निरोगी केसांमुळे तुम्ही अधिक सुंदर व आकर्षक दिसता.पण कोरड्या,निस्तेज व फाटे फुटलेल्या केसांमुळे तुमच्या सौदर्यात बाधा येते.तुमच्या आरोग्याचा परिणाम तुमच्या केसांवर देखील होत असतो.आजकाल कोरडे केस व केसांना फाटे फुटणे ही अनेकांची समस्या असते.त्याचप्रमाणे ही समस्या लवकर कमी देखील होत नाही.कोरडे व निस्तेज केस लवकर तुटतात व त्यामुळे पातळ दिसतात.
केसांच्या वरच्या भागाजवळील PH पातळी ४.५ ते ५.५ इतकी असणे आवश्यक असते.केसांवरील अॅसिडीक पीएच मुळे केसांच्या कॉर्टेक्सवरील क्युटीकल्सच्या थरांचे संरक्षण होते.मात्र हे क्युटीकल्स काही कारणामुळे निघाल्यास केसांच्या कॉर्टेक्सचे नुकसान होते व त्यामुळे केस विभाजन होतात.अती उष्णता,यांत्रिक ताण व कोरडेपणा यामुळे केसांना असे फाटे फुटतात.
केसांना फाटे का फुटतात?
केसांना फाटे फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात.अती उष्णतेच्या संपर्कात येणे,धूळ,सुर्यप्रकाश आणि प्रदुषण,केसांच्या सौदर्यांसाठी स्ट्रेटनर,कर्लर,जेल,स्प्रे व सिरम ही सौदर्यप्रसाधने वापरणे अशी यामागची अनेक कारणे असू शकतात.केसांना कलर व पर्म करण्यासाठी केमिकल ट्रिटमेंट करणे यामुळे देखील केस कोरडे होतात व तुटतात.स्विमींग पुल मधील क्लोरीनयुक्त पाण्यामुळे केसांचे नुकसान होते.केसांना साधे ब्लो ड्राय व हॉटकोन्ब केल्याने देखील केस खराब होऊ शकतात.केसांसाठी हलक्या व कमी दर्जाचे हेअरबॅन्ड्स व कंगवे वापल्यामुळे देखील केसांचे नुकसान होऊ शकते. नक्की पहा कांद्याने हटवा केसगळतीची समस्या !
केसांना फाटे फुटत असतील तर हे उपाय करा-
लक्षात ठेवा स्पीट एन्डमुळे तुमचे केस निर्जीव झालेले आहेत आणि निर्जीव केस पुर्ववत होणे शक्य नसते.त्यामुळ त्यासाठी केराटीन हेअर प्रॉडक्टस किंवा शॅम्पू वापरल्यामुळे केसांची समस्या कमी होत नाही.यासाठी प्रथम तुमचे केस २ ते ४ इंच ट्रीम करा व त्यानंतर पुन्हा केसांमध्ये ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी केसांची काळजी घ्या.
घरगुती व नैसर्गिक उपायांनी केसांची वाढ होते व केसांना फाटे फुटण्याची समस्या देखील कमी होते.यासाठी हे घरगुती उपाय जरुर करा-
१.घरातील मध वापरल्यामुळे तुमच्या केसांची समस्या कमी करता येऊ शकते.मधामुळे केसांना पोषण मिळते व केस तुटत नाही.यासाठी केसांना व केसांच्या त्वचेला मध लावा व अर्धा तासाने सौम्य शॅम्पूने केस धुवा.तुम्ही मधात थोडेसे ऑलिव्ह ऑईल किंवा योगर्ट देखील मिसळू शकता.त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते व केस बळकट होतात.यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या देखील कमी होते.
२.मधासोबत योगर्ट मिसळून केसांना लावा.एक चमचा मध न अर्धा कप योगर्ट घ्या.व्यवस्थित मिक्स करा व केसांच्या मुळांपासून केसांना लावा.अर्धा तासाने केस चांगल्या शॅम्पूने धुवा. जाणून घ्या केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा
३.दररोज केसांना अॅवोकॅडो ऑईल लावा व केसांचे आरोग्य सुधारा.अॅवोकॅडो ऑईलने केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा.एक तासाने केस नॅचरल शॅम्पूने धुवा.आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा हा मजास केसांना करा.केसांच्या मजबूती साठी व केस मऊ होण्यासाठी या तेलामध्ये तुम्ही अंड्याचा पिवळा बलक देखील मिसळू शकता.
४.एक मध्यम आकाराचा पपई घ्या व त्याच्या गरामध्ये ताजे योगर्ट टाकून एकजीव पेस्ट तयार करा.ही पेस्ट केसांच्या त्वचेवर व केसांना लावा.अर्धातासाने सौम्य शॅम्पूने केस धुवा.महीन्यातून एकदा हा प्रयोग जरुर करा.
५.एक चमचा मेथी,अर्धा कप उडीद डाळ घ्या व त्यांची वाटून बारीक पावडर तयार करा.ही पावडर अर्धा कप ताज्या योगर्ट मध्ये मिक्स करा.ही पेस्ट केसांना व केसांच्या मुळांना लावा त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा.
६.नारळाचे तेल केसांना फाटे फुटण्याच्या समस्येवर गुणकारी असते.जर तुम्हाला इतर घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या केसांना फक्त नारळाच्या तेला ने मसाज करा व हे तेल रात्रभर केसांमध्ये असू द्या.सकाळी अंड्यातील पांढरा बलक केसांना लावा व एक तासाने केस शॅम्पूने धुवा.
७.जोजोबा ऑईल केसांच्या आरोग्यासाठी खुपच उपयुक्त असते.केस धुताना शॅम्पूमध्ये जोजोबा ऑईल मिसळा व केस धुवा.केसांची स्पीट समस्या दूर करण्यासाठी केसांना नियमित जोजोबा ऑईल लावा.ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार केसांना लावण्यात येणा-या कोणत्याही हेअर ऑईलने केसांची फाटे फुटण्याची समस्या कमी होऊ शकते. नक्की पहा केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
८.बियर केसांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.बियर मुळे तुमचे खराब झालेले केस निरोगी होऊ शकतात.बियर केसांसाठी एक उत्तम कंन्डीश्नर अाहे त्यामुळे केसांची स्पीट समस्या दूर होते.यासाठी शॅम्पू केल्यावर बियरने केस धुवा.प्रत्येकवेळी शॅम्पू केल्यावर केसांना बियर लावा.
लक्षात ठेवा नैसर्गिक व घरगुती उपायांमुळे केस एक दिवसात लगेच चांगले होणार नाहीत.त्यामुळे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी व मजबूतीसाठी हे उपाय नियमित व सातत्याने करा.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock