Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘७’कारणांमुळे वाढते लाळ गळण्याची समस्या!

$
0
0

सलाईव्हा म्हणजे लाळ. ही लाळ आपल्या सलाईव्हरी म्हणजेच लाळ ग्रंथीतून स्त्रवते आणि अन्नपचनात महत्त्वाचे कार्य करते. अन्न लाळेत मिसळल्याने नरम होते, त्याचा गोळा तयार होतो. आणि त्याचे एन्झाइम्स नुसार विघटन होते. आपल्या आवडता पदार्थ दिसताच किंवा त्याचा विचार करताच आपल्या तोंडात अधिक लाळ निर्माण होते. आंबट पदार्थांची कल्पना केली तरी लाळ गळू लागते. पण अधिक प्रमाणात लाळ निर्माण होणे हे शरीरात वाढत असलेल्या आजारांचे लक्षण असू शकते. जरूर वाचा :  झोपेत  लाळ गळते  कारण ….

गोड किंवा आंबट पदार्थ: आवडता गोड पदार्थ बघताच तोंडाला पाणी सुटते का? मसालेदार पदार्थ खाणे तुम्ही टाळू शकतं नाही का? अति लाळ निर्माण होण्यामागे हेच कारण आहे. डॉ. सुहास पटवर्धन यांच्या सल्ल्यानुसार अति लाळ निर्माण होण्यास गोड, गरम किंवा मसालेदार पदार्थ कारणीभूत ठरतात.

पॅरॉटिड डक्टमध्ये अडथळा आल्यास: Dr Saifee Dohadwala यांच्या सल्ल्यानुसार पॅरॉटिड डक्ट (parotid duct) यात अडथळा निर्माण झाला तर लाळ अधिक प्रमाणात तयार होते. लाळेचा प्रवास या डक्ट मधून होतो. ग्रंथीतून स्त्रवलेली लाळ डक्ट मधून तोंडात येते. काही वेळेस डक्टमध्ये छोटे खडे (stones) तयार होतात ज्यामुळे लाळेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. या व्यतिरिक्त डक्टमध्ये दुसरा कोणता अडथळा आल्यास त्यामुळे जखम किंवा ब्लॉकेज निर्माण होतात व त्याचा परिणाम म्हणजे अधिक लाळ गळू लागते.

लाळ ग्रंथीत जळजळ होणे: लाळ गळण्याचे अजून एक कारण म्हणजे लाळ ग्रंथीत होणारी जळजळ. माणसाच्या शरीरात तीन मुख्य लाळ ग्रंथी असतात: parotid, submandibular आणि sublingual. या तिन्ही पैकी एका जरी ग्रंथीत जळजळ होत असल्यास अतिरिक्त लाळ निर्माण होते. असे डॉ. पटवर्धन म्हणाले.

दात येताना: लहान मुलांची लाळ गळणे हे बऱ्याच पालकांना सामान्य वाटते. आणि जोपर्यंत त्याचे प्रमाण अतिरिक्त होत नाही तोपर्यंत त्याकडे लक्ष दिले जात नाही. सहाव्या ते आठव्या महिन्याच्या काळात लहान बाळांना दात येऊ लागतात. ज्याला आपण दुधाचे दात म्हणतो. या दात येण्याच्या काळात मुलांमध्ये लाळ गळण्याचे प्रमाण वाढते. डॉ. पटवर्धनांच्या म्हणण्यानुसार हे अगदी सामान्य आहे. नक्की वाचा: लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !

तोंडाची स्वच्छता न पाळणे: अतिरिक्त लाळ गळण्याचा त्रास तुम्हाला ही असेल तर तुम्हाला तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण  Dr Dohadwala यांच्या म्हणण्यानुसार तोंडाची स्वच्छता न पाळल्यास अतिरिक्त लाळ तयार होते. म्हणून स्वच्छ दात घासणे, चूळ भरणे गरजेचे आहे. त्यामुळे तोंडाचे आरोग्य राखले जाईल. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !

Pellagra: हा आजार शरीरात niacin चे प्रमाण कमी असल्याने होतो. Dr Dohadwala यांच्या म्हणण्यानुसार अतिशय लाळ तयार होणे हे या आजाराचे ही लक्षण असू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या शरीरातील niacin ची पातळी तपासा आणि niacin मुबलक प्रमाणात असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

रेबीज: Dr Dohadwala यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अतिरिक्त लाळ गळण्याचे एक कारण रेबीज असू शकते. यामध्ये घशाजवळचे स्नायू आखडले जातात आणि त्यामुळे अतिरिक्त लाळ गळण्याचा त्रास होतो. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: कुत्रा चावल्यानंतर कोणते उपचार घ्यावेत ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>