Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आयुर्वेदिक उपचारांनी कमी करा केसगळतीचा त्रास

$
0
0

अनेक लोकांना केस गळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.आजकाल वाढत असलेल्या ताण-तणाव व प्रदुषणामुळे केस अधिकच खराब होतात.निरोगी व स्वस्थ केसांसाठी प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्रामध्ये अनेक उपचार सांगितलेले गेले आहेत.केस गळत असल्यास या उपचारांचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो

आयुर्वेद औषधे ही भारतीय परंपरेतील एक उत्तम उपचार पद्धती आहे.ही उपचार पद्धती मानवी ऊर्जाशक्ती,त्रिदोष,नैसर्गिक घटना,जीवनचक्र यावर अवलंबून असते.

मानवी त्रिदोष-

१.वात दोष-वात प्रकृतीचा संबध शरीरातील हवा व पोकळी यांच्याशी येतो.हे तत्व शरीरातील श्वसन,उत्सर्जन व मज्जासंस्थेतील लय याला नियंत्रित करते.

.पित्त दोष-पित्त प्रकृतीचा संबध शरीरातील अग्नी व जल यांच्यासोबत येतो.यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम नियंत्रित होते.

३.कफ दोष-कफ प्रकृतीचा संबध जल व पृथ्वीशी येतो.यातील द्रवपदार्थामुळे मेंदू व मज्जासंस्थेचे संरक्षण होते.

आयुर्वेदानूसार केस गळणे ही पित्तदोषाची समस्या आहे.शरीरात अती प्रमाणात पित्त निर्माण झाल्यामुळे केस गळतात.

केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात-

  • हॉर्मोनल असंतुलन
  • चुकीचा आहार
  • ताण-तणाव,चिंता,निद्रानाश
  • टायफॉईड,मधूमेह,व्हायरल इनफेक्शन,फंगल इनफेक्शन यासारखे विकार
  • कोंडा होणे
  • तेलग्रंथीच्या अतीस्त्रावामुळे त्वचेची छिद्रे बंद होणे
  • अनुवंशिकता

आयुर्वेदामध्ये केस गळणे थांबवण्यासाठी काही औषधांचे मिश्रण,पथ्थे व काही उपचार केले जातात.यासाठी तुमचे आयुर्वेदीक तज्ञ सर्वप्रथम तुमचा आहार व जीवनशैली जाणून घेऊन तुमच्या पित्त दोषातील समस्या जाणून घेतात.जर तुम्ही खुप तेलकट व अती तिखट खाद्यपदार्थ खात असाल तर त्यामुळे तुमचे केस गळू शकतात.अथवा तुम्ही धुम्रपान करत असाल तर कदाचित त्यामुळे तुमचे केस गळू शकतात.किंवा तुमच्या आहारात अती साखरेचे प्रमाण असणे देखील याचे एक कारण असू शकते. नक्की वाचा केसगळती रोखणारा ‘वन मिनिट’ उपाय !

आयुर्वेदीक आहार-

नैसर्गिक अन्नघटकांतील पोषकतत्वांमुळे केसांचे देखील पोषण होते.

  • विटामिन बी आणि विटामिन सी,झिंक आणि सल्फरमुळे केस मजबूत होतात व केस गळत नाहीत.हे पोषकतत्व कडधान्ये,ताक,दूध,सुकामेवा,सोयाबीन व तृणधान्यांमध्ये असतात
  • लॅट्यूस,गाजर आणि पालकच्या ताजा रसामुळे केस वाढतात
  • फळे,हिरव्या पालेभाज्या अशा भरपूर फायबर घटक असलेल्या पदार्थांमुळे केस गळत नाहीत
  • मॅग्नेशियम व कॅल्शियममुळे केस गळण्यापासून संरक्षण होते. ते तुम्हाला पांढ-या तीळांमध्ये सहज उपलब्ध असते.यासाठी एक चमचा तीळ दररोज सकाळी घ्या व स्वत:च फरक पहा.
  • योगर्ट हे केस गळण्यावर उत्तम कंडीश्नर आहे.यासाठी दररोज योगर्ट खा व आठवड्यातून एकदा केसांवर लावा.
  • जर तुमचे पोट व्यवस्थित नसेल तर डॉक्टर तुम्हाला त्रिफळाचुर्ण घ्यायला सांगतात.यासाठी झोपताना एक चमचा त्रिफळचुर्ण कोमट पाण्यासोबत घ्या.

हेअर मसाज-

ब्राम्ही तेल,आवळा तेल,नारळाचे तेल अथवा अर्निका तेलाने केसांना मसाज केल्यास केस कमी गळतात.आयुर्वेदीक तेल मसाजामध्ये यापैकी एक अथवा अधिक तेल व काही औषधी घटकांचा वापर करण्यात येतो.तुमचे आयुर्वेदीक डॉक्टर तुमच्या केस गळण्याचे कारण शोधून तुम्हाला योग्य ते तेल वापरण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा

या काही आयुर्वेदीक औषधी घटकांमुळे केस गळणे कमी होते व केसांची चांगली वाढ होते-

भृगंराज-भृगंराज मधील औषधी गुणधर्मामुळे केस गळणे थांबून केस वाढतात.त्याचप्रमाणे केस लवकर पांढरे होत नाहीत.नुकत्याच गुजरात येथे करण्यात आलेल्या एका संशोधनात ट्रिचप हर्बल हेअर प्रॉडक्टस मध्ये ब्राम्ही,भृंगराज,आवळा,कोरफड,कडूलिंब,जटमानसी,हीना आणि इतर औषधी घटक वापरण्यात आल्याचे आढळून आले.यामुळे केसांचा कोंडा कमी होतो,स्प्लिट कमी होतात व केस कमी प्रमाणात गळतात.

सागवानी लाकडाचा अर्क-अनेक वर्षांपासून सागवान लाकडाच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी वापरण्यात येतात.अलीकडे करण्यात आलेल्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेदा रिसर्चच्या संशोधनात असे आढळून आले आहे की या अर्कामुळे केसांची योग्य वाढ होते. नक्की वाचा ‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय

जटमानसी-जटमानसीचीच्या मुळांमध्ये ताण दूर करणारे घटक असतात.पारंपरिक भारतीय आयुर्वेदीक औषधांमध्ये व आयुष या आयुर्वेदीक औषधांमध्ये याचा वापर करण्यात येतो.चेन्नईतील एका संशोधनात यामुळे केसांची वाढ होते असे आढळून आले आहे.ताणामुळे देखील कधीकधी केस गळतात त्यामुळे अशा वेळी जटमानसीच्या मुळांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

केस गळण्यावर डॉक्टर तुम्हाला अनेक आयुर्वेदीक औषधे घेण्याचा सल्ला देऊ शकतात.

आयुर्वेदामध्ये केस गळणे थांबविण्यासाठी पंचकर्म उपचार केले जातात.शिरोधन पंचकर्मात पाच थेरपींच्या सहाय्याने तुमच्या शरीर दोषांमध्ये संतुलन आणले जाते व शरीरातील ताण व विषद्रव्ये बाहेर काढून टाकली जातात.यामध्ये तुमच्या कपाळावर २५ मिनीटे सलग कोमट औषधी तेलांची धार सोडण्यात येते.निद्रानाश,अस्थमा व इतर ताण-तणावात्मक समस्येवर त्याचा चांगला परिणाम होतो.यामुळे केस व केसांची त्वचा मजबूत व चमकदार होते व त्यामुळे केस गळणे थांबते.

आयुर्वेद उपचार योगासने व प्राणायमाशिवाय पुर्ण होऊ शकत नाहीत.योगासनांमुळे डोक्यातील रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे केस गळणे कमी होते.सर्वांगासन यासाठी खुप उपयुक्त आसन आहे.आयुर्वेदामुळे केस गळण्याचे कारण समजते व मुळापासून उपाय केल्याने केस गळणे पुर्णपणे थांबते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>