रात्री लघवीला झाल्यामुळे तुम्ही उठता व बाथरुममध्ये जाता पण काही केल्या तुम्हाला लघवीलाच होत नाही.तुमच्या ओटीपोटात खुप वेदना होतात पण एक थेंब देखील लघवी होत नाही.तुम्ही वेदनेमुळे जमिनीवर पडून लोळू लागता.हे चित्र कदाचित तुम्हाला एखाद्या हॉरर मुव्ही प्रमाणे वाटू शकते.पण असे वास्तवात देखील होते व या समस्येला युरीनरी रीटेंशन असे म्हणतात.ज्या स्थितीत तुमचे मूत्राशय मूत्राने पुर्णपणे भरलेले असते पण तुम्हाला लघवीला होत नाही.
यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या युरो-ऑन्कोलॉजीकल सर्जन डॉ.अनूप रमाणी यांच्याकडून जाणून घेऊयात या समस्येवर नेमके काय उपाय करावेत.
युरीनरी रीटेंशन होण्याचे काय कारण असते?
डॉक्टरांच्या मते महिला असो की पुरुष दोघांच्या देखील शरीरातून मूत्र स्वत:हून बाहेर पडत नाही.मूत्राशय मूत्र विशिष्ट दाबाने बाहेर फेकते.त्यामुळे शरीराला लघवी बाहेर टाकण्यासाठी मूत्राशयाच्या या शक्तीची गरज असते.लघवी करताना त्रास का जाणवतो ?
मूत्र बाहेर टाकण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यक्ता असते.
-
मूत्र बाहेर टाकण्यासाठी आकुंचन पावणारे मूत्राशयाचे स्नायू
-
लघवी बाहेर टाकण्याची जागा उघडी असणे
या दोघांपैकी एका जरी गोष्टीमध्ये बिघाड झाला तर त्या व्यक्तीला लघवी करण्यास त्रास होतो.
पुरुषांमध्ये ब्लेडर रीटेंशन होण्याची दोन कारणे असतात-
-
प्रोस्टेटच्या आकारात बदल
-
मूत्राशयाचे स्नायू कमजोर असणे
ही समस्या स्त्रीयांमध्ये फार कमी प्रमाणात आढळते.एखाद्या स्त्रीला सर्विकल कॅन्सर असल्यास तीला या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
युरीनरी रिटेंशनची लक्षणे-
-
मूत्राशयात वेदना
-
तीव्रतेने लघवीला होणे
-
ओटीपोटाच्या भागात सूज येणे
युरीनरी रिटेंशन मुळे काय त्रास होतो?
-
मूत्राच्या दाबामुळे मूत्राशयामध्ये बिघाड
-
युरीनरी इनफेक्शन होण्याची शक्यता
-
किडनीमध्ये बिघाड
वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार-
डॉ.रमाणी यांच्या मते पुरुषांमध्ये युरीनरी रीटेंशनचे एक प्रमुख कारण प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे हे असते.प्रोस्टेट ग्रंथी मूत्राशयाच्या गळ्याजवळ असते व या मध्ये शुक्राणूंच्या निर्मितीसाठी लागणारे द्रवपदार्थ स्त्रवतात.ही ग्रंथी एखाद्या डोनटच्या आकारासारखी असून त्यामध्ये मध्यभागी एक छेद असतो ज्यातून मूत्र बाहेर पडते ज्याला मूत्रमार्ग असे म्हणतात.पुरुषांमध्ये त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतर ही ग्रंथी सर्वबाजूने वाढू लागते ज्यामुळे मूत्रमार्गावर दाब येतो व मूत्र बाहेर पडण्याचा मार्ग संकुचित होतो.
ज्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीची लक्षणे दिसून येतात ते अगदी मूत्रमार्गाचे छिद्र पुर्ण बंद होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करतात व शेवटी यूरोलॉजीस्टचा सल्ला घेतात.डॉ.रमाणी यांच्या मतानूसार अशा वेळी डॉक्टर प्रथम कॅथटर या एका लवचिक नळीला मूत्रमार्गाच्या छिद्रात घालून मूत्राशय रिकामे करतात.त्यानंतर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर ७० ते ८० टक्के रुग्ण मूत्रमार्ग खुला झाल्यामुळे व्यवस्थित लघवी करु शकतात.मात्र २० ते ३० टक्के रुग्णांवर पुन्हा उपचार करावे लागतात.अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया अथवा लेझर उपचार करण्यात येतात. कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांमुळे prostate cancer चा धोका वाढतो?
ब्लॅडर कमजोर असल्यास काय उपचार करण्यात येतात?
स्पाईन सर्जरी,मधुमेह,डोक्यावर केलेली सर्जरी यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमजोर होतात.कधीकधी मज्जातंतूच्या बिघाडामुळे मेंदू व मूत्राशय यामधील संदेशवाहन व्यवस्थेत अडथळा येतो ज्यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात.डॉ.रमाणी यांच्यामते या समस्येमुळे मूत्राशयाचे स्नायू मूत्र बाहेर ढकलण्यास अक्षम होतात.मात्र यास्थितीतील युरीनरी रीटेंशन मध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे होणा-या युरीनरी रीटेंशन इतक्या वेदना होत नाहीत.
डॉक्टरांच्या मते यासाठी ते रुग्णांना स्वत:हून मूत्राशय व ओटीपोटावर दाब देऊन लघवी काढण्याचा सल्ला देतात.त्याचबरोबर रुग्णांना कॅथटर वापरण्यास शिकविण्यात येते ज्यामुळे रुग्ण त्यांना त्रास होऊ लागल्यास स्वत:च उपचार करु शकतात.
अधिक माहितीसाठी नक्की वाचा: दूर करा प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे हे 6 गैरसमज
ही समस्या कमी करण्यासाठी काय करावे?
जर तुम्हाला या समस्येची लक्षणे आढळली तर प्रथम यूरोलॉजीस्टचा सल्ला घ्या.डॉ.रमाणी च्या एका अनुभवावरुन एक वृद्ध गृहस्थ जे ब्लेडर रीटेंशनची लक्षणे आढळून देखील ते त्यावर औषध घेत नव्हते.त्यांना एका रात्री अचानक भयानक वेदनेला सामोरे जावे लागले पुढे अशा परिस्थितीत डॉक्टरांना त्यांना कॅज्युल्टी मध्ये घ्यावे लागले.जर त्या गृहस्थांनी आधीच याबाबत औषध-उपचार सुरु केले असते तर त्यांना या वेदना टाळता आल्या असत्या.
जीवनशैलीत योग्य बदल,काही विशिष्ट सवयींमध्ये बदल व मधुमेहाला नियंत्रित केल्यास ही समस्या नक्कीच नियंत्रणात आणता येते.डॉ.रमाणी यांच्या मते यासाठी पुरुषांनी पन्नाशीनंतर त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी प्रोस्टेट चेकअप करावे.ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकता.प्रोस्टेटचा वाढलेला आकार तपासण्यासाठी सोनोग्राफी व प्रोस्टेट स्पेसिफिक अॅन्टीजन टेस्ट जरुर करा.जाणून घ्या मूत्रपरिक्षणावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock