Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केसातील उवांचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय !

$
0
0

केसांमध्ये ऊवा होणे हे फारच त्रासदायक असते.ऊवा व त्यांची अंडी टॉवेल,कंगवा,हेअर ड्रायर,क्लीप्स या माध्यमातून एकमेकांच्या केसात मिसळतात.त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ऊवा झाल्यास त्याच्या वस्तू इतरांनी वापरु नयेत.ऊवा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज येते.ऊवांमुळे इतर कोणतीही गंभीर समस्या निर्माण होत नाही पण ऊवा सहज एकमेकांच्या डोक्यात मिसळू शकतात हे एक काळजीचे कारण असू शकते.त्यामुळे ऊवा झाल्यास विशेष दक्षता घेण्याची व स्वच्छता पाळण्याची गरज असते.

बॅनरघट्टा रोडवरील फोर्टीस हॉस्पिटलचे कन्सल्टंट पिडीएट्रिशन डॉ.योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊयात केसांमध्ये ऊवा झाल्यास मुलांची कशी काळजी घ्याल.नक्की वाचा केसांतील ऊवा घालवण्याचे 7 घरगुती उपाय

ऊवांच्या इनफेक्शनला अधिक वाढू देऊ नका-

ऊवा घरातील इतर मंडळींच्या केसात शिरल्यामुळे त्यांची अधिक वाढ होत जाते.ऊवा डोळ्यांच्या पापण्या,डोक्यावरील केस व अंर्तगत भागातील केसांवर वाढतात.या व्यक्तीरिक्त म्हणजे कारपेट अथवा कपड्यांवर ऊवा फक्त २४ तास अथवा जास्तीत जास्त ७२ तास जिवंत राहू शकतात.पण त्या आधी जर त्यांचा संबंध एखाद्या व्यक्तीसोबत आला तर त्या व्यक्तीला ऊवांचे इनफेक्शन होऊ शकते.मात्र ऊवा माणसापासून पाळीव प्राण्यांमध्ये मिसळत नाहीत.

डोक्याजवळ डोके येणार नाही याची काळजी घ्या-

ऊवा  मित्र-मैत्रिणी अथवा घरातील लोकांच्या केसात सहज मिसळतात.मात्र एखाद्याच्या डोक्यात ऊवा आहेत हे इतरांना समजणे त्याच्यासाठी खुप लाजीरवाणे असते.त्या व्यक्तीच्या डोक्यातील ऊवा आपल्या डोक्यात मिसळू नयेत यासाठी त्या व्यक्तीला टाळणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे अशा व्यक्तीच्या डोक्याजवळ जाऊ नका कारण त्यामुळे तुमच्या डोक्यात देखील लगेच ऊवा मिसळू शकतात.केसांमधील टाळूतील रक्तावर ऊवा पोसल्या जातात.

मुलांमध्ये ऊवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या-

मुलांमध्ये खेळताना अथवा गप्पा मारताना ऊवा मिसळू शकतात.यासाठी तुमच्या मुलांना इतर मुलांच्या केसांचे ब्रश,कंगवे,टोपी,स्कार्फ शेअर न करण्यास शिकवा.तुमच्या मुलांना ऊवांचे इनफेक्शन झाले आहे का हे पहाण्यासाठी त्यांच्या केसांमधील त्वचा आठवड्यातून दोन-तीन वेळा नीट तपासा.इनफेक्शन टाळण्यासाठी तुमच्या घरातील चादर,टॉवेल व कपडे खुप गरम पाण्यामध्ये धुवा.हेअर ड्रायर देखील २० मिनीटे हॉट सायकल वर ठेवा.ज्या गोष्टी धुणे शक्य नसेल त्या ड्रायक्लीन करु घ्या.तसेच अगदी असे करणे शक्यच नसेल तर कमीतकमी या गोष्टी तीन दिवस एका बंद पेटीत ठेवा जेणे करुन त्या काळात त्या ऊवा मृत होतील.घरातील कारपेट देखील व्यवस्थित व्हॅक्युम करुन घ्या.

ऊवांचे इनफेक्शन झालेल्या व्यक्तीच्या वस्तू कशा निरर्जुंक कराल-

अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेले कंगवे,ब्रश व हेअर केअर प्रॉडक्टस फेकून द्या.तुमच्या वस्तू वेगळ्या ठेवा.दुस-यांच्या वस्तू वापरणे टाळा.किंवा या वस्तू अल्कोहोल अथवा मेडीकेटेड शॅम्पूने धुवा.तुम्ही या वस्तू २० ते ३० मिनीट गरम पाण्यामध्ये धुवू शकता.

ऊवांना मारण्यासाठी औषधांचा वापर करा-

ऊवांचे इनफेक्शनवर इपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत.त्यामळे या समस्येवर तुम्ही Malathion, Dimethicone आणि Permethrin ही औषधे लावू शकता अथवा तोंडावाटे घेण्यासाठी Ivermectin हे औषध घेऊ शकता.मात्र ऊवा नष्ट करण्यासाठी या औषधांसोबत तुम्ही योग्य ती स्वच्छता देखील पाळणे खूप आवश्यक आहे.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>