छायाचित्र सौजन्य – Shutterstock
7 मार्च 2016 - महाशिवरात्र
………………………………………………………………………
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. मंदिरात दुग्धाभिषेक आणि बेलपत्र वाहले जाते. परंतू तेच बेलपत्र मधूमेहींसाठी एक वरदान आहे. काही जण या दिवशी उपवास करतात. सार्याच धर्मामध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. मात्र चुकीच्या खान-पानाच्या पद्धतीमुळे अनेकांना उपवासादरम्यान पित्ताचा त्रास होतो. उप + अवास अशी उपवास या शब्दाची फोड होते. यामध्ये उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे अर्थात उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे. उपवासादरम्यान सात्विक आणि अल्पप्रमाणात आहार घ्यावा.
योग्यरित्या उपवास केल्यास शरीराच्या काही क्रियांना विश्रांती मिळते, पचन क्रिया सुधारते. शरीर शुध्दीसाठी उपवास फायदेशीर ठरतो. परिणामी आपल्या शरीरातील आम म्हणजे विषद्रव्यांचे (हेच आम पुढे अनेक विध रोगास कारणीभुत ठरते.) ज्वलन होते. म्हणूनच आरोग्यदायी पद्धतीने उपवास करण्यासाठी लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या डॉ. कविता पवन लड्डा यांनी सुचवलेला हा डाएट प्लॅन आज नक्की अंमलात आणा.
- कसा असावा तुमचा उपवासा दरम्यानचा आहार ?
# सकाळ -
सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी प्या. त्यांनतर कमी पत्तीचा चहा (उपवासाला चालत असेल तर) प्यावा.
सकाळी ताजे ताक 1-2 ग्लास ज्यामध्ये पुदिना, जिरे, काळामिरी पूड, आलं खिसुन टाकावे. हे पेय स्वादीष्ट आणि आरोग्यदायीदेखील ठरते. किवा 1-2 राजगिरा लाडू खाऊन दिवसाची सुरवात करा. याव्यतिरिक्त तुम्ही 1 वाटी दहयातील काकडीची कोशिंबीर खाणे हा देखील फायदेशीर पर्याय आहे.
( नक्की वाचा : उपवास विशेष-: राजगिर्याचा उपमा कसा बनवाल )
# दुपार -
दुपारी 1 मध्यम आकाराची प्लेट भगर किंवा पोटभरुन पपई किंवा अननस किंवा सफरचंद किंवा डाळींब किंवा मोसंबी – संत्रा यापैकी आवडीनुसार फळ खा.
# संध्याकाळ -
संध्याकाळी भूक लागल्यास 1 ग्लास कमी साखरेचे लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्या.
# रात्री -
रात्री 7 च्या आत जेवण करावे. रात्रीच्या जेवणात राजगियाच्या लाहया किंवा राजगिरा लापशी किंवा राजगिरा लाडू किंवा राजगिरा चपाती व राजगिरायाची कढी घ्या. तसेच पहा कसा बनवाल उपवास विशेष रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा
रात्री झोपताना गरज असेल तर 1 ग्लास गरम गोड दुध अन्यथा 1 ग्लास कोमट पाणी पिऊन झोपा. पण दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !
- उपवासादरम्यान कोणती खास काळजी घ्याल ?
# उपवास आहे म्हणून एकदाच भरपोट न खाता चारपाच वेळा थोडे थोडे आपण खायला हवं .
# उपवासाच्या काळात सुध्दा आपली जेवणाची वेळ ही नियमित असावी .
# उपवासाच्या काळात योग्य मात्रेत पाणी प्यायला हवे.