Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काश्याच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे !

$
0
0

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ  कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणी खर्चिक अपॉईन्टमेंटस घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या ‘पादाभ्यंग’ या सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणं शक्य असलेल्या तितक्याच प्रभावी उपचारपद्धतीबाबत नक्की जाणून घ्या.

पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरात हमखास दिल्या जाणार्‍या काश्याच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे. पादाभ्यांग / पायाला मसाज करताना  काश्याच्या वाटीचा कशाप्रकारे वापर करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत  मुंबईतील आयुर्वेदीक वैद्य डॉ. परीक्षित शेवडे ( आयुर्वेद MD)  यांनी खास सल्ला  दिला आहे.

  • काशाची वाटी म्हणजे काय ?

कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेला कांस्य या धातूपासून काश्याची वाटी बनवली जाते. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे ! जाणून घ्या.

  • काश्याच्या वाटीने मसाज का कारावा ?

 

शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काश्याची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेल, तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला / उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोकं, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोष, आजार वाढण्याची शक्यता बळावते.

  1. काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.
  2. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. शरीरात थंडावा वाढतो.
  3. डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणं फायदेशीर ठरते. नक्की वाचा सकाळी हिरवळीवर चालण्याचे ’5′ फायदे !
  4. त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो.
  5. पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.
  • काश्याच्या वाटीने मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ?

 

काश्याच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तूपाचा वापर करणे आवश्यक आहे. तूपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तीळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. पायाला पडलेल्या भेगा करण्यासाठी भिंडेल किंवा कोकमाचे तेल फायदेशीर ठरते.

  • काश्याच्या वाटीने मसाज करण्याची योग्य वेळ कोणती ?

 

रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरात थंडावा निर्माण होऊन शांत झोप मिळण्यास मदत होते. यासोबतच सकाळी आंघोळीपूर्वी अर्धा तासदेखील मसाज करणे फायदेशीर ठरते.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>