मेनॉपॉज ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अशी नैसर्गिक स्थिती आहे ज्या स्थितीत तिच्या शरीरातील स्त्रीबीजांची निर्मिती बंद होते तसेच तिच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडतात.प्रत्येक स्त्रीला अंदाजे वयाच्या ४७ वयाच्या जवळपास मॅनोपॉजला सामोरे जावे लागते.मात्र आजकाल स्त्रीयांमध्ये लवकर मॅनोपॉज येण्याचे प्रमाण वाढले आहे.लवकर येणा-या या मॅनोपॉजची लक्षणे मॅनोपॉज प्रमाणेच असतात.लवकर मॅनोपॉज अनुभवण्याची वेळ आल्यास उष्णता व मूड स्वींग ही लक्षणे स्त्रीमध्ये आढळतात.सहाजिकच अनेक स्रीयांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की लवकर येणारी ही मॅनोपॉजची स्थिती पुढे ढकलता येते का? किंवा येत असेल तर ती कशी करावी ?
मुंबई लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज व सायन हॉस्पिटलचे प्रोफेसर व गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड डॉ.वाय.एस.नंदनवार यांच्याकडून जाणून घेऊयात मॅनोपॉज पुढे ढकलण्याचे काही सोपे मार्ग.
एस्ट्रोजनची पातळी वाढेल असा आहार घ्या-
पोषक व सतुंलित आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व फीट रहाता तसेच तुम्हाला मॅनोपॉज पुढे ढकलण्यास देखील मदत होते.मॅनोपॉजच्या काळात तुमच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी कमी होते.त्यामुळे एस्ट्रोजन वाढेल असा आहार घ्या.यासाठी सोया,शेंगदाणे,फ्लेक्स सीड तुम्ही आहारात घेऊ शकता.
नियमित व्यायाम करा-
व्यायामामुळे तुमचे हॉर्मोन्स सतुंलित रहातात व मॅनोपॉज पुढे ढकलण्यास देखील मदत होते.यासाठी तुम्हाला दररोज जीममध्ये जाण्याची काहीच गरज नाही.त्यापेक्षा दररोज तीस मिनिटे ब्रीस्क वॉक घ्या किंवा आठवड्यातून कमीतकमी पाच वेळा घरीच योगासने करा.याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.त्याचबरोबर यामुळे मॅनोपॉजच्या काळातील लक्षणांची तीव्रता देखील कमी होण्यास मदत होईल.
ताणापासून दूर रहा-
जर तुम्ही सतत ताणात असाल तर तुम्हाला लवकर मॅनोपॉजला सामोरे जावे लागेल.कारण तुम्ही जेव्हा ताणात असता तुमचे शरीर काही हॉर्मोन्स निर्माण करते ज्यामुळे शरीराचे कार्यात अडथळा येतो.या हॉर्मोन्सच्या निर्मिती हे मॅनोपॉजचे एक लक्षण असू शकते.हा ताण टाळण्यासाठी मेडीटेशनचा सराव करा अथवा तुमचा एखादा आवडता छंद जोपासा.या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !
हॉर्मोन रीप्लेसमेंट थेरपी-
तुम्ही एचआरपी अथवा हॉर्मोन रीप्लेसमेंट थेरपीच्या सहाय्याने हॉर्मोन सप्लीमेंट घेतली तर त्यामुळे तुमच्या शरीरात एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सची पातळी वाढू लागते.या काळात शरीरातील हॉर्मोन्सची निर्मिती कमी होऊ लागल्यास मॅनोपॉज टाळण्यासाठी तुम्ही या थेरपीची मदत घेऊ शकता.मात्र यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.कारण या थेरपीमुळे देखील तुमच्या शरीरातील इतर अनेक हॉर्मोन्सवर परिणाम होतो त्यामुळे प्रथम ही थेरपी तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासणे आवश्यक असते. तसेच या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock