निद्रानाश होण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी अती प्रमाणात कॅफेन सेवन केल्याने रात्री झोप येत नाही. त्याचप्रमाणे झोपताना रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहील्यामुळे तुमचा मेंदू कार्यान्वित होऊन निद्रानाश होऊ शकतो. यासाठी निद्रानाश ही समस्या दूर करण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स व योगासने.
सायकॉलॉजिकल कांऊसलर व पर्सनालाईज योगा ट्रेनर अमुल्य आर यांच्या मते पुढे वाकून व शयनस्थितीत केलेल्या काही योगासनांमुळे झोप लागण्यास मदत होते. त्याचप्रमाणे झोपून श्वासावर लक्ष केद्रीत करण्याच्या सरावामुळे देखील यामध्ये चांगला आराम मिळू शकतो.
निद्रानाश टाळण्यासाठी योगासने कसे कार्य करतात-
अमूल्य यांच्या मते श्वास सोडण्याचा कालावधी वाढवल्यामुळे मज्जासंस्थेमधील स्नायूंना संदेश पोचवणारी कार्यप्रणाली कार्यान्वित होते. ही मज्जासंस्थेमधील महत्वाची कार्यप्रणाली असते. त्यामुळे शरीर आरामच्या स्थितीत स्थिरावते. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. जाणून घ्या जायफळ – निद्रानाशावर गुणकारी उपाय
झोप चांगली लागण्यासाठी करा ही योगासने-
पश्चिमोत्तासन-
या आसनामुळे तुम्हाला ताण न येता आराम मिळतो. या आसनात सुरुवातीला जरी तुम्ही अंगठयाला स्पर्श नाही करु शकलात तरी कालांंतराने व सरावाने तुम्ही या आसनातील आदर्शस्थिती नक्कीच गाठू शकता.
- खाली बसा व पाय सरळ रेषेत ठेवा.
- दोन्ही हात डोक्यावर घ्या व पुढच्या दिशेने खाली वाका.
- हाताच्या बोटांनी पायाचा अंगठयाला स्पर्श करा. त्याचबरोबर तुमचे डोके तुमच्या गुडघ्यावर टेकवा.
- खाली वाकताना श्वास बाहेर टाका. आसनस्थितीत काही क्षण श्वास रोखून ठेवा व पुर्वस्थितीत येताना पुन्हा श्वास घ्या.
उत्तानासन-
या आसनस्थितीमुळे डोक्याला रक्तपुरवठा होतो. मेंदूला संदेश पोचवणा-या मज्जासंस्थेच्या कार्यप्रणालीला कार्यान्वित केल्यामुळे शरीराला आराम मिळतो.
- ताठ उभे रहा. श्वास घेत हात डोक्याकडून वर घ्या.
- पुढच्या दिशेने पुर्ण वाका. तुमचे हात जमिनीला टेकतील असे कंबरेतून वाका. डोके गुडघ्याला टेकवा.
- जर तुम्हाला आदर्शस्थिती गाठणे शक्य नसेल तर डोके गुडघ्याजवळ येईल असे वाका. शक्य तितका वेळ या आसनस्थितीत स्थिर रहा.
- पुर्वस्थितीत येताना हळूवार श्वास घेत पुन्हा हात डोक्याच्या दिशेन वर न्या. त्यानंतर पुढच्या दिशेने हात खाली घ्या. हालचाली सावकाश करा. शरीराला धक्का बसणार नाही याची काळजी घ्या. नक्की वाचा रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !
अपनासन-
या आसनामुळे पाठीला आराम मिळतो. मान व मांड्यांचे स्नायू ताणले जातात.
- पाठीवर झोपा व तळहात गुडघ्यांवर ठेवा.
- श्वास घेत पाय छातीच्या दिशेने ओढून घ्या.
- श्वास घेतल्यावर हाताची पकड सैल करा.पाय पुर्णपणे पोटावर असू देत.
- काही क्षण आसनस्थितीत स्थिर रहा.डोळे बंद करा.मनाने श्वास मोजा.
- आराम मिळाल्यानंतर हळूहळू पुर्वस्थितीत या.
सुप्त बद्धकोनासन-
या आसनामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही आराम मिळेल. तसेच पाय व पाठीच्या स्नायूंवर ताण येईल.
- जमिनीवर पाठीवर झोपा.पाय गुडघ्यात वाकवा व टाचा नितंबाच्या दिशेने असू द्या.
- श्वास घेत गुडघे जमिनीच्या दिशेने वळवा. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या.काही काळ आसनस्थितीत आराम करा. आसनस्थितीत काही वेळ श्वासाचा सराव करा.
- पुर्वस्थितीत येताना प्रथम तुमचे हात शरीराजवळ घ्या. गुडघे एकमेकांजवळ घ्या. त्यानंतर पाय सोडून पुर्वस्थितीत या.
- उठण्यासाठी कुशीवर वळा व हातांच्या मदतीने उठा.
शवासन-
- पाठीवर शांत पडून रहा.
- हात शरीराजवळ घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने असावेत.
- शांत पडा व श्वासावर लक्ष केद्रिंत करा.
वर दिलेली आसने कोणी करावीत व कोणी करु नयेत?
निरोगी शरीर प्रकृती असलेली कोणतीही व्यक्ती तिच्या शारीरिक क्षमतेनूसार ही योगासने करु शकते.पण काही व्यक्तींना ही आसने न करण्याचा सल्ला देण्यात येतो. स्पॉन्डीलायटीस व उच्च रक्तदाब असणा-या लोकांनी पुढे वाकणारी योगासने करणे टाळावे.पाठीच्या मणक्याचा त्रास असणा-या लोकांनी देखील ही आसने योगतज्ञांच्या सल्ल्यानूसारच करावीत. तसेच आसन करताना जास्त ताण घेऊन आसने करु नयेत. आसन करताना तुम्हाला कोणताही त्रास जाणवत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरप्रकृतीमध्ये काहीतरी बिघाड आहे. त्यामुळे आसन करण्यापुर्वी योगतज्ञांचा सल्ला जरुर घ्या. जाणून घ्या निद्रानाशाची समस्या वाढवतात या ’3′ पोषणद्रव्यांची कमतरता !
निद्रानाश होण्याचे नेमके कारण समजल्यास या आसनांचा सराव केल्याने नक्कीच आराम मिळू शकतो. घरी स्वत:च्या मनाने योगासने केल्याने मुळे तुम्हाला योग्य फायदा होईलच असे नाही. यासाठी योगतज्ञांच्या मदतीची आवश्यक्ता असते. त्यामुळे या आसनांचा नीट अभ्यास करुनच ही आसने करा.
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock