Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

Glaucom म्हणजेच काचबिंदूच्या समस्येबाबत खास एक्सपर्ट सल्ला !

$
0
0

डोळ्यातील अंतर्दाब वाढल्यामुळे काचबिंदू होण्याची शक्यता वाढते.काचबिंदू विषयी अनेक समज-गैरसमज असतात.डोळ्यांवर अंतर्दाब येणे म्हणजे काय? त्यावर काय उपचार करण्यात येतात? काचबिंदूचा धोका कमी करण्यासाठी काय करावे? अशा अनेक शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

नवी मुंबईच्या अॅडव्हान्स आय हॉस्पिटलचे (Glaucoma and Cataract) कन्सल्टंट डॉ.राजेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊयात डोळ्यांवरील अंतर्दाब व काचबिंदूविषयी ही महत्वाची महिती.

  • आय प्रेशर म्हणजे काय ?

आय प्रेशर म्हणजे नेत्रदलाचा दाब जो पा-याच्या मिलीमीटर(mm Hg) मध्ये मोजण्यात येतो.जर तुमच्या डोळ्यांमधील अंतर्दाब १२-२२ mm Hg इतका असेल तर तो सामान्य असतो.डोळ्यामधील हा अंतर्दाब टोनोमेट्रीच्या सहाय्याने मोजण्यात येतो.ही काचबिंदू तपासणीसाठी करण्यात येणारी एक टेस्ट असते.जाणून घ्या डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

डोळ्यांमधील अंतर्दाब वाढला तर काय होते?

डोळ्यांमधील दाब २२ mm Hg पेक्षा अधिक असेल तर ते ऑक्युलर हायपरटेंशन अथवा काचबिंदूचे लक्षण असू शकते.जर एखाद्या व्यक्तीचा डोळ्यांमधील दाब सामान्य दाबापेक्षा अधिक असेल व त्यामध्ये काचबिंदूची कोणतीही लक्षणे आढळत नसतील तर ते ऑक्युलर हायपरटेंशनचे एक लक्षण असू शकते.त्याचप्रमाणे जर डोळ्यांमधील अंतर्दाब जास्त असेल व काचबिंदूची लक्षणे देखील आढळत असतील तर त्याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.हे नक्की वाचा डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजकअन महत्त्व पूर्ण गोष्टी !

डोळ्यांमधील अंतर्दाबामुळे अंधत्व येऊ शकते का?

डोळ्यांमधील दाब नेहमीपेक्षा खूप जास्त असेल तर अंधत्व येण्याची शक्यता असते.कारण त्यामुळे ऑप्टिकल मज्जातंतूचे नुकसान होते व जे पुन्हा बरे करता येत नाहीत.अशा परिस्थितीत प्रथम त्या व्यक्तीच्या गौण दृष्टीवर परिणाम होतो या दृष्टीमध्ये हळूहळू बदल झाल्यामुळे तो बदल लवकर लक्षात येत नाही.जर लवकर निदान झाले नाही तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या मध्य दृष्टीवर परिणाम होतो व ही दृष्टी कमी कमी होत पुर्ण अंधत्व येते.पण काचबिंदूचे लवकर निदान झाले तर त्यावर औषधे व शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात.त्यामुळे अंधत्व येण्याची समस्या पुढे ढकलता येते.

डोळ्यांमधील अंर्तदाब कमी असल्यास काचबिंदूचा धोका असू शकतो का?

डोळ्यांमधील अंर्तदाब २१ mm Hg पेक्षा कमी असणे हे सामान्य असले तरी जाड व ताठ कॉर्नीया मुळे त्यात चुकीचा बदल दर्शविला जाऊ शकतो.ऑक्युलर हायपरटेंशन ट्रिटमेंट स्टडीनूसार ज्या लोकांमध्ये जाड कॉर्नीयासह डोळ्यांमधील अंर्तदाब २४ mm Hg असतो त्यांना सामान्य कॉर्नीया असलेल्या लोकापेक्षा काचबिंदू होण्याचा धोका अधिक असू शकतो.

उदा.ज्या लोकांचा कॉर्नीया सामान्य असतो (say 400µ) त्यांच्या डोळ्यांमधील अंर्तदाब २० mm Hg दाखवला जातो पण वास्तवात तो २७ mm Hg असू शकतो.जो सामान्य दाबापेक्षा अधिक असतो.त्याचप्रमाणे दर कॉर्नीया जाड असेल (say ६00µ) आणि डोळ्यांचा अंर्तदाब १८ mm Hg असेल तर वास्तवात तो दाब १२ mm Hg असू शकतो.तुमचे डॉक्टर यासाठी तुम्हाला पॅचीमेस्ट्री टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.ज्यामुळे तुमच्या कॉर्नीयाची जाडी व तुमच्या डोळ्याचा अंर्तदाब लक्षात घेऊन तुमच्यावर योग्य उपचार करण्यात येतात.जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार

डोळ्यांमधील दाब वाढण्याची पुर्व लक्षणे काय असतात?

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या काचबिंदूची समस्या आहे यावर डोळ्यांचा दाब वाढण्याची लक्षणे अवलंबून असतात.ओपन अॅगल ग्लूकोमा यात कोणतीही लक्षणे आढळत नाहीत कारण या समस्येमध्ये कोणतीही वेदना अथवा त्रास न होता ऑप्टीकल मज्जातंतू प्रभावित होतो.या समस्येमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत जोपर्यंत ऑप्टिकल मज्जातंतू मध्ये पुर्ण बिघाड होत नाही व गौणदृष्टी जात नाही तोपर्यत ही लक्षणे समजून येत नाहीत.तर याउलट अॅगल क्लोजर ग्लूकोमामध्ये पहिल्या टप्पात दृष्टी धुसर होते.त्यानंतर या समस्येमध्ये वाढ झाल्यास दीर्घ काळासाठी दृष्टी अंधूक होणे,डोळ्यांमध्ये वेदना होणे,डोळ्यांसमोर प्रकास दिसणे,डोळे लालसर होणे व उलटी ही लक्षणे आढळतात.दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतात ही ’14′ कारणंं !

  • या समस्येचे निदान कसे करतात?

नियमित केल्या जाणा-या शारीरिक तपासणीमध्ये नेत्रचिकित्सकांकडून डोळ्यांचा अंर्तदाब तपासून या समस्येचे निदान करता येते.तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला काचबिंदू असण्याची शंका आली तर ते तुम्हाला ग्लूकोमा स्पेशलिस्टकडे पुढील निदानासाठी जाण्याचा सल्ला देतात.

  • काचबिंदूवर काय उपचार केले जातात?

काचबिंदू पुर्ण बरा करता येत नाही पण डोळ्यांच्या दाबावर नियंत्रण आणून ऑप्टिकल मज्जातंतूंमधील अधिक बिघाड थांबविता येऊ शकतो.तुमच्या स्थितीवरुन डॉक्टर तुम्हाला औषधे(आय ड्रॉप) घेण्याचा सल्ला देतात.जी औषधे तुम्हाला दररोज घ्यावी लागतात.किंवा ते तुम्हाला शस्त्रक्रिया अथवा लेझर ट्रिटमेंट करण्याचा सल्ला देतात.जरूर वाचा: आयड्रॉप्स घालताना ही काळजी नक्की घ्या !

हाय आय प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काही टीप्स आहेत का?

आहारात हिरव्या पालेभाज्या व मासे यासारखे ओमेगा ३ फॅटी अॅसिड वाढवून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य जपू शकता.पण काचबिंदूवर पूर्ण प्रतिबंध करता येत नाही.असे असले तरी ओपन अॅगल ग्लूकोमामध्ये डोळ्यांमधील अंर्तदाब मात्र नियमित व्यायामाने कमी करता येतो.जाणून घ्या डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6  सुपरफुड्स !

यासाठी या टीप्स जरुर करा-

  • कॅफेन पेय कमी प्रमाणात घ्या कारण कॅफेनमुळे डोळ्यांमधील दाब वाढतो.

  • दिवसभरात काही तासांनी द्रवपदार्थांचे सेवन करा.कारण एकाच वेळी भरपूर पेय घेतल्याने डोळ्यांमध्ये तात्पुरता दाब निर्माण होतो.

  • झोपताना २० डिग्रीवर अंश कोनात तुमचे डोके वर उचलले जाईल अशी उशी घ्या.त्यामुळे डोळ्यांवर जास्त दाब येणार नाही.

  • तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व आय ड्रॉप्स वेळेवर घ्या ज्यामुळे तुमची समस्या अधिक बळावणार नाही.

(नक्की वाचा : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ’7′ सवयी दूर ठेवा)

डोळ्यांमधील अंर्तदाब सामान्य रहाण्यासाठी काय कराल?

डोळ्यांमधील दाब वाढणे हे काचबिंदू होण्यामागचे एकमेव कारण नाही पण त्यामुळे काचबिंदू ही समस्या अधिक गंभीर होते.त्यामुळे जर तुमच्या डोळ्यामधील अंर्तदाब जास्त आहे असे निदान झाले तर नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्या.

हिरवळीवरून चालणे कसे ठरते डोळ्यांसाठी फायदेशीर ? हे तुम्हांला ठाऊक आहे का

जवळचे दिसणे सुकर करेल हे ’5′ घरगुती उपाय

Reference 1. Kass, M. A. (1994). The ocular hypertension treatment study. Journal of glaucoma, 3(2), 97-100.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


दातांच्या आरोग्याबाबत या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

$
0
0

तुम्ही तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी नियमित दोन वेळा दात घासता व वरचेवर फ्लॉस देखील करता.पण ओरल हेल्थसाठी फक्त ऐवढेच करुन चालणार नाही.खरेतर यासाठी लहानपणीच दातांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक असते.यासाठी आतापासूनच तुमच्या मुलांच्या दातांची योग्य स्वच्छता राखा.

मथुरा येथील नयाती हॉस्पिटलच्या डेन्टीस्ट्री विभागाच्या कन्सल्टंट अॅन्‍ड इनचार्ज डॉ.स्वाती अरोरा यांच्याकडून जाणून घेऊयात दातांच्या स्वच्छतेबाबत महत्वाचा हा सल्ला.

१.तुमच्या मुलांच्या दूधाच्या दातांची व्यवस्थित काळजी घ्या-

लहानपणीच मुलांच्या दूधाच्या दातांची नीट काळजी न घेतल्यास ते लवकर किडतात व पडतात ज्यामुळे मुलांना तीव्र वेदनेला सामोरे जावे लागते.दूधाचे दात वेळे आधीच पडल्याने कायमचे दात व्यवस्थित येत नाहीत.दूधाच्या दातांमुळे नैसर्गिकपणे कायम दात येण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी होत असते.त्यामुळे मुलांचे दूधाचे दात जरी पडणारच असले तरी वेळीच त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !

२.चांगल्या टुथपेस्टची निवड करा-

टुथपेस्ट निवडताना त्यामध्ये फ्लोराईड घटक असलेली टुथपेस्टच निवडा.कारण फ्लोराईड घटक असलेल्या टुथपेस्टमुळे दातांचे किडण्यापासून सरंक्षण होते.त्याचबरोबर जर तुम्हाला टुथपेस्टमध्ये व्हाईटनींग,टार्टर कंन्ट्रोल,गम केअर,डिसेंसिटाईजींग असे घटक हवे असतील तर त्यासाठी तुमच्या डेटीस्टचा सल्ला जरुर घ्या.कारण त्यांना याबाबत अधिक चांगले ज्ञान असते.ज्या टुथपेस्टची चव तुम्हाला योग्य वाटेल अशीच टुथपेस्ट निवडा.टुथपेस्ट जेल असो की पेस्ट दोन्हीही समान कार्य करतात.जर तुम्हाला टुथपेस्ट लावल्यावर काहीही त्रास जाणवला तर ती टुथपेस्ट त्वरीत बदला.

३.जर दात तुटला तर काय कराल?

ब-याचदा मुले खेळताना पडतात.अशावेळी त्यांना केवळ जखमच होत नाही तर कधीकधी त्यांचा दात देखील मुळापासून निखळला जातो.लक्षात ठेवा असे झाल्यास त्यांचा दात लगेच फेकून देऊ नका.कारण जर दात चांगल्या स्थितीत असेल तर तो परत त्या जागी लावता येऊ शकतो.मुलाकडून दात गिळला जाण्याची शक्यता वाटत असेलत तर तो काढून थंड दूधात ठेवा.अशा वेळी परिस्थिती काही तासांसाठी खूप कठीण होऊ शकते.त्यामुळे मुलाला घेऊन त्वरीत डेंटीस्टकडे जा.जाणून घ्या बाळाच्या दातांचे आरोग्य जपण्यासाठी घ्यायची काळजी आणि उपचार !

४.दात काढल्यामुळे दृष्टीवर परिणाम होत नाही-

पुर्वीपासून असा एक समज आहे की वरचे दात हे डोळ्यांचे दात असतात.औषधे अथवा अॅन्टीबायोटीक्सचा शोध लागण्यापुर्वी वरच्या दाताला इनफेक्शन झाल्यास त्याचे संक्रमण दात व चेह-याला होऊन अंधत्व येत असे.पण दात काढण्याचा व दृष्टीचा काहीच संबध नसतो.फक्त दात काढताना वेदना जाणवू नयेत यासाठी तीन ते चार तास दात व चेह-याच्या काही भागाला भूल देऊन बधीर करण्यात येते.हे ही वाचा लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?

५.स्केलींग अथवा दात स्वच्छ केल्यामुळे ते कमजोर होत नाहीत-

स्केलींगमुळे दात कमजोर होत नाहीत.हिरड्यांमध्ये बिघाड झाला असेल तरच दात कमजोर होतात.डेस्टीस्ट दात स्वच्छ करताना दातांवरील चढलेला कठीण भाग काढून टाकतात त्यामुळे दातांच्या एनॅमलला कोणताही बसत नाही.स्केलींगनंतर काही काळ सौम्य संवेदना जाणवतात पण ते सामान्य असते.

६.ब्रेसेस पौढांसाठी देखील असतात-

तुम्ही तुमच्या दातांचे आरोग्य व तुमचे सुंदर हास्य कोणत्याही वयात सुधारु शकता.चुकीचे व वाकडेतिकडे दात,तोडांच्या जबडयाचा चुकीचा आकार,दात किडणे,हिरड्यांच्या समस्या यामुळे तुमच्या हास्यावर परिणाम होतो.मात्र आजकाल आधुनिक दंतचिकित्सेमध्ये पौढांसाठी देखील मेटल ब्रेसेस,सिरॅमिक ब्रेसेसचे पर्याय उपलब्ध आहेत.तसेच मुलांना ब्रेसेस लावण्यांपूर्वी या गोष्टी नक्की जाणून घ्या

७.दर सहा महिन्यांनी तुमच्या डेटिस्टकडे जा-

दातांच्या समस्येवर वेळीच उपचार झाले तर त्याचा त्रास,वेदना व खर्च कमी होतो.दातांच्या उपचारांसाठी लेझर गम रिशेपींग,गम डीपिगमेंटेशन,लेझर टुथ व्हाईटींग या गोष्टी कॉस्मेटीक डेटीस्ट्रीमध्ये उपलब्ध असतात.जाणून घ्या रूट कॅनलबद्दल तुमच्या मनातील हे ’10′ गैरसमज दूर करा !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

किडनी विकाराच्या रुग्णांसाठी ११ डाएट टीप्स

$
0
0

नॅशनल किडनी फांऊडेशननूसार दहा पैकी एका रुग्णाला किडनी स्टोनची समस्या असते तर एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोकांना किडनी विकार असतात.किडनी विकार हा सायलेंट विकार असल्याने त्याची लक्षणे लवकर आढळत नाहीत.पण असे असले तरी आहारात काही सोपे बदल करुन किडनी विकार असलेले रुग्ण देखील निरोगी आयुष्य जगू शकतात.किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !

किडनी विकार असलेल्या रुग्णांनी या ६ डाएट टीप्स पाळाव्या-

डायटीशन व न्यूट्रीशनीस्ट डॉ.नेहा सनवाल्का यांच्या मते काही पदार्थ किडनीसाठी खूप उपयुक्त असतात.त्यामुळे निरोगी किडनीसाठी हे पदार्थ नियमित खाणे गरजेचे आहे.तसेच जरी एखाद्या व्यक्तीला अगोदरच किडनी विकार असेल तरी या पदार्थांच्या सेवनाने त्याच्या किडनीवर शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा भार कमी होऊ शकतो.यासाठी किडनी विकार असलेल्या रुग्णांनी सोडीयम,पोटॅशियम व अॅनिमल प्रोटीन कमी प्रमाणात असलेले पदार्थ आहारात कमी घ्यावेत.

१.पौष्टिक आहार घ्या-

योग्य प्रमाणात व चांगल्या दर्जाचे प्रोटीन आहारात असणे गरजेचे आहे.खाद्यपदार्थांच्या लेबलवर सोडीयम,पोटॅशियम व फॉस्फरसचे दिलेले प्रमाण पाहूनच ते पदार्थ खरेदी करा.तसेच आहारात प्रोटीन समाविष्ट करण्यापुर्वी तुमच्या आहारतज्ञाचा सल्ला जरुर घ्या.

२.डायटीशन चा सल्ला घ्या-

किडनी विकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाब,ह्रदयविकार व मधुमेह असण्याची शक्यता अधिक असते.यासाठी प्रथम आहारतज्ञाचा सल्ला घ्या जे तुम्हाला तुमच्या आरोग्य स्थितीनूसार तुमचा आहार नियोजित करण्यासाठी मदत करतील.

३.लिचींग प्रक्रियेने तयार केलेल्या भाज्या निवडा-

किडनी विकाराच्या रुग्णांसाठी भाज्यांमधील सोडीयम,पोटॅशियम व फॉस्फरस हे घटक कमी करण्यासाठी त्या लिचींग प्रक्रियेने शिजवणे गरजेचे असते.यासाठी कोमट पाण्यात कापलेल्या भाज्या २-३ तास बूडवून ठेवा.त्यानंतर ते पाणी काढून टाका व त्या भाज्या स्वयंपाकासाठी वापरा.

४.योग्य प्रमाणात पाणी प्या-(हिवाळ्यात देखील)

किडनीवरील ताण कमी करण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.तुम्ही जितके अधिक पाणी पिता तितकी अधिक लघवी तुमच्या शरीरात निर्माण होते.सहाजिकच त्या लघवी सोबत शरीरातील विषद्रव्ये देखील बाहेर टाकली जातात.त्यामुळे तुमच्या किडनीवरचा भार कमी होतो व किडनी समस्या होण्याचा धोका देखील कमी होतो. जरुर वाचा लिंबूपाणी- ‘किडनीस्टोन’ची समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय !

५.आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ समाविष्ट करा-

ज्या लोकांना सतत किडनी इनफेक्शन होते त्यांनी आहारात फळे,ताज्या भाज्या,दूध व दूधाचे पदार्थ,ताज्या पाण्यातील मासे असे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाणे गरजेचे असते.

  • भाज्या- लाल भोपळी मिरची,कोबी,फ्लॉवर,कांदा

  • मसाले- लसूण

  • फळे- सफरचंद,पेरु,पेर,पपई,अननस

  • नॉन- व्हेज पदार्थ-ताज्या पाण्यातील मासे व अंड्यातील पांढरा भाग

६-कॅल्शियमयुक्त पदार्थ पुर्ण बंद करु नका-

काही लोकांना अशी भीती वाटते की कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्याने कॅल्शियम सॉल्टमुळे किडनी स्टोनची समस्या निर्माण होईल.लक्षात ठेवा कॅल्शियमयुक्त पदार्थांमुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याचा धोका वाढत नाही.उलट कॅल्शियमला प्रतिबंध केल्यामुळे स्टोन होण्याची शक्यता वाढते.कारण कॅल्शियममुळे ऑक्सलेटचे शोषण कमी होते.

किडनी विकार असलेल्या रुग्णांनी आहारात हे ५ पदार्थ खाणे टाळावे-

डॉ.नेहा सनवाल्का यांच्या मते किडनीचे प्रमुख कार्य शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे व शरीरातील इलेक्ट्रोकेमिकलचे सतुंलन राखणे हे असते.यासाठी किडनी विकार असणा-या रुग्णांनी सोडीयम,पोटॅशियम,फॉस्फरस,प्रोटीन व द्रवपदार्थ कमी असलेला आहार घेणे गरजेचे असते.

१.सोडीयम असलेल्या पदार्थांपासून दूर रहा-

सोडीयम घटक असलेले पदार्थ खाल्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. ज्याचा दाब तुमच्या किडनीवर पडतो.त्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.यासाठी ज्या लोकांना किडनी विकार आहेत त्यांनी सोडीयम असलेले पदार्थ खाऊ नयेत. मीठ, बेकींग पावडर, सोडा-बायकार्बोनेट, कॅन्ड फू़ड, चीज,बकॉन, हॅम सॉसेजस, मटण, यीस्ट, सॉल्टेड चीप्स, बिस्किट, नट्स, पॉपकॉर्न, पापड, लोणचे, कमर्शियल सलाड ड्रेसिंग, शितपेय, सोडीयम बेन्झॉनेट असलेले पदार्थ,सूप क्युब्स,हेल्थ ड्रींक,कोका,एमएसजी व पुडींग मिक्स यामध्ये सोडीयम असते.

२.पोटॅशियम अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा-

किडनीद्वारे शरीरातील टॉक्सिन्स,सोडीयम,पोटॅशियम,फॉस्फरस ही मिनरल्स हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.जर तुम्ही किडनी विकाराने ग्रस्त असाल व तुम्ही पोटॅशियमयुक्त असलेले पदार्थ खाल्ले तर तुमच्या किडनीच्या कार्यावर अधिक भार येतो. ज्यामुळे किडनी कमजोर होते व परिणामी टाकाऊ पदार्थांचा योग्य निचरा होत नाही.यासाठीराजगिरा, कोथिंबिरीची पाने, शेवग्याची पाने, पालक, कोलोकॅसिया, बटाट, रताळे, टॅपिओका, यम, शेवग्याच्या शेंगा, हिरवा पपई, सर्व प्रकारची फळे व फळांचा रस(पेअर,सफरचंद,पियर,पपई,अननस वगळून), नट्स, गुळ,ब्राऊन शूगर, इन्संट कॉफी, चॉकलेट, कोका पावडर असे पोटॅशियम अधिक प्रमाणात असलेले पदार्थ खाणे टाळा.

३.फॉस्फरस अधिक असलेले पदार्थ आहारातून कमी करा-

आपण खात असलेल्या जवळजवळ सर्वच पदार्थांमध्ये फॉस्फरसचे घटक असतात.मात्र ज्या लोकांना किडनी विकार आहेत त्यांनी फॉस्फरस घटक असलेले पदार्थ आहारातून कमी करणे गरजेचे असते.कारण अशा पदार्थांमुळे किडनीवर दाब येतो व किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही.यासाठी दूध,दही,मटण,पोल्ट्री पदार्थ,मासे,गुळ,डाळी,केळी,पेरु,कोला असे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा.

४.ऑक्सलेट पदार्थ कमी करा-

पालक,शेंगदाणे,सीड्स,धान्ये,शिंबी,बीट,चॉकलेट,टोमॅटो व रताळे या पदार्थांमध्ये ऑक्सलेट घटक असतात.ऑक्सलेट घटकांमुळे मूत्राशयात मूत्र निर्माण होताना कॅल्शियम क्रिस्टल किंवा स्टोन तयार होतात.जर असे पदार्थ तुमच्या आहारात असतील तर तुमची किडनी समस्या अधिक बळावू शकते. टोमॅटो खरचं वाढवते ‘किडनी स्टोन’ची समस्या ?

५.तुमच्या प्रोटीन घटकांवर नियंत्रण ठेवा-

ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे अशा लोकांनी सीफू़ड,मटण किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे.कारण या घटकांमुळे युरीक अॅसिड वाढते ज्यामुळे युनीक अॅसिड स्टोन तयार होण्याची शक्यता अधिक असते.

डॉ.नेहा यांच्या मते किडनी विकार असलेल्या लोकांच्या जीवनात ते काय आहार घेतात हे खूप महत्वाचे असते.मात्र असे असले तरी आहारातील बदलांसोबत अशा रुग्णांनी त्यांच्या जीवनशैलीत देखील काही सकारात्मक बदल करणे अपेक्षित असते.

सर्वात महत्वाची गोष्ट आहार निवडताना न्यूट्रिशनीस्ट अथवा डायटीशनचा सल्ला जरुर घ्या.कारण ते तुम्हाला तुमच्या किडनी विकाराच्या स्थितीनूसार योग्य व निरोगी डाएट प्लॅन करण्यास मदत करु शकतात.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

काश्याच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे !

$
0
0

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ  कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणी खर्चिक अपॉईन्टमेंटस घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या ‘पादाभ्यंग’ या सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणं शक्य असलेल्या तितक्याच प्रभावी उपचारपद्धतीबाबत नक्की जाणून घ्या.

पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरात हमखास दिल्या जाणार्‍या काश्याच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे. पादाभ्यांग / पायाला मसाज करताना  काश्याच्या वाटीचा कशाप्रकारे वापर करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत  मुंबईतील आयुर्वेदीक वैद्य डॉ. परीक्षित शेवडे ( आयुर्वेद MD)  यांनी खास सल्ला  दिला आहे.

  • काशाची वाटी म्हणजे काय ?

कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेला कांस्य या धातूपासून काश्याची वाटी बनवली जाते. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे ! जाणून घ्या.

  • काश्याच्या वाटीने मसाज का कारावा ?

 

शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काश्याची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेल, तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला / उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोकं, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोष, आजार वाढण्याची शक्यता बळावते.

  1. काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.
  2. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. शरीरात थंडावा वाढतो.
  3. डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणं फायदेशीर ठरते. नक्की वाचा सकाळी हिरवळीवर चालण्याचे ’5′ फायदे !
  4. त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो.
  5. पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.
  • काश्याच्या वाटीने मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ?

 

काश्याच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तूपाचा वापर करणे आवश्यक आहे. तूपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तीळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. पायाला पडलेल्या भेगा करण्यासाठी भिंडेल किंवा कोकमाचे तेल फायदेशीर ठरते.

  • काश्याच्या वाटीने मसाज करण्याची योग्य वेळ कोणती ?

 

रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरात थंडावा निर्माण होऊन शांत झोप मिळण्यास मदत होते. यासोबतच सकाळी आंघोळीपूर्वी अर्धा तासदेखील मसाज करणे फायदेशीर ठरते.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

या ‘५’आयुर्वेदीक टीप्सने लवकर येणारा मेनोपॉज रोखा !

$
0
0

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाय वळतात, पोटात दुखत, मूड स्विंग्स होतात. हे सगळं आपण प्रत्येक महिन्यात सहन करतो. त्यामुळे काही वेळेस मासिकपाळी आल्यानंतर आपली चिडचिड होते तर ते येण्यास उशीर झाला तर आपण चिंता करतो. खरंतर मासिक पाळीचे हे चक्र आपण तरुण, आरोग्यदायी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या फर्टिलिटीचे लक्षण आहे. मासिकपाळी दरम्यानच्या वेदना घालवण्याचा नैसर्गिक उपाय

परंतु आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेक स्त्रियांना खूप लवकर मोनोपॉजला सामोरे जावे लागते. योनीमार्गाचा कोरडेपणा, सेक्सची इच्छा कमी होणे किंवा मासिक पाळी न येणे या मेनोपॉजच्या लक्षणांचा काहींना ५०शीत तर काहींना ३०शी नंतर अनुभव येतो. मेनोपॉजमुळे इन्फेर्टिलिटी बरोबरच हाडं, हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. परिणामी  osteoporosis आणि strokes होण्याची संभावना असते. मेनोपॉजच्या टप्प्यावर स्त्रियांमध्ये वाढतो या 5 गोष्टींमुळे ह्रदयविकाराचा धोका

धन्वंतरी केरला आयुर्वेदा च्या आर्युर्वेदिक फिजिशियन डॉ. नम्रता पवार यांच्या सल्ल्यानुसार या समस्येचा सामना करण्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीत काही खास बदल करण्याची गरज आहे. लवकर येणाऱ्या मेनोपॉजला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी या ५ गोष्टी सांगितल्या. मोनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये वाढतो या ’3′ समस्यांचा धोका

1. नृत्य करा: डॉ. पवार यांनी मासिकपाळीचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी अतिशय मस्त उपाय सांगितला. तो म्हणजे डान्स. आणि त्यासाठी नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची गरज नाही. मस्त गाणी लावा आणि तुम्हाला हवा तसा डान्स करा. रक्तप्रवाह सुधारण्याचा डान्स हा उत्तम पर्याय आहे. तसंच डान्समुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो.

2.व्यायाम: व्यायामाचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. त्यामुळे झोपेचा मोह जरा आवरता घ्या आणि लवकर उठा. चांगल्या आरोग्यासाठी अर्धा तास व्यायाम करा. तुम्ही squats, जॉगिंग करू शकता. किंवा नियमित योगासने करा. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.

3. आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करा: डॉ. पवार यांच्या सल्ल्यानुसार स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव होण्यास तिळाच्या तेलाचा फायदा होतो.  म्हणून तिळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. मासिक पाळीचे अनियमित चक्र सुरळीत करण्यासाठी तिळाचे तेल उपयुक्त ठरते. ४०शी नंतर स्त्रियांमध्ये वाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे oestrogen ची पातळी कमी होते. परिणामी हाडं कमकुवत होतात, त्वचा कोरडी होते आणि मेनोपॉज लवकर येतो. वात कमी करण्यासाठी तिळाचे तेल उत्तम आहे. तसेच त्यामुळे सांध्याचे आरोग्य राखण्यास मदत होते. असे डॉ. पवार यांनी सांगितले. तीळाच्या तेलाचे ’9′ आरोग्यवर्धक फायदे !

4. ताणमुक्त रहा: ताणामुळे आरोग्याच्या साध्या समस्यांना देखील गंभीर स्वरूप प्राप्त होते. काम करणाऱ्या स्त्रियांपासून गृहिणींपर्यंत सगळ्यांना कोणतीतरी चिंता, काळजी असतेच. डॉ. पवार यांच्या सल्ल्यानुसार यावर मात करण्यासाठी योगसाधना, प्राणायाम करणे योग्य ठरेल. वज्रासन, शवासन यांसारखी आसने आणि भ्रामरी, अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारखे ताणमुक्त करणारे प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. ताणमुक्त राहण्यासाठी करा अधो मुख श्वानासन !

5. संतुलित आहार: आहारात phytoestrogens ने युक्त अशा सोयाबीनचा समावेश करा. तसंच तीळ, अक्रोड चे सेवन करा. काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात रहा. शिमला मिरची, बीट, जांभळा कोबी, गाजर, टोमॅटो यांसारख्या अँटिऑक्सिडंटने युक्त अशा भाज्या आहारात समाविष्ट करा. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर या भाज्या देखील फायदेशीर आहेत. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली खाणं खरंच सार्‍यांंसाठी आरोग्यदायी आहे का ?

तुम्हाला देखील लवकर मेनोपॉज येण्याची भीती असेल तर तुमच्या दैनंदिन आयुष्यात हे लहानसे बदल नक्की करून बघा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

आयुर्वेदानुसार मधाबरोबर हे ‘४’पदार्थ घेणे ठरते हानीकारक !

$
0
0

मध कोणाला आवडत नाही? त्यात नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये घालून तुम्ही मध घेऊन शकता. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते. शुद्ध आणि भेसळयुक्त मधातील फरक ओळखा अन वेळीच धोका टाळा !

ताडदेव येथील  Dr. Vaidya’s New Age Ayurveda चे certified ayurvedic medical practitioner डॉ. सूर्या भगवती आणि The Ayurvedic Village चे डॉ. तुळशीदास यांनी मधासोबत कोणते पदार्थ घेऊ नये याबाबत मार्गदर्शन केले. मधुमेहींनी साखरेऐवजी ‘मध’ खावे का ?

1. तूप आणि मध सम प्रमाणात घेऊ नका:

डॉ. भगवती यांच्या सल्ल्यानुसार मध आणि तूप सम प्रमाणात घेणे टाळावे. कारण ते एकत्रित घेणे योग्य ठरणार नाही. हनी-ओट्स कूकीज किंवा मफिन्स यांसारख्या पदार्थांमध्ये मधासोबत कॅलरिफाइड बटर घातले जाते. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आयुर्वेदाचार्य Acharya Charaka यांनी देखील तूप आणि मध एकत्रित घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. परंतु, तूप आणि मध सम प्रमाणात न घेणे योग्य ठरू शकते. म्हणजे २:१ हे प्रमाण चालू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. आलं व मध – ‘सायनस’वर गुणकारी घरगुती उपाय !

2. मुळा आणि मध:

आयुर्वेदानुसार मुळा आणि मध एकत्र केल्यास विषारी कंपाऊंड तयार होतं. डॉ. तुळशीदास यांनी हे कॉम्बिनेशन हानीकारक असल्याचे सांगितले आहे. म्हणून यापुढे सलाड मध्ये मध घालताना त्यात मुळा नसेल याची खात्री करा. तुळस, आलं व मध – अपचनाचा त्रास कमी करणारे घरगुती चाटण

3. मांसाहार आणि मध:

अलीकडे सामान्यपणे रोस्टेड मासांहारी पदार्थांवर मध घालून खाण्याचा ट्रेन्ड आहे. डॉ. तुळशीदास  यांच्या सल्ल्यानुसार मध आणि मटण व  त्याचे पदार्थ हे कॉम्बिनेशन विसंगत आहे. हे परस्पर विरोधी पदार्थ एकत्रित खाल्यास आरोग्यास हानीकारक ठरतात.

4. गरम पाणी आणि मध:

साधारपणे पदार्थाला गोडवा आणण्यासाठी त्यात मध घातले जाते. परंतु, डॉ. भगवती यांच्या सल्ल्यानुसार मध गरम पाण्यात आणि पदार्थांमध्ये घालणे टाळावे. मध नुसते घेणे आरोग्यासाठी अमृत ठरते. तर शिजवलेले मध हानिकारक असते. अभ्यासानुसार मध ६० अंशापर्यंत गरम केल्याने hydroxymethyl furfuraldehyde (HMF) याची निर्मिती होते आणि ते आरोग्यासाठी विषारी ठरते.जरूर वाचा: मध गरम करणे योग्य आहे का?

References: 1. Kumar, K. S., Bhowmik, D., & Chandira, M. R. (2010). Medicinal uses and health benefits of honey: an overview. Journal of Chemical and Pharmaceutical Research2(1), 385-395. 2. Annapoorani, A., Anilakumar, K. R., Khanum, F., Murthy, N. A., & Bawa, A. S. (2010). Studies on the physicochemical characteristics of heated honey, honey mixed with ghee and their food consumption pattern by rats. AYU (An international quarterly journal of research in Ayurveda)31(2), 141.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

अस्थमावर फायदेशीर असे आयुर्वेदीक उपचार !

$
0
0

झपाट्याने होत असलेले शहरीकरण, सध्याचे वाढलेले प्रदूषण, वाढती लोकसंख्या यामुळे गेल्या काही वर्षांत अस्थमाचे प्रमाण हळूहळू पण नक्कीच वाढले आहे. काही काळानंतर यावर उपाय म्हणून एक शास्त्र समोर आले ते म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदानुसार फुफ्फुसातील बिघाडामुळे नाही तर पचनसंस्थेतील समस्यांमुळे अस्थमा होतो. सोमैया आयुर्वेदिक सेन्टरच्या आयुरेड फिजिशिअन डॉ. आदिती गाडगीळ यांनी अस्थमाची लक्षणे, धोके, त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबाबत मार्गदर्शन केले. जाणून घ्या: व्हिडीयो: अस्थमावर गुणकारी योगासनं !

आयुर्वेद शास्त्रानुसार अस्थमा होण्याची मुख्य कारणे:

  1. नियमित कोरडा, थंड, पचनास जड आहार घेणे आणि विसंगत अन्न खाणे.
  2. अवेळी जेवणे.
  3. न उकळलेले आणि थंड दूध पिणे.
  4. थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स पिणे.
  5. नियमित मसालेदार, तेलकट अन्नपदार्थ खाणे.
  6. थंड वातावरणात प्रवास करणे, सतत ए.सी. च्या सानिध्यात असणे.
  7. प्रदूषण, धूर, धूळ यांच्याशी येणारा सततचा संपर्क.
  8. नैसर्गिक इच्छांना मुरड घालणे.

यापैकी काही किंवा सगळी लक्षणे कफ आणि वात दोष असलेल्यांमध्ये आढळून येते.

अस्थमावर आयुर्वेदीक उपचार.

अनु. क्र. औषधाचे नाव डोस वेळ Anupaan
दशमुळारिष्टम १५ मीली दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाण्याचे सम प्रमाण
सीताफळादी चूर्ण २ ग्रॅम दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर मधाबरोबर
च्यवनप्राश ५ ग्रॅम सकाळी
भुई रिंगणी ५  ते १० ग्रॅम दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर
श्वासकुठार रस १२५ ते २५० मिलिग्रॅम दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाणी किंवा मधाबरोबर
महालक्ष्मीविलास रस १२५ ते २५० मिलिग्रॅम दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाणी किंवा मधाबरोबर
त्रिकटुचुर्ण १ ते २ ग्रॅम दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर मधाबरोबर

 

ही औषधे आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनस मध्ये घेऊ शकतो. आयुर्वेदीक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधे घ्यावीत. पेशंटच्या प्रकृती आणि आजाराच्या स्वरूपानुसार त्याला औषधे देण्यात येतात.

  • नेहमी कोमट पाणी प्या.
  • गहू, जुना तांदूळ, मूग, कुळीथ, पडवळ इत्यादी अन्नपदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा.
  • लसूण, आलं, हळद, काळीमिरी याचा स्वयंपाकात वापर करा.
  • नेहमी ताजे बनवलेले, फार थंड न झालेले जेवण घ्या.
  • तेलकट, पचनास जड व शिळे अन्न खाऊ नका. नक्की वाचा: या डाएट प्लॅनने अस्थमाचा त्रास ठेवा आटोक्यात !

अस्थमाचे मोठे धोके आणि त्यावरील आयुर्वेदिक उपाय:

यामुळे अस्थमा होण्याचा धोका वाढतो. आनुवंशिक भाग सोडल्यास इतर गोष्टींवर म्हणजेच अनेमिया, श्वसननलिकेतील बिघाड यावर उपाय होऊ शकतो. आयुर्वेदात उपाय करण्याची एक वेगळी पद्धत आहे त्याला ‘रसायन थेरपी’ असे म्हणतात. त्यामुळे इम्युनिटी सुधारते. तसंच recurrent infectionsपासून बचाव होण्यास मदत होते. रसायन थेरपीमध्ये पिंपळी पासून तयार केलेले औषध विशेषतः अस्थमा आणि श्वसनाच्या आजारांसाठी वापरले जाते. जरूर वाचा: अस्थमाचा त्रास दूर करणारा नैसर्गिक उपाय !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

हे पदार्थ मायग्रेनचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतील !

$
0
0

मळमळणे, उलटी होणे, प्रखर उजेडाचा आणि आवाजाचा त्रास होणे ही मायग्रेनची लक्षणे आहेत. मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तुमच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासाठी दिल्लीच्या डायटिशन डॉ. अनिता गुप्ता यांनी काही खास टीप्स दिल्या.

  • पालक खा: पालकामध्ये फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन बी अधिक असल्यामुळे आहारात पालक अवश्य घ्या. The journal Headache च्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन बी याचे प्रमाण वाढवले त्यांना मायग्रेनची लक्षणे कमी प्रमाणात जाणवू लागली. म्हणून उकडलेला, शिजवलेला किंवा  कच्चा पालक (सलाडमध्ये) अवश्य घ्या. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी युक्त अंडी आणि मशरूम या पदार्थांचा ही तुम्ही आहारात समावेश करू शकता. या ’10′ कारणांमुळे वाढतो मायग्रेनचा त्रास !
  • स्नॅक्ससाठी ओट्स घ्या: रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मायग्रेनचा त्रास अधिक जाणवतो. म्हणून glycemic index कमी असलेले म्हणजेच steel-cut oatmeal आणि ओट ब्रानचे सेवन करा. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहील. आल्याचा काढा – मायग्रेनच्या त्रासावरील गुणकारी उपाय
  • बदाम-काजू भरपूर खा: The journal Cephalagia च्या अभ्यासानुसार मॅग्नेशियममुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून भरपूर काजू-बदाम खा. तसंच भोपळ्याच्या बिया खाणे देखील फायदेशीर ठरेल.
  • बांगडा आणि रावस सारखे मासे खा: The journal Headache अभ्यासानुसार आहारात ओमेगा थ्री फॅटी असिड अधिक आणि ओमेगा सिक्स फॅटी असिड कमी प्रमाणात घेतल्याने मायग्रेनचा त्रास व प्रमाण कमी होते. बांगडा आणि रावस यांसारख्या माशांमधून तुम्हाला पुरेसं ओमेगा थ्री फॅटी असिड मिळेल.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायग्रेनचे प्रमाण कमी करण्यासाठी नेहमी हायड्रेट रहा. भरपूर पाणी प्या. तसंच कलिंगड, काकडी, सफरचंद, पेर यांसारखी  पाण्याचा अंश असणारी फळे अवश्य खा.

References:
[1] Menon S, Lea RA, Ingle S, Sutherland M, Wee S, Haupt LM, Palmer M, Griffiths LR. Effects of dietary folate intake on migraine disability and frequency. Headache. 2015 Feb;55(2):301-9. doi: 10.1111/head.12490. PubMed PMID: 25598270.
[2] : Peikert A, Wilimzig C, Köhne-Volland R. Prophylaxis of migraine with oral magnesium: results from a prospective, multi-center, placebo-controlled and double-blind randomized study. Cephalalgia. 1996 Jun;16(4):257-63. PubMed PMID: 8792038.
[3] Martin VT, Vij B. Diet and Headache: Part 2. Headache. 2016
Oct;56(9):1553-1562. doi: 10.1111/head.12952. PubMed PMID: 27699772.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


मासिकपाळी आठवडाभर आधी येण्याचे कारण काय असावे ?

$
0
0

मी ३९ वर्षांची महिला आहे. मला मासिक पाळी वयाच्या १४ व्या वर्षी आली आणि त्यानंतर कायम माझ्या मासिक पाळीचे चक्र ३० दिवसांचे राहीले. पण गेल्याच आठवड्यात मला तारखेच्या एक आठवडा आधीच पाळी आली. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते. म्हणून मला खूप काळजी वाटते आहे. मी २४-२८ दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्राविषयी ऐकलं आहे पण ते फार क्वचितच आढळून येतं. माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की मला polycystic ovarian syndrome असू शकतो. त्यामुळे मला लवकर पाळी आली का? म्हणजे याचा अर्थ मला हार्मोनल इम्बॅलन्स ची समस्या आहे का? यासाठी मला स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे का?

Nanavati Super Speciality Hospital च्या Consultant Obstetrician and Gynaecologist डॉ. माया लुल्ला यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.

मासिक पाळी लवकर येण्याची अनेक करणे आहेत. पण आता नेमके कारण सांगणे कठीण आहे. साधारणपणे मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण त्यापेक्षा अधिक किंवा कमी दिवसांचे मासिकपाळी चक्र देखील अनेकजणींमध्ये आढळून येते. हे चक्र कमीत कमी २१ दिवस व जास्तीत जास्त ३५ दिवसांचे असते. पाळी येण्यात ५-७ दिवसांचा फरक पडला तर काळजीचे करण्याचे काही कारण नाही. त्यापेक्षा अधिक दिवसांचा फरक पडला तर मात्र ते काळजीचे कारण ठरेल आणि त्यासाठी लवकरात लवकर स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दर महिन्याला मासिकपाळी लवकर येण्यामागील कारण काय ?

तसंच तुमची पाळीची तारीख लक्षात ठेवून पुढच्या वेळी पाळी किती दिवसांनी आली ते बघा. जर त्यात ७ दिवसांपेक्षा अधिक फरक नसेल तर चिंतेचे काही कारण नाही. मासिकपाळी पुढे ढकण्यासाठी गोळ्या घ्याव्यात का ?

मासिक पाळी लवकर येण्याची कारणे:

मासिक पाळी लवकर येण्याची PCOS व्यतिरिक्त अधिक कारणं असू शकतात. जर तुम्हाला घरी किंवा ऑफिस मध्ये काही ताण असेल तर त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. परिणामी पाळीचे चक्र बिघडते आणि पाळी लवकर किंवा उशिरा येते. तुम्ही जर भावनिकदृष्ट्या अशांत असाल तर त्याचा ही परिणाम हार्मोन्स वर होतो आणि पाळी अनियमित होते. चमचाभर अळशीच्या सेवनाने कमी करा PCOS चा त्रास !

गर्भनिरोधक गोळ्यांचा देखील मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. तुम्ही जर सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह असताना या गोळ्या घेत असाल तर त्यामुळे ही पाळी लवकर येण्याची शक्यता आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

पास्ताप्रेमींसाठी हेल्दी पास्ता बनवण्याच्या काही सोप्या पद्धती

$
0
0

पास्ता, पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांशिवाय आजकाल तरूणांचा दिवसच संपत नाही. घरातील वडीलधारी मंडळी एकतर या पदार्थांना नावं ठेवतात नाहीतर नाकं तरी मुरडतात. पण आपल्या पिढीला केवळ डाळभात खाऊन काही जमत नाही. तसेच फास्टफूड आरोग्यास घातक असल्याचे आपण जाणतो. मग काय करायचे ? हे पदार्थ पूर्णपणे टाळायचे ?  नाही जमत मग यामधून सुवर्णमध्य काढून हेच पदार्थ थोडे  हेल्दी बनवूया.

पास्त्यामध्ये कार्ब्स अधिक प्रमाणात असल्याने त्याची गणती अनहेल्दी पदार्थांमध्ये केली जाते. परंतु पास्ता हेल्दी बनवण्याच्या काही पद्धती आहेत. ज्यामुळे तो  आहारातून न वगळता पास्ता लव्हर्स मस्त एन्जॉय करू शकतात.  Nutritionist Urvashi Sawhney यांनी पास्ता हेल्दी बनवण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत.

  • प्रोटीन्स, ओमेगा ३ फॅटी असिड ने युक्त असे मासे निवडा आणि पास्ता बनवताना त्यात घाला.
  • पास्त्यामध्ये कडधान्य घातल्याने त्याची पौष्टीकता वाढेल. त्याचबरोबर त्यातून अधिक प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स मिळतील. पास्ता एकदा चणे घालून ट्राय करा.
  • पास्त्यात वापरले जाणारे सॉसेस साखर आणि कॅलरीजने युक्त असतात. त्यामुळे त्याचा वापर काळजीपूर्वक करा. त्याऐवजी मशरूम, वांगी, गाजर यांसारख्या पौष्टिक भाज्या घालून पास्ता बनवा. जरूर वाचा: टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !
  • होल ग्रेन पास्ता वापरा. आणि तो विकत घेताना त्यातील पौष्टिक घटक एकदा तपासून पहा. (पॅकच्या मागे लिहिलेले असते. ) quinoa घालून पास्ता बनवल्यास त्यातून अधिक ऊर्जा मिळते. पास्त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना आवडणारा पिझ्झा देखील आपण हेल्दी बनवू शकतो. त्यासाठी नक्की वाचा: टेस्टी पिझ्झा अधिक हेल्दी बनवण्यासाठी या टॉपिंग्सची निवड करा !!
  • पास्ता कितीही आवडत असला तरी त्याचे अति सेवन टाळावे. पास्ता बनवताना कमी प्रमाणातच बनवा. कारण तो कमी प्रमाणात खाणे शक्य होत नाही. त्यामुळे बनवतानाच कमी बनवल्याने खाल्ले देखील कमी जाते.
  • कमी कॅलरीज युक्त सॉस बनवण्यासाठी पास्ता सॉसमध्ये pesto घाला. त्यात असलेल्या ऑलिव्ह ऑइल मुळे तुम्हाला मुबलक प्रमाणात स्निग्धता मिळेल.
  • पास्ता अधिक कॅलरीज युक्त बनवण्याऐवजी त्यात थोडे मसाले घाला. त्यामुळे त्याला एक प्रकारचा फ्लेव्हर येईल. आणि फ्लेव्हर फूड कमी प्रमाणात जरी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

व्यस्त कामाचे स्वरूप असणार्‍या नोकदारांनी स्वतःचे वजन कसे सांभाळावे ?

$
0
0

8-10  तास काम करणं,त्याचा ताण,दिवसभर घेतलेला चुकीचा आहार यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच अडथळा येतो.जर तुम्ही दिवसाचे १० तास काम करत असाल तर तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ काढणे कठीण जाते.पण जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला व्यायामासाठी ठराविक वेळ काढणे,घरचे पौष्टिक जेवण जेवणे व पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक अाहे. जिरं आणि केळं- वजन कमी करण्याचा घरगुती उपाय !

व्यस्त जीवनशैलीत वजन कमी करण्यासाठी या टीप्स जरुर आजमावून पहा  -  

स्वत:कडे पुरेसे लक्ष द्या-

प्रथम स्वत:कडे एक महत्वाची व्यक्ती या दृष्टीने पहा.जर तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य दिलेत तर तुम्हाला शांत झोप व व्यायामासाठी पुरेसा वेळ काढणे सहज शक्य आहे.यासाठी ज्या गोष्टींकडे आता त्वरीत लक्ष देणे गरजेचे नाही अशा गोष्टी सध्या बाजूला ठेवा व जीम अथवा धावण्यासाठी थोडासा वेळ काढा. नक्की वाचा ‘बिझी’ यंगब्रिगेडसाठी खास वजन घटवण्याच्या टीप्स !!

दोन्हीवेळचा स्वयंपाक एकत्रच करुन ठेवा-

दिवसभर काम केल्यावर थकून घरी जाऊन स्वयंपाक करणे कंटाळवाणे होते.यामुळेच अनेक जण इन्संट फूड अथवा बाहेरुन जेवण मागवणे हे पर्याय निवडतात.यावर सोपा उपाय म्हणजे दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदाच करुन ठेवा.कारण घरी जेवण तयार असेल तर सहाजिकच बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय कमी होईल.वजन घटवा या 5 पिवळ्या पदार्थांनी !

स्वत:वर नियंत्रण ठेवा-

तुम्ही तुमच्या कामाची वेळ कमी करु शकत नाही पण घरातून जेवणाचा व स्नॅक्सचा डबा नेणे तुमच्या हातात नक्कीच आहे.त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ देखील जरुर काढू शकता.यासाठी प्रथम तुमच्या गरजाचे व्यवस्थित नियोजन करा.घरी आल्यावर टिव्ही अथवा मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आराम करा ज्यामुळे तुम्हाला ७ ते ८ तासांची शांत झोप मिळेल.वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना

बाहेर खाताना पोषक आहारच घ्या-

कामानिमित्त बाहेर केले जाणारे लंच,डिनर,बर्थडे ट्रीट हा तुमच्या कामाचाच एक भाग असतो.प्रत्येक वेळी अशा गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकत नाहीत.मात्र असे असले तरी अशा वेळी पौष्टिक पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा.

वजन कमी करण्यासाठी कमी वेळात पूर्ण करता येतील असे छोटी ध्येय निश्चित करा-

लॉर्ग टर्म गोल्स पूर्ण करणे कदाचित तुम्हाला कठीण जाऊ शकते.यासाठी शॉर्ट टर्म गोल्स सेट करा.तुम्ही पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्ही किती वजन कमी करु शकता याचा विचार करा.जर तुम्हाला ३ किलो वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी महिनाभर योगाक्लास किंवा जीममध्ये नित्यनेमाने जा.असे करता करता तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याचे मोठे ध्येय नक्कीच गाठता येईल. 

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

#धनत्रयोदशी विशेष –आरोग्यरक्षणाची देवता ‘धन्वंतरी’ने दिलेले 4 स्वास्थ्यवर्धक संकेत !

$
0
0

 धनत्रयोदशी ( धन्वंतरी जयंती ) 

अमृतमंथनातून निर्माण झालेली आरोग्यशास्त्राची देवता म्हणजे  ‘धन्वंतरी’ ! आजकाल आपण आजारी पडलो की डॉक्टरांचा धावा करतो. पण आयुर्वेदाचा आणि आरोग्यरक्षणाचा अधिपती धन्वंतरी यांच्या मते, आजारी पडूच नये म्हणून आपण दक्ष  राहणे हे गरजेचे आहे. स्वास्थ्य सुधारण्यासाठी आयुर्वेदात सुचवलेल्या मार्गानुसार आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मग जाणून घ्या धन्वंतरी देवतेच्या हातात असलेल्या चार शस्त्रांचे स्वास्थ्य सुधारक चार संकेत -

# 1 चक्र  - 

मनातील आणि शरीरातील विषारी घटकांच्या संहाराचे प्रतिक म्हणजे ‘चक्र’ ! शरीरात विषारी घटकांचा प्रादूर्भाव वाढल्यास आपल्या आरोग्यात बिघाड होण्यास सुरवात होते. म्हणूनच धन्वंतरीच्या हातातील चक्र ‘आयुर्वेदा’च्या  शस्त्रारूपी सहाय्याने मानवी शरीरातील दोष  कमी करण्यास मदत करतात. ( नक्की वाचा - ‘आपन मुद्रा’ – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय ! )

#2 शंख - 

प्राचीन काळापासून शुभ कार्याची सुरवात ‘ शंख नादाने’ केली जाते. शंख ध्वनीच्या माध्यमातून वातावरणात सकारात्मक उर्जा  पसरवण्यास मदत होते. तसेच हवेतील प्रदूषण आणि विषाणू कमी करण्यास शंखनाद फायदेशीर ठरतो. वातावरण प्रसन्न झाले की आपोआपच मनाची चंचलता कमी होते, मानसिक ताण हलका होतो परिणामी आरोग्य सुधारण्यास मदत होते.

# 3 जळू (जलौका)  - 

रक्त हे जीवधारक आहे. मानवी शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी रक्त शुद्ध आणि प्रवाही रहाणे आवश्यक आहे. आयुर्वेदात सांगितल्यानुसार जळू हे रक्ताशुद्धीसाठी फायदेशीर आहे. जळूचा त्वचेला स्पर्श झाल्यास शरीरातील अशुद्ध रक्त शोषले जाते. रक्तदाब वाढल्यास त्यावर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी जळू लावला जातो. मग या ’6′ लक्षणांमधून मिळतात ‘उच्च रक्तदाबा’चे संकेत !

#4  अमृत कलश –  

अमृताचा कलश हा रामबाण आयुर्वेदीक औषधांचा भांडार समजला जातो. बदलत्या काळानुसार औषधशास्त्रात अनेक बदल झालेत. पण आयुर्वेदात अनेक आजारांवर मात करण्याची तसेच प्रतिबंध करण्याची क्षमता असल्याने ‘आयुर्वेद’ या अमृतारुपी घडाचा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच वापर करा.

(संदर्भ सौजन्य – शीव आयुर्वेदीक महाविद्यालय-सायन येथील प्रोफेसर आणि वैद्य डॉ. रजनी पाटणकर )

संबंधित दुवे -

अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी बनवा ‘सुगंधित उटणं’

उटण्याने मिळवा चेहर्‍याच्या या ’4′समस्यांपासून सुटका !

$
0
0

पूर्वीच्या काळी बोचर्‍या थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यातली मजाच काही और असते. आधी तेलाचा मसाज नंतर उटण्याची  आंघोळ आणि मग फराळावर ताव अशी दिवाळीची सुरवात होत असे. पण फक्त दिवाळीपुरता उटणं मर्यादीत न ठेवता त्याचा वापर वर्षभर करणे आरोग्यासाठी हितकारी आहे. उटणं हे एक उत्तमप्रकारचे स्क्रबर आहे. त्यामुळे बाजारातून विकतची स्क्रबर्स आणण्यापेक्षा तुम्ही वर्षभर घरच्या घरीदेखील उटणं बनवू शकता. मग त्याची कृती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

उटण्याचे आरोग्यदायी फायदे – :  

# 1 त्वचा स्वच्छ करते 

उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब  मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. जायचे झाल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा. पायावरील टॅन काढण्याचे घरगुती उपाय !

# 2 चेहर्‍याला नैसर्गिकरित्या चमक देते 

उटण हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत करते. तर बेसन त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. चंदनामुळे त्वचेत थंडावा राहण्यास मदत होते. तर यामध्ये दूध मिसळल्यास त्वचेला कांती मिळते. ( नक्की वाचा – कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व ! )

# 3 चेहर्‍यावरील केसांची वाढ रोखते 

चेहर्‍यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहर्‍यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे निकाल अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट व उटणं याचे एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहर्‍यावर करावा. या घरगुती उपचारांनी मिळवा, चेहर्‍यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती!

#4 त्वचेचे एजिंग कमी होते 

त्वचेवर सुरकुत्या पाहणे कोणाला आवडते ? पण वयानुसार त्यांचे येणे सहाजिकच आहे. उटणं लावल्याने ही समस्या कमी करण्यास मदत होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग, अ‍ॅन्टी ऑक्सिडेटीव्ह आनि दाहशामक क्षमता असते. यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. यामध्ये मध मिसळल्यास त्वचा मुलायम  होण्यास मदत होते.  यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघण्यासोबतच ते टाळणेदेखील शक्य होते. नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा!

वर्षभर आजारांना दूर करण्यासाठी साजरी करा ‘कोजागिरी पौर्णिमा’

$
0
0

अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ! नवरात्रीचे उपवास संपल्यानंतर आज सर्वत्र कोजागिरीची रात्र जागवली जाते. या रात्री दूध चंद्राच्या प्रकाशकिरणात उकळून त्याचा आस्वाद घेतला जातो. सोबतीला गप्पा आणि  मजा-मस्तीतर असतेच. परंतू आपल्या प्रत्येक सणामागे एक आरोग्यदायी महत्त्व दडलेले असते. कोजागिरीच्या रात्रीचेही असेच आरोग्यदायी महत्त्व उलगडून सांगितले आहे शीव आयुर्वेदिक रुग्णालय  आणि महाविद्यलय येथील प्रोफेसर वैद्य रजनी पाटणकर यांनी -

प्रकोप काळ - 

कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूत साजरी केली जाणारी पौर्णिमा. निसर्गात होणार्‍या बदलांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असतो. शरद ऋतू हा प्रकोप पित्ताचा काळ म्हणून ओळखला जातो. या दिवसांत निसर्गाप्रमाणेच शरीरातही उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते. परिणामी मानवी आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते.  आयुर्वेदात शरद ऋतूला आजारांची माता समजली जाते. या काळात शरीरात आजार जडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे आहे. ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी  !

कोजागिरी पौर्णिमा -

शरद ऋतूमध्ये मानवी आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच नवरात्रीत व्रत-वैकल्यांचा सल्ला दिला जातो तर त्यानंतर येणार्‍या पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. निसर्गासोबतच शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता चंद्र- चांदण्यांच्या शीतल छायेमध्ये आहे. म्हणूनच या दिवशी चंद्राच्या छायेमध्ये अधिकाधिक वेळ राहण्याचा सल्ला दिला जातो.

दुधातील थंडावा - 

दुध हे नैसर्गिकरित्या थंड प्रकृतीचे आहे. त्यामुळे चंद्राच्याप्रकाशाच्या सानिध्यात दूध आटवून पिण्याची संकल्पना पुढे आली. चंद्र-चांदण्याची शीतलता आणि दुधाचा थंडावा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. ( नक्की वाचा - हळदीचे दूध प्या आणि या ’7′ समस्यांना दूर ठेवा)

कोजागिरीचे मसाले दूध कसे बनवाल ?

मूळतः केवळ चंद्रप्रकाशात दूध आटवून पिणे आणि चंद्र-चांदण्याची सावलीत राहणे. हा कोजागिरीमागील मूळ हेतू आहे. परंतू आजकाल दुधाची चव वाढवण्याची त्यात सुकामेवा मिसळून मसालेदूध बनवले जाते. परंतू काजू-बदाम उष्ण प्रकृतीचे असल्याने त्याचा वापर प्रमाणात करावा. बेदाणा थंड असले तरीही आंबट असल्याने दूध नासण्याची शक्यता असते. परंतू केशर हे थंड आणि आरोग्यदायी असल्याने त्याचा जरूर वापर करावा. मधूमेहींनी या दुधात साखरेचा वापर टाळावा. हे ’5′ गैरसमज दूर करून बिनधास्त प्या दूध !

जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘ जीवेत शरद शतम’ असा आशिर्वाद दिला जातो. म्हणजेच तुमचे शरीर इतके रोगप्रतिशामक बनवा की तुम्ही आयुष्यात 100 शरद ऋतू पाहू शकाल. म्हणूनच जर तुम्ही दरवर्षी शरद ऋतूत निरोगी राहिल्यास वर्षभर आजारापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच  आजच्या कोजागिरी सोबतच या ऋतूत निरोगी राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्या.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

 

कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व !

$
0
0

पूजा – विधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे.  भारतात नियमित देवपूजेमध्येदेखील चंदनाचा वापर केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींनादेखील विज्ञानाचा आधार आहे.  मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा लावण्यामागील आरोग्यदायी कारण ..

वैज्ञानिक आधार - 

कपाळावर दोन भुवयांमध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते.  या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक उर्जा स्थान असल्याने अध्यात्मात  या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायीदेखील ठरते.

चंदनाच्या टिळ्याचे फायदे – :

  • एकाग्रता सुधारते - 

आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता  वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.

चायनिज अ‍ॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा  टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होते.

  • सकारात्मक बनवते - 

तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.

  • निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम - 

अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही मनामुळेदेखील निद्रानाश होण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.(रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !)

  • शरीरात थंडावा निर्माण होतो - 

चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांनादेखील थंडावा मिळतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या सार्‍या शरीराला थंड करण्यास मदत करते.

संबंधित दुवे -

बाप्पाच्या पूजेत प्रामुख्याने वापरल्या जाणार्‍या ‘दुर्वां’चे ’9′ आरोग्यदायी फायदे !


‘माखन चोर’कृष्णाच्या लोण्यात दडले आहेत आरोग्यदायी गुणधर्म !

$
0
0

गोकुळाष्टमी म्हणजे भववान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! ‘माखन चोर’ असा उल्लेख केला जाणार्‍या बाळकृष्णाच्या अनेक कहाण्यांमध्ये दही- तूप – लोण्याचा समावेश प्रामुख्याने आढळतो. अशा दुग्धजन्य पदार्थांमुळे फॅट वाढते हा काहींचा समज आहे. परंतू प्रत्यक्षात मात्र  दही-तूप- लोणी खाणे आरोग्यदायी समजले जाते.

सेलिब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी देखील नियमित चमचाभर लोणी (व्हाईट बटर), तूप खाणे आरोग्यदायी असल्याचा सल्ला दिला आहे. त्यातील अ‍ॅन्टी एजिंग व्हिटामिन ए व एंझाईम्स चवीसोबतच तुमचे आरोग्यही सुधारण्यास मदत करतात. आयुर्वेदातदेखील तूपाचे मह्त्त्व दिले आहे. म्हणूनच जाणून घ्या लोण्याचे आरोग्यदायी फायदे  -

  • आरोग्यदायी ‘कॅलरीज’चा पुरवठा होतो :

बटरमध्ये उच्च प्रतीच्या कॅलरीज असतात. ऋजुताच्या मते, उच्च प्रतीच्या कॅलरीयुक्त आहाराची शरीराला गरज असते. 100 ग्रॅम बटरमधून 750 कॅलरीज मिळतात.

  • वजन घटवण्यास मदत होते :

लोण्यामुळे वजन कमी होते. हो ! हे शक्य आहे. त्यातील लेसिथिन घटकामुळे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात फॅट साचून राहण्याची  प्रक्रिया कमी होते. परिणामी तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे तुम्हांला अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करणे शक्य  होते  व वजन घटवण्याची प्रकिया सुधारते.

  • लहान सहान संसर्गापासून बचाव होतो :

लोण्यातील अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल व अ‍ॅन्टी फंगल घटकामुळे   तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.  पोटातील गडबड, सर्दी-पडशाच्या त्रासापासून बचाव होतो. ऋजूताच्या मते, ‘ तुम्ही आजारी पडल्यावर तुमची आई मुगाची खिचडी आणि त्यावर तूपाची धार घालून मऊ भात देते. कारण त्यातील घटक बॅक्टेरियांचा नाश करण्यास मदत करतात.’

  • तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते :

बटर हे सॅच्युरेटेड फॅटपासून तयार होते. यामध्ये कॅल्शियम, फ़ॉस्फरस, व्हिटामिन ए, व्हिटामिन डी याचा मुबलक साठा असतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

  • तुम्हांला स्मार्ट आणि शार्प बनवते :

बटरमुळे मेंदूचे कार्य सुधारते. लोण्यामुळे पोषणद्रव्य शोषुन घेण्याची क्षमता वाढते. त्यामूळे आहारात लोण्याचा-तूपाचा समावेश करणे गरजेचे आहे.

  • त्वचा तजेलदार बनवते :

लोण्यामध्ये मिनरल्स, अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स तसेच व्हिटामिन ईचा मुबलक साठा असतो. यामुळे त्वचेचे आरोग्य आणि पोत सुधारण्यास मदत होते. यामुळे तुम्ही तजेलदार दिसण्यास मदत होते.

  • कर्करोगाशी सामना  करतात:

लोण्यातील फ़ॅटी अ‍ॅसिडमध्ये आरोग्यदायी घटक असल्याने कॅन्सरशी सामना करण्याची मुबलक क्षमता त्यामध्ये आढळते.

  • बहूगुणी लोणी : 

लोण्यामुळे अनेक आजारांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. आहारात लोण्याचा मुबलक समावेश केल्यास निद्रानाश, झोपेत बेड ओला करणे, सेक्सलाईफ सुधारण्यास मदत होते. तसेच गरोदर स्त्रियांनी लोण्याचा आहारात समावेश केल्यास बाळाचे आरोग्य सुधारण्यास तसेच प्रसुतीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

  • सांध्यांचे दुखणे कमी होते :

सांधेदुखीमध्ये हाडांचा ठिसूळपणा वाढतो त्यामुळे  झीज होण्याचे प्रमाणही वाढते. म्हाणूनच तुमच्या आहारात तुपाचा समावेश करावा. यामुळे हाडांमधील / सांध्यांमधील वंगण वाढते.

मुलांना ‘स्ट्रॉग’बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !

$
0
0

लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. बालपणी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवर त्यांचे भविष्य अवलंबून असते. मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आजकाल बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. मात्र प्राचीन काळापासून आयुर्वेदात लहान मुलांवर ‘ सुवर्णप्राशन संस्कार’ करण्याचा सल्ला दिला जातो.  सोनं हे सौंदर्य तर वाढवतेच पण त्याचे औषधी गुणधर्मही आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. हे तुम्हांला ठाऊक आहे  का ?

  • सुवर्णप्राशन म्हणजे काय ?  

सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक  औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते.  नवजात बालकांपासून ते 12 वयोवर्षाच्या मुलांपर्यंत सार्‍यांना या औषधांचे काही थेंब दिले जातात. पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांवर ‘सुवर्णप्राशना’चे संस्कार करणे अधिक हितावह ठरते. यामुळे मुलांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.

  • सुवर्णप्राशनाचे  फायदे - 
  1. मेंदूचा विकास - 

लहान मुलांच्या मेंदूचा विकास हा सकस आहारावर अवलंबून असतो. त्यामुळे पोषक आहाराबरोबरीनेच ‘सुवर्णप्राशना’चे काही थेंब मुलांना दिल्यास त्यांचा मेंदूचा विकास होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

2.  आकलन क्षमता सुधारते  -  

लहान मुलांमध्ये चंचलता अधिक असल्याने त्यांचे अभ्यासात लक्ष न लागण्याची समस्या अनेकांमध्ये आढळते. अशावेळी त्यांच्यामध्ये स्थिरता आणून ‘आकलन’ व एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी ‘सुवर्णप्राशन’ मदत करते.

   3.  रोगप्रतिकारशक्ती वाढते - 

वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे किंवा संसर्ग जडण्याचे प्रमाण अधिक असते  त्यामागील प्रमुख  कारण म्हणजे  कमकुवत ‘रोगप्रतिकार शक्ती’ !  वारंवार मुलं आजारी पडत असल्यास  त्यांना ‘सुवर्णप्राशन’ देणे हितावह आहे.  मॉन्सूनमध्ये ‘इम्युनिटी’ वाढवारे ’5′ नैसर्गिक पर्याय 

       4. पचन सुधारते - 

चटकदार किंवा काही अरबट -चरबट खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असते. याचा दुष्परिणाम  मुलांच्या  पचनसंस्थेवर होऊन लहान वयात जडणारा ‘अतिलठ्ठपणा’ (Obesity) , मधूमेह याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा धोक्यांपासून बचावण्यासाठी सुवर्णप्राशनाचे थेंब गरजेचे आहे.

   5. वातावरणातील बदलांपासून बचाव होतो - 

ऋतूचक्रात बदल झाल्यास त्याचा तात्काळ परिणाम लहान मुलांवर होतो.  अशावेळी त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवण्याचे काम ‘सुवर्णप्राशन’ करते.  त्यामुळे मुले अधिक सुदृढ होतात.

      6. दात  येताना होणारा त्रास कमी होतो –  

लहान मुलांसाठी ‘दात’ येण्याची प्रकिया ही फारच त्रासदायक असते. या काळात मुलं चिडचिडी होतात. मग त्यांचा हा त्रास थोडा सुककर करण्यासाठी ‘सुवर्णप्राशन’ फायद्याचे ठरते. बाळाला दात येताना होणारा त्रास सुसह्य करणार्‍या 5 टिप्स !

  7. घातक घटकांपासून  बचाव होतो - 

आजकाल भाज्या, फळ झटपट उगवण्यासाठी काही रासायनिक खतांचा, औषधांचा पिकांवर फवारा केला जातो. अशा भाज्या  नीट धुवून,शिजवून खाल्ल्या तरीही त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अशा घातक घटकांपासून बचावण्यासाठी मुलांना दिलेले ‘सुवर्णप्राशन’ अमृतच ठरते.

 8.  रंग सुधारतो - 

लहान मुलांचा  रंग सुधारण्यासाठीही ‘ सुवर्णप्राशन’ फायदेशीर ठरते.  जरूर वाचा हे गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !

      9.  कार्यक्षमता सुधारते  - 

लहान मुलांमध्ये व्यायामाच्या , पोषक आहाराच्या अभावामुळे शरीरात फोपसेपणा वाढण्याची  भीती असते. अशावेळी मुलांची शारिरीक, बौद्धिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन  देणे गरजेचे आहे.

  • कोठे दिले जाते ‘सुवर्णप्राशन’ ? 

आयुर्वेदिक रुग्णालयांमध्ये तसेच काही नामांकित आयुर्वेदिक केंद्रांमध्ये मुलांना ‘सुवर्णप्राशना’चे संस्कार शिबीर आयोजित केले जाते.

‘विठ्ठल’नामाचा जप सुधारतो हृदयाचे आरोग्य !

$
0
0

आज आषाढी एकादशी ! महाराष्ट्राचे  दैवत  समजल्या  जाणार्‍या  विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पंढरपुरात येतात. या वारीच्या दरम्यान विठू नामाचा गजर केला  जातो. हाच गजर त्यांना वारीत चालण्याची  प्रेरणा देतो. हे  संशोधनातून आता समोर आले आहे.

‘एशियन जर्नल ऑफ  कॉम्प्लिमेंटरी अ‍ॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन’ यांच्या अहवालानुसार ‘विठ्ठल’ नावाचा जप केल्यास हृद्याचे कार्य सुधारते. तसेच हृद्य चक्राला देखील चालना मिळते.

‘विठ्ठल’ शब्दाचा शास्त्रिय संबंध  - 

‘स्वर’ आणि ‘व्यंजनां’नी मिळून देवनागरी लिपी बनते.  स्वर हे स्वयंलंबी  तर व्यंजन हे  स्वरांवर अवलंबून असतात. व्यंजनांचे ‘अल्पप्राण’ (उच्चारताना तोंडातून हलकीच हवा बाहेर पडते)  व ‘महाप्राण’ (उच्चारताना अधिक हवा बाहेर पडते) अशा दोन विभागात विभागणी होते. यानुसार  ‘विठठल’ शब्दांत 2 महाप्राण व अल्पप्राण शब्दांचा समावेश आहे.  असे समीकरण असलेला ‘विठठल’ हा  एकमेव ईश्वरी शब्द  आहे.

‘विठठल’ शब्दाचा ‘हृद्य’चक्राशी असलेला संबंध - 

शरीर हे ’7′ चक्रांनी बनलेले असते. त्यापैकी हृद्याजवळ असलेले चक्र म्हणजे ‘अनाहत’ चक्र ! शरीरातील प्रत्येक  चक्राचे एक बीजाक्षर असते. त्यानुसार ‘अनाहत’ चक्राचे बीजाक्षर ‘ठ’ आहे. हे अक्षर अन्य कोणत्याही चक्रावर अवलंबून नसून थेट हदयचक्राशी निगडीत आहे. नमस्कारानेही सुधारते अनाहत चक्राचे कार्य  

anahata-chakra in marathi

आयुर्वेदातील ‘प्राण’ (वायू) ही संकल्पना व विठ्ठल शब्दाचा संबंध - 

आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वाताचे नियंत्रण ‘प्राण’ हा घटकावर अवलंबून असतो. व त्याचे स्थान हे हद्याजवळ असते. ‘प्राण’ व ‘हृद्या’चा एकमेकांवर थेट प्रभाव होतो. तसेच ‘ठ’ हा महाप्राण शब्द असून त्याचा ‘ विठ्ठल’ या शब्दांत दोनदा समावेश होत असल्याने त्याचा जप केल्यास हृदयावर अधिक चांगला प्रभाव पडतो.

 प्रयोग –

30 निरोगी लोकांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यानुसार 9 मिनिटे ‘विठ्ठल’ नावाचा जप केल्यानंतर त्या लोकांचा नाडीचे ठोके, हृद्याचे ठोके  व रक्तदाब 5 टक्क्यांनी सुधारला. तसेच त्यांचा शारीरिक उत्साह व उर्जादेखील वाढली.

ब्रम्हा, विष्णू  आणि महेश या तिन्हींचा समावेश ‘विठ्ठला’त असल्याचे समजले जाते. त्याची मुर्ती ही योग मुर्ती समजली जाते.  वारकरी वारीदरम्यान चालत, विठूनमाचा जयघोष करत पंढरपुरात येतात. चालण्यामुळे हृद्याचे पंपिंग सुधारते. व यादरम्यान ‘विठ्ठल’ नावाचा जप केल्यास ह्द्य चक्रालाही चालना मिळते. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !

संबंधित दुवे -

Reference - 

Prasad Joshi, Avinash Inamdar, Sanjivani Inamdar, Ravi Prayag, Jyuthica K Laghate, Bhagyashree Nilkanth. Effect of chanting ‘Vitthal’ on Heart: A Clinical Study. Asian Journal of Complementary and Alternative Medicine 02 (02); 2014; 11-15.

 

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !

$
0
0

आपले आरोग्य हे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे  दिवसभरात पदार्थांची निवड करताना आपण थोडे दक्ष  राहणे आवश्यक आहे. कारण  आपण खात असलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे एकापाठोपाठ एक अतिखाल्ल्यास किंवा  विरुदध जातीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर घातक परिणाम होतो. यालाच आयुर्वेदात ‘ विरुद्ध आहार’ म्हणतात.

दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. त्यामुळे अनेकजण मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी दूध  पितात. परंतू त्याच्या सोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरात आम निर्मिती होते. हे विषसमान असल्याने अनेकदा आपले आरोग्य बिघडते. म्हणून ‘ पंचवटी आयुर्वेदिक केंद्रा’च्या डॉ. सौरभी कोरगावे यांनी दुधासोबत हे काही पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

  • दूध आणि फळं - 

मिल्कशेक किंवा फ्रुट सॅलेड हे चवीला स्वादिष्ट असले तरीही आयुर्वेदात दूध आणि फळं  हा विरूद्ध आहार मानला जातो.  आंबट  फळ दूधासोबत खाणे  टाळावीत. मात्र अपवादात्मक स्थितीत नैसर्गिकरित्या पूर्ण पिकलेले केळं, आंबा यासारखी गोड फळ तुम्ही शिरा किंवा मिल्कशेकमध्ये वापरू शकता.  ( कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे ओळखण्याच्या स्मार्ट क्लुप्त्या)

  • दूध आणि मसाला -

चमचमीत पदार्थांमध्ये ग्रेवी वाढवण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर केला जातो. पण यामुळे शरीरात दोषनिर्मिती होते. म्हणून मसालेदार पदार्थांसोबत दूध पिणे टाळा.

  • दूध आणि मांसाहार - 

मासे, चिकन, मटण यांसोबत दूध पिणे टाळा.  मांसाहार हा उष्ण असतो तर दूध हे थंड असल्याने शरीरात दुधातील प्रोटीन  व मांसाहार  यांमध्ये रिअ‍ॅक्शन होऊन शरीरात दोष निर्माण होतात.

यासोबतच दूध आणि मीठ एकत्र खाणे देखील टाळावे.

विरुद्ध आहाराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम 

शरीरात दूध आणि त्याविरुद्ध जातीतील काही पदार्थ एकत्र आल्यास पचनक्रिया बिघडते.  परिणामी त्वचेवर रॅश येणे,  काही त्वचारोग उत्पन्न होणे, पित्त वाढून उलट्या होणे किंवा अपचन होणे अशा समस्या उद्भवतात. त्यातूनच शरीरात गंभीर आजारांची निर्मिती होते.

संबंधित दुवे - 

हळदीचे दूध प्या आणि या ’7′ समस्यांना दूर ठेवा

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!

छायाचित्र सौजन्य – shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 

 

या ‘५’कारणांसाठी, जेवताना पाणी पिणे टाळा

$
0
0

जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते. जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य  धोक्यात येऊ  शकते.  म्हणूनच या 6 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा.

  • गॅस्ट्रिक ज्युसचा नाश होतो 

मानवी शरीररचनेनुसार, पोटातील डायजेस्टिव्ह अ‍ॅसिड पचन सुधारायला तसेच अन्नपदार्थांचे  विघटन करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या रसामुळे पोटात संसर्ग निर्माण करणारे घटक कमी होण्यास मदत होते. याला ‘ डायजेस्टिव्ह फायर’ असे देखील संबोधले जाते. खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करून शरीराला उर्जा पुरवण्याचे प्रमुख पोटातील एंजाईम्स करत असतात. पण जेव्हा हा रस पाण्यात विरघळून जातो  तेव्हा पचनक्रियेसोबतच आतड्यांमध्ये क्रॅम्स येणे, दुखणे अशा समस्या अधिक उद्भवतात. यामुळे सारी पचनक्रिया संथ होते आणि बराच वेळ अन्न पोटात साचून राहिल्याने छोट्या आतड्याचे कार्यदेखील रेंगाळते. परिणामी शरीराला अन्नातून आवश्यक पोषणद्रव्यं  मिळत  नाहीत.

  • लाळनिर्मिती कमी होते

पचनक्रियेची सुरवात ‘लाळे’तूनच होते. त्यातील एन्जाईम्स अन्नपदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात त्याचबरोबर पोटातील डायजेस्टिव्ह एन्जाईम्सना चालना देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत  करतात. पण जर तुम्ही जेवताना पाणी सतत प्यायल्यास लाळ  पाण्यामध्ये विरघळते. यामुळे तोंडात अन्नाचे विघटनही होण्याची प्रक्रिया कमी होते  तसेच  पचनक्रियादेखील मंदावते.

  • पित्त वाढते 

जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हेदेखील यामागील एक कारण असू शकते. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. परिणामी त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. पोटात काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच पाणी शोषून घेतले जाते. त्यानंतर पाणी पोटातील गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचेही विघटन करते. यामुळे डायजेस्टिव्ह एंन्जाईम्सदेखील कमी प्रमाणात  शोषली जातात. त्यामुळे पित्त वाढणे, छातीत जळजळ वाढणे  अशा समस्या वाढतात. (  पित्ताचा त्रास कमी करण्याचे 5 घरगुती उपाय )

  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते 

जेवताना पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते.कारण जेव्हा खाल्लेल्या अन्नपदार्थांचे नीट पचन होत नाही तेव्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होऊन शरीरात काही घटक मेदाच्या स्वरूपातच शरीरात साठून राहतात. परिणामी रक्तातील साखरदेखील वाढते.

  • वजन वाढते 

जेवताना पाणी प्यायल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता देखील अधिक असते.  रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण तसेच अन्नपदार्थांचे पुरेसे विघटन न झाल्याने शरीरात अतिरिक्त फॅट(मेद)  साचून राहते. आयुर्वेदानुसार लठ्ठ्पणा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे दुबळी ‘डायजेस्टिव्ह फायर’.  यामुळे शरीरातील वात, कफ, पित्त यांचा समतोल ढासळतो. तसेच आरोग्यदेखील बिघडते.

जेवताना पाणी पिणे ही सवय असल्याने त्यापासून लगेच सुटका मिळणे शक्य नाही. परंतू या काही साध्या-सोप्या टीप्सने तुम्ही यावर मात करू शकता.

  • जेवणात मीठाचा वापर कमीत कमी करा -

मीठामुळे आपल्याला सतत तहान लागते.  त्यामुळे आहारात आवश्यक तेवढाच मीठाचा वापर करा. अळणी जेवणात वरून मीठ घालू नका.

  • जेवण चावून खा, गिळू नका - 

‘प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा.’ असे म्हटले जाते. कारण अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मीतीला चालना मिळते व पचनही सुधारते.  तसेच अन्न चावून खाल्ल्याने त्याचे विघटन आणि पचन सुधारते. याबरोबरच अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मिती  वाढते आणि पाणी पिण्याची इच्छा कमी होते.

  • जेवणाआधी 30 मिनिटे पाणी प्या - 

 rVita Ayurveda and yoga centers चे सीईओ डॉ. गौथमान यांच्या सल्ल्यानुसार, वजन घटवण्यासाठी तसेच उत्तम मेटॅबॉलिक रेटसाठी जेवणापूर्वी 30 मिनिटे अगोदर साधे पाणी प्यावे. यामुळे जेवताना  पाणी पिण्याची इच्छा कमी होते.

तसेच पाणी तांब्याच्या भांड्यातून पिणे हे अधिक हितकारी आहे. पाण्याबाबत तर तुम्हांला सारी माहिती मिळाली पण जेवण जमिनीवर बसून व हाताने का जेवावे ? हे देखील जरूर जाणून घ्या.

Translated By – Dipali Nevarekar

Source - 5-reasons-why-drinking-water-during-your-meals-is-bad-for-you

छायाचित्र सौजन्य – shutterstocks

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 

 

 

 

Viewing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>