Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली खाणं खरंच सार्‍यांंसाठी आरोग्यदायी आहे का ?

$
0
0

फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली या सारख्या भाज्यांमध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फायटोकेमिकल्स यांचे प्रमाण मुबलक असते. क्वालीफ्लावरच्या पानांमध्ये दडलेत आरोग्यदायी गुणधर्म ! त्यामुळे आहारात अशा भाज्यांचा समावेश करणे आरोग्यदायी ठरते. प्रामुख्याने वजन घटवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांच्या डाएट प्लॅनमध्ये या भाज्यांचा समावेश केला जातो. मात्र या भाज्या आरोग्यदायी असल्या तरीही त्यांचे अतिसेवन त्रासदायक ठरू शकते. असा सल्ला फोर्टीस हॉस्पिटल्स, कोलकत्ताच्या चीफ न्युट्रीशनिस्ट मिता शुक्ला यांनी दिला आहे. म्हणूनच जाणून घ्या कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्या शरीराला कशाप्रकारे त्रासदायक ठरतात.

कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्या cruciferous म्हणजेच गड्डा स्वरूपात असतात. यामधील cyanogenic glucosides घटक आयोडीन शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. त्यामुळे तुम्हांला आयोडीच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉईडीझमचा त्रास असेल तर अशाप्रकारच्या cruciferous भाज्या खाऊ नका. शरीराला आयोडीन कमी स्वरूपात मिळाल्यास मेटॅबॉलिझमही कमी होते. यामुळे त्वचा, केसांचे आरोग्य बिघडते. तसेच वजन वाढण्याचा धोका बळावतो. फ्लॉवर किंवा ब्रोकोली  यांचा आहारात प्रमाणापेक्षा अधिक समावेश केल्यास पोटात गॅस वाढण्याची समस्याही वाढते. परिणामी ब्लोटींगचा त्रास जाणवतो.अशा भाज्यांमधील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पचायला जड असतात. आहारातील या ’7′ पदार्थांमुळे होतो bloating चा त्रास त्याचा या पदार्थांंचे सेवन जरा बेतानेच करावे.  (नक्की वाचा : कोबीच्या झटपट आणि टेस्टी ’5′ रेसिपीज )

एकाच प्रकारच्या भाज्या खाण्यापेक्षा तुमचा आहार अधिक संतुलित आणि पौष्टीक करण्याचा प्रयत्न करा. विविध अन्नघटकांचा तुमच्या जेवणात समावेश करा. शरीराला फायबर, प्रोटीनचा पुरवठा करण्यासाठी विविध भाज्यांचा मीटचा आहारात समावेश करा. दोन तीन भाज्या एकत्र करून किंवा डाळींचा भाज्यांमध्ये समावेश करा. यामुळे ब्लोटींगचा किंवा थायरॉईचा त्रास वाढणार नाही. तुम्हांला हायपोथायरॉईडीझम किंवा गॉयटरचा त्रास असेल तर cruciferous vegetables (भाज्या) खाणं टाळा. खाण्याची इच्छा तीव्र असल्यास त्याचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन !

 

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles