Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात

$
0
0

जगभरात हायपरटेंशन मुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.हायपरटेंशन निर्माण होण्यासाठी जेनेटीक घटक,लठ्ठपणा,अती कोलेस्ट्रॉलचे प्रमाण या गोष्टी कारणीभूत असू शकतात.उच्च रक्तदाब असल्यास हार्ट अटॅक व हार्ट फेल होण्याचा धोका वाढू शकतो.दीर्घ काळापासून असलेल्या हायपरटेंशनमुळे दृष्टी दोष देखील निर्माण होतात.त्याचप्रमाणे  उच्च रक्तदाबाचा हात व पायामधील रक्तपुरवठयावर दुष्परिणाम होतो.उच्च रक्तदाब असल्यास स्ट्रोक,मोठ्या रक्तवाहिनीतून रक्तस्त्राव होणे,गंभीर किडनी विकार होण्याची शक्यता असते.

यासाठी जाणून घ्या उच्चरक्त दाबाचे शरीरावर होणारे परिणाम-

१.रक्तवाहिनी वर परिणाम होतो-

हायपरटेंशममुळे रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कमी होते व त्या कठीण होतात.या समस्येला arteriosclerosis असे म्हणतात.सतत बदलणा-या रक्तदाबामुळे या रक्तवाहिन्या कमजोर होतात व त्यांच्यामध्ये फुगवटे येऊ लागतात.रक्तवाहिन्यांध्ये होणारा हा बिघाड प्राणघातक  देखील असू शकतो.

२.ह्रदयाचे कार्य बंद होणे-

उच्च रक्तदाबामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्या जाड होतात व त्यांचे नुकसान होते.रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट अथवा अडथळे निर्माण होतात व ह्रदयाला रक्तपुरवठा करणे कठीण जाते.सहाजिकच या बिघाडामुळे ह्रदयाच्या कार्यावर परिणाम होतो.त्यामुळे छातीत दुखू लागते ज्याला अॅन्जायना(Angina)असे म्हणतात.रक्तदाब वाढल्यामुळे ह्रदयावर अतिरिक्त दाब येतो व शेवटी ह्रदयाचे काम बंद पडते.

३.मेदूंवर परिणाम होतो-

हायपरटेंशन असल्यास ब्रेन हॅमरेज अथवा स्ट्रोक येण्याचा १० टक्के धोका असू शकतो.संशोधकाच्या मते जर तुमचा रक्तदाब थोडा जरी वाढला तरी त्यामुळे तुम्हाला स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो.हाय बीपीमुळे हार्ट अटॅक व स्ट्रोक येण्याची ८० टक्के शक्यता असते.रक्त दाब वाढल्यास मेंदूमधील लहान रक्तवाहिन्या कमकुवत होतात त्यामुळे त्यांच्यामध्ये बिघाड होऊ शकतो.मेंदूला होण्या-या रक्तप्रवाहामध्ये अडथळा आल्यास सौम्य मानसिक कमजोरी  अथवा स्मृतिभ्रंश(Dementia) होण्याचा धोका असतो.

४.किडनीवर परिणाम होतो-

उच्च रक्तदाबामुळे किडनीमधील रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड होतो ज्यामुळे किडनीला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही व याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो.यामुळे किडनीचे कार्य पुर्ण पणे बंद होऊ शकते. जाणून घ्या किडनी विकारातील या १४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

५.दृष्टी दोष होऊ शकतात- Hypertensive Retinopathy

उच्च रक्तदाबाचा डोळ्यांवर देखील दुष्परिणाम होऊ शकतो.उच्चरक्त दाबामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या होते.डोळ्यातील रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यामुळे दृष्टीदोष अथवा अंधत्व येऊ शकते. नक्की वाचा डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

६.सेक्शूल कार्यक्षमतेवर परिणाम होतो-

उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम शरीराच्या निरनिराळ्या भागावर होतो.पुरुषांच्या पेनिस(जननेद्रिंय)ला पुरवठा करणा-या रक्तवाहिनीवर देखील याचा दुष्परिणाम होतो.पेनिसला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अरुंद होते त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन ही समस्या निर्माण होते.थोडक्यात अशा पुरुषांना सेक्स करताना इरेक्शन नियंत्रित करणे कठीण जाते.त्याचबरोबर उच्च रक्तदाब असणा-या स्त्रीयांमध्येही वजायनाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिनीवर परिणाम झाल्यामुळे योनीमार्ग कोरडा होणे,सेक्स करण्याची ईच्छा कमी होणे या समस्या निर्माण होतात.हायपरटेंशन वर घेण्यात येणा-या औषधांनी ही समस्या अधिक वाढू शकते.काही अॅन्टी-हायपरटेंसिव्ह औषधांमुळे पुरुषांना इरेक्शनमध्ये समस्या व स्त्रीयांमधील सेक्सची ईच्छा कमी झाल्याचे आढळले आहे.

७.गरोदरपणावर दुष्परिणाम होतो-

गरोदरपणात उच्च रक्तदाब असल्यास बाळाला ऑस्किजनचा पुरवठा व पोषण देणा-या जन्मनाळेला रक्तपुरवठा कमी होतो.त्यामुळे बाळाची वाढ कमी होते व कमी वजनाचे बाळ जन्माला येते.गर्भारपणात होणा-या Preeclampsia या समस्येमुळे लघवीवाटे प्रोटीन निघून गेल्यामुळे व इतर अवयवांवर परिणाम झाल्याने बाळ व आई दोघांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते.काही संशोधनानूसार गरोदरपणी असलेल्या उच्च रक्तदाबामुळे गरोदर महीलांना ४० टक्के स्ट्रोक येण्याचा धोका असू शकतो.

८.पायामध्ये वेदना व क्रॅम्प येतात-Peripheral Artery Disease  

दीर्घ काळ उच्च रक्तदाबावर कोणतेही उपचार न केल्यास त्याचा तुमच्या हात व पायांमधील रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो.यामुळे पायांमधील रक्तवाहिन्या अरुंद व कठीण होतात.या समस्येला Peripheral Artery Disease (PAD) असे म्हणतात.यामुळे पायातील रक्ताभिसरणावर दुष्परिणाम होतो व पायामध्ये गोळा येऊन वेदना होतात.

९.झोपेवर परिणाम होतो-

उच्च रक्तदाबाचा तुमच्या झोपेवर देखील परिणाम होतो.काही संशोधनानूसार उच्च रक्तदाब असणा-या लोकांना Obstructive Sleep Apnoea ही समस्या होते.या समस्येमुळे झोपताना श्वसनामध्ये अडथळा येतो ज्यामुळे झोप येत नाही व दिवसभर थकवा जाणवतो. जाणून घ्या शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !

१०.हाडांची झीज होते-

उच्च रक्तदाबामुळे कॅल्शियमच्या चयापचयाच्या कार्यात बिघाड होऊ शकतो.विशेषत: यामुळे वृद्ध महीलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होते.कॅल्शियम कमी झाल्याने सहाजिकच हाडांची झीज होते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>