Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ही चळवळ ‘माझी’नाही, ‘आपली’व्हायला हवी : नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे

$
0
0

एके काळी भारतातून सोन्याचा धूर निघत असे अशी आपल्या देशाची ओळख होती. मात्र स्वातंत्र्याच्या 67 वर्षांनंतरही या कृषीप्रधान भारतातील  शेतकरी दयनीय स्थितीत आहे. सावकाराचं कर्ज, वेळी-अवेळी पडणारा पाऊस यामुळे खचणारा शेतकरी सारे अनावर झाल्यानंतर आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. महाराष्ट्रातले हेच दाहक वास्तव बघून अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेऊन सुमारे 500 शेतकर्‍यांना मदत केली आहे. (कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?)

आयुष्याच्या कोणत्याही समस्येवर ‘आत्महत्या’ हा कधीच उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे समस्येवर मात करण्यासाठी सारे प्रयत्न करा, आपल्या सभोवताली असणार्‍यांशी बोला. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. शेतकर्‍यांनाही अशी आर्त हाक अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दिली आहे. त्यासंबंधीच आमच्याशी मकरंद अनासपुरेंनी केलेली ही खास बातचीत ….

  • कलाकार म्हणून सुखवस्तू जीवन जगताना तुम्ही या विषयाकडे कसे वळलात ?

21 वर्षांपूर्वी मी मुंबईत आलो. शहरात झपाट्याने बदल झाले परंतू ग्रामीण भागांत अजूनही सोई-सुविधांचा अभाव आहे. 11 तासांचे लोडशेडींग, मूलभूत सोयींचा अभाव, नियोजनाचा अभाव यामुळे येथील लोकांना अनेक  समस्यांचा झगडा करावा लागत आहे. त्यामध्ये रुसलेल पावसामुळे दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकर्‍यांवर आली आहे. परंतू पेरणीसाठी लागणार्‍या बी-बीयाणांसाठी काढलेले कर्ज फेडता येत नसल्याने अगदी कोवळ्या वयातील तरूण शेतकरीदेखील आत्महत्या करत  आहे. हेच चित्र मुळात  मन हेलावून टाकणारे आहे. त्यांच्या मागे परिवाराने हिंमत हरू नये. म्हणून आम्ही त्यांना मदत करत आहोत.

  • आत्महत्याग्रस्त लोकांना ‘पैशां’व्यतिरिक्तदेखील अनेक मदतीची गरज आहे. त्या गोष्टी कोणत्या ?   

निश्चितच ! सावकाराचं कर्ज पैशांनी फेडता येईल. मात्र अनेक ग्रामीण विभागात दुष्काळाचे सावट असल्याने, सतत होणार्‍या आत्महत्यांमुळे खूपच निराशाजनक दृष्य आहे. अशा ठिकाणी आपण जाऊन भेट देऊ शकलो. त्यांच्याशी बोलून त्यांचे थोडे दु:ख हलके करू शकलो तर त्या परिवारातील लोकांनादेखील जगण्याचे थोडे बळ मिळेल. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांनी पुढे यावे लागेल. ‘आपल्या कडे कोणी बघत नाही. येत नाही’ ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणे हेच धोकादायक आहे.  या नकारात्मकतेमधून  त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक ‘सेलिब्रिटीं’नी पुढे येणे गरजेचे आहे.  हे सेलिब्रिटी फक्त सिनेमा जगतातले नसावेत तर सामाजिक, खेळ, राजकारण क्षेत्रांतील व्यक्तीदेखील पुढे याव्यात.

  • अशा परिवारांपर्यंत पोहचण्यासाठी तुमची  कशाची मदत घेताय ? 

मराठवाडा हे माझे मूळ गाव आहे. परंतू या मोहिमेमुळे विदर्भ, बीड अशा अनेक भागात आम्ही पोहचलो. यासाठी माझ्या गावातील काही लोक एकत्र येऊन अशा परिवाराची आम्हांला माहिती देत आहेत. यामध्ये  नाना पाटेकर, माझ्यासोबत  अजून सहा ते सात जण मदत करत आहेत. त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतरच आम्ही संबंधित मदत त्यांच्यापर्यंत पोहचवत आहोत.

  • हेल्पलाईन कशी फायदेशीर ठरतेय ?      

अजून कोणतीही ऑफिशियल हेल्पलाईन नाही. अनेकजण आमच्या मोबाईल नंबर वरच आमच्याशी संपर्क साधत आहेत. किंवा आमच्या टीममधील लोकांशी संपर्क साधत आहेत. त्यांच्या आत्महत्येमागे ‘दुष्काळा’व्यतिरिक्तही अनेक कारणं आहेत. काही जणांना सावकार कर्जफेड करत नाही म्हणून अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करतो. तर काही जण आपल्या मुलांना नवीन कपडे, वस्तू देऊ शकत नाही. ही भावना मारते. म्हणूनच  अशा अगदी लहानसहान कारणांमूळे आत्महत्या करण्याआधी त्यांना मन मोकळे करायला एक संधी मिळणे  गरजेचे आहे. म्हणूनच हेल्पलाईन हा तो दुवा ठरू शकतो.

  • तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणाला मदत करायची असेल तर त्याचा अधिकृत मार्ग काय ?      

आम्ही सुरू केलेली ही मोहिम फक्त काही ठराविक लोक पेलवू शकणार नाहीत. यासाठी त्याला चळवळीचे स्वरूप मिळणे गरजेचे आहे.  त्यासाठी स्वयंस्फूर्तीने काही जण पुढे येणे गरजेचे आहे. तसेच लवकरच यासाठी एक संयुक्त बॅंक अ‍ॅकाऊंट उघडले जाईल. त्यातच लोकांनी रक्कम जमा करावी. नाना पाटेकरांच्या आवाजात आणि त्यांच्यावर एक चित्रफित बनवली जाईल. याशिवाय तुम्ही स्वतः जाऊन देखील थेट मदत करू शकता.


मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>