आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत घरातील ताजे अन्न मिळणे कठीण झाले आहे.लांबचा प्रवास, कामाच्या जास्त वेळा,ऑफीसमधील काम व घरातील जबाबदा-या यातून वेळ न मिळाल्यामुळे आपण पौष्टीक आहार घेण्याकडे दुर्लक्ष करतो. सहाजिकच त्यामुळे मग आपल्याला अयोग्य पदार्थ खाण्याशिवाय पर्याय नसतो. Bon happétee च्या डायटीशियन आकांशा झलानी यांच्या कडून जाणून घेऊयात आपण आपल्या दररोजच्या कामातून जेवणाचे नियोजन करणे का गरजेचे आहे.
१.आहारात जास्तीत जास्त पोषकमुल्ये वाढवण्यास मदत होते-
आहाराचे नियोजन करण्यासाठी प्रथम तुमच्या शरीराला आवश्यक असणा-या पोषकमुल्यांची गरज ओळखा.यासाठी तुम्ही भुक लागण्याआधीच काही पोषक पदार्थ खरेदी करुन जवळ ठेवा व भुक लागली की खा.त्यामुळे मग तुम्ही तुम्हाला अगदी सहज उपलब्ध असलेले रेडी-टू-इट,बिस्कीटे,केक व जंक फूड सारखे पर्याय निवडणे टाळू शकता.तुमच्या आहाराचे आधीच नियोजन करण्यासाठी त्याची नोंद डायरीमध्ये करुन ठेवा.
२.योग्य पदार्थ खाण्यासाठी मदत होते-
तुुम्हाला जर आधीच माहीत असेल की तुमचा पुढचा आठवडा खुप गडबडीचा असणार आहे.तर आठवड्याच्या सुरुवातीलाच आठवडाभर तुम्ही काय व कधी खाणार याचे नियोजन करुन ठेवा.असे केल्याने भुक लागल्यावर तुम्हांला चांगले व पौष्टीक पदार्थ खाण्यासाठी कष्ट करावे लागणार नाहीत व त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल.त्याचप्रमाणे वेळेवर योग्य पदार्थ खाल्यामुळे वजन कमी करण्याची चिंता देखील तुम्हाला सतावणार नाही.
तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती …
३.अॅसिडीटी व पोटात गॅस होण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल-
नियमित व वेळेवर न जेवल्यामुळे पोटात गॅस अथवा गोळा येणे अशा अपचनाच्या समस्या निर्माण होत असतात.जेवणाचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे या समस्या आपोआप कमी होतात.
४.अती खाण्यापासून बचाव होतो-
भुकेकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला सतत काहीतरी खाण्याची ईच्छा निर्माण होते.जेवणाचे नियोजन केल्यामुळे तुम्ही वेळेवर जेवता व तुम्हाला अशी सतत भुक लागत नाही.तुमच्या शरीराचे वेळेेवर व पुरेसे पोषण होते.यामुळे तुम्ही समाधानी तर रहाताच पण तुम्हाला खुप हलके व उत्साही वाटते.
५.अयोग्य पदार्थ खाणे तुम्ही सोडून देता-
कधीतरी बाहेरचे अथवा अयोग्य पदार्थ खाणे ठीक आहे.पण जेव्हा तुम्हाला असे बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागते तेव्हा तुमचे वजन अचानक वाढू लागते.जेव्हा तुम्ही तुमच्या खाण्याचे नियोजन करु लागता तुमच्या आहाराच्या चुकीच्या सवयी आपोआप कमी होऊ लागतात. जेवण टाळणे, तुम्हाला बनवू शकते लठ्ठ ! |
आहाराचे नियोजन करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा-
-
Yummly या मोबाईल अथवा वेबसाईटवर प्रत्येकाच्या आवडीनूसार रेसिपी दिल्या जातात. Yummly वर तुम्ही खाद्यपदार्थ,आहार, अॅलर्जी, पोषकमुल्ये, किंमत खाद्यसंस्कृती,वेळ, चव, खाद्यपदार्थांचे प्रकार अशा विविध प्रकारच्या रेसिपी शोधू शकता.
-
Myfitnesspal या फ्री स्मार्टफोन अॅप व वेबसाईटवर युजर्ससाठी त्यांच्या गोल्सनूसार योग्य कॅलरी व पोषकमुल्ये यासंबधीत योग्य तो आहार व व्यायाम यांचा ट्रॅक दिला जातो.
-
Bon happetee हे असे एक मोबाईल अॅप आहे.ज्यावर तुम्हाला डेली कस्टमाईज मील प्लॅन व पोषणमुल्यांचे मुल्यांकन दिले जाते.ज्यामुळे तुम्ही दररोज एका क्लीकसह तुमचा आहार नियोजित करु शकता.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock