ड ऑब्स्टिट्रिशन डॉ.नूपुर गुप्ता यांच्यामते या समस्येवर स्वत:च ओटीसी औषधे घेण्यापेक्षा तुमच्या गायनेकालॉजीस्टचा सल्ला घेणे जरुरी आहे.या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

१.पेल्विक इनफ्लैमटरी डिसिस-

हा रोग प्रामुख्याने पेल्विक भागातील बॅक्टेरियल इनफेक्शन मुळे होतो.ज्याचा प्रभाव गर्भाशय,फेलोपियन ट्यूब,अंडाशय या अवयवांवर होतो.या विकारात बॅक्टेरिया योनीमार्गातून या प्रजनन अवयवांपर्यंत पोहचतात व त्यामुळे ओटीपोटात वेदना होऊ लागतात.या विकाराची अॅबनॉर्मल व्हर्जायनल डिस्चार्ज अथवा लघवी करताना वेदना,मासिकपाळीत पोटात क्रॅम्स येणं व पाठदुखी ही लक्षणे आहेत.

२.पेल्विक इनफेक्शन-

सेक्शुअली ट्रान्समिटेड इनफेक्शन व प्रजननमार्गातील इनफेक्शन मुळे पेल्विक इनफेक्शन होते.यामुळे पेल्विक भागातील स्नायू किंवा सांधे कमजोर होतात त्यामुळे ओटीपोटात वेदना होऊ लागतात.या इनफेक्शनची लक्षणे सेक्स करताना वेदना,सतत पोटातील आतड्यांना इनफेक्शन होणे,ओटीपोटात अस्वस्थता व मूत्राशयावर दाब आल्यासारखे वाटणे ही असतात.vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !

३. Endometriosis-

या स्थितीत गर्भाशयाच्या आतील अस्तराच्या पेशी इतर अवयवांपेक्षा म्हणजे अंडाशय व मूत्राशयापेक्षा वेगाने वाढू लागतात.यामुळे वंधत्व येते,हॉर्मोनल समस्या निर्माण होतात.या विकारावर उपचार करता येतात.याची प्रमुख लक्षणे आतड्यांमध्ये तीव्र वेदना,मासिक पाळीत स्पॉटींग होणे,मासिक पाळीत अथवा आधी तीव्र पेटके येणे,गुदाशयातून रक्तस्त्राव व लघवी करताना वेदना होणे ही असतात.

४.आयबीएस-

ओटीपोटातील वेदना ही प्रजनन अवयवांमध्ये अथवा मूत्रमार्गातील बिघाडामुळे होऊ शकते.मात्र कधीकधी ही समस्या तुमच्या आतड्यांमधील इरीटेबल बोवल सिन्ड्रोम  मुळे देखील असू शकते.डायरिया,पोटदुखी,पोटफुगणे ही त्यामागची प्रमुख कारणे असू शकतात.

५. युरीनरी ट्रॅक इनफेक्शन-

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मूत्रमार्गाचे इनफेक्शन अधिक प्रमाणात आढळून येते.ब-याच महिलांना या इनफेक्शनमुळे पोटात वेदना होऊ शकतात हे देखील माहित नसते.हे इनफेक्शन झाल्यास सतत लघवीला होणे,लघवी करताना वेदना व जळजळ होणे,लघवीचा रंग,सुसंगता बदलणे,लघवीतूव दुर्गंध येणे,पाठदुखी या समस्या होतात.लिंबूपाणी – Urinary tract infections चा त्रास टाळण्याचा घरगुती उपाय

६.जेनीटल टीबी-

गर्भाशय किंवा योनीमार्ग या प्रजनन अवयवांना बॅक्टेरियाचे संक्रमण झाल्याने हा विकार होतो.या विकाराचे लक्षण पेल्विक भागात तीव्र वेदना,कंबरदुखी,लघवी करताना वेदना होणे व रक्त येणे ही असू शकतात.

७.चुकीच्या जागी गर्भधारणा ectopic pregnancy-

जेव्हा गर्भधारणा गर्भाशया ऐवजी इतर ठिकाणी होते तेव्हा त्याला ectopic pregnancy असे म्हणतात.या समस्येमध्ये कधीकधी गर्भधारणा फेलोपाईन ट्यूबमध्ये होते.यामुळे आतडी,मूत्राशय,अंडाशय यावर याचा परिणाम होतो.यामुळे पेल्विक भागात रक्त देखील जमा होतो.या समस्येमध्ये ओटीपोटात वेदना,लूज मोशन,अस्वस्थता व ताप ही लक्षणे आढळतात.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

Viewing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>