नॅशनल किडनी फांऊडेशननूसार दहा पैकी एका रुग्णाला किडनी स्टोनची समस्या असते तर एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोकांना किडनी विकार असतात.किडनी विकार हा सायलेंट विकार असल्याने त्याची लक्षणे लवकर आढळत नाहीत.पण असे असले तरी आहारात काही सोपे बदल करुन किडनी विकार असलेले रुग्ण देखील निरोगी आयुष्य जगू शकतात.किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !
किडनी विकार असलेल्या रुग्णांनी या ६ डाएट टीप्स पाळाव्या-
डायटीशन व न्यूट्रीशनीस्ट डॉ.नेहा सनवाल्का यांच्या मते काही पदार्थ किडनीसाठी खूप उपयुक्त असतात.त्यामुळे निरोगी किडनीसाठी हे पदार्थ नियमित खाणे गरजेचे आहे.तसेच जरी एखाद्या व्यक्तीला अगोदरच किडनी विकार असेल तरी या पदार्थांच्या सेवनाने त्याच्या किडनीवर शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा भार कमी होऊ शकतो.यासाठी किडनी विकार असलेल्या रुग्णांनी सोडीयम,पोटॅशियम व अॅनिमल प्रोटीन कमी प्रमाणात असलेले पदार्थ आहारात कमी घ्यावेत.
१.पौष्टिक आहार घ्या-
योग्य प्रमाणात व चांगल्या दर्जाचे प्रोटीन आहारात असणे गरजेचे आहे.खाद्यपदार्थांच्या लेबलवर सोडीयम,पोटॅशियम व फॉस्फरसचे दिलेले प्रमाण पाहूनच ते पदार्थ खरेदी करा.तसेच आहारात प्रोटीन समाविष्ट करण्यापुर्वी तुमच्या आहारतज्ञाचा सल्ला जरुर घ्या.
२.डायटीशन चा सल्ला घ्या-
किडनी विकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाब,ह्रदयविकार व मधुमेह असण्याची शक्यता अधिक असते.यासाठी प्रथम आहारतज्ञाचा सल्ला घ्या जे तुम्हाला तुमच्या आरोग्य स्थितीनूसार तुमचा आहार नियोजित करण्यासाठी मदत करतील.
३.लिचींग प्रक्रियेने तयार केलेल्या भाज्या निवडा-
किडनी विकाराच्या रुग्णांसाठी भाज्यांमधील सोडीयम,पोटॅशियम व फॉस्फरस हे घटक कमी करण्यासाठी त्या लिचींग प्रक्रियेने शिजवणे गरजेचे असते.यासाठी कोमट पाण्यात कापलेल्या भाज्या २-३ तास बूडवून ठेवा.त्यानंतर ते पाणी काढून टाका व त्या भाज्या स्वयंपाकासाठी वापरा.
४.योग्य प्रमाणात पाणी प्या-(हिवाळ्यात देखील)
किडनीवरील ताण कमी करण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.तुम्ही जितके अधिक पाणी पिता तितकी अधिक लघवी तुमच्या शरीरात निर्माण होते.सहाजिकच त्या लघवी सोबत शरीरातील विषद्रव्ये देखील बाहेर टाकली जातात.त्यामुळे तुमच्या किडनीवरचा भार कमी होतो व किडनी समस्या होण्याचा धोका देखील कमी होतो. जरुर वाचा लिंबूपाणी- ‘किडनीस्टोन’ची समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय !
५.आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ समाविष्ट करा-
ज्या लोकांना सतत किडनी इनफेक्शन होते त्यांनी आहारात फळे,ताज्या भाज्या,दूध व दूधाचे पदार्थ,ताज्या पाण्यातील मासे असे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाणे गरजेचे असते.
-
भाज्या- लाल भोपळी मिरची,कोबी,फ्लॉवर,कांदा
-
मसाले- लसूण
-
फळे- सफरचंद,पेरु,पेर,पपई,अननस
-
नॉन- व्हेज पदार्थ-ताज्या पाण्यातील मासे व अंड्यातील पांढरा भाग
६-कॅल्शियमयुक्त पदार्थ पुर्ण बंद करु नका-
काही लोकांना अशी भीती वाटते की कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्याने कॅल्शियम सॉल्टमुळे किडनी स्टोनची समस्या निर्माण होईल.लक्षात ठेवा कॅल्शियमयुक्त पदार्थांमुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याचा धोका वाढत नाही.उलट कॅल्शियमला प्रतिबंध केल्यामुळे स्टोन होण्याची शक्यता वाढते.कारण कॅल्शियममुळे ऑक्सलेटचे शोषण कमी होते.
किडनी विकार असलेल्या रुग्णांनी आहारात हे ५ पदार्थ खाणे टाळावे-
डॉ.नेहा सनवाल्का यांच्या मते किडनीचे प्रमुख कार्य शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे व शरीरातील इलेक्ट्रोकेमिकलचे सतुंलन राखणे हे असते.यासाठी किडनी विकार असणा-या रुग्णांनी सोडीयम,पोटॅशियम,फॉस्फरस,प्रोटी
१.सोडीयम असलेल्या पदार्थांपासून दूर रहा-
सोडीयम घटक असलेले पदार्थ खाल्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. ज्याचा दाब तुमच्या किडनीवर पडतो.त्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.यासाठी ज्या लोकांना किडनी विकार आहेत त्यांनी सोडीयम असलेले पदार्थ खाऊ नयेत. मीठ, बेकींग पावडर, सोडा-बायकार्बोनेट, कॅन्ड फू़ड, चीज,बकॉन, हॅम सॉसेजस, मटण, यीस्ट, सॉल्टेड चीप्स, बिस्किट, नट्स, पॉपकॉर्न, पापड, लोणचे, कमर्शियल सलाड ड्रेसिंग, शितपेय, सोडीयम बेन्झॉनेट असलेले पदार्थ,सूप क्युब्स,हेल्थ ड्रींक,कोका,एमएसजी व पुडींग मिक्स यामध्ये सोडीयम असते.
२.पोटॅशियम अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा-
किडनीद्वारे शरीरातील टॉक्सिन्स,सोडीयम,पोटॅशियम,फॉस्
३.फॉस्फरस अधिक असलेले पदार्थ आहारातून कमी करा-
आपण खात असलेल्या जवळजवळ सर्वच पदार्थांमध्ये फॉस्फरसचे घटक असतात.मात्र ज्या लोकांना किडनी विकार आहेत त्यांनी फॉस्फरस घटक असलेले पदार्थ आहारातून कमी करणे गरजेचे असते.कारण अशा पदार्थांमुळे किडनीवर दाब येतो व किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही.यासाठी दूध,दही,मटण,पोल्ट्री पदार्थ,मासे,गुळ,डाळी,केळी,पेरु
४.ऑक्सलेट पदार्थ कमी करा-
पालक,शेंगदाणे,सीड्स,धान्ये,शिं
५.तुमच्या प्रोटीन घटकांवर नियंत्रण ठेवा-
ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे अशा लोकांनी सीफू़ड,मटण किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे.कारण या घटकांमुळे युरीक अॅसिड वाढते ज्यामुळे युनीक अॅसिड स्टोन तयार होण्याची शक्यता अधिक असते.
डॉ.नेहा यांच्या मते किडनी विकार असलेल्या लोकांच्या जीवनात ते काय आहार घेतात हे खूप महत्वाचे असते.मात्र असे असले तरी आहारातील बदलांसोबत अशा रुग्णांनी त्यांच्या जीवनशैलीत देखील काही सकारात्मक बदल करणे अपेक्षित असते.
सर्वात महत्वाची गोष्ट आहार निवडताना न्यूट्रिशनीस्ट अथवा डायटीशनचा सल्ला जरुर घ्या.कारण ते तुम्हाला तुमच्या किडनी विकाराच्या स्थितीनूसार योग्य व निरोगी डाएट प्लॅन करण्यास मदत करु शकतात.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock