Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्मोकींग सोडण्यासाठी ११ सोप्या डाएट टिप्स

$
0
0

रस्त्यावरून चालताना  १०-१५ जण  स्मोक करताना अगदी सहजच दिसतात. मॉडर्न जीवनाचे हे चित्र बघताच बदलत्या जीवनशैलीने आपल्या सवयींवर देखील ताबा मिळवला आहे, हे लक्षात येते. पण ही सवय घातक आहे हे माहीत असूनही जात नाही.  या सवयीच्या अनेक घातक सवयींपैकी एक म्हणजे याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफ वर होतो. सोडण्याचा अनेकदा प्रयन्त केला असला तरी तो मोह काही केल्या आवरता येत नाही. आपल्या या समस्येवर Jaslok Hospital and Research Centre मुंबईचे Consultant ENT head and neck surgeon Dr Dilon Dsouza यांनी आपल्याला काही डाएट टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे ३० दिवसात स्मोकींग सोडणे शक्य होईल. तर मग हाच असेल का आपल्या नवीन वर्षाचा संकल्प? करून तर बघूया प्रयन्त.

१. भरपूर पाणी प्या. ज्यामुले किडनी, लंग्स आणि लिव्हर मधील सगळे टॉक्सिन्स निघून जातील. त्याचबरोबर कमी कॅलरी असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

२. कॉफी आणि मद्याची सवय असेल तर ते टाळा. त्याऐवजी पाणी प्या. फळांचा ताजा रस , एनर्जी ड्रिंक्स पिणे  फायदेशीर आहे. सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय टाळा.

३. या महत्त्वाच्या ३० दिवसात खाणे अजिबात टाळू नका. योग्य आणि पोषक पदार्थ खाऊन स्वतःला तृप्त ठेवा. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असा प्लॅन करण्यापेक्षा काही वेळेच्या अंतराने थोडं थोडं खात राहा.  अगदी शक्य नसल्यास  नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तरी व्यवस्थित आणि वेळेवर घ्या. त्यामुळे धूम्रपान सोडण्यास मदत होईल. धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात ते जाणून घेण्यासाठी जरूर वाचा: धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर पुढील 20 मिनिटंं ते वर्षभराच्या काळात शरीरात होतात हे बदल !

४. नाश्ता किंवा जेवण काहीही चुकवू नका. कारण भूक लागल्यानंतर स्मोक करण्याची इच्छा बळावेल.

५. संतुलित आणि सकस आहार घ्या. आहारात फायबर युक्त पदार्थांचा समावेश वाढवा. ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहील.

६. गाजर, काकडी, हिरव्या पालेभाज्या जरूर खा. तसेच लो कॅलरी चॉकलेट्स, च्युईंगम्स खाण्यास हरकत नाही.

७. काम आणि प्रवास करताना पोट नीट भरलेलं असेल असे पहा. गव्हाचा ब्रेड, सॅण्डवीच, डाळी त्याचबरोबर सफरचंद, केळ, अननस, कलिंगड या सारखी फळे तुम्ही खाऊ शकता.

८. गाजर, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली या भाज्यांचा  आहारात जाणीवपूर्वक समावेश  करा. कारण या भाज्या खाल्ल्याने स्मोक करण्याच्या इच्छेला आळा बसतो. तरीही जर  मोह झालाच आणि तुम्ही स्मोक केलं तरी वाईट चवीमुळे तुम्ही सिगारेट अर्धवटच सोडून द्याल.

९. व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आहारात समावेश करा. उदा. संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा. त्याचबरोबर थोडं चटपटीत खाण्याची ही तुम्हाला मुभा आहे. म्हणजेच लोणचं, पापड, चिप्स. टोमॅटो आवडत असल्यास त्यावर काळीमिरी पावडर आणि मीठ घालून खाण्यास हरकत नाही. त्यामुळे नक्कीच फायदा होईल.

१०. मलबेरीज, स्ट्राबेरीज, ब्लूबेरीज ही फळे देखील स्मोकींगच्या मोहाला आळा घालतात.

११. नॉन व्हेज आवडत असल्यास मासे, चिकन जरूर घ्या. ते फायदेशीर आहे. परंतु मटण खाणे मात्र टाळावे. त्यामुळे स्मोकींगची मोह वाढतो. अन्नपदार्थ शिजवताना त्यात हळद जरूर घाला.  त्यामुळे स्मोकींगच्या मोहाला आळा बसतो.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>