मी प्रेग्नेंट असून प्रेग्नसीचा ९ वा आठवडा चालू आहे. परंतु मला कायम अशक्त आणि चक्कर आल्यासारखे वाटते. प्रेग्नसीच्या सुरुवातीच्या काळात असा त्रास होणे मी समजू शकते. पण आताही सारखी चक्कर येणे यात काही धोका तर नाही ना? मी माझ्या व्हिटॅमिन व आयनच्या सगळ्या गोळ्या नियमित घेते. त्याचबरोबर संतुलित आहार देखील चालू आहे. तरीही मला अशक्त का वाटते? प्रेग्नसीमध्ये चक्कर आल्यासारखे वाटणे सामान्य आहे का?
या प्रश्नावर मॅक्स हॉस्पिटल नवी दिल्लीच्या Senior Consultant Gynaecologist आणि Obstetrician डॉ. उमा वैद्यनाथन यांनी सविस्तर उत्तर दिले.
प्रेग्नसीच्या सुरुवातीच्या काळात चक्कर आल्यासारखे वाटणे हे अतिशय सामान्य आहे. प्रेगन्सीमध्ये चक्कर येण्याची कारणंं आणि उपाय ब्लड प्रेशरच्या फ्लक्चुएशनमुळे असे होते. प्रेग्नसीमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांना अनुकूल होण्यासाठी संतुलित आणि पोषक आहाराची गरज असते. तसे न झाल्यास ब्लड प्रेशर फ्लक्चुएट (खाली-वर) होते. हृदयाची गती वाढल्यास हृदय अधिक रक्त शोषते. बरेचदा योग्य आहाराने यावर फरक पडतो. योग्य आहार चालू केल्यानंतर अनेक पेशंटनी अशी तक्रार करणे बंद केले. त्यामुळे सकस, सात्विक, संतुलित आहार नियमित घ्या. आहाराच्या ठरवलेल्या वेळा पाळा. यासाठी कोणत्याही औषधांची गरज नाही. गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत
प्रेग्नसीच्या सुरुवातीच्या काळात चक्कर येणे सामान्य आहे. अनेक महिलांनी तसा अनुभव देखील घेतला आहे. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ? परंतु जर आहारात बदल करूनही आणि प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यातही चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला अनेमिया आहे. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
जर तुम्ही अनेमिक असाल तर तुमच्या शरीरातील खूप कमी लाल रक्त पेशी अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात. त्यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटते. त्यासाठी आयन (लोह) युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जाणून घ्या: गर्भारपणात काय खाणे टाळाल ?
प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात चक्कर येत असेल तर cervical spondylitis, visual defects आणि sinusitis हे त्रास ही असू शकतील. पण याचे निदान डॉक्टरांकडूनच करून घेणे योग्य ठरेल. जरूर वाचा: गरोदरपणाच्या काळात हे ’10′ पदार्थ खाणं टाळाच !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock