साधारणपणे शरीरात काही बिघाड झाल्यावर उलटी होते. खराब अन्नामुळे झालेली रिअॅक्शन किंवा काहीतरी विषारी घटक पोटात गेल्यास अथवा कॅन्सर ची वाढ होत असल्यास उलटी होणं हे एक लक्षण प्रकर्षाने आढळते. काही वेळेस हँगओव्हर किंवा अॅसिडिटीमुळेदेखील उलटी होते. उलटी केल्यानंतर बऱ्याचजणांना फार रिलॅक्स वाटते. परंतू, जबरदस्तीने उलटी केल्यास घशाला त्रास होऊ शकतो किंवा घशातून रक्त येऊ शकते. जर मायग्रेन किंवा हँगओव्हर बरं करण्यासाठी तुम्हाला उलटी करायची असल्यास या ट्रिक्स ट्राय करा. त्यामुळे उलटी होण्यास मदत होईल. उलटी व मळमळच्या त्रास वाढण्यामागील १२ कारणंं
भरपूर पाणी प्या: भरपूर पाणी प्यायल्याने उलटी करणे काहीसे सोपे होते. पुरेशा पाण्यामुळे पोटात, अन्ननलिकेत आणि घशात अडकलेले घटक बाहेर पडण्यास व ते भाग स्वच्छ होण्यास मदत होते. पाण्यामुळे पोटात असलेले घटक सौम्य होऊन बाहेर पडतात. परंतू पाणी प्यायल्यावर लगेचच ते बाहेर काढू नका. १० मिनिटे थांबून मग उलटी काढणे योग्य ठरेल.
tongue cleaner वापरा: दिवसातून ३-४ वेळा पूर्ण जीभ tongue cleaner स्वच्छ करा. त्यामुळे उलटी बाहेर येण्यास नक्कीच मदत होईल. जीभेवरून ओळखा शरीरातील या समस्यांचे संकेत !
बोटांचा वापर करा: उलटी बाहेर काढण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. मग हाताची दोन बोटं जिभेच्या मागच्या बाजूला लावा. त्यासाठी पहिल्या दोन बोटांचा म्हणजे तर्जनी आणि मधले बोट याचा वापर करा. काही वेळातच उलटी होईल.
उलटी करत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा: कोणालाही उलटी करताना पाहून तुम्हाला ही उलटी आल्यासारखे वाटते. बरोबर ना? मग उलटी करण्यासाठी कोणीतरी उलटी करत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा. त्यामुळे उलटी लवकर होण्यास मदत होईल. अशा वेळी व्हिडीओ बघण्याने देखील फायदा होतो.
कोमट पाण्याने गुळण्या करा: मळमळ दूर करण्याचा अजून एक उपाय म्हणजे कोमट पाण्याने गुळण्या करणे. १० सेकंद असे केल्याने आतील पदार्थ उलटीच्या स्वरूपात बाहेर येतील.
गोल गोल फिरा: लहानपणी गोल गोल फिरल्यावर गरगरायचं. मळमळ जाणवून उलटी येईल असं वाटायचं. आठवतंय? जर कशानेच फायदा झाला नाही तर हा पर्याय उपलब्ध आहे. चक्कर येईल असे वाटेपर्यंत गोलगोल फिरा. पण असे करताना स्वतःला इजा होणार नाही याची खबरदारी घ्या.
जुन्या आठवणी आठवा: पूर्वी एखादी अशी गोष्ट असेल ज्यामुळे तुम्हाला उलटी सारखे होत असेल. उदा. लहानपणी एखाद्या औषधाचा वास तुम्हाला आवडत नसेल तर तो आठवा.
उलटी केल्याशिवाय बरं वाटणार नाही, अशा परिस्थितीच उलटी करा. कारण सतत असे केल्याने घसा व अन्ननलिकेला त्रास होऊ शकतो. तसंच त्यामुळे दात देखील खराब होतील.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock