Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’7′कारणांमुळे स्त्रियांच्या पेल्विक भागात वेदना जाणवतात !

$
0
0

महिलांमध्ये मासिकपाळीच्या काही दिवस आधी ओटीपोट दुखणे हे एक सामान्य लक्षण आहे.मात्र जर तुम्हाला ओटीपोटात सतत वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.कारण या वेदना पेल्विक इनफ्लैमटरी डिसिस चे लक्षण देखील असू शकतात.काही वेळा अशा वेदनांचे कारण जेनीटल टीबी असणे देखील असू शकते.

गुरगावच्या वेल वुमॅन क्लिनीकच्या डायरेक्टर,कन्सल्टंट गायनेकॉलॉजीस्ट अॅन्ड ऑब्स्टिट्रिशन डॉ.नूपुर गुप्ता यांच्यामते या समस्येवर स्वत:च ओटीसी औषधे घेण्यापेक्षा तुमच्या गायनेकालॉजीस्टचा सल्ला घेणे जरुरी आहे.या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

१.पेल्विक इनफ्लैमटरी डिसिस-

हा रोग प्रामुख्याने पेल्विक भागातील बॅक्टेरियल इनफेक्शन मुळे होतो.ज्याचा प्रभाव गर्भाशय,फेलोपियन ट्यूब,अंडाशय या अवयवांवर होतो.या विकारात बॅक्टेरिया योनीमार्गातून या प्रजनन अवयवांपर्यंत पोहचतात व त्यामुळे ओटीपोटात वेदना होऊ लागतात.या विकाराची अॅबनॉर्मल व्हर्जायनल डिस्चार्ज अथवा लघवी करताना वेदना,मासिकपाळीत पोटात क्रॅम्स येणं व पाठदुखी ही लक्षणे आहेत.

२.पेल्विक इनफेक्शन-

सेक्शुअली ट्रान्समिटेड इनफेक्शन व प्रजननमार्गातील इनफेक्शन मुळे पेल्विक इनफेक्शन होते.यामुळे पेल्विक भागातील स्नायू किंवा सांधे कमजोर होतात त्यामुळे ओटीपोटात वेदना होऊ लागतात.या इनफेक्शनची लक्षणे सेक्स करताना वेदना,सतत पोटातील आतड्यांना इनफेक्शन होणे,ओटीपोटात अस्वस्थता व मूत्राशयावर दाब आल्यासारखे वाटणे ही असतात.vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !

३. Endometriosis-

या स्थितीत गर्भाशयाच्या आतील अस्तराच्या पेशी इतर अवयवांपेक्षा म्हणजे अंडाशय व मूत्राशयापेक्षा वेगाने वाढू लागतात.यामुळे वंधत्व येते,हॉर्मोनल समस्या निर्माण होतात.या विकारावर उपचार करता येतात.याची प्रमुख लक्षणे आतड्यांमध्ये तीव्र वेदना,मासिक पाळीत स्पॉटींग होणे,मासिक पाळीत अथवा आधी तीव्र पेटके येणे,गुदाशयातून रक्तस्त्राव व लघवी करताना वेदना होणे ही असतात.

४.आयबीएस-

ओटीपोटातील वेदना ही प्रजनन अवयवांमध्ये अथवा मूत्रमार्गातील बिघाडामुळे होऊ शकते.मात्र कधीकधी ही समस्या तुमच्या आतड्यांमधील इरीटेबल बोवल सिन्ड्रोम  मुळे देखील असू शकते.डायरिया,पोटदुखी,पोटफुगणे ही त्यामागची प्रमुख कारणे असू शकतात.

५. युरीनरी ट्रॅक इनफेक्शन-

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मूत्रमार्गाचे इनफेक्शन अधिक प्रमाणात आढळून येते.ब-याच महिलांना या इनफेक्शनमुळे पोटात वेदना होऊ शकतात हे देखील माहित नसते.हे इनफेक्शन झाल्यास सतत लघवीला होणे,लघवी करताना वेदना व जळजळ होणे,लघवीचा रंग,सुसंगता बदलणे,लघवीतूव दुर्गंध येणे,पाठदुखी या समस्या होतात.लिंबूपाणी – Urinary tract infections चा त्रास टाळण्याचा घरगुती उपाय

६.जेनीटल टीबी-

गर्भाशय किंवा योनीमार्ग या प्रजनन अवयवांना बॅक्टेरियाचे संक्रमण झाल्याने हा विकार होतो.या विकाराचे लक्षण पेल्विक भागात तीव्र वेदना,कंबरदुखी,लघवी करताना वेदना होणे व रक्त येणे ही असू शकतात.

७.चुकीच्या जागी गर्भधारणा ectopic pregnancy-

जेव्हा गर्भधारणा गर्भाशया ऐवजी इतर ठिकाणी होते तेव्हा त्याला ectopic pregnancy असे म्हणतात.या समस्येमध्ये कधीकधी गर्भधारणा फेलोपाईन ट्यूबमध्ये होते.यामुळे आतडी,मूत्राशय,अंडाशय यावर याचा परिणाम होतो.यामुळे पेल्विक भागात रक्त देखील जमा होतो.या समस्येमध्ये ओटीपोटात वेदना,लूज मोशन,अस्वस्थता व ताप ही लक्षणे आढळतात.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>