मासिकपाळीच्या दिवसात पोटदुखी, क्रॅम्प्स, मूड स्विंग्सचा त्रास यासोबतच रक्तस्त्रावामुळे डाग पडण्याचीही भीती असते. अतिरक्तस्त्रावाच्यामुळे मुलींना कपड्यावर डाग पडण्याची भीती सतावत असते. म्हणूनच ही भीती करण्यासाठी आणि मासिकपाळीच्या दिवसात टेन्शन फ्री राहण्यासाठी या ट्रिक्स आणि टीप्स नक्की लक्षात ठेवा. ( नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!)
- अंडरवेअरमध्ये पॅड व्यवस्थित लावा. पॅडच्या विंग्स आणि आकाराप्रमाणे त्याची पुढील आणि मागची बाजू सेट करा. विंग्स घट्ट चिकटले आहेत याची खात्री करा.
- रक्ताचे डाग पडू नयेत म्हणून किमान मासिकपाळीच्या दिवसात जाडसर कापडाच्या अंडरवेअर वापरा. जाडसर अंडवेअर थोड्या प्रमाणात रक्त शोषून घेते. परिणामी डाग पडण्याचा धोका कमी होतो. तसेच तुमची अंडरवेअर सैलसर असणार नाही याची काळजी घ्या. यामुळे पॅड हलण्याचा धोका कमी होईल.
- पॅडच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला डाग पडत असेल तर त्या स्थितीत पॅड पुढे मागे करा. सॅनिटरी पॅड्समुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो का ? या तुमच्या मनातील समस्येवरही हे उत्तर मिळवा.
- मासिकपाळीच्या दिवसात अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास एक्स्ट्रा लार्ज पॅड्स वापरा. अशा पॅड्समध्ये रक्त शोषण्याची क्षमता अधिक असते. नक्की वाचा : मासिकपाळीच्या दिवसात किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे?
लिकेज होऊ नये म्हणून / डागांची भीती नको म्हणून कोणते कपडे वापराल ?
- तुम्हांला लिकेजची भीती असेल तर मासिकपाळीच्या दिवसात स्कर्ट घालणे टाळा. स्कर्ट घालायची तीव्र इच्छा किंवा हट्ट असेल तर स्कर्टमध्ये शॉर्ट्स घाला. मासिकपाळीच्या पहिल्या अनुभवाअगोदर मुलींना या ’5′ गोष्टी नक्की सांगा !
- तुमच्या जांघेजवळच्या भागामध्ये फीट राहील अशा ट्राऊजर्स किंवा जिन्स घाला.यामुळे पॅडला देखील सपोर्ट मिळेल.
- मासिकपाळीचे दिवस इतर दिवसांप्रमाणे नसतात. अनेक घाईत येताना- येताना,धावपळ करताना, चूकीच्या स्थितीत बसल्याने डाग पडल्याची शक्यता असते. अशा दिवसात कपड्यांवर डाग पडू नये म्हणून दक्ष राहणे गरजेचे असते. डाग पडू नये म्हणून खबरदारी घेत असल्यास सैलसर आणि गडद रंगाच्या पॅन्ट्स निवडा. यामुळे कदाचित डाग पडला तरीही ते दिसण्यात येणार नाही. तसेच मासिकपाळी दरम्यान पाळा या १० स्वच्छता टीप्स
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock