Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांमधील कॅन्सरबाबत जाणून घ्या या ’5′गोष्टी !

$
0
0

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा विळखा केवळ प्रौढांपुरता मर्यादीत नाही. अपोलो हॉस्पिटल्सच्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे ५०,००० लहान मुलांमध्ये कॅन्सर आढळतो. प्रौढांप्रमाणेच मुलांमध्येही विविध प्रकारचे कॅन्सर आढळतात. म्हणूनच लहान मुलांमध्ये आढळणार्‍या कॅन्सरच्या स्वरूपाबाबत अपोलो हॉस्पिटलचे, Group Medical Director & Senior Consultant Pediatric Gastroenterology and Hepatology, डॉ.अनुपम सिब्बल यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

#1 प्रौढांच्या तुलनेत केवळ 3% कॅन्सर मुलांमध्ये आढळतो. मुलांमध्ये कॅन्सर वेगळ्या स्वरूपात आढळत असल्याने त्यावरील उपचारही वेगळे असतात. त्यामुळे मुलांमधील कॅन्सर ओळखणेही काही वेळेस कठीण असते.

#2. लहान मुलांमध्ये कॅन्सर झपाट्याने वाढतो. त्यामुळे त्याचे वेळीच निदान करणे आणि त्यानुसार उपचार पद्धती निवडणे गरजेचे आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांवरील कॅन्सरमध्ये केमोथेरपी अधिक प्रभावी असल्याने त्यावर मात करता येते. नक्की वाचा : केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार !

#3. बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होतो परिणामी प्रौढांमध्ये कॅन्सरचा त्रास वाढतो. मात्र लहानमुलांमध्ये कॅन्सर नेमका का जडतो याबाबत अजूनही पुरेशी माहिती नाही. लहान मुलांमध्ये कॅन्सर जडण्यामागे कीटक नाशकं, व्हायरसचा हल्ला, एन्व्हायरमेंटल रेडिएशनचा त्रास ही कारणं असू शकतात.

#4. लहान मुलांमध्ये कॅन्सरचे एकच लक्षण आढळत नाही. काही लक्षणांची सिरीज आढळते. असा सल्ला अपोलो हॉस्पिटल्सचे Senior Consultant, Pediatric Oncology, डॉ. अमिता महाजन सांगतात. लहान मुलांमध्ये खूप दिवस ताप राहणं, सांध्यांचे दुखणे वाढणे, शरीरावर विविध भागांवर सूज आढळणं, भूक, वजन कमी होणं, शरीर पांढरं पडणं अशी लक्षणं फार काळ दुर्लक्षित करू नका. 15 दिवसांपेक्षा अधिक ही लक्षणं आढळल्यास आणि त्याचे इतर आजारांमध्ये निदान होत नसल्यास कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

#5. पूर्वी कॅन्सर हा जीवघेणा आजार समजला जात असे. मात्र आता प्रगत तंत्रज्ञान आणि औषधोपचारांमधील वाढत्या संशोधनामुळे कॅन्सरवर मात करणे शक्य आहे. कॅन्सरवर मात करूनही पुढील आयुष्य अनेक वर्ष सामान्यपणे जगता येऊ शकते यावर अनेकांचा विश्वास वाढत आहे. वेळीच होणारे निदान आणि तात्काळ उपचार यामुळे कॅन्सर अधिक लवकर आटोक्यात ठेवता येऊ शकतो.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – shutterstocks


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles