डोळ्यातील अंतर्दाब वाढल्यामुळे काचबिंदू होण्याची शक्यता वाढते.काचबिंदू विषयी अनेक समज-गैरसमज असतात.डोळ्यांवर अंतर्दाब येणे म्हणजे काय? त्यावर काय उपचार करण्यात येतात? काचबिंदूचा धोका कमी करण्यासाठी काय करावे? अशा अनेक शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
नवी मुंबईच्या अॅडव्हान्स आय हॉस्पिटलचे (Glaucoma and Cataract) कन्सल्टंट डॉ.राजेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊयात डोळ्यांवरील अंतर्दाब व काचबिंदूविषयी ही महत्वाची महिती.
- आय प्रेशर म्हणजे काय ?
आय प्रेशर म्हणजे नेत्रदलाचा दाब जो पा-याच्या मिलीमीटर(mm Hg) मध्ये मोजण्यात येतो.जर तुमच्या डोळ्यांमधील अंतर्दाब १२-२२ mm Hg इतका असेल तर तो सामान्य असतो.डोळ्यामधील हा अंतर्दाब टोनोमेट्रीच्या सहाय्याने मोजण्यात येतो.ही काचबिंदू तपासणीसाठी करण्यात येणारी एक टेस्ट असते.जाणून घ्या डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय
डोळ्यांमधील अंतर्दाब वाढला तर काय होते?
डोळ्यांमधील दाब २२ mm Hg पेक्षा अधिक असेल तर ते ऑक्युलर हायपरटेंशन अथवा काचबिंदूचे लक्षण असू शकते.जर एखाद्या व्यक्तीचा डोळ्यांमधील दाब सामान्य दाबापेक्षा अधिक असेल व त्यामध्ये काचबिंदूची कोणतीही लक्षणे आढळत नसतील तर ते ऑक्युलर हायपरटेंशनचे एक लक्षण असू शकते.त्याचप्रमाणे जर डोळ्यांमधील अंतर्दाब जास्त असेल व काचबिंदूची लक्षणे देखील आढळत असतील तर त्याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.हे नक्की वाचा डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजकअन महत्त्व पूर्ण गोष्टी !
डोळ्यांमधील अंतर्दाबामुळे अंधत्व येऊ शकते का?
डोळ्यांमधील दाब नेहमीपेक्षा खूप जास्त असेल तर अंधत्व येण्याची शक्यता असते.कारण त्यामुळे ऑप्टिकल मज्जातंतूचे नुकसान होते व जे पुन्हा बरे करता येत नाहीत.अशा परिस्थितीत प्रथम त्या व्यक्तीच्या गौण दृष्टीवर परिणाम होतो या दृष्टीमध्ये हळूहळू बदल झाल्यामुळे तो बदल लवकर लक्षात येत नाही.जर लवकर निदान झाले नाही तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या मध्य दृष्टीवर परिणाम होतो व ही दृष्टी कमी कमी होत पुर्ण अंधत्व येते.पण काचबिंदूचे लवकर निदान झाले तर त्यावर औषधे व शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात.त्यामुळे अंधत्व येण्याची समस्या पुढे ढकलता येते.
डोळ्यांमधील अंर्तदाब कमी असल्यास काचबिंदूचा धोका असू शकतो का?
डोळ्यांमधील अंर्तदाब २१ mm Hg पेक्षा कमी असणे हे सामान्य असले तरी जाड व ताठ कॉर्नीया मुळे त्यात चुकीचा बदल दर्शविला जाऊ शकतो.ऑक्युलर हायपरटेंशन ट्रिटमेंट स्टडीनूसार ज्या लोकांमध्ये जाड कॉर्नीयासह डोळ्यांमधील अंर्तदाब २४ mm Hg असतो त्यांना सामान्य कॉर्नीया असलेल्या लोकापेक्षा काचबिंदू होण्याचा धोका अधिक असू शकतो.
उदा.ज्या लोकांचा कॉर्नीया सामान्य असतो (say 400µ) त्यांच्या डोळ्यांमधील अंर्तदाब २० mm Hg दाखवला जातो पण वास्तवात तो २७ mm Hg असू शकतो.जो सामान्य दाबापेक्षा अधिक असतो.त्याचप्रमाणे दर कॉर्नीया जाड असेल (say ६00µ) आणि डोळ्यांचा अंर्तदाब १८ mm Hg असेल तर वास्तवात तो दाब १२ mm Hg असू शकतो.तुमचे डॉक्टर यासाठी तुम्हाला पॅचीमेस्ट्री टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.ज्यामुळे तुमच्या कॉर्नीयाची जाडी व तुमच्या डोळ्याचा अंर्तदाब लक्षात घेऊन तुमच्यावर योग्य उपचार करण्यात येतात.जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार
डोळ्यांमधील दाब वाढण्याची पुर्व लक्षणे काय असतात?
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या काचबिंदूची समस्या आहे यावर डोळ्यांचा दाब वाढण्याची लक्षणे अवलंबून असतात.ओपन अॅगल ग्लूकोमा यात कोणतीही लक्षणे आढळत नाहीत कारण या समस्येमध्ये कोणतीही वेदना अथवा त्रास न होता ऑप्टीकल मज्जातंतू प्रभावित होतो.या समस्येमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत जोपर्यंत ऑप्टिकल मज्जातंतू मध्ये पुर्ण बिघाड होत नाही व गौणदृष्टी जात नाही तोपर्यत ही लक्षणे समजून येत नाहीत.तर याउलट अॅगल क्लोजर ग्लूकोमामध्ये पहिल्या टप्पात दृष्टी धुसर होते.त्यानंतर या समस्येमध्ये वाढ झाल्यास दीर्घ काळासाठी दृष्टी अंधूक होणे,डोळ्यांमध्ये वेदना होणे,डोळ्यांसमोर प्रकास दिसणे,डोळे लालसर होणे व उलटी ही लक्षणे आढळतात.दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतात ही ’14′ कारणंं !
- या समस्येचे निदान कसे करतात?
नियमित केल्या जाणा-या शारीरिक तपासणीमध्ये नेत्रचिकित्सकांकडून डोळ्यांचा अंर्तदाब तपासून या समस्येचे निदान करता येते.तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला काचबिंदू असण्याची शंका आली तर ते तुम्हाला ग्लूकोमा स्पेशलिस्टकडे पुढील निदानासाठी जाण्याचा सल्ला देतात.
- काचबिंदूवर काय उपचार केले जातात?
काचबिंदू पुर्ण बरा करता येत नाही पण डोळ्यांच्या दाबावर नियंत्रण आणून ऑप्टिकल मज्जातंतूंमधील अधिक बिघाड थांबविता येऊ शकतो.तुमच्या स्थितीवरुन डॉक्टर तुम्हाला औषधे(आय ड्रॉप) घेण्याचा सल्ला देतात.जी औषधे तुम्हाला दररोज घ्यावी लागतात.किंवा ते तुम्हाला शस्त्रक्रिया अथवा लेझर ट्रिटमेंट करण्याचा सल्ला देतात.जरूर वाचा: आयड्रॉप्स घालताना ही काळजी नक्की घ्या !
हाय आय प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काही टीप्स आहेत का?
आहारात हिरव्या पालेभाज्या व मासे यासारखे ओमेगा ३ फॅटी अॅसिड वाढवून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य जपू शकता.पण काचबिंदूवर पूर्ण प्रतिबंध करता येत नाही.असे असले तरी ओपन अॅगल ग्लूकोमामध्ये डोळ्यांमधील अंर्तदाब मात्र नियमित व्यायामाने कमी करता येतो.जाणून घ्या डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6 सुपरफुड्स !
यासाठी या टीप्स जरुर करा-
-
कॅफेन पेय कमी प्रमाणात घ्या कारण कॅफेनमुळे डोळ्यांमधील दाब वाढतो.
-
दिवसभरात काही तासांनी द्रवपदार्थांचे सेवन करा.कारण एकाच वेळी भरपूर पेय घेतल्याने डोळ्यांमध्ये तात्पुरता दाब निर्माण होतो.
-
झोपताना २० डिग्रीवर अंश कोनात तुमचे डोके वर उचलले जाईल अशी उशी घ्या.त्यामुळे डोळ्यांवर जास्त दाब येणार नाही.
-
तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व आय ड्रॉप्स वेळेवर घ्या ज्यामुळे तुमची समस्या अधिक बळावणार नाही.
(नक्की वाचा : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ’7′ सवयी दूर ठेवा)
डोळ्यांमधील अंर्तदाब सामान्य रहाण्यासाठी काय कराल?
डोळ्यांमधील दाब वाढणे हे काचबिंदू होण्यामागचे एकमेव कारण नाही पण त्यामुळे काचबिंदू ही समस्या अधिक गंभीर होते.त्यामुळे जर तुमच्या डोळ्यामधील अंर्तदाब जास्त आहे असे निदान झाले तर नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्या.
हिरवळीवरून चालणे कसे ठरते डोळ्यांसाठी फायदेशीर ? हे तुम्हांला ठाऊक आहे का
जवळचे दिसणे सुकर करेल हे ’5′ घरगुती उपाय
Reference 1. Kass, M. A. (1994). The ocular hypertension treatment study. Journal of glaucoma, 3(2), 97-100.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock