Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रेग्नेंसी मध्ये का बदलते तुमची शू साईझ?

$
0
0

बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म म्हणतात  ते काही खोटं नाही. कारण त्यामुळे सगळ्या शरीरात बदल होतो. अगदी आतून आणि बाहेरूनही. आणि हे बदल साधारणपणे कायमस्वरूपी राहतात. जसं पावलाच्या आकारात फरक पडतो. असं काही सगळ्यांसोबत होत असं नाही. पण ज्यांच्या पावलात फरक पडतो त्यांना पूर्वीचे सॅन्डल, चप्पल, शूज पायाला बसत नाही. हे कसे होते जाणून घेऊया:

प्रेगन्सीमुळे येणारी सूज: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईच्या स्त्री रोग तज्ञ Dr. Shantala Vadeyar यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रेग्नेंसीच्या काळात शरीरात अधिक प्रमाणात पाणी तयार होते. त्याने शरीराला सूज येते. त्यामुळे पावलाचा आकार बदलतो. तुमच्या हाताला आणि पायाला सूज आल्याने तळवे, पावलं, बोटं जाड दिसू लागतात. गर्भ वाढत असताना येणारा ताण रक्तप्रवाहात व्यत्यय आणतो. त्यामुळे शरीराच्या खालच्या भागाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन शरीरावर सूज येते. आहारात प्रोटिन्स कमी प्रमाणात घेतल्याने किंवा हिमोग्लोबिनचच्या कमतरतेमुळे देखील अंगावर सूज येते. यात गंभीर असे काही नाही. भरपूर पाणी प्यायल्याने ही समस्या काही प्रमाणात दूर होते. यामुळेच तुमच्या शरीरात जमा झालेले पाणी बाहेर पडण्यास मदत होईल. काही वेळॆस हे लगेच होणार नाही पण प्रेग्नेंसी नंतर त्याचा परिणाम दिसून येईल. काही महिलांमध्ये प्रेग्नेंसी मध्ये पायाला आलेली सूज कायमस्वरूपी राहते.

हार्मोनल चेंजेस: Relaxtin हे हार्मोन तुमच्या शरीराला प्रसूतीसाठी तयार करते. प्रथम ते skeletal system मधील joints and ligamentsची पकड सैल करतो त्यामुळे तुमचं शरीर लवचित होत. आपलं पाऊल हे २६ हाडं आणि ३० पेक्षा अधिक जॉइंट्स ने बनलेलं असतं. Relaxtin हार्मोनचं कार्य फक्त पेल्विक भागापर्यंत मर्यादीत नसून ते संपूर्ण शरीरभर आहे. त्यामुळे पावलातील joints and ligaments ची पकड ही सैल होते. त्याचा परिणाम म्हणजे पावलाच्या आकारात काही प्रमाणात फरक पडतो. आणि काही वेळेस हा बदललेला आकार पुन्हा पूर्ववत होत नाही. गरोदरपणात शरीरात होणारे बदल जाणून घेण्यासाठी वाचा: गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

वजन वाढते: प्रेग्नेंची मध्ये वाढलेल्या वजनाचा थेट परिणाम जरी पावलांच्या आकारावर होत नसला तरी ते एक कारण नक्कीच आहे. जास्त प्रमाणात वजन वाढलं की त्याचा भार पायांवर येतो. त्यामुळे पावलांमधील जॉइंट्स रुंदावतात. आणि त्याचा परिणाम पावलांच्या आकारावर नक्कीच होतो.

त्यावर तुम्ही काय करू शकता:

  • जेव्हा तुमच्या लक्षात येतं की आधीचे शूज तुम्हाला आता होत नाही आहेत तेव्हा नक्कीच तुम्ही नवीन शूज खरेदीसाठी निघालं. नवीन शूज खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा.
  • तुम्हाला कंम्फरटेबल असलेली साईज निवडा. शक्यतो बॅक स्ट्रीप असलेले सॅन्डल घ्या त्यामुळे पायाला सपोर्ट मिळेल. या काळात flip flops किंवा हाय हील सॅन्डल घेणे टाळा.
  • तुमची बोटं अवघडली जातील असे सॅन्डल निवडू नका. अशावेळी  peep toes सॅन्डल घेणे देखील टाळा.
  • पायात होणारे  water retention टाळण्यासाठी तुम्ही सॉक्स किंवा स्टोकिंग्ज वापरू शकता. पण त्याचा अतिरेक टाळावा. कारण त्यामुळे रक्तप्रवाहात बाधा निर्माण होऊ शकते.
  • योग्य सोल असलेले सॅन्डल, शूज निवडा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>