Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?

$
0
0

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याच्या सल्ला देण्यात येतो.नवी दिल्लीतील अॅडवान्स फर्टीलिटी अॅन्ड गायनेकॉलॉजिकल सेंटरच्या क्लीनिकल डायरेक्टर व लिडींग आयव्हीएफ अॅन्ड इनफर्टीलिटी स्पेशलिस्ट डॉ.कावेरी बॅनर्जी यांच्याकडून जाणून घेऊयात गर्भनिरोधकांच्या वापराबाबत असलेल्या या शंकाची उत्तरे. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

१.गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने लगेच प्रजननक्षमतेवर विपरित परिणाम होतो असे नाही.पण जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ सतत व अयोग्य गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर तिच्या शरीरात हॉर्मोनल असतुंलन निर्माण होते.गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी, कंडोम – अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कोणता पर्याय स्विकाराल?

यासाठी गोळ्या घेतल्यावर पुढील बदल आढळल्यास त्या स्त्रीने तीच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला जरुर घ्यावा.

  • गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर जर तुम्हाला रॅशेस,खाज,श्वास घेताना त्रास जाणवत असेल तर

  • गर्भनिरोधक गोळ्या घेताना ब-याच स्त्रीयांना त्यांच्या मासिक पाळीच्या ठरलेल्या तारखेनंतर सात दिवसाच्या आत मासिक पाळी येणे अपेक्षित असते.पण जर असे झाले नाही तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घेणे जरुरी आहे.

  • जर तुम्हाला ओटीपोटात वेदना होणे,पाठदुखी,चक्कर,थकवा,मासिक पाळीच्या आधीच योनीमार्गातून रक्त येणे अशा समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाणे खुप गरजेचे आहे.

  • जर तुम्ही अॅन्टी-बायोटिक्स सारखी इतर औषधे घेत असाल तर

मासिकपाळी पुढे ढकलणार्‍या गोळ्या घेण्यापूर्वी जाणून घ्या त्याबाबत या ’10′ गोष्टी

२.गर्भनिरोधक गोळ्यांमुळे काय होते?

लेवेनोरगॅस्ट्रल(Levonorgestrel) गर्भनिरोधक गोळ्यांमुळे ओव्हूलेशन लांबते व शूक्राणूंचे व स्त्रीबीजासोबत होणारे मिलन होणे टाळले जाते.मात्र त्याआधीच गर्भधारणेची प्रक्रिया सुरु झाली असेल तर या गोळ्यांचा कोणताही परिणाम होत नाही.जाणून घ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय

३.गर्भनिरोधक गोळ्यांचा स्त्रीच्या शरीरावर काय परिणाम होतो?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रीयांमध्ये मळमळ,ओटीपोट दुखणे,उलटी,थकवा,डोकेदुखी ,मासिक चक्रात बदल,डायरिया,चक्कर  येणे,स्तन मऊ होणे,अ‍ॅलर्जी हे दुष्परिणाम दिसून येतात.हे दुष्परिणाम त्या स्त्रीच्या शरीर प्रकृतीप्रमाणे निरनिराळे असू शकतात.जर एखाद्या स्त्रीला या गोळ्या घेतल्यावर २ ते ३ तासात उलटी झाली तर तीला ती गोळी परत घ्यावी लागते.जेवणानंतर गोळ्या घेतल्याने उलटी व मळमळ कमी करता येते.

४.गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने त्या स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो?

इमरजन्सी गर्भनिरोधक गोळ्यांमुळे फर्टीलिटीवर कोणताही परिणाम होत नाही.मात्र या गोळ्यांच्या वापरामुळे त्या स्त्रीच्या हॉर्मोनल कार्यावर परिणाम होतो.यासाठी फक्त गरज असेल तेव्हाच या गोळ्यांचा वापर तुम्ही करु शकता.कधीकधी आधीच ओव्हूलेशन सुरु झाल्यास गोळ्या घेऊन देखील गर्भधारणा होऊ शकते.पुढे अनावश्यक झालेली ही गर्भधारणा काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्याने स्त्रीला भविष्यात वंधत्वाला सामोरे जावे लागू शकते.थोडक्यात गोळ्या घेतल्याने वंधत्व येत नाही. जाणून घ्या Emergency contraceptive pills किती वेळा घेणं सुरक्षित आहे ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


बेबी किक्स बाबत या ६ इंटरेस्टिंग गोष्टी

$
0
0

गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखद अनुभव असतो.गर्भातील बाळाच्या हालचाली व त्याच्या नाजूक लाथांचा अनुभव घेणे हे खूपच रोमांचक असू शकतो.तुमचे गरोदरपण सुखरुप व बाळाची वाढ योग्य दिशेने होत असल्याचे हे एक लक्षण असू शकते.जाणून घेऊयात बाळाच्या या हालचाली व गरोदरपणात तुमच्या शरीरात होणारे बदल नेमके काय दर्शवतात.

१.बेबी किक्स कशा ओळखाल-

मुंबईतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या consultant obstetrician, foetal and maternal medicine, specialist Shantala Vadeyar यांच्या मते बाळाची वाढ व विकास सुरु झाला की बाळ गर्भाशयात हालचाल करु लागते.बाळाच्या या हालचालींना बेबी किक्स असे म्हणतात.या हालचाली बाळाने हात व पाय ताणणे,बाळ एका कुशीला वळणे अशा स्वरुपाच्या असू शकतात.यातील सर्व हालचाली सुरुवातीला आईला जाणवतातच असे नाही.ज्या हालचाली आईला जाणवतात त्या तिला लाथांसारख्या वाटतात.पण पुढे काही आठवड्यांनी जेव्हा बाळ खरोखरच लाथ मारणे अथवा अंग ताणणे अशा हालचाली करु लागते तेव्हा त्या स्त्रीला या हालचाली नेमक्या ओळखणे कठीण जाते.

२.बेबी किक्सचा बाहेरील वातावरणाशी सबंध असतो-

बाळ गर्भाशयात आरामासाठी हात अथवा पाय ताणू लागते तेव्हा त्या हालचाली आईला लाथांप्रमाणे जाणवतात.डॉक्टरांच्या मते या किक्स अथवा हालचालींचा बाळाच्या वाढ व विकासाशी सबंध असतो.बाळ कदाचित बाहेरुन येणारा आवाज,प्रकाश अथवा आईकडून त्याला मिळणारे खाद्य याला प्रतिसाद देण्यासाठी लाथ मारत असू शकते.

३.आई जेवल्यानंतर बाळ खुप वेळ लाथा मारते-

पोटातील एक सुदृढ बाळ दिवसभरात कमीतकमी १५ ते २० वेळा लाथ मारु शकते.ब-याचदा बाळ आईच्या जेवणानंतर व बाहेर मोठा आवाज येत असल्यास अधिक लाथा मारु शकते. जाणून घ्या गर्भात असताना बाळ करते या 8′इंटरेस्टिंगगोष्टी !

४.बाळ नऊ आठवड्यांनी लाथ मारण्यास सुरुवात करते-

डॉक्टरांच्या मते बाळाच्या लाथा जरी आईला १८ ते १९ व्या आठवड्यापासून जाणवत असल्या तरी सामान्यत: बाळ नऊ आठवड्यांनी या हालचाली करण्यास सुरुवात करते.या हालचाली सुरुवातीला मातेला जाणवल्या नाही तरी अल्ट्रा साउंडच्या सहाय्याने त्या तिला पहाता येतात.जर मातेने जाणिवपुर्वक लक्ष दिले तर बाळाच्या या हालचाली सुरुवातीपासूनच तिला जाणवू शकतात.पण ब-याच माता याकडे पुरेसे लक्ष देत नसल्यामुळे या हालचाली प्रथम त्यांना जाणवत नाहीत.मात्र २४ व्या आठवड्यानंतर या लाथांचे प्रमाण खुप वाढल्यामुळे त्या मातेला मोठ्या प्रमाणावर जाणवू लागतात.जी माता दुस-यांदा आई होणार असते तिला या हालचाली १३ व्या आठवड्यानंतर नक्कीच जाणवू शकतात.

५.बाळाचे लाथा मारणे कमी होणे हे काही तरी समस्या असल्याचे हे एक लक्षण असू शकते-

एक निरोगी बाळ पोटात १५ ते २० वेळा लाथ मारु शकते.डॉक्टरांच्या मते बाळाचे लाथ मारणे कमी होणे हे काळजी करण्याचे एक कारण असू शकते.याचा अर्थ बाळाला पुसेसे पोषण व ऑक्सिजन मिळत नाही असा असू शकतो.याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तज्ञ अल्ट्रासाउंड स्कॅन व नॉन-स्ट्रेस टेस्ट करतात.त्यामुळे बाळाचे ठोके व हालचाली त्यांना समजू शकतात.कधीकधी अशा वेळी समस्या टाळण्यासाठी त्वरीत डिलीव्हरी करावी लागू शकते.थोडक्यात बाळाच्या हालचाली अथवा लाथा कमी झाल्यास त्याला मदतीची गरज आहे हे लक्षात ठेवा.त्यामुळे जर जेवल्यानंतर देखील बाळ एक तास काहीच हालचाल करत नसेल तर याबाबत त्वरीत तज्ञांचा सल्ला घ्या.कधीकधी आईची शूगर लेवल कमी झाल्यास देखील बाळाची हालचाल कमी होऊ शकते.

६.प्रत्येक वेळी बाळाची हालचाल अथवा लाथा मारणे कमी होणे हे काळजीचे कारण असेलच असे देखील नाही-

बाळ कधीकधी ४० ते ५० मिनीटे गर्भात विश्रांती घेऊ शकते किंवा कधीकधी ३६ आठवड्यांनंतर बाळाला गर्भातील जागा अपुरी पडत असल्यास देखील त्याची गर्भातील हालचाल कमी होऊ शकते.त्यामुळे बाळाची हालचाल कमी होणे हे नेहमी चुकीचे असेलच असे नाही. गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज!

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !

$
0
0

आजकालच्या बदललेल्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यात कामाचा व्याप आणि टार्गेट्सचा ताण यामुळे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे. पण हीच आपली जीवनशैली असल्याने त्यावर आपण काहीतरी मार्ग शोधणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपण ताणविरहित, आनंदी जीवन जगू शकतो.

कामाच्या ताणाचा परिणाम फक्त तुमच्या शरीरावर नाही तर मनावर देखील होतो. ताणामुळे मन अस्वस्थ होतं. राग, चिडचिड वाढते. आणि मग तोच राग आपण घरच्यांवर काढतो. तर काही वेळेस स्मोकिंगचा पर्याय निवडतो. स्मोकींग सोडण्यासाठी ११ सोप्या डाएट टिप्स  कामाच्या या सततच्या ताणाकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.

पण हाच ताण आपण वेगळ्या पद्धतीने दूर केला तर..? त्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही. व शरीर, मन देखील शांत होईल. यासाठी एक सोपा मार्ग. तो म्हणजे योगसाधना आणि त्यातील सहज सोप्या मुद्रा. या मुद्रा केल्याने ताण दूर होऊन तुम्ही आनंदी रहाल. ताणमुक्त राहण्यासाठी करा अधो मुख श्वानासन !

योगा एक्स्पर्ट रमण मिश्रा यांनी सांगितलेली योगमुद्रा केल्याने कामाचा ताण वेळीच दूर होण्यास मदत होते व संपूर्ण शरीरात ऊर्जेचा संचार होतो. मुद्रेमुळे हातावरील काही ठराविक अ‍ॅक्यूप्रेशर पॉईंट्स दाबले जातात. त्यामुळे अवयवांना चालना मिळते आणि ताण निघून जातो. शरीरातील शीण घालवणारे ‘शवासन’

सेपना मुद्रा केल्याने सगळे नकारात्मक विचार दूर होवून ताण दूर होण्यास मदत होते. तसंच या मुद्रेमुळे नैराश्य, नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर कामावरची एकाग्रता वाढण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. एकाग्रता वाढवण्यासाठी करा ‘ब्रम्हमुद्रा’ !

 

Ksepana mudra

इतर हस्तमुद्रांप्रमाणे ही मुद्रा करणे देखील अत्यंत सोपे आहे.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

जुळ्या बाळासाठीचे प्रयत्न यशस्वी करतील हे ’6′पर्याय !

$
0
0

जुळ्या मुलांची गंमतच काहीशी वेगळी असते. त्यामुळे काही जोडप्यांना आपल्याला जुळं व्हावं अशी इच्छा असते. पण जुळ्यांबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. म्हणूनच जुळ्यांबाबतच्या या शंका तुमच्याही मनात असतील तर वेळीच दूर करा. आणि जुळी मुलं होण्यासाठी प्रयत्न करण्यापूर्वी जुळ्यांचा जन्म कसा होतो हे जाणून घ्या.

  • कसा होतो जुळ्यांचा जन्म  ? 

जुळी मुलं ही दोन प्रकारची असतात. एक म्हाणजे monozygotic  - जे एकमेकांसारखे दिसतात आणि दुसरे dizygotic, म्हणजे जे एकमेकांसारखे दिसत नाहीत.

Mono zygotic twins मध्ये एक अंड एका स्पर्मसोबत फर्टीलाईज होते परंतू त्यामधून दोन इम्ब्रो किंवा गर्भाची वाढ होते. अशा प्रकारच्या बाळांमध्ये सारखेच जेनेटीक कम्पोझिशन असतात. या ’5′ व्यवसायातील पुरूषांमध्ये इन्फ़र्टीलिटीचा धोका अधिक असतो !

Dizygotic twins मध्ये मात्र दोन स्पर्म्सचा दोन अंड्यांशी संबंध येऊन बाळाची निर्मीती होते. अशामध्ये त्या जुळ्यांचा जेनेटीक कम्पोझिशनदेखील एकमेकांपासून भिन्न असतो. पण तुम्हांला  ठाऊक आहे का ? बाळ कसे होते ?

या काही मार्गांनी तुम्हांला जुळं होण्याची शक्यता वाढू शकते

1. अनुवंशिकता - तुमच्या घरात पूर्वी जुळ्या मुलांचा जन्म झाला असेल तर अनुवंशिकतेने तुम्हांलाही जुळं होण्याची शक्यता दाट असते. यामागे genetic predisposition कारणीभूत असते. जर तुम्ही स्वतः जुळ्यांपैकी एक असाल तर तुम्हांलाही जुळं होण्याची शक्यता वाढते. यामध्ये वडीलांच्या कुटूंबीयांशी थेट कोणताही संबंध नसतो. प्रामुख्याने ही गोष्ट आईकडच्या बाजुने अधिक प्रभावी असते. यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!

2. वजन आणि उंची - ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक आहे. मात्र तुमची उंची आणि वजन  यावर जुळ्यांचा जन्म आधारित असू शकतो. American College of Obstetrics and Gynaecology मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, 30 किंवा त्यापेक्षा अधिक बीएमआय असणार्‍या स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता अधिक असते. पण हा नियम  dizygotic twins मध्ये अधिक प्रकर्षाने जाणवतो. तसेच उंच स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता अधिक असते. बॉडी मास इंडेक्स खरंच देते का वजनाचा अचूक अंदाज ?

3.आईचे वय - जसे वय वाढत जाते तशी आई होण्याची शक्यता कमी होते. मात्र वाढत्या वयानुसार जुळं होण्याची शक्यता वाढते असा निष्कर्ष काही अभ्यासातून पुढे आला आहे. जसे वय वाढते तसे शरीरात follicle stimulating hormone चे प्रमाण वाढते. या हार्मोनमुळे अंडाशयातून अंड्याची निर्मीती होण्याची शक्यता वाढते.जितकी अंड्याची निर्मिती होण्याचे प्रमाण वाढते तशी जुळं होण्याची शक्यताही वाढते. नक्की वाचा ‘लिंग’ निदान करण्याच्या ’9′ रंजक पद्धती !

4. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह - अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टीव्हचा वापर केला जातो. मात्र कॉन्ट्रासेप्टीव्ह पिल्स घेण्याची सवय असणार्‍यांमध्ये गोळ्या घेणं बंद केल्यावर शरीरात हार्मोनल बदल होतात. परिणामी अशावेळी बाळासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये जुळ्या बाळाची निर्मिती होण्याची शक्यता वाढते.

5. पूर्वी जुळ्यांना जन्म दिल्यास - पूर्वी जुळ्यांना जन्म दिल्यानंतर पुन्हा दुसर्‍यांदा गरोदर स्त्रियांमध्ये सहाजिकच जुळ्यांचा जन्म होण्याची शक्यता वाढलेली असते. दुस-या बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी लक्षात ठेवा या ६ गोष्टी

6. आयवीएफ -  वरील उपायांनी तुम्हांला जुळं बाळ मिळेलच याची खात्री देता येत नाही. मात्र in-vitro fertilisationच्या मदतीने तुम्ही जुळं बाळं प्लॅन करू शकता. याप्रक्रियेमध्ये शरीराबाहेर अंड फर्टीलाईज केले जाते. त्यानंतर गर्भाशयात त्याचा प्रवेश करून दिला जातो. त्यामुळे आयवीएफच्या मदतीने नक्कीच जुळ्या  बाळाला जन्म देणं शक्य आहे. गर्भात असताना बाळ करते या ’8′ इंटरेस्टिंग गोष्टी !

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
References:

1. Hoekstra C, Zhao ZZ, Lambalk CB, Willemsen G, Martin NG, Boomsma DI, Montgomery GW. Dizygotic twinning. Hum Reprod Update. 2008 Jan-Feb;14(1):37-47. Review. PubMed PMID: 18024802.

2. Reddy UM, Branum AM, Klebanoff MA. Relationship of maternal body mass index and height to twinning. Obstet Gynecol. 2005 Mar;105(3):593-7. PubMed PMID: 15738030.

3. Dua M, Bhatia V, Malik S, Prakash V. ART outcome in young women with premature ovarian aging. Journal of Mid-Life Health. 2013;4(4):230-232. doi:10.4103/0976-7800.122257.

 

अतिव्यायामाचा मासिकपाळीवर परिणाम होतो का ?

$
0
0

व्यायामाने केवळ वजन कमी होते असे नाही. एकूणच शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो. नियमित व्यायामाच्या सवयीमुळे केसांचे, त्वचेचे आरोग्य सुधारते. मासिकपाळीच्या दिवसातील त्रासही कमी करण्यास व्यायाम फायदेशीर ठरतो. पण मासिकपाळीच्या दिवसात रक्तस्त्राव होत असल्याने कमजोरी येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आहाराचे पथ्यपाणी सांभाळून प्रमाणातच व्यायाम करावा. मासिकपाळीच्या दिवसात शरीरात  हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार होतात. म्हणूनच व्यायामाने त्यामधील संतुलन राखता येते.

स्त्रीरोगतज्ञ अरुंधती धर यांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या शरीराचा बीएमआय कमी असल्यास त्याच्या तुलनेत खूप शारीरिक मेहनत घेत असल्यास हे नक्कीच त्रासदायक ठरू शकते. व्यायम करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये पुरेशी उर्जा असणं गरजेचे आहे. शरीरात उर्जा नसताना अति व्यायाम केल्यास मासिकपाळीच्या दिवसात त्रास होतो. मासिक पाळीच्या दिवसात अतिव्यायाम, एखादी फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी किंवा खेळ खेळल्याने शारिरीक आणि मानसिक ताण वाढतो. त्याच्या परिणाम मासिकपाळीच्या चक्रावर होतो. परिणामी तरूण मुलींमध्ये मासिकपाळीमध्ये अनियमितता येणे, अनेक दिवसांच्या, महिन्याच्या फरकाने मासिकपाळी येते.

टीप्स -

मासिकपाळीमध्ये अनियमिततेसोबतच थकवा आणि त्रास जाणवत असेल तर व्यायम करताना MyFitnessPal सारखे अ‍ॅप वापरा. या अ‍ॅपमुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नातून तयार झालेल्या उर्जेपेक्षा अधिक शारिरीक कष्ट होत नाहीत याची काळजी घेतली जाते.जेव्हा तुमच्या आहारामध्ये अधिक पोषणद्रव्य आणि व्यायमातून अधिक उर्जा वाया जात नाही. अशावेळी मासिकपाळीचे चक्र व्यवस्थित चालते. मासिकपाळीचे चक्र फार काळ लांबले तर शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण ढासळते परिणामी ऑस्टोपोरायसिसचा त्रास वाढतो.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

आहाराची ही ’6′पथ्यपाणी सांभाळल्यास कमी होईल कॅन्सरचा धोका !

$
0
0

जगभरातल्या मृत्यूचे प्रमुख कारण कॅन्सर हे आहे. WHO च्या अहवालानुसार ८.२ मिलियन्स मृत्यू हे कॅन्सरमुळे झाले आहेत. फक्त याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी सुमारे १.१ मिलियन कॅन्सर रुग्णाची नोंद होते. त्यापैकी भारतातील ३.३ मिलियन लोक कॅन्सरने पीडित आहेत. US Department of Health and Human Services (USDHHS) ची संस्था National Cancer Institute (NCI) च्या अहवालानुसार प्रत्येक वर्षी १३ नवीन कॅन्सर पेशन्ट हे भारतीय असतात. आणि कॅन्सरशी सामना करण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. दिल्लीच्या फोर्टीज हॉस्पिटलचे Senior Consultant Oncologist डॉ. विकास गोस्वामी यांच्या सल्ल्यानुसार कॅन्सर होण्यास आपल्या दैनंदिन सवयी विशेषतः आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचन न होणारे पदार्थ carcinogens असतात. किंवा कॅन्सरच्या सेलची निर्मिती करणारे पदार्थ खाल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. तसंच त्याचा कॅन्सर सेल्सवर थेट परिणाम होतो. सकस व संतुलित आहार घेतल्याने तुम्ही दीर्घ काळापर्यंत कॅन्सरपासून दूर रहाल. म्हणून डॉ. गोस्वामी यांनी आहारातून कॅन्सरवर मात करण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी या ’7′ सवयी अंमलात आणाच !

1. शाकाहारी अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा: मासांहारी अन्नपदार्थांपेक्षा शाकाहारी अन्नापासून शरीराला अधिक आरोग्यदायी फायदे मिळतात. म्हणून आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, सलाड, कडधान्य, डाळी यांचा समावेश करा. कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांमुळे prostate cancer चा धोका वाढतो?

2. ओमेगा थ्री फॅटी असिडयुक्त पदार्थ खा : ओमेगा थ्री फॅटी असिडमध्ये कॅन्सरशी सामना करण्याचे गुणधर्म असल्याने त्याचा आहारात अवश्य समावेश करा. salmon आणि sardines या माशांमध्ये आणि अक्रोड, आळशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड मुबलक प्रमाणात असते.

3. जास्तीत जास्त प्रमाणात दही खा: दह्यात असलेल्या बॅक्टरीया व्हिटॅमिन बी १२ आणि मेटाबोलिसमसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या (metabolites)  निर्मितीस मदत करतात. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरला आळा बसतो. तसंच metabolites मुळे फॅट्सचे मेटाबोलिसम होण्यास मदत होते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. या ’10′ लक्षणांनी पोटाचा कॅन्सर वेळीच ओळखा !

4. मांसाहारी पदार्थांचे सेवन कमी करा: मांसाहारी पदार्थांपेक्षा अँटिऑक्सिडेन्ट युक्त फळे, भाज्या खाणे जास्त योग्य ठरेल. विशेषतः रेड मीट खाणे टाळा. कारण मीटमध्ये फायबर आणि कॅन्सरला प्रतिबंध करणारे इतर पोषक घटक नसतात. त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असल्याने ओबेसिटी आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. काळामिरी कमी करते कर्करोगाची शक्यता !

5. हायड्रेट रहा: शरीराला आवश्यक तितके पाणी जरूर प्या. त्यामुळे शरीरातील इतर क्रिया सुरळीत होण्यास व टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. कारण फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढले की कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणून भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा. शरीरातील फ्लुइड लेव्हल योग्य राखण्यासाठी सतत पाणी पित रहा. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !

6. भाज्या व फळे स्वच्छ धुवा: पेस्टीसाईडस फवारलेल्या भाज्या व फळे खाणे घातक असते. त्यामुळे भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे फार महत्त्वाचे असते. यासाठी फक्त पाणी नाही तर व्हिनेगर आणि मीठाचा वापर करा. ३ कप पाण्यात १ कप व्हाईट व्हिनेगर घाला. त्यात चमचाभर बेकींग सोडा घाला. आणि हे मिश्रण भाज्या व फळे धुण्यासाठी वापरा. त्यामुळे बॅक्टरीया, फळांवर लावलेले वॅक्स (मेण) निघून जाण्यास मदत होते. आजकाल सफरचंदावर वॅक्स लावलेले असते. त्यामुळे ते चमकदार दिसतात. चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

लहान मुलांमधील जंताची समस्या कमी करण्यासाठी ६ उपाय

$
0
0

जर तुमच्या मुलांच्या सतत पोटात दुखत असेल अथवा त्यांना भूक लागत नसेल तर त्यांना पोटात जंताची समस्या असू शकते.लहान मुलांप्रमाणे पोटातील जंत मोठ्या माणसांमध्ये देखील आढळतात.मात्र या समस्येवर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. तुमची मुले वारंवार आजारी पडतात का?

वाशी येथील फोर्टीस हिरानंदानी हॉस्पिटलचे Paediatrician व Neonatologist डॉ. अशोक गोवडी यांच्यामते जाणून घेऊयात मुलांमधील जंताची समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय-

१.मुलांचे दात घासण्यासाठी नळाचे पाणी वापरणे टाळा-

लहान मुले दात घासताना तोंडात घेतलेले पाणी गिळू शकतात.नळाचे पाणी शुद्ध नसल्याने त्यामध्ये जीवजंतू असतात.यासाठी मुलांना दात स्वच्छ करण्यासाठी घरातील गाळलेले पाणी द्या.मुले गुळण्या करताना पाणी तोंडात घेतल्यावर थुंकण्याऐवजी ते पाणी गिळून टाकतात.असे अशुद्ध पाणी पोटात गेल्यामुळे त्यांना जंताचा त्रास होऊ शकतो.

२.मुलांना अंघोळ घालताना त्यांची काळजी घ्या-

दात स्वच्छ करताना केल्याप्रमाणे मुले अंघोळ करताना देखील पाणी तोंडात घेऊन गिळण्याची शक्यता असते.काही घरात बोरींगचे पाणी अंघोळीसाठी वापरण्यात येते.असे पाणी दुषित असण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे असे पाणी पोटात गेल्याने तुमच्या मुलांना जंत होण्याचा धोका देखील वाढतो.यासाठी मुलांना अंघोळ घालताना मुले ते पाणी तोंडात घेणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

३.विशेषत: जेवणापूर्वी मुलांना हात स्वच्छ धुण्यास आवर्जुन सांगा-

मुले दिवसभर घराबाहेर खेळत असतात.खेळताना मातीमुळे त्यांचे हात खराब होतात.यातून त्यांना जंतूसंपर्क होऊ शकतो.यासाठी खेळल्यानंतर विशेषत: जेवताना मुलांना कटाक्षाने हात धुण्याची सवय लावा.असे केल्याने तुमची मुले सतत आजारी पडणार नाहीत व इतर आरोग्य समस्यांप्रमाणे त्यांना जंताचा त्रास देखील होणार नाही.

४.नियमित मुलांची नखे कापा व त्यांना नखे चावण्यापासून परावृत्त करा-

मुलांच्या नखांच्या आतील त्वचेवर अनेक प्रकारचे बॅक्टरिया,फंगस आणि यीस्ट वाढू शकतात.विशेषत: Staphylococcus Aureus या जीवाणूमुळे मुलांना त्वचेचे इनफेक्शन होते व त्यामध्ये जीवाणूंची वाढ होते.जेव्हा मुले मळलेल्या हातानी अन्न खातात तेव्हा हे जंतू तोंडामार्फत त्यांच्या पोटात प्रवेश करतात.त्यामुळे जर तुम्ही मुलांची नियमित नखे कापली व त्यांना नखे कुरतडण्यापासून परावृत्त केले तर त्यांना जंताची समस्या होणार नाही.

५.मुलांना साखर व गोड पदार्थ देणे टाळा-

आपल्या पालकांनी आपल्याला लहानपणी साखर खाऊ नये असे सांगण्यामागे हेच कारण होते.गोड पदार्थांमुळे जंताचे पोषण होते.त्यामुळे मुलांना गोडाचे पदार्थ कमी दिले तर त्यांना पोटाचे इनफेक्शन देखील कमी होऊ शकते.त्याचप्रमाणे हे इनफेक्शन टाळण्यासाठी तुमच्या मुलांना रस्त्यावरचे प्रदुषित खाद्यपदार्थ देखील खाण्यास देऊ नका.

६.कच्चा भाज्या व फळे स्वच्छ धुतल्याशिवाय सलाडमध्ये वापरु नका-

कच्चा भाज्या व फळे खाणे हे आरोग्यासाठी हितकारक असले तरी त्यामुळे इनफेक्शन होण्याचा धोका असतो.न धुतलेली भाजी व फळे प्रदुषित असल्याने खाण्यापुर्वी भाज्या व फळे स्वच्छ धुण्यास विसरु नका.असे केल्याने तुमच्या मुलांना इनफेक्शन व जंताचा धोका कमी होईल. जंत झाले असल्यास भूक जास्त प्रमाणात लागू शकते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

व्हेरिकोस व्हेन्सच्या रुग्णांनी कशी घ्यावी काळजी ?

$
0
0

व्हेरिकोस व्हेन्स म्हणजे पायांंच्या पोटर्‍यांजवळ रक्तवाहिन्या फुगून त्यांच्या गाठी/जाळं निर्माण होण्याची समस्या ! व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास खूपच त्रासदायक असतो. जर या समस्येकडे दुर्लक्ष केले गेले तर त्यातून रक्त येणे,अल्सर होणे व इनफेक्शन होण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.जी लवकर बरी होत नाही.या कारणांंमुळे पायांंवर वाढते सूज ! म्हणूनच मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजीशिअन डॉ प्रदीप शाह यांच्या कडून जाणून घेऊयात व्हेरिकोस व्हेन्सच्या रुग्णांसाठी या काही महत्वाच्या टीप्स-

काय कराल-

१.जर तुम्ही दिवसभर उभे राहून काम करत असाल तर ते करताना अधूनमधून अथवा प्रत्येक २ ते ३ तासांनी थोडा ब्रेक घ्या.अशा वेळी खुर्चीवर बसा व तुमचे पाय एखाद्या टेबलावर ठेवा.

२.तुमच्या पायाला सूज येत असल्यास रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आठवणीने स्टॉकींग्स घाला.जर तुम्हाला वेरीकोस वेन्सची समस्या असेल तर त्यामुळे कोलेजीन पेशी कमजोर व लवचिक होतात ज्यामुळे लवकर जखमा होणे अथवा त्यातून रक्त येण्याची शक्यता असते.यासाठी तुमच्या शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहा.जर तुमचा डेस्क जॉब असेल,तुम्ही जर सतत विमानानेे प्रवास करीत असाल किंवा तुम्ही उभे राहून काम करीत असाल तर तुम्ही पायात स्टॉकींग्स वापरणे गरजेचे आहे.

३.नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारेल व तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील.कारण जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर पायावर त्याचा दाब येऊन ही समस्या अधिकच वाढू शकते.

४.चालताना पायावर कमी दाब येण्यासाठी फ्लॅट अथवा कमी हिल्सचे शूज वापरा.त्याचप्रमाणे उंच टाचाचे शूज वापरणे जाणिवपूर्वक टाळा कारण त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.

काय करु नका-

१. एकाच ठिकाणी बराच वेळ उभे राहू नका कारण त्यामुळे तुमच्या पायामध्ये रक्त साठून तुम्हाला वेदना होऊ शकतात.ट्राफिक पोलिस अथवा रिसेप्टनीस्ट यासारखे उभे राहून काम करणा-या लोकांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी.तुम्हाला जर बराच वेळ उभे राहण्याची वेळ आली तर थोड्यावेळ एका पायावर व थोड्यावेळ दुस-या पायावर वजन टाका कारण असे थोड्यावेळासाठी एकाच पायावर वजन टाकल्याने तेव्हा तुमच्या दुस-या पायाला आराम मिळतो.अशा वेळी थोड्यावेळ चाला,चवडयांवर उभे रहा अथवा पायांना स्टेच करा ज्यामुळे पायांना हा दाब सहन करणे सोपे जाईल.

२.बसताना पायावर पाय टाकून बसू नका कारण त्यामुळे रक्तप्रवाह थांबल्यामुळे तुमची स्थिती अधिकच बळावू शकते.यापेक्षा तुमचे पाय वरच्या दिशेला ठेवा अथवा आराम करताना पायाखाली उशी ठेवा.त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारेल व तुम्हाला आराम मिळेल.

३.एकाच जागी बराच काळ बसू नका.या पेक्षा थोड्या थोड्या वेळाने उठा व ३० ते ३५ मिनीटे चाला.त्यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळेल.

४.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मलम अथवा घरगुती उपचार करु नका.कारण वेरीकोस वेन्स या समस्येमुळे तुमच्या पायातील नसा कमजोर झाल्यामुळे रक्तप्रवाह खंडीत झालेला असतो व ही एक अंतर्गत आरोग्य समस्या आहे.त्यामुळे या समस्येवर तज्ञांकडून उपचार होणे आवश्यक असते.त्यामुळे हर्बल उपचार अथवा मलमामुळे तुमची समस्या बरी होईल या भ्रमात राहू नका.असे असले तरी कधीकधी काही घरगुती उपचारांमुळे तुम्हाला तात्पुरता आराम देखील मिळू शकतो.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


मिंलिंद सोमण आता Ultraman –फ्लोरिडात पूर्ण केली जगातील सर्वात कठीण Ultraman triathlon

$
0
0

51  वर्षीय मिलिंद सोमण याने लागोपाठ तीन दिवसात 10 किमी स्विमिंग, 421 किमी सायकलिंग आणि 84.4 किमी धावून अल्ट्रामॅन हा नवा किताब पटकवला आहे. अल्ट्रामॅन ट्रायथलॉन ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मिलिंदला एकूण तीन दिवसात 34 तास 46 मिनिटे आणि 14 सेकंदांचा वेळ लागला.

दोन वर्षांपूर्वी मिलिंद सोमण याने ‘आयर्नमॅन’चा किताब पटकवला होता. जगातील एक आव्हानात्मक समजली जाणारी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा मिलिंद सोमण याने पन्नाशीच्या टप्प्यावर उभा असताना पूर्ण केल्यानंतरही मिलिंद थांबला नाही. ‘आयर्नमॅन’ नंतर त्याने त्याहून अधिक आव्हानात्मक समजली जाणारी ‘अल्ट्रामॅन’ ही स्पर्धा फ्लॉरिडा (अमेरिकेत) येथे पूर्ण केली आहे.

milind and usha soman

 

मिलिंद सोमण सोबतच भारतातील एकमेव ‘आयर्नमॅन’ कोच कौस्तुभ राडकर सह अन्य तीन भारतीयांनीही देखील ‘अल्ट्रामॅन’ वर आपले नाव कोरले आहे. अमेरिकेत यावेळी मिलिंद सोमणचा उत्साह वाढवण्यासाठी त्याच्यासोबत मिलिंदची आई उषा सोमण यादेखील उपस्थित होत्या.  येथे क्लिक करा आणि जाणून घ्या आयर्नमॅन कौस्तुभ राडकरची हेल्थ सिक्रेट्स

काय  असते अल्ट्रामॅन स्पर्धा ?

  • आयर्नमॅन प्रमाणेच  अल्ट्रामॅन ही स्पर्धादेखील   स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा तीन टप्प्यांत असते. परंतू आयर्नमॅनस्पर्धेमध्ये हे तिन्ही ट्प्पे एकापाठोपाठ आणि एकाच दिवशी पूर्ण केले जातात. मात्र अल्ट्रामॅन स्पर्धेत स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगचे आव्हान एकापाठोपाठ एक तीन दिवसात असते.
  • अल्ट्रामॅन स्पर्धकाला 6.2 मैल स्विमिंग, 263 मैल सायकलिंग आणि 52.4 मैल धावणं गरजेचे असते. यापैकी पहिल्या दिवशी स्पर्धक 6.2 मैल स्विमिंग आणि 92 मैल सायकलिंग करतो. तर दुसर्‍या दिवशी 171 मैल सायकलिंग आणि तिसर्‍या दिवशी 52.4 मैल धावण्याची कसोटी असते.

मिलिंद सोमण पिंकाथॉनसारख्या स्पर्धेचा एक अविभाज्य भाग आहे. देशभरात समजामध्ये फीटनेस बाबत सजगता निर्माण करण्यासाठी मिलिंद पिंकाथॉन धावतो. प्रामुख्याने स्त्रियांनी त्यांच्या फीटनेसकडे लक्ष द्यावे हे यामागील उद्दिष्ट असते. त्यादृष्टीने तो वेळोवेळी प्रयत्नशील असतो.

वयाची पन्नाशी पार केलेल्या मिलिंदसाठी  वय हा केवळ बदलणारा नंबर आहे. एव्हरयंग आणि हार्टथ्रोब मिलिंद  सोमणकडून प्रत्येकानेच उर्जा आणि प्रेरणा घेऊन स्वतःच्या फीटनेसकडे लक्ष देणं आणि स्वतःसाठी पाहणं गरजेचे आहे.

छायाचित्र सौजन्य – फेसबूक

या लक्षणांनी वेळीच ओळखा ऑटिझम आणि त्यावरील उपाय !

$
0
0

ऑटीझम हा एक डेव्हलपमेंटल विकार आहे.या विकाराचे मेडीकल टेस्ट करुन निदान करता येत नाही.पण पालक मुलांसोबत प्रत्येक क्षण असतात त्यामुळे पालकांना मुलांधील ऑटीझमची पुर्व लक्षणे ओळखता येऊ शकतात.

दिल्लीतील स्पर्श फॉर चिल्ड्रन या बौधिक कमकुवत मुलांसाठी असलेल्या मल्टीडिसीिप्लनरी थेरपी सेंटरमधील एक्सपर्ट मिस सौरभी वर्मा यांच्याकडून जाणून घेऊयात मुलांमध्ये ऑटीझम हा विकार लहानपणीच कसा ओळखावा.

लहान मुलांमध्ये ऑटीझमची ही लक्षणे आढळतात-

सहा महिने-असे बाळ आनंदी अथवा भावनिक क्षणी मोकळेपणाने हसत नाहीत.

नऊ महिने-असे मुल आवाजाने,हसण्याने आपल्या भावना व्यक्त करत नाहीत किंवा एकटेच हसत अथवा स्माईल करत बसतात. 

बारा महिने- हे बाळ त्याच्या नावाला प्रतिसाद देत नाही.इतर लहान बाळाप्रमाणे बडबड करणे,धावणे,एखादी गोष्ट दाखवणे व ओढून घेणे,चुळबूळ करणे अशा हालचाली ते करीत नाही.

सोळा महिने- बाळ इतर लहान बाळांप्रमाणेतोंडातून शब्द उच्चारत नाही.ते एखादे बडबड गीत अथवा गाणे गुणगुणते पण त्याला भुक लागली आहे अथवा टॉयलेटसाठी जायचे आहे अशा गरजेच्या गोष्टी सांगत नाही.इतर मुलांप्रमाणे सर्वामध्ये मिसळण्यापेक्षा ते एकांतात रहाते.ते तुमच्या सोबत बोलते पण तुम्ही बोलताना तुमच्या चेह-याकडे पहात नाही.

२४ महिने-असे बाळ एखाद्या गोष्टीचे अनुकरण व पुनरावृत्ती करीत नाही.शब्द व खेळ अशा एखाद्या अॅक्टीव्हीटीज मध्ये ते खूप चांगले असू शकते.किंवा एखाद्या वस्तूसोबत त्यांची खूप जवळीक असू शकते.

एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळाच्या सामाजिक संवाद कौशल्याच्या विकासाकडे नीट लक्ष दिले पाहीजे.तुमचे बाळ इतरांसोबत बोलताना आय कॉन्टेक्ट देते अथवा हातवारे करते का हे तुम्ही पाहिले पाहिजे.

ऑटीझम पुर्ण बरा करता येत नाही पण लवकर निदान झाल्यास तुम्ही त्याच्यावर योग्य उपचार करु शकता.त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये ही लक्षणे आढळली तर त्वरीत तुमच्या बाळाच्या पिडीयाट्रिशनचा याबाबत सल्ला घ्या.

ऑटिस्टिक मुलांसोबत कसे वागाल?

त्यांच्याबद्दल महिती मिळवा-

जर तुमचे बाळ स्पेशल चाईल्ड असेल तर त्याच्यासाठी काय चांगले व काय चुकीचे आहे याबाबत योग्य ज्ञान घ्या.अशी मुले निरनिराळ्या पद्धतीने विकसित होतात त्यामुळे त्यांच्या विकासाचे निरिक्षण करा.यासाठी तुमच्या बाळाच्या शारीरिक,भावनिक,सामाजिक,भाषिक व वर्तणुकीच्या विकासाकडे नीट लक्ष द्या. ‘ऑटिस्टिक मुलांना सांभाळताना या ’6 गोष्टी लक्षात ठेवा

मुलाला प्रेम व आधार द्या-

उपचारासोबत अशा मुलांना कुटूंबाच्या प्रेम व आधाराची अधिक गरज असते.त्यामुळे अशा मुलांना शिकण्यास व वाढण्यास मदत करा.अशी मुले इतर मुलांप्रमाणे जाणिवपूर्वक गैरवर्तन करीत नाहीत.ही मुले सोशली अॅक्टीव्ह देखील नसतात कारण त्यांचा मेंदू त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सक्षम नसतो.

प्रश्न विचारत रहा-

प्रत्येक ऑटीझम मुल निरनिराळ्या पद्धतीने वागू शकते.त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलामधील फरक समजला तर तुम्हाला त्याला समजून घेणे सोपे जाऊ शकते.यासाठी तुमचे मुल आवाज अथवा प्रकाशाबाबत अती संवेदनशील आहे का ते तपासा.त्यांना वारंवार त्यांच्या ज्ञानेद्रिंयाबाबत सांगावे लागते का हे पहा.अशा समस्या असतील तर या गोष्टी पुढे हळूहळू सुधारतील अशा भ्रमात राहू नका.त्यापेक्षा वेळीच तज्ञांच्या मदतीने त्यांचा विकास करण्यासाठी छोटी व मोठी ध्येय आखा व त्याप्रमाणे प्रयत्न करण्यास सुरुवात करा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ‘५’नैसर्गिक तेलांनी दात होतील मजबूत !

$
0
0

दातांचे आरोग्य राखणे गरजेचे आहे कारण ते आपल्याला एकदाच मिळतात. त्यात काही बिघाड झाला तर त्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. रूट कॅनल, डेंटल क्लीनअप किंवा नवीन दात बसवणे या ट्रीटमेंटस अतिशय महागड्या आहेत. दात किडू नये, हिरड्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी टूथब्रश आणि पेस्ट व्यतिरिक अधिक काही करण्याची गरज आहे. तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी मिळणाऱ्या प्रोडक्टसमध्ये Sodium Laurel Sulfate आणि triclosan यांसारखे अँटीबॅक्टरील केमिकल अजन्ट्स असतात. त्यात carcinogenic आणि endocrine-disturbing गुणधर्म असल्याने त्याऐवजी काही नैसर्गिक उपाय करणे उत्तम ठरेल. या ५ तेलांच्या नियमित वापराने तुमच्या दात आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तमरीत्या राखले जाईल. जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे

लवंग तेल: दात दुखू लागल्यावर लवंग चघळण्याचा सल्ला हमखास दिला जातो. त्यामुळे तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी लवंग हा एक नैसर्गिक उपाय आहे. लवंगामुळे तोंडातील बॅक्टरीया नष्ट होतात. तसंच ते एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. आलोपॅथिक पेनकिलर्सवर लवंग तेल हा सुरक्षित आणि लवकर आराम देणारा पर्याय आहे. परंतु, त्याच्या अति प्रमाणामुळे तोंडाला सुन्नता येईल. कोमट पाण्यात एक थेंब लवंग तेल घाला आणि झोपण्याआधी त्याने गुळण्या करा. एका मिनिटात दातदुखी दुर करणारे घरगुती उपाय !

दालचिनी तेल: तोंडातील बॅक्टरीयाचा नाश करण्यासाठी लवंग तेल उत्तम आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की तोंडातील बॅक्टरीयांसाठी दालचिनी तेल हे लवंग तेलापेक्षा अधिक परिणामकारक आहे. परंतु, लवंग तेलाप्रमाणे याचा देखील अती वापर टाळावा. गुळण्या करण्यासाठी कोमट पाण्यात फक्त दोन थेंब दालचिनी तेल घाला.

पुदीना तेल: या तेलाचा गंध आणि त्यातील अँटीमायक्रोबीयल गुणधर्मांमुळे तोंडाच्या आरोग्यासाठी हे तेल उत्तम समजले जाते. दात काढण्याचा निर्णय या ’5′ कारणांमुळे घ्यावा लागतो !

निलगिरी तेल: कॅन्सर निर्माण करणाऱ्या Streptococcus mutans आणि Streptococcus sobrinus यांसारख्या बॅक्टरीयांवर निलगिरी तेल अत्यंत उपयुक्त आहे. तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी तुमच्या टूथपेस्ट किंवा माऊथवॉश मध्ये निलगिरी तेलाचा एक थेंब घाला. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !

Sage oil: अँटीबॅक्टरील गुणधर्मांमुळे gingivitis सारख्या तोंडाच्या समस्यांवर हे तेल उपयुक्त ठरते. तोंडाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी या तेलाचा नियमित वापर करा. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे ९ घरगुती उपाय

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

या सोप्या पद्धतीने दात होतील शुभ्र आणि चमकदार !

$
0
0

तुमचे हास्य हे तुमच्या सौंदर्याबरोबरच तुमच्या आरोग्याचे ही प्रतीक आहे. त्यामुळे तोंडाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. दिवसभरातून फक्त ५ मिनिटे आपण दातांच्या स्वच्छतेसाठी  देतो. ती पण घाईघाईतच. परंतु, हे पुरेसे नाहीये. कारण दातात अन्नाचे कण अडकलेले असतात. दात स्वच्छ व चमकदार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही जिन्नस उपयुक्त ठरतात.  दात पिवळे होण्याची कारणं जाणा, भविष्यातील धोका टाळा

त्यामुळे महागड्या ट्रीटमेंट पेक्षा या सोप्या ट्रिक्स नक्की करूंन बघा. दातांची शुभ्रता वाढवणार हा टाकाऊ पदार्थ

साहीत्य:

  • संत्र, मोसंबी किंवा लिंबू यांसारख्या (citrus fruit) फळांचा एक मोठा तुकडा.
  • ३-४ तुमच्या आवडत्या टूथपेस्ट (अधिकतर सफेद टूथपेस्ट, जेल वापरू नका.)
  • अर्धा चमचा बेकींग सोडा.
  • चिमूटभर कोळशाची पावडर (असेल तर).
  • एक टूथपीक.
  • एक लहान चमचा.

कृती:

सायट्रस फळाचा तुकडा काही वेळ चावत रहा. जोपर्यंत त्यातून रस बाहेर येत नाही. नंतर तो तुकडा बाहेर काढा. फळाचा काहीसा गर दाताला चिकटून राहील. एका कोरड्या भांड्यात ३-४ तुमच्या आवडत्या टूथपेस्ट घ्या आणि त्यात थोडी कोळशाची पावडर घाला.

टूथपीकने ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात बेकिंग पावडर घालून पुन्हा मिक्स करा. आता फळाच्या तुकड्यावर ते मिश्रण लावा. आणि ते फळ खाताना तुमच्या दोन्ही ओठांना (वरचा आणि खालचा) ते मिश्रण पूर्णपणे लागलं पाहिजे.

फळाचा तुकडा ५ मिनिटे तोंडात ठेवा. जर जास्त स्वच्छतेची गरज असेल तर तो तुकडा अधिक वेळ तोंडात ठेवा. नंतर तो तुकडा काढून फेकून द्या आणि तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टने ब्रश करा. आतल्या बाजूच्या दातांकडे विशेष लक्ष द्या. ब्रश करून झाल्यावर स्वच्छ चूळ भरा. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे ९ घरगुती उपाय

वेगवेगळ्या टूथपेस्टचे कॉम्बिनेशन, कोळसा आणि बेकिंग सोडा यामुळे दातांवरील प्लाग निघून जाण्यास मदत होते. बेकिंग सोड्यामध्ये erosive गुणधर्म असल्यामुळे हा प्रयोग महिन्यातून दोनदाच करा. तसंच हा प्रयोग केल्यानंतर लगेच काही थंड किंवा गरम खाऊ नका. त्यामुळे दातात सेन्सिटिव्हिटी जाणवेल. जाणून घ्या दात सेन्सिटिव्ह का आणि कशामुळे होतात?

ही ट्रिक ट्राय करा आणि शुभ्र, चमकदार दातांनी सुंदर हास्य मिळवा. एका मिनिटात हटवा दातांचा पिवळेपणा !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

कोथिंबीर- कोरड्या त्वचेसाठी अगदी सोपा घरगुती उपाय.

$
0
0

आपली त्वचा नितळ, मुलायम असावी असे प्रत्येकीला वाटते. पण ऋतुमानानुसार त्वचा बदलते आणि त्यावर आपल्याला नवे उपाय शोधावे लागतात. आता हिवाळ्यात कोरड्या होणाऱ्या त्वचेसाठी काय करावे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कोथिंबीर साधारपणे पदार्थ सुभोभित करण्यासाठी किंवा त्याची चव, स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? की त्वचेसाठी देखील कोथिंबीर उपयुक्त आहे. कोथिंबीरचा उपयोग हिवाळ्यात कोरड्या होणाऱ्या त्वचेवर देखील होतो. पिंपल्स, ब्लॅक हेडसवर कोथिंबीर हा नैसर्गिक उपाय आहे. जरूर वाचा:  धणे-हळदीच्या मिश्रणाने दूर करा पिंपल, ब्लॅकहेड्सची समस्या !

कोरड्या त्वचेसाठी महागड्या क्रीम्स वापरण्याऐवजी हा नैसर्गिक उपाय करून बघा. तो करण्यास ही अगदी सहज सोपा असून अतिशय परिमाणकारक आहे. नक्की वाचा:  कोथिंबीरीची फूलं खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

कोथिंबीरचा वापर कसा करावा?

कोरड्या त्वचेसाठी कोथिंबीर फेसपॅक बनवण्याचे टप्पे:

१. ओंजळभर कोथिंबिरीची पाने घेऊन ग्राइंडर मध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा.

२. ती पेस्ट गाळून घ्या. गाळलेल्या रसात चिमूटभर हळद घाला आणि ते मिश्रण एकजीव करा. त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!

३. ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करा. झटपट टीप्स – कसा कराल घरच्या घरी चेहरा स्वच्छ ?

४. काही वेळ पॅक चेहऱ्यावर सुकू द्या. रात्री झोपण्यापूर्वी हा पॅक लावल्यास अधिक उत्तम. नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा !

५. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. अधिक चांगल्या फायद्यासाठी हा पॅक रोज लावा. शहाळ्याच्या पाण्याने मिळवा ‘तजेलदार त्वचा’ !

याचा फायदा कशाप्रकारे होतो?

कोथिंबिरीच्या पानात हळद घातलेला फेसपॅक हा कोरड्या त्वचेसाठी परिणामकारक घरगुती उपाय आहे. त्यामुळे त्वचा स्वच्छ होवून त्वचेचे ओपन झालेले पोर्स बंद होतात. कोथिंबिरीमध्ये असलेल्या volatile oil मुळे त्वचा मॉइश्चराईज होते. जाणून घ्या:  त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय

तसंच त्वचेला अँटिऑक्सिडेंटचा भरपूर पुरवठा होतो. हळदीमुळे त्वचेवरील मोठे पोर्स लहान होण्यास मदत होते. त्याचबरोबर हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याने पिंपल्सला प्रतिबंध होतो. घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !

 

Reference:

1. Bakhru, H. K. (2001). Indian Spices & Condiments as Natural Healers. Jaico Publishing House.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

तुमचे हस्ताक्षर तुमच्या आरोग्याबाबत काय सांगते?

$
0
0

तुमच्या जीवनातील भावनिक समस्या,आरोग्य समस्या,चिंता-काळजी मागे तुमच्या नशीबाचा दोष नसून तुमच्या हस्ताक्षरांतील एखादा लहानसा दोष असू शकतो. ग्राफोलॉजीस्टच्या मते या सर्व समस्या तुमच्या हस्ताक्षरामुळे तुमच्या जीवनात निर्माण होतात.तुम्ही लिहीताना वेलांटी व उकार कसे लिहीता यावर तुमचे मानसिक,भावनिक व शारिरीक स्वास्थ अवलंबून असते.

पुण्यातील ग्राफोलॉजीस्ट Zubin Vevaina यांच्यामते २००५ साली जेव्हा त्यांच्या भावनिक,शारिरीक व आर्थिक जीवनात उलथापालथ झाली तेव्हा त्यांनी ग्राफोलॉजी  या शास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.यामुळे त्यांच्यामते त्यांच्या व्यक्तिमत्वात व आरोग्यात सकारात्मक बदल झाले.आता ते याच माध्यमातून इतरांच्या समस्या दूर करण्यासाठी सहकार्य करतात.

सहाजिकच या विषयाबाबत तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होऊ शकतात.या तुमच्या शंकाच्या निरसनासाठी तज्ञांकडूनच जाणून घेऊयात काही निवडक प्रश्नांची ही उत्तरे.

हस्ताक्षराचा व आपल्या आरोग्याचा काय सबंध असू शकतो?

श्री.वेवैना यांच्या मते हस्ताक्षर ही नैसर्गिक गोष्ट आहे.अशा कार्यांचा सबंध आपल्या शरीरातील इनवॉलेन्टरी व रिलॅक्स फंक्शनवर सतत पडत असतो. उदा.चालणे हे वॉलेन्टरी कार्य आहे तर पचन हे इनवॉलेन्टरी कार्य आहे.पाय मुरगळल्यास त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होत नाही पण जर तुम्हाला पोटात वेदना होत असतील तर तुमच्या चालण्याच्या ढबीत नक्कीच फरक होतो. त्याचप्रमाणे आपल्या हस्ताक्षरातील चुकांचा देखील आपल्या शरीरातील इनवॉलेन्टरी कार्यावर परिणाम होत असतो.

श्री.वेवैना यांच्यामते हस्ताक्षराचा देखील आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.एक चांगला ग्राफोलॉजीस्ट तुमच्या हस्ताक्षरावरुन तुमच्या शरीराची स्थिती सांगू शकतो.तुमच्या आरोग्य समस्यांचे निदान करण्यासाठी ग्राफोलॉजीस्ट तुमच्या हस्ताक्षराचा सुक्ष्म व अतिसुक्ष्म पद्धतीने अभ्यास करतात.

एखाद्याच्या हस्ताक्षरामध्ये ग्राफोलॉजीस्ट नेमके काय पहातात?

तुमच्या हस्ताक्षराचा अभ्यास करण्यासाठी प्रथम ते तुमच्या हस्ताक्षराचे काही नमुने घेतात.तुम्ही ‘आय’ लिहिताना डॉट कसा देता अथवा ‘टी’ हे अक्षर लिहीताना वळण कसे देता यावरुन त्यांना काही संकेत मिळतात.हस्ताक्षर विश्लेषक अनेक हस्ताक्षरांच्या नमुन्यांचा अभ्यास व निरिक्षण करुन तुमच्या हस्ताक्षरातील बारकावे उघड करु शकतात.जसे की मीठ व हळद या दोघांची चव तशी निराळी असते पण जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र वापरले जातात त्याची चव अगदीच वेगळी असू शकते.

तुमच्या हस्ताक्षरामधून कोणत्या आरोग्य समस्या आढळू शकतात?

ग्राफोलॉजीस्ट पाठदुखी,रोगप्रतिकार शक्तीमधील समस्या,स्नायूदुखी,अपचनाचे विकार,डोकेदुखी.कार्डिएक व सर्कुलेटरी समस्या तसेच हॉर्मोनल असतुंलन अशा अनेक आरोग्य समस्या तुमच्या हस्ताक्षरावरुन ओळखू शकतात. चुकीच्या लिखाणात योग्य सुधारणा घडवून काही वैद्यकीय व भावनिक समस्या सोडवण्यात ग्राफोलॉजीस्टना आतापर्यत यश आलेले आहे. श्री.वेवैना यांच्या वैयक्तिक अनुभवावरुन त्यांनी लिखाणात काही साधे बदल करुन स्वत:च्या भावनिक अस्थिरता,आतड्यांच्या समस्या व सेल्फ इस्टीम मध्ये परिणामकारक बदल घडवून आणले आहेत.

तुमच्या शरीरातील आरोग्य समस्या तुमच्या हस्ताक्षरात कशा आढळतात?

यासाठी आपण e या अक्षराचे उदाहरण पाहूयात.

पहिल्या चित्रातील डावीकडच्या e या अक्षराला एक प्रकारचा झटका दिलेला आढळतो ज्यामुळे त्याव्यक्तीचे आरोग्य निरोगी नाही असा संकेत मिळतो.तर दुस-या चित्रातील e हे अक्षर योग्य वळणाचे असल्यामुळे हे अक्षर लिहिणारी व्यक्ती निरोगी आहे असा संकेत मिळतो.पहिल्या चित्रातील e हे अक्षर लिहिणा-या व्यक्तीला डिहायड्रेशनची समस्या असल्याचे लक्षण आढळते.

आता या पुढील तिस-या चित्रात b या अक्षर लिहीताना त्याला दिलेले गोलाकार वळण पुर्णपणे जोडलेले नाही.त्यामुळे या व्यक्तीला ह्रदयाचे ठोके अस्थीर असण्याचा व कार्डिएक समस्या असण्याचे लक्षण आढळते.ग्राफोलॉजीस्टच्या मते या समस्येवर चौथ्या चित्राप्रमाणे काढलेल्या b या अक्षराप्रमाणे ते गोलाकार वळण पुर्ण जोडून या आरोग्य समस्यांवर उपचार करता येऊ शकतात.

अक्षरे त्या व्यक्तीचा ब्रेन पॅटर्न दर्शवतात.अक्षरांमध्ये काही बदल आढल्यास रिप्रोगॅमींग करुन मेंदू व मज्जासंस्थेच्या समस्या सोडवता येतात.

ग्राफोलॉजी अथवा ग्राफोथेरपी द्वारे मानसिक आजार व मज्जासंस्थेच्या समस्या दूर करता येतात का?

श्री.वेवैना यांच्या मते ग्राफोथरपी द्वारे काही प्रमाणावर मानसिक आजारांचे निदान व उपचार करता येतात.तज्ञांच्या मते ग्राफोथेरपी द्वारे हात व डोळे यांच्यामधील समन्वय सुधारुन मज्जासंस्था व त्याद्वारे करण्यात येणा-या कार्यामधील समन्वय देखील सुधारता येऊ शकतो.ग्राफोथेरपीच्या दोन सेशननंतर अनेक ऑथेस्टिक व स्पेशल मुलांमध्ये वागणुकीत व शरीराच्या हालचालीत सकारात्मक बदल जाणवले आहे.या थेरपीमध्ये उपचार करताना वागणुकीत बदल करण्यासाठी काही लिखीत व अलिखीत टेकनिक वापरण्यात येते.

वास्तवात ग्राफोथेरपी काय साध्य साधते?

ग्राफोलॉजीस्ट ची अशी श्रद्धा आहे की ग्राफोथेरपीमुळे रोगाच्या प्रमाणाचे निदान झाल्यामुळे तो रोग पुर्ण बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया अथवा औषधउपचार करण्याची किती गरज आहे हे समजते.इतर उपचारांप्रमाणे रोगाचे लवकर निदान होणे हे नेहमीच भल्याचे असते.त्यामुळे उपचारांचा वेग वाढवून आजार लवकर बरा करता येतो.

आम्ही सांगितल्याप्रमाणे हस्ताक्षर सुधारण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ नक्कीच लागू शकतो पण लक्षात ठेवा निरोगी व आनंदी जीवनासाठी तुमच्या पेनाचा बदलेला एक स्ट्रोक तितकाच  प्रभावी असू शकतो.जरुर वाचा ‘विठ्ठल’ नामाचा जप सुधारतो हृदयाचे आरोग्य !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !

$
0
0

तुमचा जॉब फारसा चांगला नसेल. त्यात तुम्हाला अनेक अडचणी, त्रास असतील किंवा त्या कामात तुमचे मन रमत नसेल. पण काही कारणांमुळे तुम्हाला तो जॉब सोडता येत नसेल. तर काळजी करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी अशी फेज येते. ऑफीसच्या अडचणींचा सामना करताना तुम्हाला तुमचा राग अनावर होण्याची भीती असते. म्हणूनच तुमचा समजूतदारपणा कायम ठेवून तुमच्या न आवडणाऱ्या जॉबमध्ये व्यवस्थित टिकून राहण्यासाठी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे Consulting Psychiatrist डॉ. उषा तळावडेकर यांनी काही टीप्स सांगितल्या आहेत.

  •  ध्येय आणि उद्दिष्ट याची आवश्यकता: तुम्हाला जॉबमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला ध्येय आणि उद्दिष्टांची आवश्यकता असते. आवडत नसलेल्या जॉबमध्ये टिकून राहण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ते वापरून तुम्ही अर्थपूर्ण आयुष्य जगू शकता. सकारात्मक वाक्य सतत बोलणे. (Positive affirmations) त्याचा नक्कीच फायदा होईल. सकाळी उठल्यावर ‘आजचा दिवस चांगला आहे, मी शांत राहीन आणि अजिबात निराश, नाराज होणार नाही’ अशा प्रकारची सकारात्मक वाक्ये बोला. ध्येय आणि उद्दिष्टांमुळे तुमच्या करीयरला योग्य दिशा मिळेल. ध्येयामुळे तुम्हाला काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षेची जाणीव होईल आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीच्या मागे लागाल. ध्येयामुळे तुम्ही सकारात्मक राहण्यास, विचार करण्यास प्रवृत्त व्हाल. तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा आणि तुमचा वेळ व ऊर्जा तुमचे भविष्य साकारण्यासाठी खर्च करा.
  •  पगार कापला जात असेल तर वाईट वाटून घेऊ नका: कमी पैशात अधिक समाधान देणारा जॉब करणे तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण पैशातून आनंद विकत घेता येत नाही. जर तुमचा पगार कापला जात असेल तर वाईट वाटून घेऊ नका. त्या परिस्थितीचा सकारात्मक पद्धतीने विचार करा. कारण त्यामुळेच तुम्ही दुसरा चांगला जॉब लवकरात लवकर मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न कराल. नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी
  •  गॉसिपिंगपासून दूर रहा: गॉसिपिंगमुळे स्वतः बरोबर इतरांना ही त्रास होतो. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. उलट तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ व ऊर्जा त्यामध्ये वाया घालवता. म्हणून गॉसिपिंगमध्ये सहभागी होऊ नका. सौम्यपणे त्यातून बाजूला व्हा.

बॉसशी डिल कसे कराल ? 

  • त्याचा विश्वास संपादन करा आणि छान बॉण्ड तयार करा.
  • सकारात्मक बोला आणि तुमच्या मर्यादा राखा.
  • कोणतीही गोष्ट पर्सनली घेऊ नका. वाद न घालता शांत राहा. प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा विचार करा.
  • त्याचा तुमच्या कामावर किंवा तुमच्या परफॉर्मन्सवर परिणाम होवू देऊ नका. तसंच कंपनीचे इतर लिडर्स आणि तुमचे संबंध यावर त्याचा परिणाम होता कामा नये.
  • बॉसला कोणत्या गोष्टीचा राग येतो ते जाणा आणि त्या गोष्टी करणे टाळा.

राग घालवण्याचे आणि नैराश्य वाढू न देण्यासाठी काही टीप्स:

  • नियमित व्यायाम करा. जिम वर्कआऊट किंवा चालणे अशा कोणत्याही प्रकारचा व्यायाम तुम्ही करू शकता. निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार !
  • तुमचे छंद जोपासा.
  • तुमच्या पेट (पाळीव प्राणी) सोबत खेळा.
  • कुटुंबासोबत वेळ घालवणे हा रिलॅक्स होण्याचा उत्तम मार्ग आहे.

काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवा: काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील फरक सांभाळण्यासाठी ते एकत्रित न करता वेगळे ठेवा. त्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकरीत्या हेल्दी राहता. कुटुंब आणि फ्रेंड्स सोबत चांगले नातेसंबंध असल्यास तुम्ही घरी व ऑफिस दोन्ही ठिकाणी आनंदी रहाल. ताणमुक्त राहण्यासाठी करा अधो मुख श्वानासन !

तुम्हाला आवडत नसलेल्या जॉब करण्यापेक्षा तो सोडणे केव्हाही योग्यच. पण थोडी तडजोड करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला थोडा वेळ देऊन बघा. कदाचित त्याचा काही फायदा होईल. तरीही काही फरक होत नसल्यास आणि जॉबमुळे तुम्ही अधिकच चिडचिडे, उदास आणि निराश होत असाल तर तो जॉब म्हणजे करियर मध्ये पुढे जाण्याची एक पायरी आहे असे समजा. तुमच्या भावनांना सकारात्मक वळण द्या. जरूर वाचा: केवळ शारिरीक नाही तर मानसिक समस्यांचाही वेळीच निचरा करा : अमृता सुभाष

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


लहान मुलांंना वस्तू चोरण्याच्या सवयीपासून कसे परावृत्त कराल ?

$
0
0

लहानपणी तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीने तुमची एखादी वस्तू, खेळणं चोरलेलं असल्याचं तुम्हाला आठवतंय? लहान मुलं अगदी सहज असं करतात. त्यांना चोरणे म्हणजे काय किंवा ते चुकीचे का आहे याची जाणीव नसतेच. त्यांना हवी असलेली वस्तू मिळवणे हाच त्यामागचा उद्देश असतो.

चाईल्ड सायकॉलॉजिस्ट, शुची दळवी यांनी सांगितले की जर तुमचा मुलगा/मुलगी वस्तू चोरत असतील किंवा मित्रांची खेळणी न सांगता घरी आणत असतील तर  त्याला/तिला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तसंच त्याबद्दल खोटे बोलणे चुकीचे असल्याचे त्यांना समजावून सांगायला हवे. हे कसे सांगावे किंवा अशा चुकीच्या सवयींना आळा कसा घालायचा यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

  • स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवा: आपण आपल्या मुलांना हवी ती खेळणी, हवा तो खाऊ आणून देतो. त्यांचा सगळ्या इच्छा-मागण्या पुरवतो. पण त्यांना स्वतःवर किंवा त्यांच्या मागण्यांवर बंधन ठेवायला शिकवत नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना दुकानातलं एक खेळणं निवडण्यास सांगा. आठवड्यातून एक चॉकलेट द्या. कारण ज्या वेळेस त्यांना खेळण्याचं पूर्ण दुकान हवं असतं तेव्हा त्यातून निवड करायला लावल्याने ते स्वतःवर किंवा त्यांच्या मागण्यांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतील. या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !
  • शिस्त आणि मूल्य यांचे महत्त्व शिकवा: जर तुमची वर्तवणूक चांगली आणि प्रामाणिक असेल तर तुमच्या मुलांना ते शिकवणे सोपे जाईल. मुलांच्या चुकीवर जोरात ओरडण्या मारण्यापेक्षा काय चुकले ते त्यांना समजावून सांगा. चांगल्या वागण्याचे महत्त्व पटवून द्या. सुरवातीलाच जेव्हा तुमचं मूळ दुसऱ्याच्या हातातून खेळणं हिसकावून घेत असेल तेव्हाच त्याला सांगा की खेळणं शेयर करणे चांगले असते पण असे खेचून घेणे नाही. कारण लहानपणी शिकवलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. लहान मुलांसमोर या ’5′ गोष्टी करणे टाळाच !
  • विश्वासाचे महत्त्व पटवून द्या: जर तुमच्या मुलाला/ मुलीला वस्तू चोरण्याची सवय असेल तर त्याला/तिला सांगा की असे केल्याने तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल. विश्वासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळा. वस्तू चोरणे हा कशाही वरचा उपाय नसल्याची जाणीव त्यांना करून द्या. या समस्येच्या खोलापर्यंत जाऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा
  • ही सवय कायम राहिल्यास: जर तुमच्या मुला/मुलीची ही सवय कायम राहीली आणि शाळेत व घरी अशा तक्रारी यायला लागल्या तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. त्यामुळे मुलाला समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल. जरूर बघा: व्हिडियो: लहान मुलांच्या मनात नेमकं दडलयं काय ?

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

या टीप्सने मासिकपाळीच्या दिवसात कपड्यांवर डाग पडण्याचे टेन्शन होईल दूर !

$
0
0

मासिकपाळीच्या दिवसात  पोटदुखी, क्रॅम्प्स, मूड स्विंग्सचा त्रास यासोबतच रक्तस्त्रावामुळे डाग पडण्याचीही भीती असते. अतिरक्तस्त्रावाच्यामुळे मुलींना कपड्यावर डाग पडण्याची भीती सतावत असते. म्हणूनच ही भीती करण्यासाठी आणि मासिकपाळीच्या दिवसात टेन्शन फ्री राहण्यासाठी या ट्रिक्स आणि टीप्स नक्की लक्षात ठेवा. ( नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!)

  • अंडरवेअरमध्ये पॅड व्यवस्थित लावा. पॅडच्या विंग्स आणि आकाराप्रमाणे त्याची पुढील आणि मागची बाजू सेट करा. विंग्स घट्ट चिकटले आहेत याची खात्री करा.
  • रक्ताचे डाग पडू नयेत म्हणून किमान मासिकपाळीच्या दिवसात जाडसर कापडाच्या अंडरवेअर वापरा. जाडसर अंडवेअर थोड्या प्रमाणात रक्त शोषून घेते. परिणामी डाग पडण्याचा धोका कमी होतो.  तसेच तुमची अंडरवेअर सैलसर असणार नाही याची काळजी घ्या. यामुळे पॅड हलण्याचा धोका कमी होईल.
  • पॅडच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला डाग पडत असेल तर त्या स्थितीत पॅड पुढे मागे करा.  सॅनिटरी पॅड्समुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो का ?  या तुमच्या मनातील समस्येवरही हे उत्तर मिळवा.
  • मासिकपाळीच्या दिवसात अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास एक्स्ट्रा लार्ज पॅड्स वापरा. अशा पॅड्समध्ये रक्त शोषण्याची क्षमता अधिक असते. नक्की वाचा : मासिकपाळीच्या दिवसात किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे?

लिकेज होऊ नये म्हणून / डागांची भीती नको म्हणून कोणते कपडे वापराल ?

  • तुम्हांला लिकेजची भीती असेल तर मासिकपाळीच्या दिवसात स्कर्ट घालणे टाळा. स्कर्ट घालायची तीव्र इच्छा किंवा हट्ट असेल तर स्कर्टमध्ये शॉर्ट्स घाला. मासिकपाळीच्या पहिल्या अनुभवाअगोदर मुलींना या ’5′ गोष्टी नक्की सांगा !
  • तुमच्या जांघेजवळच्या भागामध्ये फीट राहील अशा ट्राऊजर्स किंवा जिन्स घाला.यामुळे पॅडला देखील सपोर्ट मिळेल.
  • मासिकपाळीचे दिवस इतर दिवसांप्रमाणे नसतात. अनेक घाईत येताना- येताना,धावपळ करताना, चूकीच्या स्थितीत बसल्याने डाग पडल्याची शक्यता असते. अशा दिवसात कपड्यांवर डाग पडू नये म्हणून दक्ष राहणे गरजेचे असते. डाग पडू नये म्हणून खबरदारी घेत असल्यास सैलसर आणि गडद रंगाच्या पॅन्ट्स निवडा. यामुळे कदाचित डाग पडला तरीही ते दिसण्यात येणार नाही. तसेच मासिकपाळी दरम्यान पाळा या १० स्वच्छता टीप्स

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

केसातील उवांचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय !

$
0
0

केसांमध्ये ऊवा होणे हे फारच त्रासदायक असते.ऊवा व त्यांची अंडी टॉवेल,कंगवा,हेअर ड्रायर,क्लीप्स या माध्यमातून एकमेकांच्या केसात मिसळतात.त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ऊवा झाल्यास त्याच्या वस्तू इतरांनी वापरु नयेत.ऊवा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज येते.ऊवांमुळे इतर कोणतीही गंभीर समस्या निर्माण होत नाही पण ऊवा सहज एकमेकांच्या डोक्यात मिसळू शकतात हे एक काळजीचे कारण असू शकते.त्यामुळे ऊवा झाल्यास विशेष दक्षता घेण्याची व स्वच्छता पाळण्याची गरज असते.

बॅनरघट्टा रोडवरील फोर्टीस हॉस्पिटलचे कन्सल्टंट पिडीएट्रिशन डॉ.योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊयात केसांमध्ये ऊवा झाल्यास मुलांची कशी काळजी घ्याल.नक्की वाचा केसांतील ऊवा घालवण्याचे 7 घरगुती उपाय

ऊवांच्या इनफेक्शनला अधिक वाढू देऊ नका-

ऊवा घरातील इतर मंडळींच्या केसात शिरल्यामुळे त्यांची अधिक वाढ होत जाते.ऊवा डोळ्यांच्या पापण्या,डोक्यावरील केस व अंर्तगत भागातील केसांवर वाढतात.या व्यक्तीरिक्त म्हणजे कारपेट अथवा कपड्यांवर ऊवा फक्त २४ तास अथवा जास्तीत जास्त ७२ तास जिवंत राहू शकतात.पण त्या आधी जर त्यांचा संबंध एखाद्या व्यक्तीसोबत आला तर त्या व्यक्तीला ऊवांचे इनफेक्शन होऊ शकते.मात्र ऊवा माणसापासून पाळीव प्राण्यांमध्ये मिसळत नाहीत.

डोक्याजवळ डोके येणार नाही याची काळजी घ्या-

ऊवा  मित्र-मैत्रिणी अथवा घरातील लोकांच्या केसात सहज मिसळतात.मात्र एखाद्याच्या डोक्यात ऊवा आहेत हे इतरांना समजणे त्याच्यासाठी खुप लाजीरवाणे असते.त्या व्यक्तीच्या डोक्यातील ऊवा आपल्या डोक्यात मिसळू नयेत यासाठी त्या व्यक्तीला टाळणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे अशा व्यक्तीच्या डोक्याजवळ जाऊ नका कारण त्यामुळे तुमच्या डोक्यात देखील लगेच ऊवा मिसळू शकतात.केसांमधील टाळूतील रक्तावर ऊवा पोसल्या जातात.

मुलांमध्ये ऊवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या-

मुलांमध्ये खेळताना अथवा गप्पा मारताना ऊवा मिसळू शकतात.यासाठी तुमच्या मुलांना इतर मुलांच्या केसांचे ब्रश,कंगवे,टोपी,स्कार्फ शेअर न करण्यास शिकवा.तुमच्या मुलांना ऊवांचे इनफेक्शन झाले आहे का हे पहाण्यासाठी त्यांच्या केसांमधील त्वचा आठवड्यातून दोन-तीन वेळा नीट तपासा.इनफेक्शन टाळण्यासाठी तुमच्या घरातील चादर,टॉवेल व कपडे खुप गरम पाण्यामध्ये धुवा.हेअर ड्रायर देखील २० मिनीटे हॉट सायकल वर ठेवा.ज्या गोष्टी धुणे शक्य नसेल त्या ड्रायक्लीन करु घ्या.तसेच अगदी असे करणे शक्यच नसेल तर कमीतकमी या गोष्टी तीन दिवस एका बंद पेटीत ठेवा जेणे करुन त्या काळात त्या ऊवा मृत होतील.घरातील कारपेट देखील व्यवस्थित व्हॅक्युम करुन घ्या.

ऊवांचे इनफेक्शन झालेल्या व्यक्तीच्या वस्तू कशा निरर्जुंक कराल-

अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेले कंगवे,ब्रश व हेअर केअर प्रॉडक्टस फेकून द्या.तुमच्या वस्तू वेगळ्या ठेवा.दुस-यांच्या वस्तू वापरणे टाळा.किंवा या वस्तू अल्कोहोल अथवा मेडीकेटेड शॅम्पूने धुवा.तुम्ही या वस्तू २० ते ३० मिनीट गरम पाण्यामध्ये धुवू शकता.

ऊवांना मारण्यासाठी औषधांचा वापर करा-

ऊवांचे इनफेक्शनवर इपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत.त्यामळे या समस्येवर तुम्ही Malathion, Dimethicone आणि Permethrin ही औषधे लावू शकता अथवा तोंडावाटे घेण्यासाठी Ivermectin हे औषध घेऊ शकता.मात्र ऊवा नष्ट करण्यासाठी या औषधांसोबत तुम्ही योग्य ती स्वच्छता देखील पाळणे खूप आवश्यक आहे.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या आयुर्वेदीक उपायांनी गर्भधारणेतील अडथळे होतील दूर !

$
0
0

अनेक जोडप्यांना आजकाल आई-बाबा होण्यासाठी खुप प्रयत्न करुन देखील यश मिळत नाही.आजकाल हे प्रमाण वाढल्याने अनेक कुटूंबासांठी ही चिंतेची बाब होत आहे.वंधत्वावर अनेक उपाय योजना उपलब्ध आहेत.मात्र पांरपारिक औषधाच्या माध्यमातून कर-यात येणा-या उपचारांपेक्षा आयुर्वेदिक उपचारांचा वंधत्वावर चांगला परिणाम दिसून येतो.शिवाय या उपचारांचे दुष्परिणाम देखील कमी असतात.

नागार्जुन आयुर्वेदाचे डॉ.रणजित सी मेनन यांच्याकडून जाणून घेऊयात वंधत्वावर आयुर्वेदात कसे उपचार केले जातात.नक्की वाचा : या ’5 व्यवसायातील पुरूषांमध्ये इन्फ़र्टीलिटीचा धोका अधिक असतो !

           आयुर्वेदामध्ये वंधत्व उपचारांच्या प्रकियेत प्रथम स्त्रीचे योग्य ओव्हूलेशन,निरोगी स्त्रीबीज आणि पुरुषांच्या शुक्रांणूंच्या योग्य संख्येवर भर देण्यात येतो.त्याचप्रमाणे या उपचारांमध्ये स्त्री व पुरुष या दोघांच्याही प्रजनन अवयवांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

आयुर्वेदानूसार एखाद्या व्यक्तीचे आरोग्य या गोष्टींवर अवलंबून असते-

  • बायो-स्टॅटीक एनर्जी अथवा त्याच्या शरीरातील वात,पित्त व कफ या दोषांचे संतुलन
  • सप्त धातू  अथवा शरीरातील पेशींचे सात थर
  • पचनसंस्था
  • पचनसंस्थेचे योग्य कार्य
  • शरीर-मन-आत्मा यांचे संतुलन व आंतरिक शांती

जेव्हा चुकीचा आहार व जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे या गोष्टीमध्ये असंतुलन होते तेव्हा अनेक प्रकारचे विकार व आरोग्य समस्या निर्माण होतात.परंपरागत उपचारांमध्ये जोडप्यांवर वंधत्व या समस्येसाठी वैयक्तिक रित्या उपचार करण्यात येतात.मात्र आयुर्वेदामध्ये गर्भधारणेतील समस्येवर दोघांवर एकत्रित उपचार करण्यात येतात. जाणून घ्या आयुर्वेदीक डिटॉक्स डाएटने कसे कराल शरीर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी !

गर्भधारणेमधील आयुर्वेदिक शास्त्र-

आयुर्वेद शास्त्रानूसार गर्भधारणा ही स्त्री व पुरुष यांच्या शूक्राणू,बीजांडे व गर्भाशयाच्या आरोग्यावर अवलंबून असते.पुरुष व स्त्री या दोघांच्याही  प्रजनन अवयवांचे आरोग्य हे त्यांच्यामध्ये निर्माण होणा-या शुक्रधातूवर किंवा शरीरात निर्माण होणा-या प्रजनन पेशींवर अवलंबून असते.योग्य मेटाबॉलिक क्रिया व प्रभावी पचन क्रियेमुळे खाल्लेल्या अन्नाचे शरीरातील द्रवपदार्थ,रक्त,स्नायू,चरबी,हाडे,अस्थिमज्जा व शुक्र पेशी यामध्ये रुपांतर होण्यास मदत होते.स्त्रीयांमध्ये या शुक्रपेशींमुळे मासिक पाळीत बीजांडे व पुरुषांमध्ये शूक्राणू निर्माण होतात ज्यामुळे त्यांना सेक्ससाठी चालना मिळते.या शुक्रधातूचे आरोग्य शरीरातील इतर टिश्यूज व मेटाबॉलिक फंक्शनच्या आरोग्यावर अवलंबून असते.

सहज गर्भधारणेसाठी काय करावे?

स्त्री व पुरुष याच्या फर्टिलीटीवर शारिरीक,मानसिक स्थिती व वातावरणातील घटक अशा अनेक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो.

यासाठी आयुर्वेदानुसार फर्टिलीटीवर परिणाम करणारे घटक जाणून घ्या-

प्रजनन अवयवांचे आरोग्य-

गर्भधारणा सहज होण्यासाठी स्त्रीचे गर्भाशय व पुरुषांचे शुक्राणू कारणीभूत असतात.जर पुरेसे पोषण मिळालेे नाही किंवा पचनसंस्थेत बिघाड असेल व शरीरात टॉक्सिन्स जमा झाले असतील तर गर्भाशय व शुक्राणूंवर त्याचा विपरत परिणाम होतो.नक्की वाचा ‘आपन मुद्रा’ – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय !

भावनांचा अभाव-

प्रेम नसलेल्या अथवा आकर्षण वाटत नसलेल्या व्यक्तीसोबत सक्तीने सेक्स केल्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.त्याचप्रमाणे अती सेक्शूल अॅक्टीव्हिटीज मुळे देखील शुक्रधातूचा क्षय होतो व वंधत्व येण्याचा धोका वाढतो.

अनियमित आहार-

अती तिखट,खारट व प्रकिया केलेले पदार्थ खाल्याने पित्त वाढते व शुक्राणू कमी होतात. जाणून घ्या शरीर नैसर्गिकरीत्या डीटॉक्स करा या ’5 पदार्थांंनी !

कामवासना कमी होणे-

खूप काळापासून सेक्सची इच्छा दाबून ठेवल्याने वीर्यअवरोध होण्याची शक्यता असते ज्यामुळे वीर्याचे प्रमाण व कामवासना कमी होते.

इनफेक्शन-

प्रजनन पेशींना इनफेक्शन झाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले तर वंधत्व येण्याचा धोका असतो.

यावर काय उपचार करतात -

आयुर्वेदिक उपचारांमध्ये प्रथम विषद्रव्ये बाहेर टाकून शरीराचे शुद्धीकरण केले जाते त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीेेंचे योग्य पोषण होऊन त्यांचे कार्य सुधारले जाते.सहाजिकच त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते.वंधत्व दूर करण्यासाठी जोडप्यांना प्रथम पंचकर्म उपचार दिले

पंचकर्म उपचार -

पंचकर्म उपचारांमध्ये शरीरातील टॉक्सीन्स बाहेर टाकले जातात.शरीर शुद्धीकरण झाल्यावर पचनसंस्था सुक्ष्म पातळीवर सुधारण्यात येते.त्यामुळे शरीरातील सर्व पेशींचे कार्य सुधारते व त्यांना योग्य पोषण मिळते.

त्यामुळे शुद्ध झालेल्या पेशींना पुन्हा व्हिटॅमीन,मिनरल्स मिळू लागतात.शरीराला हॉर्मोन्स व इन्झायमी सह पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे शरीरातील पेशींचे कार्य सुधारते व शरीराची सेल्फ हिलींग क्षमता वाढते.सहाजिकच त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारते व गर्भधारणा रहाण्याची शक्यता देखील वाढते.

पंचकर्माच्या उपचारांची पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी कमीतकमी २१ दिवसांची गरज असते.ही प्रक्रिया तीन टप्प्यात करण्यात येते.यशस्वी गर्भधारणेसाठी आहारात हे बदल कराच

१.पुर्व-प्रक्रिया-

या प्रक्रियेत निरनिराळ्या प्रकारचे मसाज व औषधे दिली जातात.ज्यामुळे घामाद्वारे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.

२.महत्वाची प्रक्रिया-

यात निरनिराळ्या पद्धतीने शरीरातील टॉक्सीन्स नष्ट केले  जातात.

स्नेह बस्ती किंवा विशिष्ठ तेलांचा मसाज

काश्य बस्ती किंवा आयुर्वेदिक काढे पिण्यास देऊन शरीर शुद्ध करणे

विरेचनम् किंवा कोठा साफ करुन टॉक्सीन्स बाहेर काढणे

नस्यम् किंवा नाक साफ करणे

वमन –  किंवा उलटी द्वारे पोट साफ करणे

३.शेवटची प्रक्रीया-

ही या उपचारांची शेवटची प्रक्रीया असते.ज्यामध्ये शरीरात सकारात्म ऊर्जा वाढते व शरीर-मन-आत्मा यांचे सतुंलन होते.त्यामुळे मानसिक स्वास्थामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते.

असे असले तरी केवळ पंचकर्म उपचारांच्या माध्यामातूनच वंधत्वावर उपचार करण्यात येतात असे नाही.जोडप्यांच्या आरोग्य समस्यांचा विचार करुन पंचकर्मासोबत इतर उपचार देखील त्यांच्यावर करण्यात येतात. ( नक्की वाचा : अश्वगंधा – पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय )

यशस्वी गर्भधारणेसाठी इतर काही उपचार-

अभ्यंग-यामध्ये त्रिदोषाचे सतुंलन राखण्यासाठी उपचारात्मक तेलाचे मसाज केले जातात.यासाठी वापरण्यात येणारे तेल निरनिराळी औषधे व औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात येतात.

स्नेहपानम - या उपचारांमध्ये रुग्णाला औषधी तुप पिण्यास देण्यात येते.ज्यामुळे आतड्यांच्या समस्या दूर होतात व पचनसंस्था सुरळीत होऊन आरोग्य सुधारते.

Podikkizhi -यामध्ये औषधी वनस्पतीचे चुर्ण दिले जाते.ज्यामुळे शरीरातील ताण दूर होतो,रक्ताभिसरण सुधारते,विषद्रव्ये बाहेर टाकली जातात,स्नायूं व टीश्यूजना आराम मिळतो,शरीरातील जास्तीचा कफ कमी होतो.या पद्धतीमुळे शरीरातील घाम व विशद्रव्ये बाहेर पडतात त्यामुळे त्रिदोष सतुंलित राहतात

Elakizhi-यामध्ये औषधी वनस्पती व पानांचा मसाज केला जातो.एरंड,अर्क,निरगुंडी,रस्न,नारळांची पाने,लिंबू या वात कमी करणा-या वनस्पतींच्या ताजी पाने तळून एका कापडात गुंडाळतात.त्या गाठोड्याला गरम औषधी तेलात बूडवून त्याने शरीराला मसाज केला जातो.या उपचारांचा निरनिराळ्या आर्थ्राटीस,स्पॉडीलाईटीस,पाठदुखी व दाह कमी करण्यासाठी उपयोग होतो.मसाजमुळे बिघडलेल्या अवयवांचे रक्ताभिसरण सुधारते व घामाच्या माध्यामातून विशद्रव्ये बाहेर टाकली जातात.

Njavara-गरम तांदूळ अथवा लाल तांदूळ दूध व औषधांसोबत कापडांच्या माध्यमातून पिळून घेतात व त्या कापडाच्या पिशवीने शरीराला मसाज करतात.याचा शरीराला ३० ते ४० मिनीटे मसाज केला जातो.तांदूळ थंड झाल्यावर शरीर स्वच्छ करुन गरम तेल लावले जाते.

Pizhichil- यामध्ये संपुर्ण शरीराला कोमट औषधी तेलाने मसाज करुन स्टीम बाथ देतात.यामुळे शरीराचे निरनिराळ्या आजारपणापासून संरक्षण होते व शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढून शरीर निरोगी होते.संधीवात,आर्थ्राटीस,अर्धांगवायु व लैंगिक दुर्बलतेवर या उपचारांचा चांगला परिणाम होतो.

Snehavasthy-वात सतुंलित करण्यासाठी स्नेहबस्ती ही ऑईल थेरपी देण्यात येते.आयुर्वेदानूसार वात हा मोठ्या आतड्यांमध्ये असतो.यासाठी औषधी तेलांचा एनिमा देऊन तो शांत करण्यात येतो.त्यामुळेे मेटाबॉलिजम सतुंलित होते व पचनक्रिया सुधारते व शरीराचे आरोग्य आपोआप सुधारु लागते.

Avagaham-हे एक प्रकारचे सीट बाथ आहे ज्यामध्ये अवगहम टबमध्ये औषधी वनस्पती टाकून बसण्यास सांगितले जाते.यात टबमध्ये टाकलेल्या औषधी तेल व औषधी वनस्पती रुग्णाच्या प्रकृतीनूसार निवडण्यात येतात.

Kashayavasthy-या उपचारांमध्ये पोट साफ करण्यासाठी रुग्णाच्या शारीरिक परिस्थितीनूसार मध,औषधी पेस्टचा एनिमा दिला जातो.यामुळे वात कमी होतो व रुग्णाला आरोग्य लाभते.

Lepanam-काही आरोग्य परिस्थितीत या उपचारांमध्ये काही औषधी लेप संपुर्ण शरीर अथवा काही भागावर लावण्यात येतात.हे लेप सुकल्यावर काढण्यात येतात.या लेपांचे थर हे प्रत्येकाच्या आरोग्य स्थितीनूसार कमी किंवा जास्त लावण्यात येतात.संवेदनशील त्वचा व उष्णता सहन न होणा-या लोकांनी हे उपचार करणे टाळावे.

इवनिंग थेरपी-थैलधरा अथवा थर्कधरा या आरामदायक व विशेष मसाज थेरपीमुळे शरीरातील इमोशनल टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात.

सामान्यत: हे उपचार व औषधे रुग्णाचा विकार व शरीर प्रकृतीनूसार निवडण्यात येतात.त्यामुळे वंधत्वावर कोणता उपचार करावा हे त्या जोडप्याच्या आरोग्याची तपासणी करुन ठरविण्यात येऊ शकते. यशस्वी गर्भधारणेसाठी ’8 हॉट सेक्स पोजिशन्स !! नक्की ट्राय करा. 

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

स्मोकींग सोडण्यासाठी ११ सोप्या डाएट टिप्स

$
0
0

रस्त्यावरून चालताना  १०-१५ जण  स्मोक करताना अगदी सहजच दिसतात. मॉडर्न जीवनाचे हे चित्र बघताच बदलत्या जीवनशैलीने आपल्या सवयींवर देखील ताबा मिळवला आहे, हे लक्षात येते. पण ही सवय घातक आहे हे माहीत असूनही जात नाही.  या सवयीच्या अनेक घातक सवयींपैकी एक म्हणजे याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफ वर होतो. सोडण्याचा अनेकदा प्रयन्त केला असला तरी तो मोह काही केल्या आवरता येत नाही. आपल्या या समस्येवर Jaslok Hospital and Research Centre मुंबईचे Consultant ENT head and neck surgeon Dr Dilon Dsouza यांनी आपल्याला काही डाएट टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे ३० दिवसात स्मोकींग सोडणे शक्य होईल. तर मग हाच असेल का आपल्या नवीन वर्षाचा संकल्प? करून तर बघूया प्रयन्त.

१. भरपूर पाणी प्या. ज्यामुले किडनी, लंग्स आणि लिव्हर मधील सगळे टॉक्सिन्स निघून जातील. त्याचबरोबर कमी कॅलरी असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

२. कॉफी आणि मद्याची सवय असेल तर ते टाळा. त्याऐवजी पाणी प्या. फळांचा ताजा रस , एनर्जी ड्रिंक्स पिणे  फायदेशीर आहे. सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय टाळा.

३. या महत्त्वाच्या ३० दिवसात खाणे अजिबात टाळू नका. योग्य आणि पोषक पदार्थ खाऊन स्वतःला तृप्त ठेवा. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असा प्लॅन करण्यापेक्षा काही वेळेच्या अंतराने थोडं थोडं खात राहा.  अगदी शक्य नसल्यास  नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तरी व्यवस्थित आणि वेळेवर घ्या. त्यामुळे धूम्रपान सोडण्यास मदत होईल. धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात ते जाणून घेण्यासाठी जरूर वाचा: धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर पुढील 20 मिनिटंं ते वर्षभराच्या काळात शरीरात होतात हे बदल !

४. नाश्ता किंवा जेवण काहीही चुकवू नका. कारण भूक लागल्यानंतर स्मोक करण्याची इच्छा बळावेल.

५. संतुलित आणि सकस आहार घ्या. आहारात फायबर युक्त पदार्थांचा समावेश वाढवा. ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहील.

६. गाजर, काकडी, हिरव्या पालेभाज्या जरूर खा. तसेच लो कॅलरी चॉकलेट्स, च्युईंगम्स खाण्यास हरकत नाही.

७. काम आणि प्रवास करताना पोट नीट भरलेलं असेल असे पहा. गव्हाचा ब्रेड, सॅण्डवीच, डाळी त्याचबरोबर सफरचंद, केळ, अननस, कलिंगड या सारखी फळे तुम्ही खाऊ शकता.

८. गाजर, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली या भाज्यांचा  आहारात जाणीवपूर्वक समावेश  करा. कारण या भाज्या खाल्ल्याने स्मोक करण्याच्या इच्छेला आळा बसतो. तरीही जर  मोह झालाच आणि तुम्ही स्मोक केलं तरी वाईट चवीमुळे तुम्ही सिगारेट अर्धवटच सोडून द्याल.

९. व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आहारात समावेश करा. उदा. संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा. त्याचबरोबर थोडं चटपटीत खाण्याची ही तुम्हाला मुभा आहे. म्हणजेच लोणचं, पापड, चिप्स. टोमॅटो आवडत असल्यास त्यावर काळीमिरी पावडर आणि मीठ घालून खाण्यास हरकत नाही. त्यामुळे नक्कीच फायदा होईल.

१०. मलबेरीज, स्ट्राबेरीज, ब्लूबेरीज ही फळे देखील स्मोकींगच्या मोहाला आळा घालतात.

११. नॉन व्हेज आवडत असल्यास मासे, चिकन जरूर घ्या. ते फायदेशीर आहे. परंतु मटण खाणे मात्र टाळावे. त्यामुळे स्मोकींगची मोह वाढतो. अन्नपदार्थ शिजवताना त्यात हळद जरूर घाला.  त्यामुळे स्मोकींगच्या मोहाला आळा बसतो.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Viewing all 1563 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>