चेहर्यावर पडलेले डाग तुम्हांला कळत-नकळत मानसिकदृष्ट्या कमजोर करते. या समस्येमागील कारण काहीही असेल परंटू त्यापासून सुटका मिळवण्याचा नैसर्गिक आणि घरगुती मार्ग म्हणजे पपई. मग पहा कच्चा पपई तुमच्या आत्मविश्वासाला आणि त्वचेलाही उजाळा देण्यास मदत करेल. (पपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !)
- फायदेशीर पपई
पपईमध्ये आढळणारे पॅपिन नामक घटक त्वचेवरील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात. त्यातील दाहशामक घटक व्रणांचे डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच मेलॅनीनमधील असमतोल कमी करण्यास मदत करतात. ( मेलॅनीनचे प्रमाण वाढल्यास त्वचेचा रंग गडद होतो)
- कसा वापराल पपई
कच्चा पपई सोलून त्याचे लहान लहान तुकडे करावेत.
या तुकड्यांचा रस काढून गाळावा.
तयार रस चेहर्यावर लावून 20 मिनिटे शांत पडून रहा.
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
- किती वेळा हा प्रयोग कराल ?
दिवसातून एकदा हा रस चेहर्यावर लावणे पुरेसे आहे. यामुळे तुमचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
संबंधित दुवे -
शहाळ्याच्या पाण्याने मिळवा ‘तजेलदार त्वचा’ !
तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील हे ’7′ पदार्थ !
‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - Get clear, even toned skin with raw papaya
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.