लहान बाळ म्हणजे घरातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याचा छोट्या छोट्या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष दिले जाते. विशेषतः त्याच्या आरोग्याकडे. तुम्ही कधीतरी पाहिले असेल की लहान बाळाला भरवल्यानंतर त्याने ढेकर दिला की आई-आजी यांसारखी मोठी मंडळी खुश होतात. त्यामागे कारणही तसेच आहे. बाळाला भरवताना पोटात गेलेली अतिरिक्त हवा ढेकराच्या मार्फत बाहेर निघते. कारण ती जर पोटातच राहीली तर पोटात दुखू लागते. नक्की वाचा: बाळाच्या रडगाण्यामागे दडल्यात या ’5′ भावना !
परंतु, बरेचदा या छोट्याशा गोष्टीला आपण फार महत्त्व देत नाही. बाळाला भरवताना बाळ झोपल्यास तुम्ही त्याला बेडवर ठेवता आणि निश्चिंत होता. तुम्हाला असं वाटत की आता काही तास तरी बाळ शांत झोपेल आणि तुम्हाला निवांत वेळ मिळेल. पण असे न होता बाळ काही वेळातच रडत उठतं. झोपेतून उठण्याची अनेक कारणं असू शकतात. पण ढेकर न दिल्यामुळे पोटात दुखू लागतं आणि त्यामुळे ही बाळ उठतं. या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !
The Pediatric Network च्या Founder & Director, Dr Chaitali Laddad यांच्या सल्ल्यानुसार बरेचदा भरवल्यानंतर बाळ ढेकर देत नाही. तरी पण त्याला खांद्यावर घेऊन पाठीवर हलक्या हाताने थोपटणे योग्य ठरेल. त्यामुळे पोटात गेलेली अतिरिक्त हवा हलकेच बाहेर पडेल. असे करून देखील बाळाला ढेकर आला नाही तरी काही प्रमाणात हवा बाहेर पडून पुढे होणारी पोटदुखी टाळता येईल. आणि त्यामुळे बाळाची झोप मोड होणार नाही. या ’5′ कारणांंसाठी बाळाचे रडणे फायदेशीर !
भरवताना ढेकर न देता बाळ झोपी गेलं तर काय करावे ?
भरवताना बाळ झोपल्यानंतर देखील १५-२० मिनिटांसाठी बाळाला उचलून घ्या. तरीही बाळाला ढेकर न आल्यास बाळाच्या अंथरुणाखाली उशी ठेवा. त्यामुळे पोटात गेलेल्या हवेमुळे होणाऱ्या पोटदुखीला आळा बसेल. असे Dr. Laddad यांनी सांगितले. हिंग – लहान मुलांमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय !
परंतु, तुमचं बाळ दोन वर्षाचं झाल्याशिवाय उशीचा वापर करू नका. कारण त्यामुळे मानदुखी, डोकं मागून सपाट होणे किंवा choking hazards यांसारखे त्रास होऊ शकतात. जरूर वाचा: या लक्षणांनी वेळीच ओळखा ऑटिझम आणि त्यावरील उपाय !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock