Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’8′कारणांमुळे शरीरावर वाढतात अनावश्यक केस

$
0
0

Hirsutism या समस्येचा मुळापासून विचार करणे गरजे आहे.लक्षात ठेवा ही समस्या जरी त्रासदायक अथवा लाजीरवाणी असली तरी प्राणघातक अजिबात नाही.संशोधकांना या समस्येमध्ये काही स्त्रीयांच्या शरीरावर पुरुषांप्रमाणे लांब,राठ व कुरळे केस आल्याचे आढळून आले आहे.याकरिता अनेकदा वॅक्सिंग, थ्रेडींगचा पर्याय वापरला जातो. पण या समस्येची कारणं जाणून घेतल्यास त्यावर उपचार करणंही सुकर होईल.

स्त्रीयांमध्ये Hirsutism या समस्येमुळे कोणत्या अवयवांवर अनावश्यक केस येतात-

  • ओठांच्या वरती, हनूवटी, चेह-याचा दोन्ही बाजूला
  • छाती व स्तनांग्राच्या बाजूचा भाग
  • पाठीच्या वरचा व खालचा भाग
  • पोटाचा मधला भाग
  • मांड्याच्या आतील भाग व नितंब

Hirsutism  या समस्येसोबत अशा स्त्रीयांमध्ये अनियमित मासिक पाळी,अ‍ॅक्ने,पुरुषांप्रमाणे टक्कल पडणे,आवाजात बदल,स्तनांचा आकार बदलणे ही लक्षणे आढळतात.

शरीरावर अनियमित केस येण्याचे प्रमुख कारण अॅन्ड्रोजन या मेल हॉर्मोनची पातळी वाढणे हे असू शकते.जेव्हा एखादी मुलगी पौडांगवस्थेत येते तेव्हा तिच्यामध्ये मेल व फिमेल अशा दोन्ही हॉर्मोन्सची निर्मिती होते.हे दोन्ही हॉर्मोन्स संतुलित असणे आवश्यक असते.पण जर या दोन्ही हॉर्मोन्सचे संतुलन बिघडले तर हिर्सुटिझम ही समस्या निर्माण होते.स्त्रीबीज निर्मितीमध्ये होणा-या बिघाडामुळे मेल हॉर्मोन्सची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढते व फिमेल हॉर्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात.तसेच अॅडर्नल ग्रंथीमध्ये बिघाड झाल्याने देखील अंगावर अनावश्यक केस येण्याची समस्या निर्माण होते.

अनावश्यक केस येण्याची कारणे-

वांशिकता-

पूर्व आशियायी,उप-सहारा आफ्रिकन,आफ्रिकन-अमेरिकन,मुळ अमेरिकन,व मूळ उत्तर युरोपियन महीलांपेक्षा भारतीय उपखंड व भूमध्य देशातील महीलांमध्ये हिर्सुटिझम समस्या अधिक आढळते.

उपाय-तुम्ही तुमच्या वंश व वांशिकतेवर कोणतेही उपाय करु शकत नाही.त्यामुळे अशा वेळी अनावश्यक केस कमी करण्यासाठी तुम्ही वॅक्सिंग,लेझर उपचार,क्रीम किंवा शेवींग करुन हे केस काढून टाकू शकता.

अनुवंशिकता -

जर तुमच्या आई अथवा बहिणीला हिर्सुटिझम समस्या असल्यास तुम्हाला नको असले तरी या समस्येला तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते.काही वंश परंपरेतील गटामध्ये फार पुर्वीपासून ही समस्या असल्यास तुम्हाला देखील ही समस्या असणे स्वाभाविक असू शकते.लक्षात ठेवा हा कोणताही विकार नसल्याने यात घाबरण्याचे काहीच कारण नाही.

उपाय-जर तुमच्या अंगावरील अनावश्यक केसांमुळे तुमच्या सौदर्यात बाधा येत असेल तर ते केस तुम्ही हेअर रिमूवल टेक्निकच्या सहाय्याने काढून टाकू शकता.

पोलिस्टीक ओव्हरी सिन्ड्रोम-

पीसीओडी ची समस्या असल्यास अनावश्यक केसांसोबत अनियमित मासिक पाळी,अचानक खुप वजन वाढणे,इनफर्टिलीटी व अंडाशयामध्ये गाठी होण्याची लक्षणे देखील आढळतात.पीसीओडीमुळे एलएच या हॉर्मोन्सची पातळी अधिक वाढते ज्यामुळे अंडाशयामध्ये अॅन्ड्रोजन निर्माण होते व हॉर्मोन्समध्ये असमतोल निर्माण होतो.ही समस्या अनुवंशीक देखील असू शकते.

उपाय-पीसीओडीच्या समस्येवर स्त्रीच्या वयानूसार तीला गर्भनिरोधक गोळ्या अथवा हॉर्मोन्स थेरपी देण्यात येेतात.मात्र चांगल्या परिणामांसाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार करणे गरजेचे असते.

कशिंग सिन्ड्रोम-

या विकारामध्ये अनावश्यक केसांसोबत खांदे,चेहरा व त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात.हा विकार शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढल्यामुळे होतो.अॅडर्नल ग्रंथीमध्ये कोर्टिसोल निर्माण होते.मेटाबॉलिजम सोबत ताण,रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी या हॉर्मोन्सची मदत होते.कोर्टिकोस्टिरॉईडच्या अधिक वापरामुळे कशिंग सिन्ड्रोम होऊ शकतो.

उपाय-

या विकारावर उपाय करण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या.यासाठी डॉक्टर तुम्हाला काही औषधे,शस्त्रक्रिया किंवा रेडीएशन थेरपी घेण्याचा सल्ला देतात.त्याचप्रमाणे या समस्येत अनावश्यक केस कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला अॅन्टी-अन्ड्रोजन काही गर्भनिरोधक औषधांसोबत देतात.

Congenital adrenal hyperplasia-

या अनुवंशिक विकारामध्ये कोर्टीसोल कमी निर्माण होते पण adrenocorticotropic या  हॉर्मोनची पातळी वाढते.अनावश्यक केसांसोबत या विकारात अनियमित मासिक पाळी,पुरुषांप्रमाणे टक्कल पडणे,एक्ने ही लक्षणे आढळतात.

उपाय-

यापैकी अनेक समस्यांमध्ये कोणत्याही उपचारांची गरज नसते.कधीकधी अॅन्ड्रोजनची पातळी कमी करण्यासाठी glucocorticoids देण्यात येते.या समस्येमध्ये अनावश्यक केसांची समस्या कमी करण्यासाठी औषधे अथवा लेझर उपचार करणे मात्र कठीण असते.

कर्करोग-

गर्भाशय अथवा अॅडर्नल ग्रंथीच्या कर्करोगामध्ये स्त्रीयांच्या अंगावर अतिरिक्त केस येतात. अॅडर्नल ग्रंथीच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण असते.नेदरलॅन्ड मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार फक्त अॅन्ड्रोजनची पातळी वाढल्यामुळे त्याचे निदान होणे कठीण असते.

उपाय-जेव्हा कर्करोगाचे निदान होते तेव्हा डॉक्टर तुम्हाला उपचार सुरु करतात.

Idiopathic hirsutism-

कोणतेही वैद्यकीय कारण नसताना जर स्त्रीयांमध्ये अनावश्यक केस येत असतील तर त्याला Idiopathic hirsutism असे म्हणतात.ही समस्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा एखाद्या आजाराचे पुर्व लक्षण किंवा फॅमिली हिस्ट्री यामुळे असू शकते.संशोधकाच्या मते अनावश्यक केस येण्याचे कारण केसांच्या रोम छिद्रांची अॅन्ड्रोजनसाठी संवेदनशीलता वाढणे हे देखील असू शकते.

उपाय-

यासाठी अॅन्ड्रोजनच्या कमी निर्मितीसाठी औषधे व काही सौदर्योपचार केले जातात.

Drug induced hirsutism-

काही औषधांमुळे स्त्रीयांच्या अॅन्ड्रोजनवर परिणाम होतो व अनावश्यक केस निर्मिती होते.

काही औषधे-

  • asdehydroepiandrosterone sulfate (DHEA-S), testosterone, danazol, anabolic स्टिरॉईड या औषधांमुळे स्त्रीयांच्या शरीरावर अॅन्ड्रोजेनिक परिणाम होतो ज्यामुळे अनावश्यक केस येऊ शकतात.
  • phenytoin, minoxidil, diazoxide, cyclosporine, streptomycin, psoralen, penicilla mine, high-dose corticosteroids, metyrapone, phenothiazines, acetazola mide, hexachloroben zene या औषधांचा स्त्रीयांच्या शरीरावर अॅन्ड्रोजेनिक परिणाम न झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर अनावश्यक केस येतात.

उपाय-ओरल गर्भनिरोधकांचे प्रमाण कमी केल्याने केस येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

अंगावर खुप केस येत असतील तर जास्त चिंता करु नका.एक साधी रक्तचाचणी,एक्स-रे किंवा अल्ट्रासाउंड परिक्षण करुन तुम्हाला या केस येण्यामागचे कारण कळू शकते.समस्येचे कारण लक्षात घेऊन त्यावर तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले उपचार करा.ब-याचदा यावर उपाय करणे फायदेशीर ठरते.मात्र या थेरपीसांठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने त्यासाठी तयार रहा.

संदर्भ-

http://www.mayoclinic.org/diseases-conditions/hirsutism/basics/causes/con-20028919

http://emedicine.medscape.com/article/1072031-overview#showall

http://www.aafp.org/afp/2003/0615/p2565.html#afp20030615p2565-t1

http://www.nlm.nih.gov/medlineplus/ency/article/002339.htm

http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3039006/

http://www.mayoclinic.org/diseases-conditions/cushing-syndrome/basics/treatment/con-20032115

http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3638754/

http://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJM199410133311502#t=article

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>