लहानपणी तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीने तुमची एखादी वस्तू, खेळणं चोरलेलं असल्याचं तुम्हाला आठवतंय? लहान मुलं अगदी सहज असं करतात. त्यांना चोरणे म्हणजे काय किंवा ते चुकीचे का आहे याची जाणीव नसतेच. त्यांना हवी असलेली वस्तू मिळवणे हाच त्यामागचा उद्देश असतो.
चाईल्ड सायकॉलॉजिस्ट, शुची दळवी यांनी सांगितले की जर तुमचा मुलगा/मुलगी वस्तू चोरत असतील किंवा मित्रांची खेळणी न सांगता घरी आणत असतील तर त्याला/तिला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तसंच त्याबद्दल खोटे बोलणे चुकीचे असल्याचे त्यांना समजावून सांगायला हवे. हे कसे सांगावे किंवा अशा चुकीच्या सवयींना आळा कसा घालायचा यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
- स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवा: आपण आपल्या मुलांना हवी ती खेळणी, हवा तो खाऊ आणून देतो. त्यांचा सगळ्या इच्छा-मागण्या पुरवतो. पण त्यांना स्वतःवर किंवा त्यांच्या मागण्यांवर बंधन ठेवायला शिकवत नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना दुकानातलं एक खेळणं निवडण्यास सांगा. आठवड्यातून एक चॉकलेट द्या. कारण ज्या वेळेस त्यांना खेळण्याचं पूर्ण दुकान हवं असतं तेव्हा त्यातून निवड करायला लावल्याने ते स्वतःवर किंवा त्यांच्या मागण्यांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतील. या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !
- शिस्त आणि मूल्य यांचे महत्त्व शिकवा: जर तुमची वर्तवणूक चांगली आणि प्रामाणिक असेल तर तुमच्या मुलांना ते शिकवणे सोपे जाईल. मुलांच्या चुकीवर जोरात ओरडण्या मारण्यापेक्षा काय चुकले ते त्यांना समजावून सांगा. चांगल्या वागण्याचे महत्त्व पटवून द्या. सुरवातीलाच जेव्हा तुमचं मूळ दुसऱ्याच्या हातातून खेळणं हिसकावून घेत असेल तेव्हाच त्याला सांगा की खेळणं शेयर करणे चांगले असते पण असे खेचून घेणे नाही. कारण लहानपणी शिकवलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. लहान मुलांसमोर या ’5′ गोष्टी करणे टाळाच !
- विश्वासाचे महत्त्व पटवून द्या: जर तुमच्या मुलाला/ मुलीला वस्तू चोरण्याची सवय असेल तर त्याला/तिला सांगा की असे केल्याने तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल. विश्वासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळा. वस्तू चोरणे हा कशाही वरचा उपाय नसल्याची जाणीव त्यांना करून द्या. या समस्येच्या खोलापर्यंत जाऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा
- ही सवय कायम राहिल्यास: जर तुमच्या मुला/मुलीची ही सवय कायम राहीली आणि शाळेत व घरी अशा तक्रारी यायला लागल्या तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. त्यामुळे मुलाला समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल. जरूर बघा: व्हिडियो: लहान मुलांच्या मनात नेमकं दडलयं काय ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock