खरंतर सार्वजनिक स्वच्छतागृहाबाहेरून जाताना आपण नाकाला रुमाल लावतो. तर मग ते वापरणे लांबच राहीले. पण अगदीच अडचण असेल तर त्या शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. स्वच्छ स्वच्छतागृहामध्ये ही अनेक किटाणू असतात कारण ते एका दिवसात अनेकांकडून वापरले जाते. पण यापुढे कधी सार्वजनिक स्वच्छतागृह वापरावे लागले तर तोंड वाकडे करू नका. कारण काही छोट्या पण महत्त्वाच्या टीप्स ज्यामुळे आपण इन्फेकशनला प्रतिबंध करू शकतो. आणि त्या टीप्स पाळल्यास सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याचा तुमचा अनुभव अगदीच वाईट ठरणार नाही.
पहिली पायरी: हातात टिशू पेपर घेऊन दरवाजा उघडा किंवा सॅनिटायझर वापरा.
वॉशरूम मध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही दरवाजा उघडता. पण त्या दरवाज्याचा हॅन्डलला अनेकांनी स्पर्श केलेला असल्यामुळे त्यावर किटाणू असण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. म्हणूनच स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडताना टिशु पेपर किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्यामुळे किटाणूंपासून होणाऱ्या आजारांचा धोका कमी होईल.
दुसरी पायरी: टॉयलेट सीट टॉयलेट पेपरने पुसून घ्या.
टॉयलेट मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा टॉयलेट सीट बघा. गरज असल्यास टॉयलेट पेपरने पुसून घ्या. तुम्ही टॉयलेट सीट कव्हर्स देखील वापरू शकता. (फार्मासिसकडे छोट्या पॅक मध्ये उपलब्ध असतात.) ते खिशात किंवा बॅगमध्ये सहज राहत असल्याने कॅरी करणे सुद्धा सोपे आहे.
तिसरी पायरी: Hover over the toilet seat (गरज असल्यास)
जर तुम्हाला ओल्या सीट वर बसणे गैरसोयीचे होत असेल किंवा इन्फेकशन होण्याची भीती वाटत असेल तर सीट वर न बसता थोडे जवळ उभे राहून आपले काम आटपून घ्या. अगदीच गरज असेल तर असे करण्यास काही हरकत नाही.
चौथी पायरी: फ्लश करण्यासाठी टॉयलेट पेपर वापरा:
फ्लशला सगळेच हात लावत असल्याने त्यावर किटाणू असण्याची शक्यता अधिक असते. म्हणून टॉयलेट पेपर हातात घेऊन फ्लश करा.
पाचवी पायरी: फ्लश केल्यावर लगेच टॉयलेट बाहेर पडा:
फ्लश मधून अनेक किटाणू बाहेर पडण्याची संभावना असते. ते किटाणू श्वासावाटे शरीरात जावून इन्फेकशन होण्याची भीती असते. त्यामुळे फ्लश केल्यानंतर टॉयलेट मधून पटकन बाहेर या. किंवा अजून एक पर्याय म्हणजे फ्लश केल्यावर टॉयलेटचे झाकण लावून घ्या. ते लावत असताना टॉयलेट पेपरचा वापर करा. नंतर तो पेपर कचरा पेटीत टाकून द्या.
सहावी पायरी: दरवाजा उडण्यासाठी टॉयलेट पेपर वापरा.
टॉयलेट दरवाजाच्या आतील भागातील हँडलवर बाहेरील हँडलपेक्षा अधिक किटाणू असतात. त्यामुळे दरवाजा उघडताना टॉयलेट पेपर वापरणे अधिक योग्य ठरेल. पण तो पेपर लगेचच कचराकुंडीत टाका.
सातवी पायरी: न विसरता हात धुवा.
हात योग्य पद्धतीने धुणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अधिकतर इन्फेकशन हे हात स्वच्छ न धुतल्यामुळे पसरते. हात धुण्यासाठी साबणापेक्षा हँडवॉश वापरणे जास्त चांगले. कारण साबणामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे इन्फेकशन पसरू शकते.
आठवी पायरी: हात पुसण्यासाठी टिशु पेपर वापरा.
आजकाल सगळीकडे हात कोरडे करण्यासाठी हॅन्डड्रायर्स वापरले जातात. पण तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार टिशू पेपरने हात पुसणे ही अधिक चांगली पद्धत आहे. कारण हॅन्डड्रायरने हात कोरडे होतात पण गरम हवेमुळे बॅक्टेरीया निघून जाण्याऐवजी वाढण्यास मदत होते.
नववी पायरी: सगळ्यात शेवटी परत सॅनिटायझर वापरा.
हात धुवून पुसल्यानंतर सॅनिटायझर लावल्याने बॅक्टरीयाच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो.
कमोड वापरताना या टीप्स आपण पाळू शकतो. पण इंडियन टॉयलेटचा वापर करताना यातील काही पायऱ्या आपल्याला टाळाव्या लागतील.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock