Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘४’टीप्स परीक्षेच्या काळात मुलांना शांत झोप देतील !

$
0
0

मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की आपली व मुलांची झोप उडते. परंतु, परीक्षेच्या तणावयुक्त काळात पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करण्यासाठी मूल रात्रभर जागतात आणि त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. मुलाला योग्य झोप मिळण्यासाठी आणि परीक्षेच्या दिवशी तो रिफ्रेश राहण्यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही काही मातांना प्रश्न विचारले आणि त्यांनी या टीप्स आमच्यासोबत शेअर केल्या. आल्या परीक्षा …. आरोग्य सांभाळा

मुलांच्या जेवणाकडे नीट लक्ष द्या: परीक्षेच्या काळात फक्त झोपच नाही तर जेवणाकडे ही नीट लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मुलं जेवणापेक्षा इतर खाद्यपदार्थ जास्त खातात. त्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. अशावेळी मुलांचे चित्त एकाग्र करणारे आणि शांत झोपेस मदत करणारे अन्नपदार्थ मुलांना द्या. दोन मुलांची आई असलेल्या हिना जैन यांनी सांगितले की मी मुलांना संत्री, किवी सारखी फळे देते. त्यामुळे ते उत्साही राहतात. तसंच पौष्टीक आहार देण्यावर माझा भर असतो. ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

मुलांवर दबाव आणू नका: पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलांवर ताण येतो. कनुप्रिया बग्गा यांना १२ वर्षांचा मुलगा आहे. त्या म्हणाल्या की मुलं जर तणावमुक्त असेल तर ते अधिक चांगला अभ्यास करू शकेल. जेव्हा मुलाला अभ्यासात, ताण घालवण्यासाठी मदत हवी असेल तेव्हा अवश्य करा. मुलांना ओरडल्याने, रागवल्याने मुलं अस्वस्थ होते व त्यामुळे झोप ही नीट लागत नाही. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा

योग्य तेलाचा वापर करा: दोन मुलांची आई असलेल्या निरल घोश यांनी सांगितले की मुलांवरील ताण घालवण्यासाठी योग्य तेलाचा वापर करा. मी माझ्या मुलांना शांत झोप लागण्यासाठी झोपण्याआधी त्यांना तेल लावते. त्यामुळे सकाळी उठल्यावरही त्यांना फ्रेश वाटते. आणि शांत मन तणावग्रस्त मनापेक्षा अधिक चांगलं काम करतं. नक्की वाचा: मुलांच्या निकालाच्या टेन्शनवर करा ‘स्मार्ट’ली मात !

झोपेचे चक्र पाळा: स्मिता राऊत यांना १५ वर्षाच्या मुलगा आहे. त्या म्हणाल्या की आमच्या घरातच सगळे योग्य वेळी झोपून योग्य वेळी उठतात. त्यामुळे झोपेचे चक्र सांभाळले जाते. तसंच तुम्ही सहा महिन्यात किंवा वर्षभरात काय शिकलात याची परीक्षा असते. एका रात्रीत काय शिकलात याची नाही. त्यामुळे अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळा. त्याचा झोपेवर परिणाम होऊ देऊ नका.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles