Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदर स्त्रियांनी पाठीवर का झोपू नये ?

$
0
0

गरोदरपण ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाची स्थिती असते.गरोदरपणी स्त्रीने स्वत:ची व बाळाची स्वास्थासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते.गरोदरपणात पुरेशी विश्रांती घेतल्याने गरोदर स्त्रीचे मन आनंदी व प्रसन्न रहाते.पुरेशी विश्रांती घेण्यासाठी शांत व निवांत झोप घेणे देखील महत्वाची असते.त्यामुळे या काळात स्त्रीने कसे नेमके झोपावे हे देखील खुप महत्वाचे अाहे.प्रेगन्सीच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा तुमचे पोट अधिक वाढलेले नसते त्या काळात तुम्ही पाठीवर झोपण्यास काहीच हरकत नसते.पण जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत प्रवेश करता त्यानंतर मात्र तुम्ही पाठीवर झोपू शकत नाही.याचे कारण असे की पाठीवर झोपल्याने गर्भाशयावर अतिरिक्त ताण येतो.ब-याचदा असे झोपल्याने तुमच्या गर्भाशयातील नसेवर दाब येऊन पायाकडून डोक्याच्या दिशेने वाहणारा रक्तप्रवाह उलट दिशेने परत फिरण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे बराच काळ पाठीवर झोपल्यामुळे ह्रदय व फुफ्फुसांसारख्या महत्वाच्या अवयवांवर ताण येतो.ज्यामुळे तुमच्या बाळाला ऑक्सिजन व पोषण कमी प्रमाणात मिळू शकते.तुमच्या गर्भाशयाचा दाब पाठीचा मणका,आतडी आणि मोठ्या रक्तवाहिन्यांवर येऊ शकतो.ज्यामुळे पाठीच्या खालील भागात व नितंबाला वेदना होतात.रात्रभर पाठीवर झोपून तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सकाळी चक्कर येण्याची समस्या निर्माण होते. जाणून घ्या गर्भारपणात कशी घ्याल पुरेशी झोप?

बाळाला संरक्षण मिळावे व तुम्हाला देखील शांत झोप मिळावी यासाठी तुम्हाला कुशीवर झोपण्याचा सल्ला देण्यात येतो.त्यामध्ये देखील उजव्या कुशीवर झोपणे अधिक फायदेशीर असू शकते.कुशीवर झोपल्याने तुमच्या बाळाला नाळेमार्फत पुरेसे ऑक्सिजन व रक्तपुरवठा होतो.काही काळानंतर सवयीने डाव्या कुशीवर झोपणे गरोदर महीलांना आरामदायक वाटू शकते.तसेच गरोदर महीलांसाठी झोपण्याची ही आदर्श स्थिती असते.जर या स्थितीत तुम्हाला आरामदायक वाटत नसेल तर तुमच्या पायाखाली उशी घेऊन झोपण्याचा प्रयत्न करा.त्याचप्रमाणे तुमच्या पोटाला आधार मिळावा यासाठी एखादी छोटी उशी तुम्ही पोटाच्या आधारासाठी घेऊ शकता. नक्की वाचा गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

तुम्हाला पाठीवर झोपावे असे तीव्रतेने वाटत असेल तर अगदी थोडावेळ तुम्ही दोन्ही बाजूने उश्या ठेऊन पाठीवर झोपू शकता.पण जरा आराम वाटू लागला की लगेच पुन्हा कुशीवर झोपा.अस्वस्थपणा,सारखे लघवीला जाणे व अपचन यामुळे तुम्हाला झोप मिळणे अशक्य असते.पण लक्षात ठेवा गरोदरपणी तुमच्या व बाळाच्या संपुर्ण स्वास्थासाठी तुम्हाला शांत झोप येणे खुप गरजेचे असते.यासाठी अस्वस्थ वाटत असेल तरी कुशीवर झोप घेण्याचा प्रयत्न करा हळूहळू याची तुम्हाला सवय होईल.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>